माहिती

उपक्रम दिवाळी अंक २०१२

यावर्षीच्या दिवाळी अंकाची घोषणा करण्यात उशीर झाला त्याबद्दल दिलगीर आहोत. गेल्यावेर्षीपेक्षा यंदा वेळ कमी असल्याने शक्य तितक्या लवकर लेखन पाठवून सहकार्य करावे ही नम्र विनंती.

विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे. उपक्रमींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे गेल्या चार वर्षांचे दिवाळी अंक वैशिष्ट्यपूर्ण झाले आहेत. यावर्षीचा दिवाळी अंकही असाच वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी सर्व उपक्रम सदस्यांना आवाहन आहे की त्यांनी आपले लेखन उपक्रम दिवाळी अंक २०१२ साठी पाठवावे.

शून्य ते अनंतापर्यंत......

प्राचीन भारतीय गणितज्ञांनी जगाला शून्य ही संख्या दिल्यामुळे गणितविश्वाला कलाटणी मिळाली हे कुणीही नाकारू शकत नाही. प्राचीन काळातील बॅबिलोनियन, ग्रीक, सुमेरियन, इजिप्त इत्यादींच्या संस्कृतीत वापरात असलेले अंक व गणितीय पद्धती कळण्यास फारच क्लिष्ट होत्या व सामान्यांच्या आकलनाच्या पलिकडच्या होत्या. भारतातून अरबांच्याद्वारे इतर देशात शून्य ही संकल्पना पोचल्यानंतरच तेथील तज्ञांना शून्याचे महत्व कळू लागले. शून्य ही 1, 2, 3 ... सारखी फक्त संख्या नव्हती. तर दशमान पद्धतीची सुरुवातच या संख्येने झाली. व काही शतकानंतर शून्याला पर्याय नाही हे जगाला कळून चुकले.

सांगली जिल्ह्यातील ’देवराष्ट्रे’ गावाबाबत काही...

Allahabad Pillar’देवराष्ट्रे’ हे सांगली जिल्ह्यातल्या छोटया गावाचे नाव तसे परिचित होते. यशवंतराव चव्हाणांचे तसेच रमाबाई रानडे ह्यांचे हे जन्मगाव. गावाच्या नावाबाबत जरा कुतूहल होते कारण इतके जवळजवळ संस्कृत भाषेतील वाटावे असे नाव महाराष्ट्रात तरी दुर्मिळ वाटते. ह्या गावच्या जुनेपणाविषयीहि कोठे काही ऐकलेले वा वाचलेले नव्हते.

कालपरवा असे ध्यानात आले की अलाहाबाद किल्ल्यामध्ये असलेल्या स्तंभावर जो समुद्रगुप्ताचा म्हणून दीर्घ कोरीव लेख आहे त्यात ’देवराष्ट्र’ नावाच्या नगराचा आणि तेथील ’कुबेर’नामक राजाचा उल्लेख आहे. लेखाच्या १९व्या आणि २०व्या ओळीत समुद्रगुप्ताच्या दक्षिणेतील मांडलिक राजांची नावे आहेत.

'टूडीवर्ल्ड'च्या अद्भुत दुनियेत!

आपल्यातील अगाध परंतु मर्यादित बुद्धीमत्तेच्या कुवतीनुसार आपण लांबी, रुंदी व उंची या त्रिमिती (व काळ ही चौथी मिती) विश्वात राहणारे प्राणी आहोत याची आपल्याला कल्पना आहे. परंतु विज्ञान कथालेखक मात्र अनेक वेळा बहुमिती विश्वात आपल्याला नेतात व तेथील चक्रावून सोडणाऱ्या गोष्टीतून आपले मनोरंजन करत असतात. त्यांच्या मते त्या बहुमिती विश्वातील माणसं आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असतात. मेंदूला थोडे जास्त ताण दिल्यास विज्ञान कथालेखक वर्णन करत असलेल्या बहुमिती विश्वाची आपण कल्पना करू शकतो व त्यात राहणाऱ्या सूपरइंटेलिजेंट प्राण्यांच्या जीवनाचा वेध घेऊ शकतो.

ओझोन दिनाच्या निमित्ताने

ओझोन दिनाच्या निमित्ताने..

माहिती

'जीवन रसायन चिकित्सा शास्त्र अर्थात बाराक्षार चिकित्सा पद्धती'
लेखक - डॉ. गोपाळ सदाशिव पळसुले
संस्थापक - श्रीकृष्ण होमियो फार्मसी, पुणे.

हे पुस्तक पुण्याव्यतिरिक्त इतर शहरांत कुठे उपलब्ध आहे का?
असल्यास, संबंधित दुकानांचा पत्ता मिळू शकेल का?

लेखनविषय: दुवे:

ईदका चाँद आणि ब्ल्यू मून

या दोन्ही प्रकारच्या चंद्राचे उदाहरण साधारणपणे 'दुर्मिळ' या एकाच अर्थाने दिले जाते. एकादा माणूस सहसा भेटेनासा झाला तर त्याला उद्देशून "तुम तो भाई अब ईदका चाँद हो गये हो!" असे म्हंटले जाते आणि क्वचित कधी तरी घडणार्‍या घटनेला 'वन्स इन ए ब्ल्यू मून' असे म्हणतात. या दोन्ही प्रकारचे चंद्रदर्शन थोडे दुर्लभ असले तरी त्या अगदी वेगळ्या आणि परस्पराविरुध्द प्रकारच्या घटना असतात. ईदचा चंद्र दिसलाच तर तो अत्यंत फिकट रेघेसारखा दिसतो तर ब्ल्यू मून हा पौर्णिमेचा चंद्रमा चांगला गरगरीत आणि पूर्ण वर्तुळाकृतीच्या रूपात असतो.

नेटिझन्सचा उर्मटपणा!

संगणक (व संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधा) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे.

घरमालकांनो सावधान.....भाडेकरूची माहिती द्या....नाहीतर...!!!

रोज सकाळी उठल्या उठल्या हातात वर्तमानपत्र लागते, (फक्त वाचण्यासाठी) आता न्यूज चानेल च्या भाऊगर्दीत वर्तमानपत्राचे काय एवढे महत्व...असे डायलॉग मारू नका. पण आख्या दिवसाच्या बातम्या एकदाच वाचायला मिळतात ना...तर असो, तर सकाळी-सकाळी सकाळ वाचायला घेतला अन सकाळचा (वर्तमानपत्राचा) मथळा पाहून सकाळीच माथा सरकला, बातमी होती, "भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर गुन्हे." भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या 28 घरमालकांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, अटक आणि अर्थीक दंड हि होऊ शकतो.

भारतीय राष्ट्रध्वज....!!!

तिरंगा उत्सव तीन रंगाचा ,
आभाळी आज सजला ,
नतमस्तक मी या सर्वांसाठी ,
ज्यांनी भारत देश घडविला,
भारत देशाला मनाचा मुजरा...

 
^ वर