सुधारक आगरकर

भारतीय इतिहासामधील सुप्रसिध्ध असा एक किस्सा सांगितला जातो कि टिळक व सुधारक आगरकर यांच्यामध्ये "आधी समाजसुधारणा हवी कि आधी राजकीय स्वातंत्र्य मिळायला हवे" या दोन्ही बाबीवर या दोन्ही प्रिय मित्रांचे बिनसले. पुढे आगरकर आपल्या राहिले आणि समाजसुधारणा "बुधीप्रमाण्यावाद" नियमानुसार केली. व पुढे टिळक "राष्ट्रीय सभेमध्ये" जहालांचे प्रमुख नेते बनले.

इथे हि गोष्ट सांगण्याचा हाच उद्देश आहे कि सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी भारतवर्षाचे भवितव्य हितचिंतूनच हा आपला विचार मांडलेला दिसून येतो. यामध्ये असे दिसून येते कि ते एक ब्राह्मण असूनही एक निष्पक्ष अशी विचारधारा त्यांच्या तन आणि मनातून प्रकट होत होती. सनातनी कर्मकांड व धर्मकांड लोकांमुळे भारत वर्षातील बहुजनांचे झालेले हाल त्यांना पाहवत नव्हते. याच्याउलट टिळक मात्र आपल्या हट्टी आणि जहाल स्वभावामुळे या महत्वपूर्ण विचारापासून व सामाजिक सुधारणेच्या भावापासून अनभिज्ञ होते.

सुधारक आगरकर यांनी बोलेल ते करून दाखवले. प्रसंगी त्यांच्याच सनातनी ब्राह्मण लोकांकडून त्यांच्या छळ झाला. त्यांनी त्यांच्या हयातीतच स्वताची अंतयात्रा पहिली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असताहि त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला आणि या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.त्यांच्या शिक्षणामुळे त्यांना त्याकाळी खूप चांगली नोकरी भेटली असती परंतु त्यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि " आई , माझे शिक्षण संपले आहे परंतु तुला वाटेल कि मी एखादी चांगल्या पगाराची नोकरी करेल व आपली परिस्थिती बदलून टाकेन पण मी असे करणार नाही . माझे संपूर्ण जीवन मी उपेक्षित, गोर-गरीब लोकांसाठी वाहून घेण्याचे ठरवले आहे". केवढा मोठा हा त्याग....

आगरकरांनी पुण्यातच ‘सुधारक’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ‘सुधारक’ मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. म्हणूनच त्यांना आपण "सुधारक" असे म्हणतो. अत्यंत अल्प आयुष्य त्यांना मिळाले परंतु यामध्ये त्यांनी सतत आपल्या समाजाप्रती सुधारणेचे बीज रोवाण्याचाच प्रयत्न केला.
शंकर माने

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम विषय उत्तम सुरूवात

शंकर मानेजी
तुम्ही विषय चांगलाच निवडला आहे. तुम्हाला सांगायचे जे आहे तेही महत्त्वाचे आहे. तरीही लेख मला थोडा बालसाहित्यातील वाटला. उपक्रमवरील सभासदांसाठी तो वाटत नाही. मला क्षमा करा परंतु उपक्रमवर थोड्या प्रगल्भ लेखांची सभासदांना अपेक्षा असते असे मला तरी वाटते .पुढच्या लेखात तसा जरूर प्रयत्न करा. तुमचे लेख खूप वाचनीय होतील याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.

आभार

चंद्रशेखर साहेब ...तुमचेहि स्वगत !! आणि आभार ! विनोबा भावे यांचे चरित्र वाचले त्याबद्दल लिहिले आहे ….ते हि पाहून घ्या विनोबा भावे

चंद्रशेखर ह्यांचे स्वागत +१

चंद्रशेखर ह्यांचे स्वागत +१
:)

ह्यातहि नवीन काय आहे?

हेहि आम्हांस आधीच माहीत आहे. असले ढोबळ लिखाण करू नका.

समाजसुधारणेबाबत टिळकांचे तुम्ही काय वाचले आहे? नसल्यास पंचहौद प्रकरणात ते कसे वागले ते पहा.

फुकटचे सल्ले

अरविंद कोल्हटकर : "काय लिहावे आणि काय लिहू नये" असे विनाकारण फुकटचे सल्ले दिले नाहीत तर बरे होईल. कारण हे काही कोणाच्या घराचे व्यासपीठ नाही जिथे कोणाची मनमानी चालेल. आणि काय लिहायचे असे सांगण्यापेक्षा तुम्हाला नाकच मुरडायचे असेल तर ignore करा न …. परंतु सल्ले देणे हे चुकीचे वाटत नाही काय ?

शंकरराव

हे काही कोणाच्या घराचे व्यासपीठ नाही जिथे कोणाची मनमानी चालेल. आणि काय लिहायचे असे सांगण्यापेक्षा तुम्हाला नाकच मुरडायचे असेल तर ignore करा न …. परंतु सल्ले देणे हे चुकीचे वाटत नाही काय ?

मान्य आहे ना? मग तुम्ही तरी प्रतिसादाला नाक का मुरडता आहात? तुम्ही सुद्धा दुर्लक्ष करु शकता? तुम्ही दुर्लक्ष करण्याचा सल्ला का देत आहात?
हे व्यासपीठ माहितीपूर्ण लेखन करण्यासाठी आहे.

हा जेष्ठत्वाचा सल्ला

हा फुकटचा सल्ला नसून जेष्ठत्वाचा सल्ला आहे असे मला वाटते.त्यांना तो नैतिक अधिकार आहे. आपण उपक्रमावर नवीन आहात.
शंकर माने
सदस्यत्वाचा अवधी
१ दिवस 22 तास

अरविंद कोल्हटकर
सदस्यत्वाचा अवधी
1 वर्ष 34 आठवडे
या व्यतिरिक्त कोल्हटकरांनी उपक्रमावर दिलेले सकस योगदान हे महत्वाचे ठरते. याचा अर्थ असा नक्की नाही कि अरविंद कोल्हटकरांशी मतभेद असू नयेत. जरुर असावेत पण ते वयाने अनुभवाने व लिखाणाने जेष्ठ आहेत याचे भान असावे. आदर ठेवुन मतभिन्नता व्यक्त करता येते.कठोरपणे प्रतिवाद ही करता येतो. उत्साहाच्या भरात नवोदित लेखकाकडून असे प्रमाद घडतात हे मी आंतरजालावर पहात आलो आहे. काही अंशी ही या माध्यमाची देखील मर्यादा आहे.

ज्येष्ठ (?)

आदरणीय प्रकाश घाटपांडे साहेब । आपले विचार पटले. परंतु इथे वैचारिक मतभेद आहेत हेही विसरू नका. ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती direct "असे करू नका" "तसे करू नका" असा सल्ला देत नाहीत … तर त्यांची बाजू किवा दुसर्याची बाजू मांडून त्यातील फोलपणा अगदी सामंजस्य पने सांगतात । कोल्हटकर हे ज्येष्ठ (?) आहेत हे तुम्हालाही आहेत आणि मलाही परंतु वैचारिक मतभेद असू शकतातच … इथे व्यक्तीला विरोध नाहीये.

तापू नका

अरविंद कोल्हटकर : "काय लिहावे आणि काय लिहू नये" असे विनाकारण फुकटचे सल्ले दिले नाहीत तर बरे होईल.
तापून असे काही लिहिण्यापेक्षा एकदा कोल्हटकरांची वाटचाल, त्यांचे लेखन डोळ्यांखालून घालावे. हा लेख उपक्रमासाठी बाळबोध वाटतो असे मलाही वाटते. टीका, सल्ले सकारात्मकरीत्या घ्यावेत, ही विनंती. बाकी प्रकाशरावांशी सहमत.

 
^ वर