ज्योतिषशास्त्र

नमस्कार,

ज्योतिष हा सर्वसामान्य माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांना ह्या विषयात जेवढा रस आहे तेवढेच भय ही आहे. आपल्या कुंडलीत काय लिहीले आहे, हे जाणण्याची इच्छा बहुतेक लोकांना असते.

अमूक एक ग्रह अमूक राशीत आला तर काय फळे देईल् या बाबत कमालीचे कुतुहल असते.

त्याचप्रमाणे विविध राशी, नक्षत्रे, तिथी , योग, करण इत्यादी बाबत बराच संभ्रमही असतो.

त्या लोकांसाठी या विषयावर सखोल चर्चा व्हावी आणि त्यातून त्यांना यथार्थ मार्गदर्शन लाभावे ह्या उद्देशाने हा समुदाय सुरू करण्याचा मानस आहे.

त्याचप्रमाणे ज्या लोकांचा ज्योतिषावर फारसा विश्वास नाही पण कुतुहल आहे, अशा लोकांना यातून मनोरंजन आणि माहिती मिळू शकेल.

ंव्यवस्थापनाने अनुमती दिली तर ह्या समुदायाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.

आपला,
(ज्योतिर्भास्कर) धोंडोपंत

लेखनविषय:
 
^ वर