भाषाशास्त्राची ऑलिंपियाड स्पर्धा

नमस्कार मंडळी,

गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र या विषयांप्रमाणेच भाषाशास्त्र या विषयातही ऑलिंपियाडची स्पर्धा घेतली जाते. २००९ सालापासून भारताने या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली आहे आणि काही पदकेही मिळवली आहेत. यावर्षीपासून या स्पर्धेसाठीचे भारतीय प्रतिनिधी ठरवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी २ फेब्रुवारी २०१३ रोजी होईल. त्यातून मुख्य स्पर्धेसाठी ४ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल .

त्याआधी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे तपशील पुढीलप्रमाणे-
कालावधी: ६ दिवस (२४ ते २९ डिसेंबर, २०१२)
वेळः सकाळी १० ते दुपारी ४
स्थळः भाषाशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, कालिना

अधिक माहितीसाठी कृपया या संस्थळाला भेट द्या- https://sites.google.com/site/paninilinguisticsolympiad/

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यशाळेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे आई-वडिल, शिक्षक, भाषा या विषयात रुची असणारे सर्वच भाग घेऊ शकतात.

'उपक्रमी या माहितीचा उपयोग करून घेतील अशी आशा आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

ही माहिती ईमेलने अन्य लोकांना पाठवत आहे, धन्यवाद

ही माहिती ईमेलने अन्य लोकांना पाठवत आहे, धन्यवाद.

संपादन

लेखकाला स्वतःच्या धाग्याचे संपादन करता येत नाही का आता?
मला शेवटचे वाक्य बदलून 'उपक्रमी या माहितीचा उपयोग करून घेतील अशी आशा आहे' असे करायचे आहे. प्रशासकांना हा बदल करण्याची विनंती.

 
^ वर