उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?
निमिष_सोनार
September 3, 2012 - 7:33 am
(१) जन्मकुंडलीत नोकरी, करीअरचे स्थान कोणते? सहावे की दहावे?
(२) तसेच, सहावे स्थान शत्रू, रोग दर्शवते. त्यानुसार जर सहाव्या स्थानात सिंह राशी असून त्याचा मालक रवी बाराव्या स्थानात कुंभ राशीत असेल तर त्याचे फळ काय मिळेल?
(३) आणि दहाव्या स्थानात धनू राशी असून त्याचा मालक गुरू हा तिसर्या स्थानात चंद्राबरोबर वृषभ राशीत असेत तर त्याचे फळ काय?
दुवे:
Comments
संपादक महोदय
हा लेख उपक्रमची मार्गदर्शक तत्त्वे व ध्येयधोरणे यात बसू शकतो काय?
या आधीही
धोरणात बसतो की नाही वगैरे माहिती नाही पण उपक्रमावर आधीही फलज्योतिष आणि श्रद्धा/अंधश्रद्धा इ. विषयावर जोरदार चर्चा झालेल्या आहेत असे आठवते (उदा. http://mr.upakram.org/node/1144 ही चर्चा पाहा). उपक्रम संकेतस्थळाने एका विचारधारेचा पुरस्कार/धिक्कार केला आहे असे वाटले नाही. हां, इथले सदस्य (माझ्यासह) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार हिरिरीने करतात त्यामुळे पाहणार्याला कदाचित असे वाटू शकेल.
+१
अगदी सहमत आहे. इतकेच नव्हे तर इथे ज्योतिषशास्त्र या नावाचा समुदाय देखील आहे.
तेव्हा या विषयावर अश्या प्रकारची चर्चा होण्यास व्यवस्थापनाचा आक्षेप दिसत नाही (आणि ते योग्यच वाटते)
मात्र येथील सदस्य अश्या प्रकारच्या चर्चेत आता फारसे उत्साही राहिलेले दिसत नाहीत (माझ्यासकट)
सोनार....
चक्क चक्क उपक्रमावर असं काही?
ह्यापेक्षा सौदीमध्ये सार्वजनिक गणपती मोठ्ठ्या चौकात, धुमधडाक्यात बसवणं सोपय की.
@चंद्रशेखर;-
हॅव अ लुक अॅट धिस :- http://mr.upakram.org/node/38
असा प्रश्न
जीवनात जन्मकुंडलीचे स्थान कोणते? असा प्रश्न पडला नाही का?
सहमत आहे
सहमत आहे. असा प्रश्न पडावा.
बहुधा
तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी हे स्थळ योग्य नाही. यदाकदाचित, गुंडोपंतांनी पुनर्जन्म घेतला तर उत्तर मिळूही शकेल. :-)
सल्ला
विज्ञान आणि श्रद्धा यात अनेक फरक आहेत. तुमच्या प्रश्नाच्या सन्दर्भात दोन फरक महत्वाचे ठरतात.
एक, विज्ञान हा सत्याचा शोध असतो, व म्हणून विज्ञानात बहुतेक उत्तरे एकमेव (यूनीक) असतात. क्लोरीनचा अटोमिक नम्बर काय या प्रश्नाचे उत्तर कोणतही वैज्ञनिक १७ असेच देईल. दोन, जर वैज्ञानिकान्च्यात मतभेद झालेच, तर ते त्या मतभेदान्च्या मुळाशी जाऊन मतभेदाचे कारण शोधून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करतात.
श्रद्धेत या दोन्ही गोश्टी नसतात. कुन्डलीत नोकरीचे स्थान कोणते हा प्रश्न दहा ज्योतिषीना विचारल्यास पन्धरा उत्तरे पण मिळू शकतात, कारण काही ज्योतिषी आज जे उत्तर देतील तेच उद्या पण देतील याची शाश्वती नाही. व एकमेकान्च्या उत्तरात फरक का याचा शोध घेण्याचा कोणताही प्रयत्न ते करणार नाहीत. त्यातून, उपक्रम हे स्थळ फारसे ज्योतिश धार्जिणे नाही. इथे तुमच्या प्रश्नाला वात्रट उत्तरे मिळण्याची शक्यताच जास्त. माझा तुम्हाला असा सल्ला आहे कि हे प्रश्न तुम्ही ज्योतिषीनाच विचारावेत, व तुम्हाला आवडेल असे उत्तर मिळे पर्यन्त विचारीत रहावे. जे उत्तर आवडेल ते मान्य करून पुढची वाटचाल करवी. ज्योतिषात अमूक बरोबर व तमूक चूक असे काहीच नसते. त्यामुळे जो ज्योतिषी आपल्याला आवडेल असे उत्तर देईल तो विद्वान असे मानावे.
योग्य सल्ला
हा श्री.चेतन पंडित यांचा सल्ला अगदी योग्य आहे. चाणाक्ष ज्योतिषी पृच्छ्काला आवडेल असेच सांगतात.
ज्योतिष
इथे कोणी ज्योतिष बघते का?
मलाही काही शंका आहेत
आणखी प्रश्न
http://mr.upakram.org/node/1065 हे आधी वाचावे असा सल्ला देतो.
तुमचे प्रश्न वाचून आम्हाला आमचे काही (जुनेच) प्रश्न आठवले.
आधी कोंबडी की आधी अंडे........
असा एक युक्तिवाद किंवा मतप्रवाह आहे की ग्रहांमुळे (कुंडलीतल्या त्यांच्या अस्तित्वामुळे) आपले आयुष्य घडते असे नसून आपले आयुष्य कसे जाणार आहे याची एक साधारण रूपरेषा हे ग्रह दाखवतात. उदाहरण द्यायचे झाले तर रस्त्यावरील मार्गदर्शक चिह्नांचे देता येईल. रस्त्याला वळण (बेंड) असते तेव्हा ते वळण दाखवणारे चिह्न वळणाच्या थोडे आधी रस्त्याच्या कडेला असते. ती खूण आहे म्हणून ते वळण निर्माण झाले आहे असे नसून ते वळण आहेच, फक्त त्या चिह्नामुळे ते तुम्हाला कळू शकते आणि हवे तर तुम्ही वेगनियंत्रणादि काळजी घेऊ शकता. एखाद्याची नोकरी जाणार आहे असे आधी कळले तर तो मनुष्य दुसर्या नोकरीच्या खटपटीस लागू शकतो किंवा उत्पन्नाचे इतर स्रोत चाचपडू शकतो.
अर्थात नियती, प्राक्तन, संचित,कर्मफल, "तूच हो तुझ्या आयुष्याचा शिल्पकार" वगैरे गदारोळातून जुन्याच मुद्द्यांची पुनरुक्ती होत रहाणार. नवे असे फारसे काही सापडण्याची शक्यता नाही. त्यामुळे येथेच थांबावे हे बरे.
ज्योतिषशास्त्रा बद्दल वाद विवाद हा माझ्या चर्चेचा हेतू नव्हे...
ज्योतिषशास्त्र शास्त्र आहे की नाही?, ज्योतिषशास्त्र मानावे की नाही?, या बद्दल मला चर्चा करावयाची नाही.
मी जे प्रश्न विचारले आहेत, त्याची मला कुणी उत्तरे देईल ही अपेक्षा आहे.
बहुमत घेणे
>>ज्योतिषशास्त्र शास्त्र आहे की नाही?, ज्योतिषशास्त्र मानावे की नाही?, या बद्दल मला चर्चा करावयाची नाही.<<
याची गरज वाटत नसल्यास अशा प्रकारच्या 'गंभीर प्रश्नां'ची उत्तरं बहुमताद्वारे ठरविणे इष्ट.
वाचकांना आव्हान करून SMS द्वारे - काही निर्दिष्ट वेळेत - सहाव्या स्थानाला किती मतं व दहाव्या स्थानाला किती मतं मागवून ज्या स्थानाला जास्त मतं हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असे समजून करीअरचे कुंडलीतील स्थान निश्चित करता येईल.
शेवटी काय सगळेच खोटे!
मग खोटेच बोलायचे असे ठरविल्यास मी चुरमुरे खात आहे की सुकामेवा. काही फरक पडत नाही!
वळण चिन्ह ?
निमिष सोनार याना ज्योतिषशास्त्र मानावे की नाही या बद्दल चर्चा करावयाची नसली, तरी इतराना त्यात इन्टरेस्ट असेल तर चर्चा पुढे चालू ठेवता येईल. राही यान्चेच उदाहरणात घेतल्यास त्यात त्रुटि अशी कि केवळ रस्त्यावर "पुढे वळण" असे चिन्ह आहे म्हणून खरोखरच पुढे वळण आहे असे जरूरी नाही. हिन्दी सिनेमातील स्टन्डर्ड सीन आठवावा - गुन्डे नायकाचा पाठलाग करीत आहेत, पुढे एक तिरस्ता येतो, एका रस्त्या कडे "रस्ता बन्द" अशी पाटी असते, नायक आपली गाडी चालू असलेल्या रस्त्या कडे घेतो, पण खाली उतरून ती पाटी बदलून त्याच रस्त्या कडे वळवितो, पाठलाग करणारे गुन्डे चुकिचा रस्ता घेतात व त्यान्ची गाडी दरीत कोसळते. कुन्डलीत ग्रहान्चि स्थिती (म्हणजे काय, हाच मुळात एक वादाचा मुद्दा आहे) ही भविष्यात घडणार्या घटनान्चे मार्ग दर्शक चिन्हे आहेत असे मानायला कोणताच वैज्ञानिक पुरावा नाही, ना थियोरेटिकल, ना प्रक्टिकल.
घाबरलेली माणसे
घाबरलेल्या माणसांचे सांत्वन करायचे की त्यांना हसायचे असा पेच पडतो कधीतरी. :-( निमिष सोनार यांनी भविष्याबद्दल/ कुंडलीबद्दल प्रश्न विचारायची पहिली वेळ नाही. विविध संकेतस्थळांवर यापूर्वीही त्यांचे प्रश्न वाचले आहेत. त्यांनी पैसे खर्चून अपेक्षित फले देणारा ज्योतिषी गाठावा ते बरे!