कौषीतकी उपनिषद आणि काही प्रश्न

माझ्या मुलीला इतिहासाच्या अभ्यासासाठी कौषीतकी उपनिषद आहे. असे लक्षात आले की मुलांना त्याचा संदर्भ आणि थोडाफार अर्थ कळला तरी अधिकाराने त्यावर भाष्य करणे किंवा त्यावर आधारित उत्तरे देणे जमलेले नाही. मला उपनिषदे, अध्यात्म वगैरे गोष्टींमध्ये अजिबात गती नाही. कौषीतकी हा शब्द देखील मी व्यवस्थित लिहिला आहे की नाही याची कल्पना नाही. थोडेफार समजवून दिल्यावर पुढे मला अधिकारवाणीने समजावता येत नाही.

या उपनिषदाचे भाषांतर येथे सापडेल. हेच जसेच्या तसे भाषांतर इतिहासाच्या पुस्तकात आहे आणि या भाषांतरावरून काही प्रश्न विचारले आहेत.

१. ब्राह्मण म्हणजे काय? (यातील ब्राह्मण हा मनुष्य नसून कौषीतकी ब्राह्मण, ऐतेरिय ब्राह्मण मधील ब्राह्मण असावा.)

२. प्राण म्हणजे काय याचा विस्तार करा.

३. या उपनिषदात सांगितलेली अमरत्वाची संकल्पना मृत्यूपश्चात स्वर्ग नरकाच्या कल्पनेतील अंतर स्पष्ट करा.

४.या समाजात अनेक राजे, श्रीमंत वगैरे त्यांचे कर्म बाजूला सारून संन्यासी किंवा ऋषी झाले आणि त्यांनी जगाला जो बोध केला त्यामुळे भारतीय समाजावर कोणते परिणाम झाले?

या प्रश्नांची उत्तरे सध्या शोधतो आहोत पण आणखीही कोणी मदत करू शकल्यास आवडेल.

Comments

आणखी एक भाषांतर

आणखी एक भाषांतर येथेही आहे.

कौशितकी उपनिषद

हा शब्द कौशितकी उपनिषद असा लिहिला पाहिजे असे वाटते. आणखी सांगण्यासारखे मिळाले की ते येथे नंतर लिहिनच.

कल्पना नाही

विकीपिडीयावर कौषीतकि असे लिहिलेले आढळले. मी मराठीकरणाप्रमाणे शेवटची वेलांटी दीर्घ केली.

खाली धनंजय यांनी दिल्याप्रमाणे कौषीतकि असेच लिहायला हवे असे वाटते. :-)

आणखी सांगण्यासारखे मिळाले की ते येथे नंतर लिहिनच.

अवश्य. आभारी आहे.

मराठीत कौषीतकीच!

>खाली धनंजय यांनी दिल्याप्रमाणे कौषीतकि असेच लिहायला हवे असे वाटते.<< नाही. मराठीत लिहिताना कौषीतकी असे लिहिले आहे ते बरोबरच आहे. --वाचक्नवी

धन्यवाद

धन्यवाद. सोबत प्रश्नांच्या उत्तरांवरही प्रकाश टाकता येईल का?

कुठली शाळा?

कशातलेच काहीच माहित नसल्याने मदत करु शकत नाही. क्षमस्व.
रामकृष्ण मठ आहेत का तुमच्या एरियात? त्यांनी सर्व प्रमुख भाषांत ह्यावरील विवेकानंदांची विवेचने प्रसिद्ध केली आहेत.
विवेकानंदांनी दरवेळी विव्वेचन करण्यापूर्वी प्रत्येक ग्रंथ्/पंथ्/विचारधारा/तत्वज्ञान काय म्हणते ते जशाला तसे सांगायचा प्रयत्न केलाय.
स्वैर रुपांतर किंवा भाषांतरच म्हणा ना विचारधारेचं. आणि नंतर मग स्वतःच्या भाष्याची/विवेचनाची सुरुवात केली आहे.
म्हणजे आधी फक्त रिपोर्टिंग शैलीतले ते तत्वज्ञान; आणि नंतर त्यावर्रील टीका/समीक्षा.
ज्ञानयोग, भक्तीयोग, राजयोग, कर्मयोग्,प्रेमयोग ही त्यांच्या भाष्यांची प्रमुख पुस्तके.
त्यापैकी ज्ञानयोगात उपनिषदांची एक एक नावे घेउन त्यावर भाष्ये केलीत असे अंधुकसे आठवते.
प्रामाणिकपणे सांगायचे तर ते मला काहीही समजल्ले नव्हते. पण उपनिषद, (कठोपनिषदापासून ते मांडुक्योपनिश्द वगैरे बरेच), प्राण, तत्वाज्ञानाचे भारतीय समजावरील परिणाम (प्रश्न करमांक दोन, तीन चार) ह्यावर त्यांनी बरेच काही सांगितलेले आहे.(उपनिषदांचे दाखले देउन)
.
शंका:-
बादवे, सदर शाळा नक्की कुठे आहे?
कुठला अभ्यासक्रम आहे?(रेग्युलर अभ्यासक्रमात असे विषय असतात का?)
इयत्ता कुठली म्हणायची?
तुम्ही लेखात विचारलेल्या प्रश्नांमुळे सध्या भारताच्या राजकीय्,सामाजिक आसमंतात मागील दिड दोनशे वर्षापासून बराच गदारोळ आधीच सुरु आहे, विशेषतः पहिल्या आणि चौथ्या प्रश्नामुळे.
शंभर कोटिच्या देशात ह्याची एखाद कोटी तरी उत्तरे नक्कीच मिळतील.

प्रश्नांची उत्तरे

प्रामाणिकपणे सांगायचे तर ते मला काहीही समजल्ले नव्हते. पण उपनिषद, (कठोपनिषदापासून ते मांडुक्योपनिश्द वगैरे बरेच), प्राण, तत्वाज्ञानाचे भारतीय समजावरील परिणाम (प्रश्न करमांक दोन, तीन चार) ह्यावर त्यांनी बरेच काही सांगितलेले आहे.

धन्यवाद. मीही याबाबतीत प्रामाणिकच आहे. :-))

प्रश्नांची उत्तरे वरील संदर्भाला धरून द्यायची आहेत. वरील भाषांतरात चौथा प्रश्न सोडून इतर प्रश्नांची उत्तरे आहेत फक्त ती प्रभावीपणे मांडावी कशी हे मला जमत नाही.

रेग्युलर अभ्यासक्रमात इतके खोलवर संदर्भ आणि प्रश्न नसतात. हा कॉलेज कोर्स आहे आणि करणे भाग आहे. :-(

ब्राह्मण

१." ब्राह्मण म्हणजे काय? (यातील ब्राह्मण हा मनुष्य नसून कौषीतकी ब्राह्मण, ऐतेरिय ब्राह्मण मधील ब्राह्मण अ"

..जे इंग्लिश भाषांतर आहे त्यात Brahman हा शब्द मुख्यत्वेकरून
ब्रह्मन (ब्रह्म,परब्रह्म,) या अर्थी आलेला आहे.प्रश्नात तोच अर्थ अपेक्षित
असावा.ब्राह्मणें,आरण्यके,उपनिषदे हे प्रत्येक वेदाचे भाग आहेत.
त्यांतील अंतिम भाग म्हणजे उपनिषदे.म्हणून उपनिषदांतील तत्त्वज्ञा
नाला वेदान्त असे म्हणतात.कौषीतकी हे गौण (minor) उपनिषद आहे
प्रमुख अकरा उपनिषदांत त्याचा समावेश नाही.अद्यापि वाचनात आले
नव्हते..तुम्ही दिलेल्या दुव्यावर भाषांतर वाचले.चांगले आहे.

मॅक्स म्युलरच्या इंग्रजी भाषांतराचा दुवा

मॅक्स म्युलरच्या इंग्रजी भाषांतराचा दुवा

मोनिएर विल्यम्स शब्दकोशात "कौषीतकि" असा शब्द दिसतो.

संस्कृत मूळपाठ्याची पीडीएफ प्रत येथे मिळेल : (दुवा)

१. उपनिषदाच्या नावातील "ब्राह्मण" शब्द वेदाचा (गद्य) विभाग या अर्थाने आहे. परंतु उपनिषदाच्या अंतर्गत असलेल्या उल्लेखांत तो अर्थ नव्हे. बहुधा ब्राह्मण नावाच्या लोकांबाबत उल्लेख आहे. (अंतर्गत उल्लेख २:९ पञ्चमुखोऽसि प्रजापतिर् ब्राह्मणस्त एकं मुखम् ... राजा त एकं मुखम् ... श्येनस्त एकं मुखम् ... अग्निस्त एकं मुखम् ... सर्वाणि भूतानि ... पञ्चमं मुखम् ... ।)

२. प्राण म्हणजे नाका-फुप्फुसातला हलणारा वायू हा नेहमीचा अर्थ बहुधा चालून जाईल.

३. मृत्यूनंतरची गती : मॅक्स म्युलरच्या भाषांतरात पहिल्या अध्यायाखालील तळटीप २७१:५ बघण्यालायक आहे.

४. समाजावर परिणाम : हा प्रश्न बहुधा या उपनिषदातील पाठ्याच्या मर्यादेबाहेरचा आहे.

ब्राह्मण, प्राण

१. ब्राह्मणच्या खुलाशाबद्दल धन्यवाद. मनुष्य दाखवायचा असेल तर Brahmin म्हणतात पण इथे Brahman असे स्पेलिंग असल्याने ते वेदातील गद्य भाग, येथे गुरु-शिष्यांतील चर्चा असा मी आता घेते. चू. भू. द्या. घ्या.

२. वरील भाष्यावरून प्राण म्हणजे श्वास असावा असे मला वाटले होते पण ते वरील भाष्यात तेवढेच मर्यादित आहे काय?

३. वाचते.

४. हो. हा प्रश्न भारताच्या उर्वरित धड्यांच्या अनुषंगाने आला असावा पण तो आला या धड्यात आणि याचे उत्तरही मर्यादित नाही. नेमके काय उत्तर द्यावे मला कळत नाही.

उत्तर

मी तुमचा प्रश्न एक व्यक्ती कडे पाठविला जिचा संस्क्रुत, वेद, पुराण, उपनिषदे इत्यादीचा सखोल अभ्यास आहे. त्या व्यक्तिने हा विषय कालेजच्या अभ्यासक्रमात लावल्या बद्दल आश्चर्य व्यक्त करीत थेट तुम्हाला उत्तर देण्याची तयारी दाखविली. पण त्या करता तिचा ईमेल तुम्हाला या ओपन फोरम मधे पाठवावा लागेल. किंवा तुमचा या ओपन फोरम मधून मागवावा लागेल. ते टाळण्या करता, जर तुमचा प्रश्न अजून अनुत्तरीत असेल, तर मला cmpandit@yahoo.com या पत्त्या वर मेल पाठवावी म्हणजे मी तुम्हा दोघांची ई-गाठ घालून देईन.

धन्यवाद

सदर अभ्यासक्रम कॉलेजचा असला तरी काही विद्यार्थ्यांना इयत्ता ९वी १०वी मध्ये शिकवला जातो. जागतिक इतिहासात रामायण, वेद, उपनिषदे आणि महाभारत यांच्यातील काही भाग अभ्यासाला आहेत इतकेच नव्हे तर इंग्रजी शिकताना "साहित्य" म्हणून एक अधिकचे पुस्तक अभ्यासाला आहे त्यात पुन्हा उपनिषदे, महाभारत, रामायण अभ्यासाला आहेत. पण यातला एक भाग हा ही आहे की शिकवणारे काही संस्कृत किंवा भारतीय साहित्याचे अधिकारी नाहीत.

मी तुम्हाला निरोप पाठवते उपक्रमवर त्यात इमेल देते. मला विशेषतः ४थ्या प्रश्नाचे उत्तर माझ्या स्वतःच्या समाधानासाठीही हवे आहे. त्या उत्तराचा आवाका बराच मोठा वाटतो.

बाकी, संस्कृत जाणकारांची संख्या उपक्रमवर कमी नाही. फक्त वेळ आली की ते गायब असतात. सर्वांनी ह. घ्या.

 
^ वर