समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }
वैश्य म्हणजे व्यापार करणारे, विविध प्रकारचे उद्योग धंदे करणारे आणि आपल्या साहित्य, मालमत्ता यांच्या रक्षणासाठी त्यातील नफ्याचा काही भाग कराद्वारे राजसत्तेला देणारे.

राजकारण = नोकरी , धंदा करुन हळुहळू/परंपरेने प्राप्त अर्जितावर "साम-ताम-दंड-भेद" द्वारे सत्ता प्राप्त करुन गाव-शहर-तालुका-राज्य-देश चालवणारे..... धूर्त सत्ताधारी मंडळी !{ स्वतःचे व स्व-अनुयायांचे सामर्थ्य दाखवणे व सत्ता काबिज करण्यात सुख मानणारे }
क्षत्रिय म्हणजे समाज व्यवस्था नीट चालावी म्हणून असणारा विश्वस्त अधिकारी, समाज रक्षण करणे, व्यवस्था नीट सांभाळणे इ. त्याची कामे.

समाजकारण = सत्य-अहिंसा-आदि तत्त्वांद्वारे समाजाचे मंगल ईच्छिणारे... धर्मरत...धर्म = मानव धर्म !..... असे सर्व ज्ञान-समुद्रा बुडुन "सर्वे सुखिनः सन्तु..." अशी कामना ठेवणारा..... स्थिरबुद्धी वर्ग !!{ स्वतः पुर्वी सर्व जगाच्या कल्याणात इच्छिण्यात सुख मानणारे }
ब्राह्मण म्हणजे यजन, याजन - यज्ञ करणारा आणि करवून घेणारा, अध्ययन अध्यापन करणारा, दान देणारा (ज्ञानदान, यज्ञदान, औषधांबद्दलचे ज्ञान वापरुन जीवनदान करणारा इ.) आणि घेणारा असा असणे अपेक्षित होते.

आता ह्या वर्गांस तुम्ही काहीही नाव द्या.....
माझ्या मते मनुंनी त्यांस सर्वश्रुत चतुर्वर्ण व्यवस्था म्हणून नाव दिले. अर्थात ज्यांस हे पटत नाही ते विरोध करतात व ज्यांस हे पटते ते समर्थन !!

अर्थशास्र , समाजशास्र व नागरिकशास्र वेगवेगळे शिकवून चालत नाही ! नीट एकत्र अभ्यास करणार्‍याचे मत जाणून घेण्यास आवडेल.

एखाद्या मिल मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यापेक्षा(wokrers)..... अधिकार्‍यास (officers)व त्यापेक्षा अध्यक्षास (president) जास्त कळतं की कंपनी प्रोफिट मध्ये आहे की लॉस मध्ये व तो तो त्या त्या दिशेने प्रयत्न करतो....आणि ह्या सर्वांना योग्य संयमित नियम ठरवून -एक सर्वकल्याणकारी वेग व दिशा देण्याचे काम कोणी तरी एक बुद्धीवान (orgniser/thinktank)करतो...

हे सर्व काही आपाअपल्या बुद्धी - स्वभाव -कर्तृत्वाव अवलंबून आहे की आपण कोणत्या वर्गात राहून आपले उदरभरण करतो...सुख कशात मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याने आपण स्वतःच ते ते वर्ग ग्रहण करतो....

सारांश असा, सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि आजही चारी वर्ण अजूनही अस्तित्वात आहेत ते पुढील प्रमाणे १) नोकरी=शुद्र, २) धंदा=वैश्य, ३) राजकारण=क्षत्रिय व ४) समाजकारण=ब्राम्हण काही शंका???

Comments

एक दुरुस्ती > शूद्र म्हणजे...

शूद्र म्हणजे खालील सर्व स्तरांना सेवा पुरवणारे, सर्वांना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे. असे वाचावे.

मनू

माझ्या मते मनुंनी त्यांस सर्वश्रुत चतुर्वर्ण व्यवस्था म्हणून नाव दिले. अर्थात ज्यांस हे पटत नाही ते विरोध करतात व ज्यांस हे पटते ते समर्थन !!

मनू जर "चातुर्वर्ण व्यवस्था" असे नाव देऊन थांबला असता, तर काही हरकत नव्हती. कारण जगातील सगळ्याच संस्कृतीतील समाजांत हे स्तर होते, असतात आणि राहतील.

मनुने ह्या स्तरांना "जन्माधारीत" तर बनवलेच वर त्याला "धर्माचे अधिष्ठान" दिले.

अनेकांचा आक्षेप आहे तो ह्याला! कारण त्यामुळे निम्नस्तरीयांना स्वतःची प्रगती करणेच अशक्य झाले.

समाज व्यवस्था

मनुने ह्या स्तरांना "जन्माधारीत" तर बनवलेच वर त्याला "धर्माचे अधिष्ठान" दिले.
समाज व्यवस्था जन्मावर नसुन कर्मावर आधारीत आहे. मनुनेही ह्या स्तरांना "जन्माधारीत" बनवले पण "धर्माचे अधिष्ठान" दिले नाही, म्हणून त्याचे आभार मानायला काही हरकत नसावी. त्याने दोनच धर्म सांगितले आहेत.

जातीव्यवस्था

मनुनेही ह्या स्तरांना "जन्माधारीत" बनवले

हे तर मान्य आहे ना!

मग ह्या एकाच गोष्टीसाठीदेखिल मनुला त्याज्य का मानू नये? कारण ह्याचेच पर्यवसान पुढे बळकट (आणि हीन) अशा जातीव्यवस्थेत झाले ना?

आता उरला प्रश्न धर्माच्या अधिष्ठानाचा.

आंबेडकरांनी त्यांच्या "हू वेअर शूद्राज" ह्या ग्रंथाच्या पहिल्याच प्रकरणात मनुच्या पुरुषसूक्ताची जी चीरफाड केली आहे, ती जमल्यास वाचा. पटण्यासारखी आहे.

सर्वात आधी वर्ण व्यवस्था.

मग ह्या एकाच गोष्टीसाठीदेखिल मनुला त्याज्य का मानू नये? कारण ह्याचेच पर्यवसान पुढे बळकट (आणि हीन) अशा जातीव्यवस्थेत झाले ना?
मानले, मनुला त्याज्य मानले, पण समाज व्यवस्था सर्वात आधी कोणी निर्माण केली तो मनु आहे. नंतर त्याचे सारखे कोणीही करु लागले. म्हणून जगात अनेक जाती, धर्म निर्माण होऊन वाद सुरु झाले.

बरं मग?

आताच्या शूद्रांना कोण कोणत्या गोष्टींपासून वंचित करायचे?

शूद्रांना वंचित.

नोकरी, मग ती कोणतीही असो व कितीही पगाराची असो हाच ज्याचा स्थायीभाव आहे तो क्षुद्र असे मनुस्मृतीतच सांगितले आहे. म्हणून जे सेवा देतात ते क्षुद्रच आहेत. यात कोणाला कमीपणा मानण्याचा प्रश्न नाही. कारण सेवा नसेल तर कुठलीही व्यवस्था तग धरू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या वाणिज्य विषयात सुद्धा aids to trade या गोष्टीला खूप महत्व आहे.

क्षुद्र की शूद्र?

नोकरी, मग ती कोणतीही असो व कितीही पगाराची असो हाच ज्याचा स्थायीभाव आहे तो क्षुद्र असे मनुस्मृतीतच सांगितले आहे. म्हणून जे सेवा देतात ते क्षुद्रच आहेत.

शूद्र की क्षुद्र? शब्द कोणता वापरता यावर बरेच अवलंबून आहे. क्षुद्र म्हणायचे की शूद्र ते ठरवा मग कमीपणाचे बघता येईल. जेव्हा एखाद्या गोष्टीला इतका पूर्वेतिहास असतो तेव्हा मनू म्हणाला ते खरे होते हा सांगण्याचा अट्टाहास बालिश दिसतो.

शूद्र...शूद्र...शूद्र...शूद्रच

जेव्हा एखाद्या गोष्टीला इतका पूर्वेतिहास असतो तेव्हा मनू म्हणाला ते खरे होते हा सांगण्याचा अट्टाहास बालिश दिसतो.
बाई, बालिशपणा जाऊ द्या, मनूलाही सोडा. सध्याच्या समाजाचे निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि आजही चारी वर्ण अजूनही अस्तित्वात आहेत ते पुढील प्रमाणे १) नोकरी=शुद्र, २) धंदा=वैश्य, ३) राजकारण=क्षत्रिय व ४) समाजकारण=ब्राम्हण काही शंका???

वर्ण व्यवस्था

नोकरदार, राजकारणी, विद्वान वगैरेंची व्यवस्था जगात इतरत्रही रुजू होती. त्यामुळे केवळ नाव देण्यासाठी त्या व्यवस्थांनाही वर्ण व्यवस्था वगैरे म्हणता येईल पण ते तसे नाही. तसेच, आताची जी व्यवस्था आहे तिलाही वर्णव्यवस्था म्हणता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात "वर्ण" वगैरे काही नाही.

केवळ नाव नाही.

या व्यवस्थांना केवळ नाव नाही तर १) नोकरी, २) धंदा, ३) राजकारण व ४) समाजकारण. हे चार प्रकारचेच लोक आज समाजात आहेत. बाकीच्यांना व्यवस्था म्हणता येणार नाही व त्याला काही अर्थही नाही. यात कोणीच कोणताही बदल करायला राजी नाहीत.

वर्ण, जात, धर्म...

वर्ण, जात, धर्म... समाज व्यवस्था जन्मावर नसुन कर्मावर आधारीत आहे. खरे तर हिंदू नावाचा धर्मच मुळचा नव्हता काही लोकांनी तो निर्माण केला. आजही दोनच धर्म आहेत. एक स्त्रि व दुसरा पुरुष नाटक बस झाले. आजच्या सामजाने हे मान्यही केले आहे.
कोणाला कोण कोणत्या गोष्टींपासून वंचित करायचे? हा प्रश्नच नाही.

क्षमा असावी ...

क्षमा असावी ....पण आपली कुठेतरी गल्लत होतेय. आपले निरीक्षण अगदी बरोबर आहे. यान तिळमात्रही शंका नाही. याच पद्धतीने जगात सर्व व्यवस्था चाललेल्या आहे. हा एक मानवी स्वभाव आहे.पण हे जाती व्यवस्थेचे समर्थन असू शकत नाही. आपण कुठला मार्ग निवडावा याचे स्वातंत्र्य ज्याला त्याला असावे. त्यावर कुठल्याही नियमांचे (उदा. जात, धर्म, वर्ण इ. ) बंधन नसावे. शंका तिथे येते जेव्हा जन्माच्या आधीपासूनच हे नक्की असत कि अमुक शुद्र आहे कि क्षत्रिय आहे की ब्राम्हण आहे. काही संधर्भांनुसार जाती व्यवस्था निर्माण करण्याचा हेतू हा समाज व्यवस्थेची घडण घालण्यासाठी झाला होता आणि गुणांनुसार त्याचे वर्गीकरण होते. यात एका वर्गातून दुसर्या वर्गात जाण्याची मुभा होती. वाल्मिकी हे त्याचेच एक उदाहरण आहे. म्हणजेच ते वर्ग जन्मानुसार नाही तर कर्मानुसार ठरविले जायचे .आता हे कोण ठरवायचे याचे समाधानकारक उत्तर सध्यातरी माझ्याकडे नाही...

समाधानकारक उत्तर?

म्हणजेच ते वर्ग जन्मानुसार नाही तर कर्मानुसार ठरविले जायचे .आता हे कोण ठरवायचे याचे समाधानकारक उत्तर सध्यातरी माझ्याकडे नाही...
समाज व्यवस्था जन्मावर नसुन कर्मावर आधारीत आहे, असा नियम होता परंतू कालांतराने ही समाज व्यवस्था नेमकी ऊलटी म्हणजे कर्मावर नसुन जन्मावर आधारीत काही हुशार लोकांनी समाजकारण करताना स्वत:च्या फायद्यासाठी केली व त्यामुळे याचे समाधानकारक उत्तर आपल्याकडेच आहे.

जातीव्यवस्थेचे एक कारण

भारतात जातीव्यवस्था आहे त्याचे एक कारण जे मला वाटते ते असे आहे

भारतीय समाज हा कधीच एकसंध समाज नव्हता. १००००-५००० वर्षा पासुन इथे वेगवेगळ्या वंशाची लोके येउन रहात आहेत. त्यामुळे एका वंशाच्या लोकांना दुसर्‍या वंशाच्या लोकांबद्दल जी असुरक्षीतता वाटते त्यामुळे आपला वंश अलग ठेवण्याच्या अट्टाहासातुन तशा तशा जाती होत गेल्या.
नुस्त्या कर्मावरुन जाती ठरल्या नसाव्यात. कारण लोहार, सुतार, क्षत्रीय, सोनार, ब्राह्मण अश्या सगळ्या जातींमधे पोट्जाती आहेत आणि त्या एकमेकांशी पूर्णपणे फटकून वागतात.
माझ्यामते ज्या आक्रमक आणि जेते वंश होते त्यांनी जातीच्या उतरंडितील वरच्या जाती पटकवल्या. हारलेल्या, जिंकल्या गेलेल्या वंशाला खालच्या जातीत ढकलण्यात आले. ही हारजीत पण बदलत राहीली.

चीन मधे ९५% लोक हान वंशीय आहेत, त्यामुळे तिथे जाती नाहीत.

जगात वादाला तोंड फुट्ले.

समाज व्यवस्था जन्मावर नसुन कर्मावर आधारीत आहे, असा नियम होता परंतू कालांतराने ही समाज व्यवस्था नेमकी ऊलटी केल्याने नुसती वर्ण व्यवस्थाच बिघडली नाही तर काही जातीही निर्माण झाल्या एवढेच नाही तर धर्मही निर्माण झाले व जगात वादाला तोंड फुट्ले.

काही शंका व प्रश्न

श्री. समतादर्शनजी,

मला कळ्लेला आपल्या लेखाचा अर्थ असा की, हे वर्ण अजूनही अस्तित्वात आहेत, "भले ते कोणी किती का नाकारो!". नाकारण्याची कारणे काही का असेनात. पण मुद्दा असा आहे की, हे मान्य केले, तर आपण त्याला काही करू शकत नाही, असे समाजाला वाटू लागते व तो आपला स्वत:चा वर्णही नैसर्गिक गोष्ट असल्यासारखा मान्य करून वागू लागतो. हजारो वर्षे दलित बांधव त्याचमुळे संघर्ष करायलाच नाकारत गेले. इथेच शोषण, अन्याय ई. सुरू होतो व कायम राहण्याची व्यवस्था होते.
काही प्रश्नः

  • सर्व लहान मुले एकसारखाच जीवनक्रम जगतात. म्हणजे नोकरीवाल्याचे मूल जे करते, तेच राजकारण्याचे मूलही करते. मग त्यांचा वर्ण कोणता?
    हीच गोष्ट गृहिणीं, म्हातार्‍यांबाबतही म्हणता येईल. म्हणजे, वर्ण ही कल्पना फक्त समाजातल्या तरूण पुरूषांचे वर्गीकरण आहे काय?
    प्रौढ झाल्यावर नोकरदाराला वा समाजकारण करणार्‍याला, सर्वांनाच बहुसंख्य गोष्टी समानच कराव्या लागतात. उदा. दोघांनाही आपल्या मुलांची, आईवडीलांची सेवा करावी लागते, हाताखालच्या लोकांना शिकवावे लागते, रस्त्यात संघर्ष करायची वेळ आली तर आपले संरक्षण हे एकाच व्यक्तीला करावे लागते. हे अपवादात्मक प्रसंग नसून नेहमीचे जीवन आहे, मग व्यक्तीच्या या प्रकारच्या वर्णाचा रिलेव्हन्स काय?
    वर्णभेद जेंव्हा घट्ट होत गेला, त्यानंतर भारतावर सतत परकीय आक्रमणे येत गेली. अनेकांनी इथे येऊन राज्य केले. त्याचे कारण वर्ण मानणार्‍या समाजरचनेत तर नसेल? असा मला प्र्श्न पडतो. परकीय आक्रमण आले, तर लढायचे काम माझे नाही. ते क्षत्रिय बघून घेतील. मी जिंकणार्‍यांची सेवा करायला, त्यांच्याशी धंदा करायला, त्यांच्यासाठी यज्ञ करायला - थोडक्यात माझ्या वर्णधर्माप्रमाणे आचरण करायला मोकळा.

म्हणून मला वाटते की वर्ण हे समाजात असतातच, अशा प्रकारचे प्रतिपादन समाजाच्या हिताचे नाही.
-स्वधर्म

विवेचन मनापासून आवडले...

"वर्णभेद जेंव्हा घट्ट होत गेला, त्यानंतर भारतावर सतत परकीय आक्रमणे येत गेली. अनेकांनी इथे येऊन राज्य केले. त्याचे कारण वर्ण मानणार्‍या समाजरचनेत तर नसेल? " आपला हा प्रश्न मला अगदी योग्य आणि विचार करायला लावणारा वाटला. आपण मांडलेले विचार अतिशय तर्क शुद्ध वाटले. वर्ण म्हणजे जोपर्यंत आपल्यात ताकद, सत्ता व पैसा आहे तिथपर्यंतच टिकाव धरू शकतात आणि नंतर जेव्हा जगण्याशी युद्ध सुरु होते तेव्हा सर्व समान ....हा कुठला न्याय !!! आपले विवेचन मनापासून आवडले...

किंचित असहमत.

वर्णभेद जेंव्हा घट्ट होत गेला, त्यानंतर भारतावर सतत परकीय आक्रमणे येत गेली.
असहमत. गेल्या ह़जार वर्षांत केवळ भारतावरच आक्रमणे झाली असे नव्हे. पर्शिया (सध्याचा इराण, अफ्घानिस्तान) वर झालेले मंगोल आक्रमण म्हणजे क्रौर्याची आणि नृशंसतेची परिसीमा होती. असे म्हणतात की तेराव्या शतकात जी कत्तल झाली त्यामुळे घटलेली इराणची लोकसंख्या १९३०पर्यंत भरून आली नव्हती. योरप मध्येही शेजारील राष्ट्रांची आपापसांत आक्रमणे आणि लढाया यांनी मध्ययुग व्यापले आहे. त्यातल्या त्यात एकोणिसावे शतक जरासे शांततेत जाते न जाते (ऑस्ट्रो-प्रशिअन युद्धांचा अपवाद) तोच विसाव्या शतकात आधी बोअर युद्ध,नंतर धाडकन दोन महायुद्धे, नंतर कोरियन युद्ध, विएत्नाम युद्ध, इराण्-इराक युद्ध, अमेरिका-इराक युद्ध, रशिआ-अफ्घानिस्तान आक्रमण, अमेरिका-अफ्घानिस्तान युद्ध अशी मालिकाच लागली. त्यात भर आपल्या भारत-चीन/पाकिस्तान युद्धांची. मुद्दा असा आहे की जेव्हा संस्कृती विकासाच्या तत्कालीन शिखरावर पोचते तेव्हा आत्मसंतुष्टता येते आणि चक्रनेमिक्रमाने ती संस्कृती खाली जाणे क्रमप्राप्त असते. तसे नसते तर महाबलाढ्य रोमन साम्राज्य,ऑटोमन साम्राज्य, ब्रिटिश एम्पायर, मुघल साम्राज्य ही सर्व लयाला गेली नसती. कॉम्प्लेसन्सी, डेकेडन्स ह्या दुर्गुणांमुळे संस्कृतीचा र्‍हास आणि विनाश होतो. आपल्याकडील वर्ण/जातिव्यवस्था हे समाज विस्कळित होण्याचे एक कारण आहे हे खरे पण एकूण समाजाला आलेली मरगळ आणि सुस्ती हेसुद्धा तितकेच मोठे कारण आहे. एकंदर ज्ञानपिपासा लयाला जाणे ही र्‍हासपर्वाची खूण आणि सुरुवात असते.
एखादी प्रगत संस्कृती अथवा सुघटित समाजव्यवस्था लयाला का जाते - तिच्यामध्ये वरील दुर्गुणांचा प्रादुर्भाव का व कसा होतो हे भल्या भल्या इतिहासकारांना पडलेले कोडे आहे.

आत्मसंतुष्टता

आत्मसन्तुष्टतेचा मुद्दा योग्य आहे. एखादी संस्कृती शिखरावर जाण्याचे कारण तिला त्यावेळी विशेष असा शत्रू उरत नाही बहुधा असे असते. ज्यावेळी आपण सुरक्षित आहोत ही भावना वाढते तेव्हा शस्त्रास्त्रे, सैन्य वगैरेंवर होणारा खर्च आणि लक्ष काढले जाते आणि ती शक्ती कला, शेती, संशोधन, कायदा आणि सुव्यवस्था याकडे वळते. असे अनेकदा दिसून येते की शिखरावर पोहोचलेल्या अनेक संस्कृती एखाद्या लहानशा रानटी टोळ्यांकडून हरल्या आहेत. त्याचे कारण मरगळ हे नसून सुव्यवस्था - कायदा वगैरे अंमलात आणल्याने क्रौर्य, शत्रूचा समूळ विनाश वगैरेंकडे सहिष्णुतेने पाहिले जाते.

खरे आहे.

सुसंस्कृत होणे याचा अर्थच मुळी क्रौर्य,रानटीपणा जाऊन त्याऐवजी प्रेम,विवेक,संयम, क्षमा हे गुण अंगी बाणणे. तमोगुण नष्ट होणे. अरे ला कारे करणे, क्षुल्लक कारणावरून हातघाईला येणे या दुष्प्रवृत्ती नष्ट होणे. असा समाज आदिम रानटी टोळ्यांसमोर हतबल होतो. खोट्या नाण्याने खर्‍या नाण्यांना चलनातून बाद करावे किंवा जंगली वाणांनी बागेत जोपासलेल्या वाणांवर कीडप्रतिकारात आघाडी घ्यावी तसेच हे.

आक्रमणे व संस्कृती लयाला जाणे

राही,
आक्रमणे व संस्कृती लयाला जाणे याचा आपण संबंध जोडला आहे, तो मला नेमका उलटा वाटतो. म्हणजे संस्कृती लयाला गेल्यामुळे, आक्रमणे झाली, असे नसून आक्रमणे झाल्यामुळे, व भारताचा परकियांकडून पराभव झाल्यामुळे संस्कृती लयाला गेली, असे वाटते. संस्कृती लयाला का गेली हा मोठा व महत्त्वाचा विषय जरी असला, तरी पराभव होणे, हे कारण आहे व संस्कृती लयाला जाणे हा परिणाम! भारतावर जी आक्रमणे सतत झाली व त्याला भारताने जो प्रतिसाद दिला तो, वर्णाश्रमाच्या पगड्याशी संबंधीत आहे का, हा मुद्दा आहे.

पर्शिया, युरोप इ. इतिहासाचा माझा अभ्यास नाही, पण प्रत्येक ठिकाणी जेत्याची संस्कृती ही वरचढ ठरते व पराभूतांची संस्कृती लय पावते, असेच होते ना? त्यामुळे आपण संस्कृती का लयाला गेली असा विचार न करता भारतात बाहेरून आलेल्या लोकांनी आपल्यावर इतकी वर्षे आक्रमणे का केली, आपले पराभव का झाले असे पाहू गेले तर वर्णधर्माचा पगडा असे वर दिलेले कारण समोर येते. जेंव्हा आक्रमण येईल, तेंव्हा लढायला आपल्याकडे फक्त क्षत्रियच, म्हणजे एकूण उपलब्ध तरूण पुरूषांपैकी फक्त २५%च जात असतील, तर मूठभर लोक आपला पराभव करणारच ना? जर वर्णधर्म, वर्णाश्रमाचा पगडा नसता, तर प्रत्येकाला अशा वेळी 'लढणे' हेच आपले कर्तव्य आहे असे वाटले असते, आपले असे सतत पराभव झाले नसते व मग संस्कृतीही लयाला गेली नसती.

मी प्रतिसाद थोडा उशीरा पाठवला, तरी आपले व धागाकर्त्याचे मत जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद.
-स्वधर्म

नाही

मला स्वतःला डीक्लाइन अँड फॉल- र्‍हास आणि नाश- हाच क्रम असेल असे वाटते. उतरती कळा लागते, बेदिली माजते आणि नंतर पाडाव होतो.
एकूण उपलब्ध तरुण पुरुषांपैकी फक्त २५%च जात असतील तर मूठभर लोक आपला पराभव करणारच ना? समोरचे मूठभरच असतील तर आपले २५% सुद्धा संख्येने जास्तच ठरतील ना? आक्रमणे फक्त भारतावरच झाली आणि फक्त भारतीयांनीच ती सोसली हा एक गैरसमज आहे. जिथे जिथे सुबत्ता निर्माण झाली तिथे तिथे ती लुटण्यासाठी युद्धे झाली. कष्ट करून संपत्ती निर्माण करण्यापेक्षा लूट करून ती हिसकावणे नेहमीच सोपे असते.

सहमत

सध्या अमेरिका इतकी प्रबळ असूनही सगळीकडे संपूर्ण विजय मिळावू शकत नाहीये. सगळे लढले तरी मुळातच आपल्या धर्मात नैतिकता नावाच्या गोष्ट आहे त्याचा अतिरेक झाला आहे. श्रीमान योगीची प्रस्तावना जरूर वाचावी. त्यात नरहर कुरुंदकरांनी चांगला उहापोह केला आहे. सगळी युद्धे कायम आपल्याच देशात व जमिनीवर झाली. जिंकलो तरी आपलेच नुकसान. सध्याची अवस्था पण फार काही वेगळी नाहीये. आपल्या शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवणे आणि आपले हित कशात आहे हे न समजणे हे बहुदा गेल्या हजार वर्षातले व्यवच्छेदक लक्षण आहे.

कारण.

आपल्याकडील वर्ण/जातिव्यवस्था हे समाज विस्कळित होण्याचे एक कारण आहे

चार वर्ण, दोन जाती व एक धर्म या सर्वांचा मिळून समाज बनतो, यावर समाज रचना आधारलेली आहे.

इथे कुठल्या एका देशाची समाज रचना अपेक्षित नसून पुर्ण जगाची समाज रचना अपेक्षित आहे.

अशा प्रकारचे प्रतिपादन समाजाच्या हिताचे नाही.

प्रथम सडेतोड प्रतिसादा बद्दल आपले आभार, व्यवस्था असेल तरच त्याला समाज म्हणता येईल. वर्ण, जात व धर्म या गोष्टी वेगळ्या आहेत. हे सर्व तुम्ही एकच समजता म्हणून काही काही शंका व प्रश्न पडले आहेत. वास्तविक समाज व्यवस्था जन्मावर नसुन कर्मावर आधारीत आहे. मला वाटते एवढे स्पष्टीकरण पुरेशे आहे.

मूळ प्रश्नांची उत्तरे द्यावीत

समतादर्शनजी,

मला का प्रश्न पडले आहेत, त्याविषयी आपले मत सांगितल्याबद्दल आभार, पण आपण माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत ही विनंती. मी वर्ण आत्ता का रिलेव्हंट नाही हे मांडायचा प्रयत्न केला होता. त्याला आपण काहीच उत्तर देत नाही आहात. तेच पुन्हा डकवत नाही, पण प्रतिसादात अगदी स्पष्टपणे ते विचारले होते. (उदा. स्त्रिया, मुले व म्हातार्‍यांचा वर्ण; दिवसभर वेगवेगळी, म्हणजे सगळ्या वर्णांची कामे करावे लागणारे आपण सर्व, इ.)
मुद्दे सोडून देऊन उगीचच स्पष्टीकरण पुरेसे आहे म्हणणे; धर्म - जात - वर्ण अशा संदिग्ध संज्ञा घुसडणे याला काय म्हणावे?

-स्वधर्म

वर्ण आत्ताही रिलेव्हंट आहे.

स्त्रिया, मुले व म्हातार्‍यांचा वर्ण, दिवसभर वेगवेगळी, म्हणजे सगळ्या वर्णांची कामे करावे लागणारे आपण सर्व, यांचा वर्ण कोणता? असा प्रश्न स्वधर्म यांनी विचारला आहे.

वास्तवीक चर्चा समाज रचना या मुद्दयावर आहे. आजही समाज रचनेला अर्थ आहे... ती रचना चार वर्ण, दोन जाती व एक धर्म यावर आधारलेली असून ते आपल्या जागी आहेत. या सर्वांचा मिळून समाज बनतो, यात वेगळ्या कुठल्याही प्रकाराला काहीही अर्थ नाही. नुसत्याच वर्णावरून समाज रचना ठरवता येत नाही.

वर्ण आत्ताही रिलेव्हंट आहे. कारण तेला-मिठासाठी प्रत्येकाला काहीतरी कर्म करावेच लागते. स्वधर्म यांच्या मते दिवसभर वेगवेगळी, म्हणजे सगळ्या वर्णांची कामे करावे लागणारे आपण सर्व, यांचा वर्ण कोणता? फक्त त्याचेच वर्णन चर्चेच्या सुरूवातीला केले आहे. त्याप्रमाणे समजण्यास काही हरकत नसावी.

राहीला प्रश्न तो स्त्रिया, मुले व म्हातार्‍यांचा, ते तेला-मिठासाठी काहीच कर्म करीत नाहीत. त्यांना कुठल्याही वर्णात बसविता येत नाही, त्यांना जातीत व धर्मात महत्वपुर्ण स्थान आहे.

म्हणून आजही समाज रचनेला अर्थ आहे, तसेच वर्ण आत्ताही रिलेव्हंट आहे. येणेप्रमाणे थोडक्यात स्पष्टीकरण दिले असे.

स्त्रिया

>>राहीला प्रश्न तो स्त्रिया, मुले व म्हातार्‍यांचा, ते तेला-मिठासाठी काहीच कर्म करीत नाहीत.

स्त्रिया तेला-मिठासाठी काहीच कर्म करत नाहीत? वाचून डोळे पाणावले.....

त्यांना कुठल्याही वर्णात बसविता येत नाही, त्यांना जातीत व धर्मात महत्वपुर्ण स्थान आहे.

महत्त्वपूर्ण असे काय स्थान आहे हे कळले तर बरे होईल.

स्त्रिला जातीत व धर्मात महत्वपुर्ण स्थान.

प्रत्येक स्त्रिच्या जीवनात तीन पुरुष येतातच वडील, नवरा व मुलगा मग हे तीन-तीन पुरूष असताना स्त्रिला तेला-मिठासाठी काहीच कर्म करायची गरज नाही. म्हणून स्त्रिला दोन्ही जातीत व धर्मात महत्वपुर्ण स्थान आहे.

फालतूपणा बंद करा

प्रत्येक स्त्रिच्या जीवनात तीन पुरुष येतातच वडील, नवरा व मुलगा मग हे तीन-तीन पुरूष असताना स्त्रिला तेला-मिठासाठी काहीच कर्म करायची गरज नाही.

हा फालतूपणा बंद करा. स्त्रिला तेला-मिठासाठी काहीच कर्म करायची गरज नाही असले विचार मांडणारे पुरुष कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात न येवोत.

फालतू समाज व्यवस्था...

हा फालतूपणा नाही समाज व्यवस्था आहे. वडील, नवरा व मुलगा यांनी घरात बसून जाती धर्माचा सांभाळ करायचा व स्त्रिने तेला-मिठासाठी घराबाहेर पडून कामे करायची असा समाज हवा आहे काय? प्रियालीबाई...

?

सध्याच्या समाजव्यवस्थेत बर्‍याच प्रमाणात "स्त्रिने तेला-मिठासाठी घराबाहेर पडून कामे करायची" पद्धत आहे*. पुरुष घरी नवरेशाही करत बसण्याची आणि दारूसाठी स्त्रिकडून पैसे घेण्याचीसुद्धा पद्धत आहे.

*ही पद्धत सुशिक्षित मध्यमवर्गापासून ते कनिष्ठ झोपडपट्टी वर्गापर्यंत सर्वदूर पसरली आहे.

कुठल्या काळात वावरता

स्त्रीने घराबाहेर पडून तेल आणि मीठच नाही तर टीव्ही, फ्रीज, गाड्या आणि घरे कमवायची पद्धतही कधीच रुजू झाली आहे तेव्हा ही फालतूगिरी थांबवा.

कालगणना.....

जेव्हापासून सुर्य व चंद्राची निर्मिती झाली तेव्हा पासून धरले तर १,९७,२९,४९,१०९ एवढी वर्ष झाली. आत्ता एवढ्या काळात काय काय झाले याची माहीती सर्वांना असेलच असे नाही.

काळ कोणताही असला तरी समाज रचनेत काहीही बदल होत नाही म्हणजेच वर्ण, जात व धर्म यात बदल होत नाही. तसेच काळ कोणताही असला तरी कमीत कमी वडील, नवरा व मुलगा हे तीन पुरुष स्त्रीला चिकटलेले असणार. मग हे कमीत कमी तीन टगे पुरुष जीवनात येत असताना स्त्रीने घराबाहेर पडून तेल आणि मीठच नाही तर टीव्ही, फ्रीज, गाड्या आणि घरे कमवायची गरज काय? या तिघांना सांभाळण्यासाठी की, दुसरे काही??? प्रियालीबाईने उत्तर द्यावे, नुसते कोणत्या काळात वावरता असा उलटा प्रश्न करुन भागत नाही. आम्ही कोणता काळात आहोत हे सांगितले आहे, आत्ता तुमची बारी.

बार!

लवकरच बार निघणार आहे.

उत्तर दिलं तर ते कळायला हवं ना. मध्ययुगातून बाहेर या मग सांगते उत्तर.

तूर्तास, हे तीनही टगे काही कारणास्तव "गचकले" तर बाईने काय करावे - तेल आणि मिठासाठी? सती जावे का हे सांगा बघू.

बायदवे, जास्त तेल खाल्ल्याने कोलेस्ट्रोल आणि जास्त मिठ खाल्ल्याने बीपी वाढते का तुमच्या काळात?

गचकणे शक्य नाही.

हे तीनही टगे काही कारणास्तव "गचकले" तर बाईने काय करावे - तेल आणि मिठासाठी? सती जावे का हे सांगा बघू.

तेल आणि मिठासाठी तर वर्ण व्यवस्था आहे. आपण जाती व्यवस्था या विषयावर इतक्या लवकर न बोललेले बरे. ओघात विषय निघाला आहे म्हणून जगात मानवाच्या पुरुष व स्त्री या दोनच जाती आहेत. इथे प्रश्न फक्त स्त्री जातीचा नाही तर पुर्ण समाजाचा आहे.

वडील, नवरा व मुलगा हे जवळ जवळ ९९% एकाच वेळी गचकू शकणार नाहीत, तिने काय करावे हे ठरविण्यासाठी तीन टगे आहेत ना, ते काय सांगतात तेवढेच स्त्री जातीने पालन करावे तरच समाज रचना अबाधित राहिल अन्यथा आपण पाहात आहात आज काय चालले आहे ते!

स्त्री जातीने घराबाहेर का पडावे? याचे सविस्तर उत्तर अजूनही मिळाले नाही.

आरारारा!

तेल आणि मिठासाठी तर वर्ण व्यवस्था आहे.

तुम्ही टीव्ही, फ्रीज वापरत नाही का? कपडे बिपडे वापरत नाही का? घराचे भाडे देत नाही का? तेल मिठावर टपलेले आहात ते?

वडील, नवरा व मुलगा हे जवळ जवळ ९९% एकाच वेळी गचकू शकणार नाहीत, तिने काय करावे हे ठरविण्यासाठी तीन टगे आहेत ना, ते काय सांगतात तेवढेच स्त्री जातीने पालन करावे तरच समाज रचना अबाधित राहिल

टगे? स्त्रीला आपल्या ताब्यात ठेवणारे टगे नाही, पशू असतात. या वेडगळ कल्पनांवर आपला देश चालत नाही तेव्हा बरळणे बंद करा. मी तर म्हणते की हा असा विचार करणारे पुरुष स्त्रियांच्या टाचेखाली राहिले तर समाज सुधारेल.

बाकी, त्या १% स्त्री ने काय करावे ते सांगा ना.

आपण पाहात आहात आज काय चालले आहे ते!

जे चालले आहे ते स्त्रियांनी पुरुषांच्या आज्ञेचे पालन करावे असा विचार करणार्‍या मानवी पशूंमुळे चालले आहे असे मला वाटते.

वर्ण व्यवस्था=तेल मीठ..

जास्त तेल खाल्ल्याने कोलेस्ट्रोल आणि जास्त मिठ खाल्ल्याने बीपी वाढते का तुमच्या काळात?

होय, कोलेस्ट्रोल अन् बीपी काय काहीही वाढले तरी समाज रचना आपण नाही बदलू शकत.

अरे बापरे

भाषा, अर्थकारण , वाणिज्य , व्यवस्थापन , विज्ञान , इतिहास , तत्त्वज्ञान , धर्म , शिक्षण , संस्कृती , उपक्रम, कायदे , प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे, मनोरंजन, विरंगुळा , व्यक्तिमत्व, सामाजिक, साहित्य व साहित्यिक , हे संकेतस्थळ , राजकारण

एवढ्या ठिकाणी या धाग्याची व्याप्ती पाहिल्यावर सर्वव्यापी परमेश्वराची आठवण झाली

सर्वव्यापी परमेश्वर ???

स्वर्गलोक, प्रुथ्वीलोक व पाताळलोकावर जो राज्य करतो तो परमेश्वर आहे. प्रथम तो सर्वव्यापी आहे हे खूळ डोक्यातून काढले तरच समाज व्यवस्था समजेल. येथे टिचकी मारून पाहा थोडी आधिक माहीती मिळेल.

समाजकारण = सत्य-अहिंसा-आदि तत्त्वांद्वारे समाजाचे मंगल ईच्छिणारे... धर्मरत...धर्म = मानव धर्म !..... असे सर्व ज्ञान-समुद्रा बुडुन "सर्वे सुखिनः सन्तु..." अशी कामना ठेवणारा..... स्थिरबुद्धी वर्ग !!{ स्वतः पुर्वी सर्व जगाच्या कल्याणात इच्छिण्यात सुख मानणारे }
ब्राह्मण म्हणजे यजन, याजन - यज्ञ करणारा आणि करवून घेणारा, अध्ययन अध्यापन करणारा, दान देणारा (ज्ञानदान, यज्ञदान, औषधांबद्दलचे ज्ञान वापरुन जीवनदान करणारा इ.) आणि घेणारा असा असणे अपेक्षित होते.

सगळी चांगली चांगली विशेषणे मात्र ब्राह्मणांना लावून मोकळे झालात!!!

शिक्षण देणारा मनुष्य आश्रम हा व्यवसाय म्हणून करत असतो ना? मग तो वैश्य का होत नाही? बाजारात वांगी विकली तर वैश्य ..... आणि ज्ञान, औषध विकणारा मात्र 'दान देतो' ............ !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! त्याला मात्र दान देणे असे नाव!!!! मग वांगी विकणारादेखील अन्नदान करतो, असे का नाही म्हणायचे... ??

सत्य, अहिंसा हे म्हणे ब्राह्मणांचे काम!!!!! मग वांगी विकणारा वैश्य इतरांना लुबाडा, इतराना कापा, असे सांगत फिरत असतो का??
जगात कुणीच न पाहिलेला स्वर्ग, नरक यांच्या गोष्टी सांगणारे आणि यज्ञात बैल कापणारे ब्राह्मण सत्य अहिंसेचे पुजारी, हे ऐकून मात्र हसू फुटले.... :)

---- विशिष्ट एक जात / वर्ण श्रेष्ठ असे इंटरनेटावर कोकलणारा भाट ब्राह्मण, वैश्य, शूद्र की क्षत्रिय हा प्रश्न पडलेला आंबा.

समाजरचनेला अर्थ आहे.

देव आहे. काँग्रेस भुक्कड आहे. मोदी ग्रेट आहेत. वर शूद्र अन आतून क्षूद्र आहे. हा लेख फक्त समाज कारण आहे.

वरील सर्व काही सत्य आहे. (प्रतिसादाचा विषय देखिल)

सत्य भाई सत्य है!

अरेरे

उपक्रमाची अवस्था बघवत नाही आता. तशी ती अधूनमधून भेलकांडतच असते नि पुन्हा सावरतही असतेच असे दरवर्षीचे निरीक्षण आहे. पण ह्यावेळेसचा उपक्रमाचा bad patch जरा जास्तच लांबलाय.

राही यांचे प्रतिसाद

राही यांचे सगळे प्रतिसाद अत्यंत वाचनीय. धन्यवाद. बाकी समतादर्शन ह्यांचा लेखातून आणि प्रतिसादांतून चातुर्वर्ण्याचे जे काही समर्थन चालले आहे ते हास्यास्पद आहे. आणि मनबुवा, रडारड करण्यापेक्षा लेख लिहिलेले किंवा चांगले प्रतिसाद टाकलेले बरे.

उत्तम लेखक की उत्तम लेखांचा वाचक?

आम्ही उत्तम लेखक नाही हे सविनय सांगू इच्छितो.(किंवा मान्य करतो. शिंचा पर्याय तरी काय आहे कबुलीवाचून?)
पण उत्तम लेखांचे चाहते आहोत. पण उपक्रमाचे पूर्वीचे दिवस पाहिलेले असल्याने हे पाहवत नाही. सायन्युसाइडल तरंगाप्रमाणे पुन्हा चांगले दिवस येणारच हेही निश्चित. ते लवकर यावेत इतकीच इच्छा.
ह्या सायटिला आम्ही आवडतो की नाही ठाउक नाही. आम्हाला ही साइट आवडते.
अर्थात, उत्तम/भरीव कामगिरी केल्याशिवाय तशा कामगिरीची अपेक्षाही ठेउ नये असे म्हणणे असेल तर माझा मूळ प्रतिसाद मागे घेत आहे.
राही ह्यांचे ह्या धाग्यावर आणि इतरत्रही प्रतिसाद वाचनीय असतत ह्याच्याही सहमत.

संप झाला... अजून काही...

संप झाला... अजून काही... चार वर्णा पैकी राजकारण(क्षत्रिय) व नोकरी(शुद्र) या वर्णात दरी निर्माण होऊन समाज रचना कळत नसल्याने नोकरदारांना(शुद्रांना) संप पुकारावा लागत आहे. त्याची झळ पुर्ण समाजाला बसत आहे. धंदा(वैश्य) व समाजकारण(ब्राम्हण) करणारा वर्ण याला तटस्थपणे पाहत आहे.

कुरुंदकर मोड

सैनिक/सेनापती = समाजाला "सुरक्षा सेवा" पुरवणारा शूद्र
पुरोहित = समाजातल्या इतर घटकांना "यज्ञ-पूजा आदि सेवा" पुरवणारा शूद्र
व्यापारी= समाजाला उपयुक्त "वस्तू घराजवळ उपलब्ध करून देण्याची" सेवा देणारा शूद्र

सगळेच शूद्र का नाही?

चुकीचा मोड आहे...

आजही समाज रचनेला अर्थ आहे... ती रचना चार वर्ण, दोन जाती व एक धर्म यावर आधारलेली असून ते आपल्या जागी आहेत. नुसत्याच वर्णावरून समाज रचना ठरवता येत नाही. वर्ण आत्ताही रिलेव्हंट आहे. कारण तेला-मिठासाठी प्रत्येकाला काहीतरी कर्म करावेच लागते. वर्ण बदलने आपण समजता तेवढे सोपे नाही.

नोकरी, धंदा, राजकारण व समाजकारण यातील वर्ण बदल जर करायचा तर किती अग्निदिव्यातून जावे लागते याकडे जगातले सर्वजण सोईस्करपणे दुर्लक्ष करतात. हेच पहा ना, मागे एक-दोन महीन्यापुर्वी नोकरदारांनी (शुद्र) संप पुकारला, आता सर्व धंद्यावाल्यांनी (वैश्य) एल.बी.टी. मुळे संप पुकारला आहे. चार वर्णा पैकी राजकारण(क्षत्रिय) व धंदा (वैश्य) या वर्णात दरी निर्माण होऊन समाज रचना कळत नसल्याने धंद्यावाल्यांना (वैश्य) संप पुकारावा लागत आहे. त्याची झळ पुर्ण समाजाला बसत आहे. आता नोकरदार (शुद्र) व समाजकारण(ब्राम्हण) करणारा वर्ण याला तटस्थपणे पाहत आहे.

खालची केस उचकटून सांगा राव.

मी इंजिनिअरिंग काम करतो म्हणजे मी ब्राह्मण नसून शूद्र आहे असे तुम्ही सुचवत असाल तर मग तुमच्या म्हणण्याला काही अर्थ आहे.

प्राध्यापकाच्या* मुलीशी (तुमच्या दृष्टीने ब्राह्मणाच्या मुलीशी) मी (तुमच्या दृष्टीने शूद्रकाम करणार्‍याच्या शूद्रकाम करणार्‍या मुलाने) लग्न केले तर तो प्रतिलोम विवाह झाला का? [असा विवाह केल्याने सात पिढ्या कुठच्या तरी नावाच्या नरकात पडतील असे मनुस्मृतीत म्हटले आहे.

*सदर प्राध्यापक नोकरदारसुद्धा असल्याने ते शूद्र का नाही म्हणायचे?

 
^ वर