१६६४ - सुरतेत शिवाजी

शिवाजीच्या सुरतेवरील १६६४च्या जानेवारीतील पहिल्या मोहिमेचे खालील वर्णन सुरतेमध्ये तेव्हा उपस्थित असलेल्या M.Escaliot नावाच्या ख्रिश्चन फादरने लिहून Brown आपल्या एका परिचिताकडे पाठविले होते. ते वर्णन Indian Antiquary ह्या नियतकालिकाच्या सप्टेंबर १८७९ च्या अंकात छापले होते. मला ते सर्व पत्र जालावर सापडले.

हे काही नवीन मुळीच नाही. ह्या पत्राचे संदर्भ अनेक शिवचरित्रांमधून पाहावयास मिळतात. तथापि मी तरी सर्व पत्र मुळातून आजपर्यंत कोठेच वाचले नव्हते. त्यामुळे उत्सुकतेपोटी मी ते सर्व वाचले.

'उपक्रम'च्या अन्य सदस्यांनाहि ते मुळातून पूर्णतः वाचावयास आवडेल अशा हेतूने ते येथे खाली देत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

नोंद ठेवण्याची सवय

या नोंदींवरून युरोपियन लोकांच्या नोंदी ठेवण्याच्या सवयी बद्दल मला वाटणारे कौतुक आणखीनच वृद्धिंगत झाले. यावरून एका अवांतर नोंदीचीही आठवण झाली. सन 1819 मध्ये कच्छ येथे एक भयानक भूकंप झाला होता. हा भूकंप आणि नंतर आलेली सुनामी लाट याबद्दलचे इत्यंभूत वर्णन त्यावेळी भूजमध्ये रहात असलेल्या एका ब्रिटिश महिलेने इंग्लंड मधील आपल्या एका परिचिताला कळवले होते. या नोंदीशिवाय दुसरी कोणतेही प्रत्यक्ष जागेवरून केलेले वर्णन आज उपलब्ध नाही. युरोपियन लोकांच्या या सवयीने आपला बराचसा इतिहास जतन होऊ शकलेला आहे.

ईतिहासाचा बटयाबोळ

कही लोकांनी ईतिहासाचा बटयाबोळ करून टाकला आहे. कोणता इतिहास खरा आणि कोणता खोटा हेच ठरविण्यासाठी आता नवा इतिहास लिहावा लागेल कदाचित....

मी हल्ली परिक्षेत मार्क मिळविण्यासाठीच इतिहास वाचतो. :-)

प्रायमरी सोर्स

हा वृत्तांत येथे दिल्याबद्दल धन्यवाद. वेळ काढून अवश्य वाचेन.

यावरून सहज आठवले -

इतिहासाच्या दृष्टीने "प्रायमरी सोर्स"चे महत्त्व सर्वात जास्त असते.

प्रथम स्रोत म्हणजे ज्याने एखादी घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहून तत्क्षणी किंवा पुढे-मागे ती नमूद करून ठेवली. मार्को पोलोचे वृत्तांतापासून ते गोडसे भटजींच्या प्रवासापर्यंत अनेकजणांनी असे वृत्तांत लिहिले आहेत. यांत केवळ प्रवासी, सेनाधिकारी, इतिहासकार वगैरे अनेक प्रकारचे लोक येतात असे नव्हे तर सर्वसामान्य जनतेने लिहिलेली पत्र वगैरेही ग्राह्य असतात पण त्यांच्या हुद्द्यानुसपण, समजूतीनुसार, सामाजिक पत इ.इ. वरून लेखनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.

परदेशी व्यक्तीने लिहिलेला वृत्तांत तपासण्यासाठी किंवा तो विश्वासार्ह आहे की नाही हे ठरवण्यासाठी अनेक कसोट्या ठेवल्या जातात. यावर काही चांगले भाष्य उदाहरणांसकट माझ्याकडे आहे परंतु वेळेअभावी ते लिहून काढणे शक्य होईल की नाही ते सांगता येत नाही. प्रयत्न करायला हवा.

:(

लेखातील प्रतिमांवर क्लिक केल्यास 'रिक्वेस्ट अनसक्सेसफुल' असा संदेश यत आहे.

इतर मार्गांनी दुवे उघडणे शक्य आहे का?

विषय भरणे अनिवार्य आहे.

books.google.ca/books?id=AdswAQAAMAAJ&pg=PA256

आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती. आज मी डब्यात बटाट्याची भाजी आणली होती.

धन्यवाद

वा!! बहुत रोचक आहे. हे पत्र इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद :)

 
^ वर