शाहरुख आणि इतर सेलेब्रिटींना लगाम घालावा का?

ज्यांच्याकडे लोक रोल मॉडेल म्हणून बघतात त्या शाहरुख आणि इतर सेलेब्रिटींनीही ताळतंत्र सोडून दिल्याच्या खबरा आपण रोज वाचतो. मटातील बातमी अशी -

शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा!

बुधवारी कोलकाताने मुंबई विरुद्धची मॅच ३२ धावांनी जिंकली आणि शाहरुखला प्रचंड आनंद झाला. आपला आनंद साजरा करण्यासाठी मॅच संपल्यानंतर त्याने खेळाडूंच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला. तिथे कोलकाता टीमच्या खेळाडूंचे अभिनंदन करुन शाहरुख मैदानात आला. मैदानात एक लांब फेरी मारत त्याने प्रेक्षकांना अभिवादन करायला सुरुवात केली. सुरक्षा रक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न करताच शाहरुख आणि त्याच्या बॉडीगार्डनी सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांनी हस्तक्षेप करुन शाहरुखची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शाहरुखने असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव देशमुख आणि अन्य पदाधिका-यांचा अपमान केला.

या प्रकारच्या बातम्यांनी कधी शाहरुख, कधी प्रीती, कधी जॉन अब्राहम वर्तमानपत्रांची जागा व्यापतात. आता शाहरुखला वानखेडेवर बंदी घातली आहे पण शाहरुखचा कांगावा आता पुढे आला आहे. त्यावर विश्वास ठेवून ही बंदी मागे घेतली जाईल का?

या सेलेब्रिटींना अद्दल घडवणे शक्य आहे असे वाटते का? त्यांच्याकडे रोल मॉडेल म्हणून पाहू नका हे लोकांना कसे सांगायचे? असे लगाम घालणे या सेलेब्रिटींच्याच पथ्यावर पडते असे वाटते का? इतर देशांत सेलेब्रिटींना होणार्‍या शिक्षा भारतात अंमलात येतील का?

या बातमीबद्दल उपक्रमींचे मत काय?

Comments

हम्म!

जे सलमानचे झाले, सैफचे झाले, जॉन अब्राहमचे झाले तेच शाहरुखचे होईल. काळजी नसावी!

शाहरुख

शाहरुखचा एकही नवीन चित्रपट येऊ घातलेला नाही, मग त्याने हे का करावे हे कळत नाही. तो मैदानात जाण्याचा प्रयत्न करत होता तेंव्हा मैदान जवळजवळ रिकामे झाले होते आणि मैदानावरचे दिवेही मालवलेले होते, असे समजते. मग ज्या प्रेक्षकांना त्याला अभिवादन करायचे होते ते प्रेक्षक कोण? 'आय वॉज अँग्री, नॉट ड्रंक' असे शाहरुख म्हणतो. 'आधीच मर्कट... हे आठवणे' साहजिक आहे.कणेकरांनी लिहिले आहे की ते अमेरिकेत गेले असताना ते मद्यपान करत नाहीत हे कळाल्यावर ज्यांच्याकडे ते उतरले होते त्यांना आपले पैसे वाचल्याचा आनंद झाला, पण त्याऐवजी ते उठसूट भारतात फोन करत सुटले तेंव्हा त्यापेक्षा हा माणूस पिऊन पडला असता तर बरे झाले असते असे त्यांना वाटले! त्या न्यायाने सामन्यादरम्यान /सामन्यानंतर शाहरुखच्या पिण्याची व्यवस्था करणे बीसीसीआयला परवण्यासारखे आहे. 'वानखेडेवर प्रवेश करण्याला मला बंदी घातली तर मला काही फरक पडत नाही' असेही हे चिरंजीव म्हणतात. काही वर्षांपूर्वी 'अमेरिकेत प्रवेश करण्याला मला बंदी घातली तर मला काही फरक पडत नाही' असे म्हणणारे हेच ते चिरंजीव. म्हणजे 'ही मे बी राँग बट ऍट लीस्ट ही इज कन्सिस्टंट' असे म्हणून आपण त्याला माफ करुन टाकू. शेवटी प्रश्न राहिला तो त्याच्या मस्तीचा. तर शाहरुखने मस्ती करायची नाही तर कुणी करायची?
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

चूकून मी वाचलं.- 'या बातमीबद्दल उपद्रवींचे मत काय?'

आपला देश आर्थिक सुबत्तेबाबत, व्यक्तिगत यशाबाबत मोठा होत आहे, विकसित होत आहे. आत्ताच्या काळात एखादी उत्तुंग आकांक्शा असलेल्या व्यक्तीने प्रयत्न केले व संधींचे योग जुळून आले तर दहा-पंधरा वर्शात करोडपती होणं शक्य होत आहे.

परंतु इतक्या कमी काळात धनवंत होताना स्वभावातील काही भाग विकसित होण्याचा राहून जाऊ शकतो, पूर्वानुभवामुळे आलेला स्वभावातील धारधारपणा, टोकदारपणा बाकी राहू शकतो. यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतर स्वभावातील ह्या उणीवा दूर होण्यासाठी हालचाल व्हायला हवी. व अशा व्यक्तीगत हालचालींना समाजातील इतर व्यवसायिक अंगाने उपचार करीत सामाजिक स्वास्थं टिकवणं हेच समाजाच्या भल्याचे व उत्कर्शाचे होवू शकते.

जसे व्यायाम करून घेण्यासाठी ट्रेनर असतात, आहारावर संयमन होण्यासाठी डायट्रीशिअन असतात तसेच यश, पैसा, संमृद्धी ही एखाद्या व्यक्तीला मिळत गेल्यावर समाजात आपली प्रतिमा कशी हाताळावी? समाजातील छोट्यात-छोटे व शुल्लक वाटणारे एटीकेटस व मॅनर्स कसे पाळावेत यांची आध्यायिका (इं.:कॉर्स) विकसित होवून त्यांची ओळख प्रशिक्शित शिक्शकांकडून अशा यशस्वी व्यक्तींना दिली जायला हवी.

मुळात अशा आध्यायिका विकसित होणं व त्यांना सेलिब्रीटीजना त्यांचा इगो संभाळत पोहचवण्याबाबत शिक्शकवर्ग तयार करणं ही एक नवी रोजगारनिर्मिती होऊ शकते. जे समाजाच्या भल्याचे व सुबत्तेस पोशक होवू शकेल.

तसे झाले नाही तर...
गंडे-धागे, जादू-टोणा, राहू-केतू ह्या संकल्पनांवर आधारलेली अर्थव्यवस्था डोके वर काढील.

जे अशा आध्यायिकांचा वा साधनांचा उपयोग स्वतःच्या भल्यासाठी करून न घेता त्यांच्याकडून असभ्यपणे वागणं चालूच राहत असेल तर नियम पाळणार्‍यांकडून, कायदा रक्शण करणार्‍यांकडून योग्य ती कारवाई होईल असे आपण स्वतःच स्वतःस समजवावे व आपल्या कामात व्यग्र व्हावे.

'रोल मॉडेलकडे बनून आपला विकास करणे' हा जुना विचार आहे. स्वतःचा विकास, स्वतःच करायचा असतो. फक्त आपला विकास समाजाला काहितरी देण्याहेतूने व्हायला हवा तसे होत नसेल तर किमान आपल्यापासून समाजात तेढ-तंटा व स्वतःस मनस्ताप व्हावयाचा नाही हे बघितलं जायला हवं.

कोण कुणाला लगाम घालणार?

हितसंबंध जोपासणारी दुनिया - तेरीभी चुप, मेरीभी चुप!
(विलासराव मध्यस्थी करतील, सावंत गप्प बसतील, वानखेडे सिक्युरिटीची माणसे तक्रार मागे घेतील, लोक विसरून जातील, म्यॅटर खतम...)

अंबानींना विसरलात?

(विलासराव मध्यस्थी करतील, सावंत गप्प बसतील, वानखेडे सिक्युरिटीची माणसे तक्रार मागे घेतील, लोक विसरून जातील, म्यॅटर खतम...)

इतर कोणी नसतील तर अंबानी असतीलच. वानखेडेवर बंदी घातली तर येलच्या फूटबॉल स्टेडियमवर शाहरुख फेरी मारताना दिसेल. हाय काय आणि नाय काय!

सध्या म्हणे ५ वर्षांची बंदी आहे, शाहरुखच्या "सद्वर्तनाने" ती पाच महिन्यांची किंवा दिवसांची झाली तर आश्चर्य वाटायला नको.

तूर्तास,

१. जेथे शाहरूखला बोलवायचे नाही असे - म्हणजे एखादा पारितोषिक वितरण सोहळा.
२. फराहखानच्या पुढल्या चित्रपटाचे शूटींग वगैरेसाठी वानखेडे वापरता येईल. ;-)

पत्रकारांना नाहीयेत उद्योग

बहुदा या पत्रकारांना नाहीयेत उयोग.. उगाच काहितरी टैमपास चाल्ला आहे! ;)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

+१

सहमत!

"व्हेनेवर आय स्टार्ट फिलींग टू ऍरोगंट अबाउट मायसेल्फ आय ऑलवेज..

...टेक अ ट्रीप टू अमेरिका"

आता त्याला त्यासाठी पदरमोड करून अमेरिकेत जायची गरज नाही. :)

गल्लत

आता त्याला त्यासाठी पदरमोड करून अमेरिकेत जायची गरज नाही. :)

ते साहेब पदरमोड करून अमेरिकेत जात नाहीत. त्यांच्यासाठी चार्टर्ड विमाने सोडली जातात पण अमेरिकेत जायची गरज नाही हे खरेच.

गल्ली

धागा पाहून चुकीच्या संस्थळावर आलो की काय असे वाटले. पण बॅकग्राऊंड तर निळीच दिसली.

नितिन थत्ते

निळा की लाल?

धागा पाहून चुकीच्या संस्थळावर आलो की काय असे वाटले. पण बॅकग्राऊंड तर निळीच दिसली.

निळी की लाल याने तुम्हाला काय फरक पडतो चाचा? तुम्ही थोडेच रंगद्वेष्टे आहात?

आयपीएलसारखा वाह्यातपणा बंद करावा याच्याशी सहमत आहे. लोक ऑफिसात कामे सोडून आयपीएलच्या बातम्या, विडिओ बघताना आढळतात. वेस्ट ऑफ टाइम!

सगळ्यांना लगाम हवा

शाहरुखसोबत मीडिया, बीसीसीआय ह्यांनाही लगाम घालायला हवा. पण घालणार कोण आणि कसा. आयपीएलचा टीआरपी कमी करायला माझ्यातर्फे मी मॅचा न बघण्याचे काम करतो. असो. आयपीएल दिवसेंदिवस अधिकाधिक किळसवाणे होते आहे. अशा बातम्यांचे सादरीकरण, त्यांना दिला जाणारा वेळ, स्पेस वगैरे ग्रेटच. एकंदरच आपल्या ढासळत्या बौद्धिक वगैरे वगैरे स्तरांचे उत्तम उदाहरण.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर