युरेका फोर्ब्स ची ग्राहक हित विरोधी भूमिका

डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड या धुळे जिल्ह्यातील अवधान एमआयडीसी स्थित नामांकित उद्योग संस्थेने आपल्या कर्मचार्यांकना स्वच्छ व शुद्ध पेयजल मिळावे या करिता युरेका फोर्ब्ज या पुणे स्थित कंपनीकडे विचारणा केली असता युरेका फोर्ब्ज तर्फे श्री. पियूष अरोंडेकर यांचेकडून दिनांक १४.०८.२०१२ रोजी अ‍ॅक्वागार्ड आर ओ (रिवर्स ओस्मोसिस) प्युरिफायर कम कुलर चा प्रस्ताव देण्यात आला. सदर प्रस्तावावर संचालक मंडळात चर्चा होऊन त्यानुसार युरेका फोर्ब्जला डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड व्यवस्थापनाकडून प्युअरचिल आर ओ अ‍ॅक्वागार्ड ची मागणी दिनांक २२.०९.२०१२ रोजी नोंदविण्यात आली व तत्काळ दिनांक २६.०९.२०१२ रोजी या प्युरिफायरची संपूर्ण खरेदी किंमत रु.८२,५००/- (रुपये ब्याऐंशी हजार पाचशे फक्त) देखील चूकती करण्यात आली.

मागणीनुसार युरेका फोर्ब्ज तर्फे प्युअरचिल एफ एस एस ८० आर ओ अ‍ॅक्वागार्ड हे वॉटर प्युरिफायर कम कुलर दिनांक २७.०९.२०१२ रोजी पाठविण्यात आले. परंतू सदर वॉटर प्युरिफायर कम कुलर चे पॅकींग डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड ने केवळ युरेका फोर्ब्ज च्या अधिकृत अभियंत्याच्या उपस्थितीतच उघडावे व त्यानंतरच त्यास कार्यान्वित केले जावे अशा स्पष्ट सूचना युरेका फोर्ब्ज कडून डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड यांस देण्यात आल्या. त्यानुसार दिनांक ०८.१०.२०१२ रोजी युरेका फोर्ब्जचे अभियंता श्री. राजेंद्र कोल्हे यांच्या समोर पॅकींग उघडण्यात आले असता आतील वॉटर प्युरिफायर कम कुलर मोडलेल्या अवस्थेत दिसून आले. तसा तपासणी अहवाल श्री. कोल्हे यांनी युरेका फोर्ब्ज यांना पाठविला व त्यानुसार वॉटर प्युरिफायर कम कुलर बदलून देण्याची जबाबदारी युरेका फोर्ब्ज यांनी स्वीकारली.

ठरल्यानुसार दिनांक २२.१०.२०१२ रोजी युरेका फोर्ब्ज यांनी वॉटर प्युरिफायर कम कुलर बदलून पाठविला. सदर वॉटर प्युरिफायर कम कुलर श्री. राजेन्द्र कोल्हे यांनी दिनांक २५.१०.२०१२ रोजी कार्यान्वित केला. चार दिवसातच वॉटर प्युरिफायर कम कुलर मधून शुद्ध पेय जल मिळणे बंद झाले. डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड व्यवस्थापनाकडून ३०.१०.२०१२ रोजी युरेका फोर्ब्ज कडे तशी तक्रार नोंदविण्यात आली. सदर तक्रारीवर युरेका फोर्ब्जकडून कुठलीच त्वरीत कृती न केली गेल्याने दूरध्वनी तक्रार निवारण केंद्र (०२०३९८८३३३३), ईमेल customercare@eurekaforbes.com व संकेतस्थळ http://www.eurekaforbes.com/servicerequeststeps.aspx अशा सर्वच ठिकाणी तक्रार नोंदविण्यात आली. तरीही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी फेसबुक पेज https://www.facebook.com/EurekaForbes येथे देखील तक्रार नोंदविली गेली. त्याच प्रमाणे दूरध्वनी तक्रार निवारण केंद्रावरही (०२०३९८८३३३३) पुन्हा पुन्हा तक्रारीचा पाठपुरावा करण्यात आला. यासंबंधी झालेले सर्व संभाषण डीसान अ‍ॅग्रोटेक व्यवस्थापनाने ध्वनिमुद्रित करून ठेवले आहे. तसेच ईमेल व संकेतस्थळावर वेळोवेळी केलेल्या तक्रारींची नोंदही आहे.

त्यानंतर दिनांक ०८.११.२०१२ रोजी श्री. राजेंद्र कोल्हे यांनी डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड येथे येवून वॉटर प्युरिफायर कम कुलर ची दुरूस्ती केली. परंतू त्यानंतर सदर वॉटर प्युरिफायर कम कुलर फक्त दोनच दिवस कार्यरत राहिले व पुन्हा नादुरूस्त झाले. या घटनेनंतर अनेकवेळा तक्रारी व पाठपुरावा करून युरेका फोर्ब्ज कडून डीसान अ‍ॅग्रोटेक लिमिटेड यांस कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. उलट तुम्ही चूकीचे वॉटर प्युरिफायर कम कुलर निवडले. हे तुमच्या पाण्याकरिता योग्य पर्याय होऊ शकत नाही असे उत्तर देण्यात आले. खरे तर हे वॉटर प्युरिफायर कम कुलर युरेका फोर्ब्जचेच श्री. पीयुष अरोंडेकर यांनी सूचविले होते; परंतू तरीही अशा प्रस्तावाची जबाबदारी डीसान अ‍ॅग्रोटेक वर टाकणे हे सर्वथा अयोग्य आहे.

तेव्हा हे वॉटर प्युरिफायर कम कुलर पुन्हा युरेका फोर्ब्ज यांनी ताब्यात घेवून त्याची खरेदी किंमत डीसान अ‍ॅग्रोटेक यांस त्यांनी परत करावी अशी मागणी डीसान अ‍ॅग्रोटेक व्यवस्थापनाने केली. परंतू या मागणीसही युरेका फोर्ब्ज यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.

डीसान अ‍ॅग्रोटेकचा कर्मचारी वर्ग तसेच खरेदी व विक्री निमित्त रोज आस्थापनेला भेट देणार्या अनेकांस आता युरेका फोर्ब्जच्या तथाकथित कार्यक्षमतेची तसेच विक्रीपश्चात सेवेची सत्यता ध्यानात आली आहे. एका मोठ्या व नामांकित उद्योग संस्थेला ग्राहक म्हणून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य ग्राहकांची युरेका फोर्ब्ज कडून काय पत्रास ठेवली जात असेल? असा सवाल धुळ्यातील नागरिक आता विचारू लागले आहेत.

युरेका फोर्ब्सच्या फेसबुक पानावर https://www.facebook.com/EurekaForbes येथे पाहणी केली असता हजारो त्रस्त ग्राहकांच्या तक्रारी व असमाधान व्यक्त करणारी शेरेबाजी आढळून येते आहे.

तरी युरेका फोर्ब्जने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा डीसान अ‍ॅग्रोटेक व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

तांत्रिक मदत हवी असल्यास ....

काही तांत्रिक मदत हवी असेल तर जरूर संपर्क करावा.

ह्या मोठ्या कंपन्यांबद्दल अधिक बोलणे न बरे. कुठल्या प्रकारचा RO आहे व capacity ते सांगितल्यास बरे.

पाणी खराब? (पाण्याकरिता योग्य पर्याय)

म्हणजे एखाद्या व्यक्तीने किवा गटाने वॉटर प्युरिफायर घ्यायचा असल्यास आपल्या पाण्याची तपासणी करुन घ्यावी व त्या प्रमाणे वॉटर प्युरिफायर निवडावा, असे कपनीचे म्हणणे आहे काय? या मुद्द्यावर तर क॑पनी सर्व तक्रारी निकाली लावणार. कारण लोका॑कडे असे रिपोर्ट कसे असणार? नविन वॉटर प्युरिफायर घेणार असेल तर या मुद्द्याचे काय?

 
^ वर