प्रस्ताव

सप्रेम नमस्कार,
आपल्या समुदायाचे ३७ सदस्य आहेत. परंतु, बालसाहित्याशी निगडित विचारांची फारशी देवाण-घेवाण झालेली दिसत नाही.
आपल्या समुदायाचा उद्देश हा केवळ बालसाहित्यापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये बालशिक्षण, बालविकास आणि कायदा व सुव्यवस्था ह्या विषयाचा अंतर्भाव असावा असे वाटते.

Comments

सहमत

या बद्दला आपल्या काय सुचवण्या आहेत?

चांगली कल्पना आहे

चांगली कल्पना आहे

अगदि खरे

प्रस्तुत कल्पना स्तुत्य आहे ...

बालसाहित्य, ....

सप्रेम नमस्कार,

(१) बालवयोगट काय असावा? - शिशू-बालवर्ग (के.जी.), प्राथमिक (प्राईमरी), माध्यमिक (सेकंडरी)
(२) बालसाहित्याचे प्रकार काय असावेत? - पुस्तके, दॄक्-श्राव्य साधने, क्रिडा साहित्य वगैरे.
(३) बालशिक्षणात शिक्षकांचा व पालकांचा सहभाग कसा असावा? त्यांची नेमकी भूमिका काय असावी?
(४) ही भूमिका व मुलांची मानसिकता ही त्यांच्या प्रगतीसाठी / अधोगतीसाठी कशी कारणीभूत ठरते?
(५) शिक्षक, पालक व मुले ह्यांच्या हक्क आणि कर्तव्यांबाबत कायद्यामध्ये काय तरतूदी आहेत? व कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत?

सदस्यांची मते, सूचना, इ. जाणून घ्यायला आवडेल.

बालशिक्षण............

अभंगजी ,
मी पहिल्यांदा आपलं अभिनंदन करतो की तुम्ही सगळ्यात दुर्लक्षित असलेल्या विषयाला हात घातलाय.सुदैवाने मी बालशिक्षणात काम करतो.आपल्याला माहितच आहे की ओपचारिक शिक्षणात बालशिक्षणाचा वाटा पायाभूत स्वरूपाचा आहे. पण दुर्दैवाने बालशिक्षण अजुनही दुर्लक्षित कार्यक्षेत्र आहे. खरे तर बालकाच्या सर्व मूलभूत क्षमता याच काळात विकसित होतात. नवनिर्मितीच्या क्षमतेचे बीज याच काळात अंकुरित होते. बालकाच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील सर्व शिक्षणाचा पाया कच्चा राहतो. यासाठी 'बालशिक्षणाचा आशय'हा आजचा ऐरणीवरचा विषय ठरतो . परंतू आपण या शिक्षणाला पूर्व प्राथमिक म्हट्ल्यामुळे याच्या आशयाला बाधा येते. कारण यामुळे वाचन , लेखन , गणन अशी औपचारिक शिक्षणाची पूर्वतयारी करुन घेणे , असा बालशिक्षणाचा चुकीचा अर्थ लावला जातो. आणि बालवाडीतच पहिलीची पूर्वतयारी करवून घेण्याचा अट्ठहास केला जातो. याबद्दल तुमची मतं मला जाणून घ्यायला आवडतीलं.

धन्यवाद!

कल्पना

कल्पेश,
तुम्ही सुद्धा येथे गरजा/कल्पना मांडा. तुमचे सर्व मुद्दे योग्य आहेत.

चांगली कल्पना आहे

यावर अधिक विस्तार होऊ द्या म्हणजे काय करायचं मनात आहे ते कळेल.

अजून काही विषय ..........

धन्यवाद!
प्रणाली आणि चाणक्य.
प्रस्तावात आपल्याला अजून विषय वाढवता येतील.
(१) भारतीय बालशिक्षणाचा इतिहास - यात भारतात बालशिक्षणाची सुरवात कधी झाली ? कोणी केली ?
(२) बालशिक्षणात पाश्चात्य देशातील शिक्षण शास्त्रज्ञांचं योगदान -यात जीन पियाजेची थेअरी , मारिया मॉंटेसोरिची पद्धत तसेच साधने , रूसो , पेस्टॉलोजी यांचे शिक्षणविषयक विचार मांडता येतील.
(3) सध्या सरकारी स्तरावर बालशिक्षणाबाबत चाललेल्या घडामोडीं बाबत चर्चा. तसेच बालशिक्षणाची अवस्था. (चांगली /वाईट )

तुम्हा सगळ्यांना या विषयांबाबत काय वाटतय हे जाणून घ्यायला आवडेल.

धन्यवाद!

चर्चा

कल्पेश,
मला वाटते की माहिती उपलब्ध असलेल्या विषयांवर लेखन/चर्चा सुरु केल्यास या प्रस्तावाला काहीतरी मुर्त स्वरुप येईल अथवा नुसताच एक प्रस्ताव राहून जाईल.

बालसाहित्य, ....

सप्रेम नमस्कार,

श्री. कल्पेश ह्यांनी दिलेल्या १४ मार्च च्या प्रतिसादामध्ये - "...परंतू आपण या शिक्षणाला पूर्व प्राथमिक म्हट्ल्यामुळे याच्या आशयाला बाधा येते. .... असा बालशिक्षणाचा चुकीचा अर्थ लावला जातो. आणि बालवाडीतच पहिलीची पूर्वतयारी करवून घेण्याचा अट्ठहास केला जातो". असे म्हटले आहे.
ह्यावरुन बालशिक्षणाचे शालेय शिक्षण व शाळेबाहेरील शिक्षण असे प्रकार असावेत किंबहुना आहेत असा अर्थ घ्यावयाचा असेल तर ते योग्यंच आहे असे वाटते. पण त्याची विभागणी वयोगटानुसार कशी करावयाची ?

त्याचंप्रमाणे कल्पेश ह्यांच्या १८ मार्च च्या प्रतिसादामध्ये मांडलेला तिसरा मुद्दाही मी मांडलेल्या मुद्यांशी समांतर आहे.

ऐतिहासिक आणि पाश्चात्य शिक्षण पद्धती बद्दल फारशी माहिती नाही पण त्याचा सध्याच्या पद्धतीशी कसा संबंध आहे किंवा विसंगति आहे ह्याचा खुलासा व्हावा. म्हणजे, इतर मुद्यांवरही चर्चा करता येईल.

बालशिक्षणाचं वय ...................

सर्वांना नमस्कार,

ह्यावरुन बालशिक्षणाचे शालेय शिक्षण व शाळेबाहेरील शिक्षण असे प्रकार असावेत किंबहुना आहेत असा अर्थ घ्यावयाचा असेल तर ते योग्यंच आहे असे वाटते. पण त्याची विभागणी वयोगटानुसार कशी करावयाची ?
मानसशास्त्राने बालशिक्षणाचे वय , वय वर्षे 2 ते 6 किंवा 7 वर्ष असं मानलं आहे. मात्र आपल्याकडील अंगणवाड्यांत 3 ते 6 वर्षे हा वयोगट शिक्षण योग्य मानला आहे. म्हणजेच 0 ते 3 वर्षांपर्यंत मुलाचं शिक्षण घरच्या वातावरणात होतं. इथे शिक्षण याचा अर्थ काही मूलभूत कौशल्य (चालणे , धावणे , उडी मारणे , ऐकणे , प्रतिसाद देणे , बोलणे )शिकणे असा घेतला आहे. खरं तर बालशिक्षणाच्या वयात ( 3 ते 6 वर्ष )या मूलभूत कौशल्यांचा विकास करणे अपेक्षित आहे.

ऐतिहासिक आणि पाश्चात्य शिक्षण पद्धती बद्दल फारशी माहिती नाही पण त्याचा सध्याच्या पद्धतीशी कसा संबंध आहे किंवा विसंगति आहे ह्याचा खुलासा व्हावा. म्हणजे, इतर मुद्यांवरही चर्चा करता येईल.
मधल्या काळात(सन 1912 ते 1958) पाश्चात्य जगात बालशिक्षण विषयक प्रयोग झाले. त्याआधीच मानसशास्त्र ही शाखा उदयास आली होती हे सगळे प्रयोग त्यावेळचे मानसशास्त्रज्ञ सेग्वीन आणि ईटार्ट यांच्या थेअरीवर अवलंबून होते.हिच थेअरी वापरून पुढे डॉ. मारिआ मॉंटेसोरींची साधनाआधारित शिक्षणपद्धती अस्तित्वात आली. भारतात भावनगरचे(गुजरात) प्रख्यात वकील गिजूभाई बधेका यानी मॉंटेसोरी बाईंची पुस्तके वाचून आपल्या देशाचा संदर्भ लक्षात घेऊन काही प्रयोग केले.त्यांना साथ दिली ती श्रीमती तासाबाई मोडक यांनी.

धन्यवाद !

अनुमोदन

श्री अभय देशपांडे,
या विषयीचा व्यनी मला गेल्या महिन्यात आल्याचे नुकतेच बघितले. हल्ली इथे मी क्वचितच येत असल्याने आधी प्रतिसाद देऊ शकलो नाही. क्षमस्व.

उपक्रमपंत,
माझेही या मताला अनुमोदन आहे व या दृष्टीने समुदायात बदल उपक्रमपंत आपल्या अखत्यारित करू शकतील असे वाटते. मला समुदायाच्या उद्देशांत समुदाय-संयोजक म्हणून बदल करायचे अधिकार असले तरी मी यद्दृच्छेने असे करणे अयोग्य समजतो. तेव्हा उपक्रमपंतांनी योग्य ते बदल करावेत अशी विनंती करतो

याउपर मला यात काही करावे लागेल असे वाटत नाही, तरी माझ्याकडून कृतीची गरज असल्यास कळवावे. तसेच उपक्रमपंतांना व्यवस्थापनाच्या सोयीसाठी या समुदायाचा संयोजक बदललायचा असल्यास हरकत नाही.

 
^ वर