हे कुठून आले?

१. इसवी सनाच्या पहिल्या शतकाचा प्रारंभीचा काळ :-- "शक सत्रपांनी पश्चिम भारतात राज्ये स्थापन केली. त्याचा भारतीयांना त्रास होइ. त्यांचा सडकून पराभव गौतमीपुत्राने केला."
२. इसवीसनाच्या पहिल्या शतकाच्या शेवटी :- कुषाण तर थेट आख्ख्या उत्तर भारतात पसरले. फार मोथे साम्राज्य त्यांनी स्थापले विम- कुजुल कॅडफिसस च्या नेतृत्वाखाली . त्यांचा वारसदार कनिष्क तर पामीर पठार ओलांडून जाणारा पहिलाच भारतीय सत्तेचा प्रमुख ठरला. मथुरेपासून उत्तर्-पश्चिमेकडे त्याचा मजबूत अंमल होता. काश्मीर पार करून त्याने मध्य आशियायी भागातही धाडक मारत थेट चीनच्या राजाला हैर्राण केले.
३. इसवीसनाचे चौथे शतक :- गुप्त सम्राटांनी (चंद्रगुप्त गुप्त व समुद्रगुप्त गुप्त ह्यांनी ) बराच काळ हूण स्वार्‍यांना थोपवून धरले. नंतर हूणांनी पश्चिम उत्तर भारतात नास्धूस सुरु केलीच.
४. चौथ्या शतकाचा उत्तरार्ध :- पांढर्‍या हूणांनी थेट प्रबळ रोमन सत्तेला आव्हान देत मोठा लढा उभा केला. खुद्द हंगेरी,बल्गेरियामधील बराच भाग काबीज केला. अटिला हूण ह्याच्या काळात तर मोठ्या लढाईत पराभव झाल्यावरही पुन्हा खुद्द इटालीवरच (रोमन साम्राज्याच्या मुख्य प्रभावक्षेत्रात) एक मोठी मोहीम काढली.
५. बारावे शतक :- मंगोल... बाराव्या शतकापर्यंत जगाने कधीही न बघितलेल्या आकाराचे साम्राज्य उदयास आणणारा संघ. पुढील दीडेकशे सर्वाधिक क्रौर्याचा, आक्रमकतेचा उच्चांक गाठायला निघालेला एक समूह. तेमुजिनच्या (चंगीझ खाना) नेतृत्वाखाली उभा राहिला. आजवर कुठलीच सत्ता इतक्या दूरवर इत्क्या वेगाने पसरली नव्हती. तोवर वेगाने वाढलेले मुस्लिम धर्माचे उमय्याद किंवा अब्बासिद साम्राज्याहूनही, चीनी, रोमन, मौर्य्, कुषाण, अशा आजवरच्या कुठल्याही साम्राज्याहूनही हे काही पट मोठे होते.
६.चौदावे शतक :- तुर्क्....दिल्लीवर आक्रमण करुन ऐबकने स्थापन केलेले गुलाम घराणे संपवणारी, थेट मध्य आशियापासून ते दिल्लीपर्यंतचा मुलुख काही काळ का असेना काबीज करनारी एक सत्ता. (मुळात हे तैमुरच्या नेतृत्वात तुर्क्-मंगोल होते, ओरिजनल तुर्क नव्हेत.)
.
हे असे उल्लेख सतत इतिहासात डोकावत असतात. तेव्हा साहजिकच "हे कोण? कुठून आले?" असे प्रश्न पडतात.
किंवा हूण हे जर चीनच्या प्रांतातील लोक असतील तर ते इतक्या दूरवर , युरोपात जाउन सत्ता स्थापन कशी काय करु शकले? (ते ही सलग असे मूळ स्थानापासून मदत नसताना. कुठलीही सप्ल्याय लाइन नसताना.) चीन पासून थेट युरोप? आणि तिथवर जाइपर्यंत कुठे कुठे गेले? त्याचे स्पष्ट कुठेच उल्लेख कसे नाहीत? पश्चिमेकडेच चालले होते खुश्कीच्या रस्त्यतील उत्तरेच्या रस्त्याकडून, तर भारतात पूर्वेला कशाला वळले? असे अनेकानेक प्रश्न पडतत.
मंगोल्-तुर्क -तार्तार ह्यांचा संबंध आहे का? कुणी तुर्कांना इराणी पठारावरील एक जमात असे म्हणतात तर कुणी हे ही चीनच्या प्रांतातून आले म्हणतात.
तर शंअका अशा :-
१. हे सगळे कुठून कुठे गेले?
२. हे ह्याच वेळी(वरती उल्लेख केलेल्या वेळी) एकाएकी पेतून कसे उठले? अचानक उदय कसा व्हायचा ह्यांचा?
३. हे ह्यांच्या मूळ ठिकाणी आजही सापडतात का?
४. ह्यांचा पराभव, उच्चाटन वगैरे विक्रमादित्य, यशोधर्मन ,गौतमीपुत्र्,गुप्त सम्राट वगैरेंनी केला म्हणतात. म्हणजे नक्की काय केले. लढाईत ह्यांचा संपूर्ण पराबह्व वगैरे झाला. पण एवढा जो लोकसमूह त्यांच्या सोबत होता, त्याचे काय झाले? ते सगळेच देश सोडून निघून गेले का?(गेले असतील हे पटत नाही. पण मग त्यांचे पुढे काय झाले?)
५. शकांनी आक्रमण केले,लुटले वगैरे म्हणतात. पण कुठलाही आक्रमक सीमेवरील भागात लुटपाट करु शकतो. बरोबर? आतल्या भागात, मुख्य वस्तीपर्यंत घुसलाच, तर लूटमार करुन परतही जाइल, पण तिथेच वर्षानुवर्षेच नव्हे तर दशकानुदशके अपल्या हजारपट लोकसंख्येवर (स्थानिक मदतीशिवाय) राज्य कसे करेल? स्थानिक मदत आज मिळाली तरी उद्या तेच मदतकर्ते स्थानिक वरचढ होणार नाहीत का? हे लोक इतके वर्षे राज्य करुच कसे शकले?(जुलुमी, विध्वंसक असे ते होते, हे गृहितक आहे. भारतीयांना तसे सांगितले जाते. त्यांचा पराभव हा "शक शालीवाहन" वगैरे करुन साजराही करतात; इतका त्यांचा पराभव होणे आवश्यक होते. )
.
अजूनही बरेच प्रश्न आहे. चर्चाप्रस्ताव उच्च दर्जाचा नसेलही. पण ह्या पडणार्‍या शंका जाहीर ठिकाणी विचारुन अधिकाधिक माहिती मिळवणे हा उद्देश आहे. व्यनि करुन किती लोकांकडून किती माहिती मिळवता येते ह्यावर मर्यादा येतात.
हे सर्व प्रश्न अरविंद कोल्हटकर ह्यांच्या एका प्रति दुसर्‍या स्थळावरील प्रतिसादामुळे पडलेले आहेत.

--मनोबा

लेखनविषय: दुवे:

Comments

हे का आले?

ते आले लुटालुटीच्या आणि सर्वायवलच्या उद्देशाने. चंगीजखानासारख्या ज्या रानटी जमाती होत्या त्यांना जीव घेणे, जाळपोळ करणे, बलात्कार करणे वगैरे साधारण गोष्टी होत्या. शहरे वसवून, नियंत्रणाखाली राहणारे नागरिक या हिंसेला तोंड देण्यास तयारीचे नव्हते. रानावनांत लपणे, उपाशी राहणे, दिवसेंदिवस घोड्याच्या पाठीवर बसणे, अचानक हल्ले करणे हे सर्व प्रकार शहरी लोकांना जमणारे नव्हते. परंतु एकदा सत्ता काबीज केल्यावर या रानटी लोकांना हळूहळू शासनाचे, सत्ताविकासाचे महत्त्व कळून चुकले. बाकी नंतर...

 
^ वर