कर्माचा सिद्धांत
~कर्माचा सिद्धांत~
कर्माचा सिद्धांत यावरून अनेकदा चर्चा घडलेली आपण पाहतो.
जगन्नियंता या चर्चेत तरे त्याची टरही उडवली गेली आहे.
मुळात कर्माचा सिद्धांत आहे की नाही या विषयी ही चर्चा नाही. कर्माचा सिद्धांत आहे पण तो कसा या विषयी ही चर्चा आहे.
मग मी विचार केला की सोप्या भाषेत कुठे हा सिद्धांत मिळेल?
तो मला कुंडलीची भाषा या ज्योतिर्विद्या संशोधन मंडळाच्या पुस्तकात मिळाला. (पान १९८, १९८४)
हा सिद्धांत मी येथे देत आहे. मात्र हे ही लक्षात घ्यावे की हा सिद्धांत येथे ज्योतिषाच्या भूमीकेतून मांडला गेला आहे.
या सिद्धांताचे इतरही अनेक प्रकार आहेत असे इतरांच्या बोलण्यातून जाणवले.
शिवाय येथे दिलेला सिद्धांत हा अतिशयच लघु रूपात आहे. याचे कुणी अधिक विवेचन केलेत तर आतिशय आनंद होईल.
आपणास याच्या इतर प्रति माहीती असल्यास त्याही या चर्चेत द्याव्यात ही विनंती.
-----------------------------------------------
कर्माचा सिद्धांत
वॄषभ कन्या व मकर राशीची माणसे अन्नाच्या शोधाद्वारे जन्म मरणाच्या फेर्यात अडकतात.
त्यांची वासना अन्नात आहे
कर्क, वृश्चिक व मीन या राशींची माणसे नेत्राद्वारे जन्म मरणाच्या फेर्यात अडकतात.
त्यांची वासना दृष्टी मध्ये आहे.
नेष सिंह व धनु या राशीच्या माणसाची वासना रूपाच्या स्पर्शात आहे
यातून ते जन्म मरणाच्या फेर्यात अडकतात.
मिथून तुळ व कुंभ राशीची माणसे कानाद्वारे जन्म मरणाच्या फेर्यात अडकतात.
त्यांचे वासना कानात आहे. प्रिय बोललेले आवडते पण अप्रिय बोलणे सहन होत नाही.
-----------------------------------------------
कर्माच्या सिद्धांताचा मुख्य भाझा जन्म मरणाच्या फेर्यात आपण कसे अडकतो हे विषद करण्याचा असावा.
यात आपले रोजच्या आयुष्यात घडणार्य छोट्या मोठ्या घटना सामील आहेत असे असले तरी याचा विचार मात्र एकत्रीत स्तरावर या तत्वाचा विचार करतांना होत असावा असे मला वाटते.
१. मूळ गीतेत श्रीकृष्णाने विवेचित केलेला सिद्धांत कुणी येथे देईल काय?
२. अजून कोणत्या प्रकारचा सिद्धांत ज्ञात आहे?
३. इतर कोणत्या धर्मात अथवा संस्कृतींमध्ये असा सिद्धांत आपणास माहीती आहे का?
४. इजिप्शियन, इंका अथवा माया संस्कृती मध्ये या किंवा तत्सम सिंद्धांताची काही माहीती होती का?
तसेच कर्माच्या फेर्यात अडकलेल्यांना या पार नेण्यासाठी काय उपाय योजना यात आहे हे ही वाचायला आवडेल.
सूचना
तसेच कर्माचा सिद्धांत कसा भंपक/भंकस आहे वगैरे वगैरे मानणार्यां मंडळींनी
कृपया वेगळी चर्चा सुरु करावी. येथे रसभंग करू नये !
---------------------------------------------------
संदर्भ
कृष्णराव प्रल्हाद वाईकर, १९८४, कुंडलीची भाषा, खंड १, ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, गाडगे महाराज कुष्ठधाम, औरंगाबाद रोड, पंचवटी नाशिक -३.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा

संकल्पना
सिद्धांत या टोकाकडे जाण्या आगोदर सुरुवात संकल्पनांपासून करु यात.
इथे जगन्नियंता मध्ये थोड मांडलय बघा.
प्रकाश घाटपांडे
कर्माचा सिद्धांत.
कर्माचा सिद्धांत.
श्रीमद्भगवद्गीता २.४७ येथे निम्नलिखित श्लोक वाचावयास मिळतो. कर्माचा सिद्धांत ह्या संकल्पनेचे विश्लेषण करण्यास ह्या श्लोकाचा उपयोग व्हावा.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ||
- श्रीमद्भगवद्गीता २.४७
हाच मूळ गीतेत श्रीकृष्णाने विवेचित केलेला सिद्धांत असावा. विविध प्रकारचे ज्ञानी लोक त्याचा विविध प्रकारे अर्थ करतांत.
उदा. श्रीमान् (लोकमान्य) बाळ गंगाधर टिळक ह्यांनी "कर्मयोगशास्त्र" (म्हणजेच मंदलेच्या तुरुंगात लिखित "श्रीमद्भगवद्गीतारहस्य") ह्या अतिसुंदर ग्रंथात 'कर्मविपाकसिद्धांतशास्त्र' सोप्या भाषेत विशद केले आहे. तेथे त्यांनी 'समाजकारणा'च्या दृष्टीकोनातून आपली भूमिका मांडली आहे. तो ग्रंथसुद्धा अभ्यासावा.
हैयो हैयैयो!
हे वाचले पाहिजे
हैयो हैयैयो! राव,
हाच मूळ गीतेत श्रीकृष्णाने विवेचित केलेला सिद्धांत असावा. विविध प्रकारचे ज्ञानी लोक त्याचा विविध प्रकारे अर्थ करतांत.
इथल्या ज्ञानी लोकांना आवाहन केले आहे, पण अजून कुणाला फारसा वेळ झाला नाहीये हो!
बघु या 'कर्मात असले तर' येईलच ;))))
टिळकांनी लिहिलेले फार काही वाचलेच नाहीये पण,
आपण दिलेले 'कर्मविपाकसिद्धांतशास्त्र' वाचले पाहिजे असे वाटते आहे.
आपला
गुंडोपंत
भंकस | मूलभूत प्रश्न
>> तसेच कर्माचा सिद्धांत कसा भंपक/भंकस आहे वगैरे वगैरे मानणार्यां मंडळींनी कृपया वेगळी चर्चा सुरु करावी.
कर्माचा सिद्धांत भंकस आहे किंवा कसे ते माहीत नाही (कर्मसिद्धांत मलाही स्मजून घ्यायचा आहे पण त्याविषयी असलेले मूलभूत प्रश्न कोणीतरी सोडवावेत*, कृपया!) पण ज्योतिषशास्त्राच्या रूपात कर्मयोगाचे केलेले अति(अति)सामान्यीकरण स्पष्टच बोलायचे तर ('अतिशयच लघु रूपात' असले तरी) हास्यास्पद वाटते.
वासना प्रत्येक मनुष्याची, कोणत्याही राशीचा असो, इथे उल्लेखलेल्या आणि याशिवायही इतर गोष्टींमध्ये फिरत असते. मेष राशीच्या माणसाला काय नेत्रसुख नको असते? की वृश्चिक राशीच्या माणसाला अप्रिय बोललेले चालते?
हे कोणी शोधून काढले आणि कसे यावर प्रकाश टाकला तर यावर विश्वास ठेवणे सोपे होईल.
१. आज मी गेल्या कित्येक जन्मात केलेल्या कर्माची फळे भोगत असेन तर माझ्या 'पहिल्या' जन्मात मला मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य होते का? असलेच तर मला ते 'माहीत' होते का?
२. समजा माझा पुढचा जन्म कुत्र्याचा झाला तर त्यावेळी 'मी या जन्मात कुत्रा आहे कारण मागच्या जन्मात केलेली (कु)कर्मे' हे मला त्यावेळी माहीत असेल का? आणि जर मला माहीतच नसेल तर कर्मसिद्धांत मानणे किंवा न मानणे याने काय फरक पडणार आहे?
३. कर्माची फळे आपल्या रोजच्या आयुष्यात कोणत्या 'लेवल' पर्यंत येतात? म्हणजे आज मला भूक लागली नाही, बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही, लवकर जाग आली, जेवताना एका घासात खडा आला (किंवा कांदेपोहे खाताना एका घासात दोन शेंगदाणे आले :) इ.इ. सर्व गोष्टी पूर्वकर्मावर आधारित आहेत का?
४ माझ्या हातून होणारी प्रत्येक गोष्ट पूर्वकर्मामुळे असेल, म्हणजे मला माझ्या मनाप्रमाणे काहीच करता येत नसेल तर "तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे" हे गीतेतले वचन खोटे आहे की काय?
५. जर सर्व काही पूर्वकर्माने होत असेल, म्हणजे माझे या जन्मातले प्रत्येक कर्म 'आधीच ठरलेले' आहे तर पूर्वकर्माचा 'संचय' एक-दोन जन्मातच संपायला हवा. त्यानंतर काय?
हे
वासना प्रत्येक मनुष्याची, कोणत्याही राशीचा असो, इथे उल्लेखलेल्या आणि याशिवायही इतर गोष्टींमध्ये फिरत असते. मेष राशीच्या माणसाला काय नेत्रसुख नको असते? की वृश्चिक राशीच्या माणसाला अप्रिय बोललेले चालते?
या आप्ल्या प्रश्नावर मी म्हणेन की
याचे कुणी अधिक विवेचन केलेत तर आतिशय आनंद होईल.
अरे वर म्हणालोच आहे तरी,
(मला असे वाटते की) त्या त्या राशीच्या लोकांना वरील भावना जास्त बोचर्या असाव्यात, इतरांना कमी.
आपली रास काय आहे त्याप्रमाणे तपासून पहा...
जाणवल्यास ठीकच!
न जाणवल्यास जे काही जाणवते ती रास बदलून घ्या! ;))))
आपला
कर्माच्या फेर्यात अडकलेला
गुंडोपंत
कर्माचा सिद्धांत?!
असं आहे तर? पण मग आंधळी मीन व्यक्ती किंवा मूकबधीर कुंभ व्यक्ती का अजुन अडकल्या असाव्यात जन्ममरणाच्या फेर्यात? न रहेगा बास और न रहेगी बासुरी असे का होत नाही.. काही आयडीया?
अवांतर : कर्माचा सिद्धांत असा काही प्रकार अजून शाळेवाल्यांना माहिती नाही बरे आहे नसता त्याचीही सिद्धता वगैरे रट्टामार करावी लागली असती ! :))
काही
पण मग आंधळी मीन व्यक्ती किंवा मूकबधीर कुंभ व्यक्ती का अजुन अडकल्या असाव्यात जन्ममरणाच्या फेर्यात? न रहेगा बास और न रहेगी बासुरी असे का होत नाही.. काही आयडीया?
काही कल्पना नाही बॉ!
बहुतेक आधीचे बॅकलॉग भरत असणार किंवा कर्माची उधारी चुकती करत असणार. ;))
ते ही सोडा... साधे आहे!
अहो ज्याला ऐकायलाच येत नाही त्याला ऐकण्याची किती तीव्र इच्छा असेल बरं?
आली कि नाही वासना?
ढळला मोक्षापासून अडकला कर्मात!
(बाकी 'मोक्ष म्हणजे काय' यावर कुणा ज्ञानी माणसाने प्रकाश टाकला तर खुप ऋणी राहीन आपला!)
आपला
गुंडोपंत