जगन्नियंता

तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो

या वाक्यावरून सदस्यांनी अनेक मते मांडली.

आवडते सुभाषित या चर्चेत होत असणारे विषयांतर या चर्चेत स्थलांतरित करण्यात येत आहे. इच्छुक सदस्यांनी चर्चेचा धागा येथून पुढे चालू ठेवावा.

Comments

जगन्नियंता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ऋजु लिहितातः "तो जगन्नियन्ताच सुख किंवा दु:ख आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे धाडत असतो."

......
जगन्नियंता परमेश्वर, पूर्वसंचित, प्राक्तन,पुनर्जन्म, इ.कल्पना तर्कबुद्धीला पटणार्‍या नाहीत. या भ्रामक कल्पनांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. आपल्याला जर पूर्वजन्मातील काहीच स्मरत नाही तर त्यावेळी केलेल्या कर्मांची फळे या जन्मात भोगतो आहोत हे म्हणणे हास्यास्पद आहे.
............
आपले राज्य अबाधित राहावे आणि जनतेकडून कररूपाने मिळविलेल्या पैशांवर आपले सुखोपभोग निर्वेधपणे चालावे म्हणून सत्ताधार्‍यांनी धर्मगुरूंशी संगनमत करून पद्धतशीरपणे पसरविलेले हे थोतांड आहे.लोकांनी आपल्या कर्माला दोष देत गप्प बसायचे. कारणे शोधायची नाहीत. लोक खरी कारणे शोधायला लागले की सत्तेवर गदा आलीच.

पूर्वसंचित

ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पंचविसाव्या वर्षी समाधी घेणे, वयाच्या केवळ चौतिसाव्या वर्षी मरण्यापूर्वी , वा.शि. आपट्यांकडून संस्कृतचे तीन शब्दकोश रचले जाणे हे पाहिले की सुकृतावर विश्वास बसतो. -वाचक्‍नवी

कमीपणा

असे मानल्याने ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वर असतानाच्या कर्तृत्वाला कमीपणा येत नाही?

कमीपणा?

मला नाही वाटत. सुकृतामुळे फक्त आत्मिक बल प्राप्त झाले. ज्ञानेश्वरी आणि इतर वाङ्मय लिहिण्याकरिता तेवढे पुरेसे नाही.--वाचक्नवी

सुख

जगन्नियंता परमेश्वर, पूर्वसंचित, प्राक्तन,पुनर्जन्म, इ.कल्पना तर्कबुद्धीला पटणार्‍या नाहीत. या भ्रामक कल्पनांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. आपल्याला जर पूर्वजन्मातील काहीच स्मरत नाही तर त्यावेळी केलेल्या कर्मांची फळे या जन्मात भोगतो आहोत हे म्हणणे हास्यास्पद आहे.

ठीकच आहे आम्हाला अज्ञानात सुख, तुम्हाला ज्ञानात!
आयुष्यात प्रत्येक(च) गोष्टीत तर्क कशाला? का प्रत्येक गोष्ट मेंदुला घासत सुटायची?
त्या ऐवजी तात्पुरता न विचार करता काही गोष्टी करून पहाव्यात.
एकदा जगन्नियंता परमेश्वर, पूर्वसंचित, प्राक्तन,पुनर्जन्म मान्ये केले की आयुष्य किती छान सुकर होते म्हणून सांगु...
मनापासून करून पहा, मनाला मस्त अगदी मोकळे वाटते! स्वानुभवाने सांगतो.

आपला
तर्कबुद्धी गुंडाळून फडताळात ठेवून दिलेला
गुंडोपंत

जगन्नियंता

>> जगन्नियंता परमेश्वर, पूर्वसंचित, प्राक्तन,पुनर्जन्म, इ.कल्पना तर्कबुद्धीला पटणार्‍या नाहीत. या भ्रामक कल्पनांवर माझा तिळमात्र विश्वास नाही.

तार्किकदृष्टीने विचार केला तर अगदी लहानसहान गोष्टीत लक्ष घालणारा असा कोणी जगन्नियंता आहे हे पटत नाही. पण बहुतेक लोकांचे आत्मिक/मानसिक सामर्थ्य नेहमी सारखेच नसते. कधीकधी आपल्या हातात नसलेल्या गोष्टीमुळे दु:ख होते किंवा आपल्याला दु:ख होईल अशी भीती वाटते तेंव्हा अशी कोणीतरी sane व्यक्ती या जगाचे आणि जगातील प्रत्येक गोष्टीचे नियंत्रण करते हा विचार तात्पुरता दिलासा देऊन जातो. तो अश्या कठिण काळात त्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरतो.

हेच

वा नवीन,
तो अश्या कठिण काळात त्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरतो.

खूपच उपयोगी ठरतो.
हेच म्हणतो आहे मी.
योग्य व थोडक्या शब्दात मांडल्या बद्दल अभिनंदन!

आपला
गुंडोपंत

पूर्वसंचित

ही कल्पना काव्यात रंजक असली तरी जीवनातील निर्णय घेताना तोट्याची ठरू शकते. उदाहरण वर विकास यांनी दिलेले वापरावे. त्यामुळे अज्ञानात सुख आहे असे म्हणणे पटत नाही.

अहो

अहो साहेब,
जिथे
आपला जन्मच का झाला हे माहीती नाही?
आपण कधी व का मरणार हे माहीती नाही.
आपण आयुष्यात 'हेच का करतो दुसरे काही का नाही' याची कोणतीही कारणी मिमांसा करण्याची कोणतीच कुवत जर आपल्या कडे नाही,
तर कसले ते बोल बच्चन तर्कशास्त्र कामाचे? नि कसले हे ज्ञान?

त्यामुळे आम्हाला आपले तर्कच हास्यास्पद वाटतात!

आपला
गुंडोपंत

व्यवहारात

तुम्ही रोजव्यवहारात मिनिटामिनिटाचे निर्णय कसे घेता? आता व्यायाम करावा, न करावा, नंतर करावा हे कसे ठरवता? उपक्रमावर अमुक प्रतिसाद लिहावा न लिहावा कसे ठरवता? त्यात काय शब्द टंकावे, हे कसे ठरवता? व्यायामशाळेचा हिशोब आज करावा की उद्या करावा, या क्षणी करावा की एका तासानंतर करावा, कसे ठरवता? हा व्यावहारिक विचार करावा.

तुम्ही जर खरोखरच काही विचार करत नसाल, तर तुम्ही अपवादात्मक आहात. तरीसुद्धा तुम्ही विचार/मीमांसा करतच नसाल तर तुम्ही अंततोगत्वा पूर्व-कर्म "मानता" म्हणजे नेमके काय हेच कळत नाही.

एखादा यंत्रमानव उपक्रमावर मीमांसा न करता केवळ पूर्वसंचिताच्या प्रणालीने टंकत असेल तर त्याच्या म्हणण्याला उत्तर देण्यने काही हशील नाही. येथील कोणीच तसा यंत्रमानव नाही, तर मीमांसा करून टंकते, असे जाणून आपण एकमेकांना विचारपूर्वक उत्तरे देतो, असे माझे मत आहे.

आता प्रत्येकाच्या प्रत्येक प्रतिसादात जाऊन हा विदा विश्लेषित करावा काय, की अमुक व्यक्ती इहलोकात कारणमीमांसा करते की नाही? कमीतकमी आपण स्वतःच्या लेखांचे विश्लेषण करूया. हे केल्यानंतर तुम्ही कसे म्हणू शकता "आपण आयुष्यात 'हेच का करतो दुसरे काही का नाही' याची कोणतीही कारणी मीमांसा करण्याची कोणतीच कुवत जर आपल्या कडे नाही"? असे म्हणणे तुमच्या-आमच्या-सर्वांच्या उपक्रमावरील चर्चांशी, प्रतिसादांशी, लेखांशी विसंगत आहे. आणि बहुतेक आपल्या सर्वांच्या उपक्रमाबाहेरील जीवनातल्या वागण्याशीही विसंगत आहे.

तुमच्याकडून काहीएक मीमांसा न करता जर काही कार्य घडत असेल तर माझी लॉटरी फुटली! तुम्ही मला एक चेक लिहून तुमचे पूर्ण बँकखाते हवाली करणार हे तुमच्या कर्मात लिखित आहे, त्याबद्दल तुम्ही काय करणार, पंत!

अवघड

तुझ्याशी वाद विवाद करणे ही खरच अवघड गोष्ट आहे यात शंका नाही.
पण त्यामुले मला मजा मात्र येते. शिवाय वर गुंडाळून फडताळात ठेवून दिलेली माझी सामान्य, छोटीशी तर्कबुद्धी सारखी सारखी खाली काढून त्यावर कामही करावे लागते.
असो,

तुम्ही रोजव्यवहारात मिनिटामिनिटाचे निर्णय कसे घेता?
हे मी फडताळातल्या तर्कबुद्धीच्या आधारेच घेतो. रोजच्या व्यवहारातले अनेक निर्णय तसे तर्क व बुद्धीने घेवूनही, ठरवलेल्या ठिकाणा पेक्षा जेंव्हा आपण भलत्याच ठिकाणी पोहोचलो आहोत हे मागे वळून पाहिल्यावर दिसते.
मग मी माझीच कुंडली काढून पाहतो की का असं झालं? आणि त्यात काही आधार मला सापडू लागतात. म्हणजेच जेंव्हा सगळ्या व्यायाम करावा, न करावा या छोट्या छोट्या घटनांचा मी एक्त्रीत पणे निष्कर्षीत विचार करतो तेंव्हा मला यात सुसंगती दिसते. आता यात वाद हा येणारच की वापरली की नाही तर्क बुद्धी? तर याचे उत्तर हो! असेच आहे. मात्र जीवनाच्या प्रत्येकच गोष्टीला तर्कावरच घासून बघत बसणे हे आता मला माझ्या बुद्धीला पटेनासे झाले आहे. (ज्योतिष्या मध्ये तथ्य आहे हे अनेक वर्षे ज्योतिष विरोधी काम केल्यावरच गुंडोपंतांच्या ध्यानात आले आहे.)

तुम्ही जर खरोखरच काही विचार करत नसाल, तर तुम्ही अपवादात्मक आहात.
छे रे बाबा! मी कसला अपवादात्मक? मी एक अतिशय सामान्य माणूस आहे.
मी विचार करतोच, कुणाला चुकले आहेत ते?
मात्र त्यातल्या त्यात या सगळ्यात राहून त्यातल्या त्यात 'अटॅच्ड बट डिटॅच्ड' असण्याचा प्रयत्न करतो. (कधी अटॅच होतो ते कळतच नाही मग परत प्रक्रीया सूरू)

असे जाणून आपण एकमेकांना विचारपूर्वक उत्तरे देतो, असे माझे मत आहे.

असेच माझेही मत आहे. तेव्हढा विचार मी करतोच. पण काही विचारांना मी आपल्या सामान्य कुवतीच्या बाहेरचे असे म्हणून सोडून देतो. (हा माझ्या सामान्य असण्याचा जास्तीचा फायदा!)
यामुळे मी राजेंद्रच्या एक्स्टेंशियलिझम मधून पण वाचतो हा दुसरा फायदा!
शिवाय जगाची जबाबदारी 'सर्वस्वी माझ्या डोक्यावर नाही इतकेच काय माझी जबाबदारी सुद्धा माझ्या डोक्यावर नाही ' तो' सगळे बघून घेईल हा विचार आपल्याला अगदी मुक्त होण्याची वेगळीच संधी देतो. अर्थातच याला पलायनवाद वगरे काहीही म्हणता येईल. पण एक्स्टेंशियलिझम जितके मिथ्या व जितके खरे आहे तितकाच माझा हा अस्तित्वाचा वादही खरा आहे.

असे म्हणणे तुमच्या-आमच्या-सर्वांच्या उपक्रमावरील चर्चांशी, प्रतिसादांशी, लेखांशी विसंगत आहे. आणि बहुतेक आपल्या सर्वांच्या उपक्रमाबाहेरील जीवनातल्या वागण्याशीही विसंगत आहे.

अजिबात नाही! माझे वागणे सुसंगत आहेच. फक्त 'काहींना' असे वाटते की 'ते लिहितात' मला असे वाटते की माझ्या कडून 'लिहवून घेतले जाते'.
यामूळे मी वृथा अभिमानाच्या विळख्यातही सापडत नाही असे आपले माझे मलाच वाटते.
शिवाय जबाबदारीचेही ओझे नाही. (असेही देवा नंतर माझे लेखन सुधारण्याची जबाबदारी माझी नसून संपादकांचीच आहे असे मी मानतो! ;)) )

तुम्ही मला एक चेक लिहून तुमचे पूर्ण बँकखाते हवाली करणार हे तुमच्या कर्मात लिखित आहे, त्याबद्दल तुम्ही काय करणार, पंत!

असे प्राक्तनात असेल तर तसेच होईल. पण तू कधी शांतपणे बसून विचार केला आहेस का, की माझे आयुष्य असेच का? वेगळे का नाही? मी अजून काही का केले नाही? त्यावर मी अजूनही वेगळ्या प्रकारे आयुष्य जगू शकतो असा युक्तीवाद बरेच जण करतात परतु त्यावर काम करू शकत नाहीत. तुमच्या भाग्याकडे, प्रक्तनाकडे तुम्ही जातच राहता, यातून सुटका नसते. तू शास्त्रज्ञच का झालास? तू ट्रक ड्रायव्हर का नाही झालास? किंवा पोलिस का नाही झालास? यावर काही उत्तर नाही. तू म्हणशील मला व्हायचे नव्हते म्हणून. पण खरेच तसे होते का?

पहा बरं तुझी कुंडली काढून नेपचून, शुक्र व गुरु प्रभावी आहेत की नाही ते. याशिवाय गुरुचा दशमाशी दाट संबंध आहेच. आता हे कसे? (काय बिंधास्त दावे करतोय मी? खरं मी आजिबात असे करत नाही, पण आज झाले बुवा!)

या प्रवाहात मी, तू अगदी आपले वालावलकर सर सुद्धा वहात आहेत. कितीही हातपाय मारले तरी किनारा नाही.

आपला
प्रवाहपतित
गुंडोपंत

लगे रहो !!!

प्राक्तनात असेल तर तसेच होईल. पण तू कधी शांतपणे बसून विचार केला आहेस का, की माझे आयुष्य असेच का? वेगळे का नाही? मी अजून काही का केले नाही? त्यावर मी अजूनही वेगळ्या प्रकारे आयुष्य जगू शकतो असा युक्तीवाद बरेच जण करतात परतु त्यावर काम करू शकत नाहीत. तुमच्या भाग्याकडे, प्रक्तनाकडे तुम्ही जातच राहता, यातून सुटका नसते. तू शास्त्रज्ञच का झालास? तू ट्रक ड्रायव्हर का नाही झालास? किंवा पोलिस का नाही झालास? यावर काही उत्तर नाही. तू म्हणशील मला व्हायचे नव्हते म्हणून. पण खरेच तसे होते का?
गुंडोपत आपण विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे धनंजय कशी देतो त्याची उत्सुकता मलाही आहे.
जे विधिलिखित असते ते बदलुच शकत नाही. आपल्या हातात काहीच नसते हो.
मला तर नेहमी वाटते एक बाळ श्रीमंताच्या घरात जन्माला येते. आणि त्याच वेळी एखाद्या रोडवर एखादी भिकारीन एका बाळाला जन्म घालते. च्यायला त्या बाळाला कोणाच्या घरी जन्म घालायचे याचे काही तर्क शास्त्रात आणि विज्नानात उत्तर असेल का ?

देवधर्मवाला.
प्रा.डॊ......

उपप्रतिसाद वाढून मूळ चर्चेत विरस होऊ नये

उपक्रमी खाली नवीन-नवीन आवडती सुभाषिते लिहीत आहेत. उपप्रतिसाद वाढून मूळ चर्चेत विरस होऊ नये. गुंडोपंतांनी या मस्त विषयावर नवीन लेख किंवा चर्चा सुरू करावी, अशी विनंती.

"सर्व माहीत नाही" या विषयाबद्दल व्यावहारिक तर्क "भूस्थिरवादाचा पुरस्कार" (भाग-१, भाग-२) या लेखमालेत काही उपक्रमी करत आहेत. त्यातील सदस्यांचे लेखन या विषयात अगदी समर्पक नसले तरी अगदी अवांतरही नाही.

आमचे आवडते सुभाषित !!!

सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यं
मलिनमपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति !
इयमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी
किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम् !!

बरं का गुंडोपंत, कवी कालिदास शाकुन्तल नाटकात म्हणतो : ( वाचकांनी खात्री करुन घ्यावी )
शेवाळाने भरलेल्या तलावात कमळ उगवले असले तर ते शेवाळ कमळाची शोभा वाढवते. चंद्रावर काळा डाग आहे ती त्याची लक्ष्मी आहे.
उलट तो काळा डाग त्याची शोभा वाढवतो. वल्कल नेसुनही शकुन्तला सुंदर वाटते. असे दुश्यंताने म्हटले आहे.


सारांश :- 'उपक्रमी ' जी काही सुंदर सुभाषिते लिहित आहेत, त्यात तुमच्या आमच्या चर्चेमुळे विरस होतो.( असे आम्हासही वाटत आहे. ) त्यामुळे सदर चर्चेत वरील सुभाषितावरुन शोभा वाढण्याऐवजी आपली शोभा करुन घेऊ नये ही नम्र विनंती. ;)

ठीक!

आपल्या वरच्या एका प्रतिसादात सुभाषितांची चर्चा आपणास फारशी आवडले नाही असे प्रतीत झाले होते आता
इतक्या चांगल्या (परंतु अस्थाई असलेल्या हे मान्य ) चर्चेत आपणास आमची शोभा होत आहे असे वाटते आहे...

मला काही कळत नाही बॉ!

आपला
अज्ञ
गुंडोपंत

शेवटची ओळ

किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम् !!
या महत्त्वाच्या शेवटच्या ओळीचे भाषान्तर राहिलेच. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.-वाचक्‍नवी

धन्यवाद !!!

किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम् !!
या महत्त्वाच्या शेवटच्या ओळीचे भाषान्तर राहिलेच. जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.

शेवटच्या ओळीचे भाषान्तर इथे दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
संस्कृतची आम्हाला अक्षर ओळखच नाही. तेव्हा त्याचे भाषान्तर कोठून येणार.

( सुभाषित आणि त्याचा अर्थ कोठुन तरी आम्ही उचललेला आहे. तिथे जसा होता तसा इथे खरडला. :) )

आपला.

प्रा.डॊ. दिलीप बिरुटे
(जातिचाच सुंदर )

दुरूस्ती

यामुळे मी राजेंद्रच्या एक्स्टेंशियलिझम मधून पण वाचतो हा दुसरा फायदा!
एक्झिस्टेंशिअलिझ्म मी थोडेसे वाचले/ऐकले आहे. ते माझे आहे असे म्हणणे बरोबर नाही. यापेक्षा सार्त्रचे एक्झिस्टेंशिअलिझ्म असे म्हटल्यास योग्य ठरेल.
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

खरंच की!

अरे ते एक्झिस्टेंशिअलिझ्म तू ओळख करून दिल्यामुले तुझेच आहे असे वाटते रे मला...
क्षमा कर हां! ते एक्झिस्टेंशिअलिझ्म सार्त्रचे असे म्हणायला हवे खरे.
आपला
गुंडोपंत

काही उत्तरे

(चर्चेत ५०हून अधिक प्रतिसाद झाले आहेत. त्यामुळे नवीन सुभाषिते नाहीतरी पान २ वर दिसतील. त्यामुळे माझ्या या प्रतिसादाने नवीन सुभाषिते वाचणार्‍यांचा विरस होणार नाही. म्हणून हा प्रतिसाद.)
----------------------------------------------------------------
इथे असा काही तर्क वापरलेला दिसतो :
१अ. माझे भविष्य मला नेमके माहीत नाही
१आ. त्यामुळे माझे भविष्य ललाटावर लिखित आहे

हे तर्क ठीक नाहीत. त्याच धाटणीचा पुढील तर्क सहज चुकलेला म्हणून दिसून येतो :
२अ. माझ्या आईच्या प्रेमाची किंमत नेमकी मला माहीत नाही
२आ. त्यामुळे माझ्या आईच्या प्रेमाची किंमत कुठेतरी लिखित आहे.

----------------------------------------------------------------
तुमच्या प्रतिसादात आणखी एक चांगला मुद्दा आहे, पण विचाराअंती तो केवळ एकाच शब्दाच्या दोन विसंगत व्याख्यांमुळे होत आहे, असे दिसून येईल.

लहानपणी मला अनेक वेगवेगळ्या व्यवसायात पडायची अमूर्त शक्यता होती :
१. ट्रक ड्रायव्हर, २. पोलीस, ३. शास्त्रज्ञ, ४. स्मगलर, ५. बँक कारकून, ६. बेकार मनोरुग्ण ... वगैरे
प्रौढ वयात मी पैकी एकाच मूर्त व्यवसायात पडलेला दिसतो.

कुठल्याही विषयात अमूर्त शक्यता अनेक असतात पण मूर्त घटना एकच असते. त्यामुळे मी पैकी कुठल्यातरी एका शक्यतेत पडलो, हे आश्चर्यकारक किंवा प्राक्तन-मानण्यास-भाग पाडणारे नाही. उलट अनेक विसंगत मूर्त शक्यता एकत्र घडून आल्यात तर ते आश्चर्यकारक, ठरले असते, आणि काहीतरी-मानणे भाग पडले असते. (लक्षात असू द्या : एकाच वेळी पोलीस आणि स्मगलर असणे परस्पर-विसंगत नाही. एकाच वेळी बँक-कारकून आणि बेकार-मनोरुग्ण असणे परस्पर विसंगत आहे.)

भविष्यातल्या घटनांची कारणमीमांसा "शक्यता" (प्रॉबॅबिलिटी) या तत्त्वाने केली जाते, आणि भूतकाळातल्या घटनांची कारणमीमांसा "तर्क्यता" (लाइकलीहूड) या तत्त्वाने केली जाते. या दोन्ही कल्पना तात्विकदृष्ट्या खूप वेगळ्या आहेत, पण लोकांमध्ये या दोन्हीसाठी बहुधा "शक्यता" हा एकच शब्द वापरला जातो. यात काही मोठा दोष नाही, कारण संदर्भानुसार आपण योग्य निष्कर्ष काढतो. पण दोन्ही अर्थ एकेच ठिकाणी आलेत (जसे गुंडोपंतांच्या म्हणण्यात आले आहेत) तर गडबड होते.

"तुझ्या बाळपणी तू शास्त्रज्ञ होण्याची कितपत शक्यता होती?"
"आज तू शास्त्रज्ञ आहेस ते तुझ्या बाळपणातल्या स्थितीवरून कितपत तर्क्य आहे?"
हे दोन पूर्णपणे वेगवेगळे प्रश्न आहेत.

शिवाय हे पुढील प्रश्न निरर्थक आहेत :
"तुझ्या बाळपणी तू शास्त्रज्ञ होशील याची कितपत तर्क्यता होती?"
"आज तू शास्त्रज्ञ आहेस ते तुझ्या बाळपणातल्या स्थितीवरून कितपत शक्य आहे?"

त्यामुळे तुमच्या या मुद्द्याचा अर्थ विपर्यस्त होत आहे.

----------------------------------------------------------------
तुम्ही म्हणता की माझे वागणे सुसंगत आहेच. फक्त 'काहींना' असे वाटते की 'ते लिहितात' मला असे वाटते की माझ्या कडून 'लिहवून घेतले जाते'.
हे तुमच्या व्यवहाराशी पूर्णपणे सुसंगत नसल्यास बरे वाटेल. कारण हे एक बर्‍यापैकी अनैतिक (किंवा समाजास घातक, म्हणा) असे विधान आहे. "कोणी करवून घेतो" हे वाक्य दुर्योधन अशा प्रकारे वापरतो :
जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति:
जानाम्यधर्मं न चे मे निवृत्ति: ।
केनापि देवेन हृदिस्थितेन
यथा प्रवृत्तोऽस्मि तथा करोमि ॥
(सुभाषित नसले तरी श्लोक आहे, :-) ...)
अर्थ : मला धर्म काय ते माहीत आहे, पण त्यास मी प्रवृत्त होत नाही. मला अधर्म काय ते माहीत आहे, पण त्याच्यापासून मी निवृत्त होत नाही. माझ्या हृदयात कुठलातरी देव आहे, तो मला जसे प्रवृत्त करतो, तसे कार्य मी करतो.
"सर्वच काही कोणीतरी करविता आहे" असे (काव्यात नव्हे, खरोखर गंभीरपणे) म्हणणार्‍या लोकांना कसलीही जबाबदारी कशी द्यावी? मला असे वाटते, की तुम्हाला कधीकधी असे जरूर वाटत असेल की कोणीतरी करविता आहे, पण जबाबदारी घ्यायची वेळ आली की तुम्ही "मी हे केले" म्हणून जबाबदारी घेत असाल, असाच तुमचा बहुतेक रोजव्यवहार असणार.

संपादक चर्चा

:)
धनंजया तू मुद्दे मांडले आहेत. त्यांनी मी उत्तरही देईन पण त्या आधी
संपादक कृपया ही सगळी चर्चा एका नवीन धाग्यात हलवतील का?

आपला
गुंडोपंत

वा!

तर्क्यता आणि शक्यता हे विश्लेषण आणि उदाहरणे भारीच :)

उत्तरे धनंजयाची


भविष्यातल्या घटनांची कारणमीमांसा "शक्यता" (प्रॉबॅबिलिटी) या तत्त्वाने केली जाते, आणि भूतकाळातल्या घटनांची कारणमीमांसा "तर्क्यता" (लाइकलीहूड) या तत्त्वाने केली जाते. या दोन्ही कल्पना तात्विकदृष्ट्या खूप वेगळ्या आहेत,


धनंजयाच्या याच विचारांचा वापर आम्ही फलज्योतिष चिकित्सेकरता करतो. कुंडली ही जन्मवेळचा जन्मस्थळाचा अवकाशस्थित नकाशा हा भाकिताचा मूलभुत बिंदु. त्या अनुषंगाने भुतकाळातल्या घटना (शक्यता)या सदरात टाकून त्याची पडताळणी (तर्क्यता) या आधारे केली की ते तपासणे सोपे तसेच तर्कशुद्ध.
आता गुंडोपंतासाठी ; समजा भविष्यातील घटना या चित्रपटाच्या रिळाप्रमाणे आहेत असे गृहीत धरुन , तसेच ते सत्य मानून जर एखाद्याला त्याच्या आयुष्यातील पट दाखवला तर त्याला सुरुवातीच्या काळात सत्यता तपासता येईल. नंतर तसे ते प्रत्यक्ष घडते आहे असे जर अनुभवस आले तर त्याला जीवन जगण्यात काय वाटेल ?अशी कल्पना करुन पहा.
'प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेच फक्त ते आपल्याला माहित असेलच असे नाही' ही मांडणी आणि ' प्रत्येक प्रश्नाला उत्तर असलेच पाहिजे असे नाही' ही मांडणी वर्तमानकाळात उत्तर नाही एवढेच दर्शवतात.पहिली मांडणी 'वाव' देते तर दुसरी मांडणी 'मोकळीक' देते.
प्रकाश घाटपांडे

हो ना

हो ना
असे रिळाप्रमाणे दिसले तर मला आवडेल हो.
पण तसे दिसत नाही ना!
म्हणून तर कुंडलीत पाहतो तेंव्हा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.
त्यातले आपल्या आयुष्याचे प्रतिबींब पाहून अचंबित व्हायला होते.

दरवेळी या ग्रहांच्या राशी व नक्षत्रातील भ्रमणाने माझ्या आयुष्यात होणारे बदल न्याहाळणे
हा एक माझ्यासाठी तरी मनोहारी अनुभव आहे.

आपला
गुंडोपंत

श्लोक?

(सुभाषित नसले तरी श्लोक आहे, :-) ...)
जानामि धर्मम्‌... पांडवगीतेतल्या या श्लोकाला सुभाषित का म्हणू नये? केवळ दुर्योधनाने म्हटले म्हणून? की यात अधर्माची कबुली आणि अधर्माचे पुष्टीकरण आहे म्हणून? सुभाषिताची नेमकी व्याख्या काय करावी?--वाचक्‍नवी

विश्वास ठेवा अगर नको.

जगात अनेक गोष्टी विश्वासावर चालतात. आई ही वस्तुस्थिती असली तरी अमुक व्यक्ती आपले वडील आहेत हा विश्वास असतो. विश्वास ठेवण्यामुळे औषधाचा गुण येतो. गुरूवर विश्वास असल्याने ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. देवावर, भुतांखेतांवर, पापपुण्यावर विश्वास असल्याने जीवन सुरक्षित आणि सुसह्य होते. जे करण्याने तोटा होणार नसेल ते करायला काय हरकत असावी?
एका मराठी दूरदर्शन वाहिनीवर दिलखुलास नावाचा एक चर्चा कार्यक्रम कांचन अधिकारी चालवतात. त्यातल्या एका चर्चेत अनेक वर्षांचा अनुभव असलेले संमोहनतज्ज्ञ नाईक बोलत होते. (हे नाईक पोलिस अधिकार्‍यांना आणि अनेक मनोवैज्ञानिकांना संमोहन शास्त्र शिकवतात. या शास्त्राचा उपयोग करून त्यांनी अनेक अवघड समस्या सोडवून देण्यास शासकीय अधिकार्‍यांना आणि वैद्यकीय तज्ञांना मदत केली आहे.) एकदा पुण्यातील एका सभागृहात त्यांचा खुला कार्यक्रम झाला होता. त्यांनी संमोहनशास्त्राच्या प्रयोगासाठी एका मुलीला समोर खुर्चीवर बसवले. ती मराठी फारसे न येणारी मुलगी दक्षिणी भारतीय असून वैद्यकशास्त्राची विद्यार्थिनी होती. (आता डॉक्टर होऊन पुण्यात व्यवसाय करते.) भारलेल्या अवस्थेत असताना तिला पूर्वजन्माविषयी प्रश्न विचारले. तिने अप्रचलित मराठीत अस्खलितपणे सांगितले की ती एक गणिका आहे आणि तिचा आळंदीला अमुक‍अमुक ठिकाणी वाडा आहे, वगैरे वगैरे. नाईकांनी ती काहीतरी थापा मारते आहे असे समजून मुलाखत योग्य वेळी संपवली.
पुण्यातली माणसे ! आळंदी जवळच ! कार्यक्रम संपल्यावर तडक गाड्या काढून आळंदीला गेली. आणि तिच्या सांगण्यात शंभर टक्के सत्य असल्याच्या निष्कर्षाला आली.
पुढच्या कार्यक्रमाला पुन्हा तिला बोलवावे असा आग्रह असूनही, तिच्या घरातील मंडळींनी सहमती न दाखवल्याने तिची परत मुलाखत शक्य झाली नाही.
आता याला काय म्हणावे?--वाचक्‍नवी

समाजशास्त्रानुसार.

समाजशास्त्रानुसार.

समाजशास्त्रानुसार काही सिद्धांत आहेत, जे कायद्यात अनेकवेळा उपयोगांत आणले जातात. त्या सिद्धांतांस समाजधुरिणांची मान्यता आहे.

आम्ही अधिवक्ते मंडळी कायद्याच्या क्षेत्रांत एका सिद्धांताचा नेहमी उपयोग करतो. तो म्हणजे:

"एखादी गोष्ट 'अस्तित्त्वांत नाही' असे सिद्ध करतां येत नसेल, तर ती 'अस्तित्त्वांत आहे' असे गृहित धरतांत.
तीच गोष्ट 'अस्तित्त्वांत आहे' असे सिद्ध करतां येत नसेल, तर मात्र संशयाचा फायदा देवून ती गोष्ट 'अस्तित्त्वांत आहे' असेच गृहित धरण्यांत येते."

हाच सिद्धांत 'जगन्नियंता परमेश्वर, पूर्वसंचित, प्राक्तन,पुनर्जन्म' इत्यादी बाबतींत उपयोगात आणण्यास हरकत नसावी. तर्कबुद्धीस आराम पडेल. :-)

हैयो हैयैयो!

महत्त्वाची व्यावहारिक तत्त्वे सांगितलीत

काही महत्त्वाची तत्त्वे सांगितलीत. तुमची तत्त्वे व्यावहारिक आहेत, हे खास आकर्षण. माझी तत्त्वे/चर्चा तर्कबुद्धीस अमर्याद प्रश्नांपासून वाचवण्यासाठीस आहेत.

एक महत्त्वाचा गैरसमज दूर करू इच्छितो - जगन्नियंत्याच्या अस्तित्वाबद्दल किंवा न-अस्तित्वाबद्दल माझे काहीच मत नाही.

प्रश्न आहे हा : त्या अस्तित्वाचा आधार घेऊन मी माझ्या वागण्यात काही फरक करावा का?
उदाहरण : समजा सत्यनारायणाच्या पोथीतल्या तपशीलांना "संशया"ने मी सत्य मानले, कारण या क्षणी माझ्याकडे काहीच पुरावा नाही. प्रसाद आव्हेरला तर फार भयंकर गोष्टी होतात. या क्षणी मला भूक नाही, पोटात कालवाकालव होत आहे, ओकारी येत आहे. प्रसाद घरी नेण्यासाठी पिशवीही नाही. तरी "संशया"ने सत्यता मानून कोणी दिलेला प्रसाद खावा का?
शिवाय दोन उपप्रश्न :
(अ.) त्या अस्तित्वाचा अधार घेऊन दुसरे लोक अशा प्रकारे वागणे बदलत असतील, ज्याने माझा तोटा होतो, तर त्याबद्दल मी दुसर्‍याचे म्हणणे मानावे का?
उदाहरण : जगन्नियंत्या अल्लाने मुहम्मदाला आदेश दिला की "काफिरांची सुंता करवणे मुसलमानाचे कर्तव्य आहे" - ही गोष्ट सत्य नसल्याचा माझ्याकडे काहीएक पुरावा नाही. पण माझ्या समोरील माणसास हे सत्य असल्याचा विश्वास आहे. त्याच्या मते मी काफिर आहे, आणि त्याने मला सुंता करण्यास भाग पाडावे असा अल्लाचा आदेश आहे. "संशयाचा" फायदा देऊन, समोरील माणसास माझ्याशी व्यवहार करू द्यावा काय. (हे उदाहरण मुद्दामून टोकाचे दिले आहे, पण कित्येकदा ख्रिस्ती मिशनरी मला पटवायला येतात, हे टोकाचे नाही. त्यांच्याशी बोलण्यात माझा वेळ खर्च होतो, हा मला तोटा. त्यांचे म्हणणे "संशया"ने खरे मानून तो तोटा मी सहन करावा का? - ही कपोलकल्पित घटना नाही.)

(आ.) त्या अस्तित्वाचा अधार घेऊन दुसरे लोक अशा प्रकारे वागणे बदलत असतील, ज्याने माझा फायदा होतो, तर त्याबद्दल मी दुसर्‍याचे म्हणणे मानून माझा फायदा करून घ्यावा का?
पुढील घटना सत्य आहे. माझ्या एका ओळखीच्यांचे मत आहे, की माझ्या जातीमुळे त्यांच्या घरीही मला पूजा करायचा अधिक अधिकार प्राप्त होतो, मी केलेल्या पूजेचे पुण्य/फळ अधिक मिळते. शिवाय त्यांनी मला दक्षिणाही द्यावीच लागते. हे सत्य नाही याबद्दल माझ्यापाशी काहीएक पुरावा नाही. यास "संशया"ने त्याचे म्हणणे खरे मानावे का? (माझा सुरुवातीचा नकार त्यांच्या मनाला इतका लागला, की मी पूजा केली आणि १ रुपया दक्षिणा घेतली.) "संशया"ने त्या कुटुंबाचे म्हणणे सत्य मानून, अन्य भट घेत होते तितकी दक्षिणा मीही घेतली तर नैतिकदृष्ट्या ठीक होते काय?

या सर्व बाबतीत, तुम्ही दिलेले वकिली कायद्यातले तत्त्व उपयोगी ठरावे. तुम्ही म्हणता :

> आम्ही अधिवक्ते मंडळी कायद्याच्या क्षेत्रांत एका सिद्धांताचा नेहमी उपयोग करतो. तो म्हणजे:
>
> "एखादी गोष्ट 'अस्तित्त्वांत नाही' असे सिद्ध करतां येत नसेल, तर ती 'अस्तित्त्वांत आहे' असे
> गृहित धरतांत. तीच गोष्ट 'अस्तित्त्वांत आहे' असेही सिद्ध करतां येत नसेल, तर मात्र संशयाचा
> फायदा देवून ती गोष्ट 'अस्तित्त्वांत आहे' असेच गृहित धरण्यांत येते."

हे म्हणणे मला सोपे जावे, म्हणून काटेकोरपणे न सांगता, सोप्या भाषेत तुम्ही सांगितले असावे. पण हे नेमके तत्त्व असे नसावे. पुढील उदाहरण बघा:

मला घर विकत घ्यायचे आहे. एक माणूस मला एक सुंदर घर दाखवतो. किंमत अगदी परवडणारी आहे. खरेदीखत तयार करूया असे विक्रेता म्हणतो. मी त्याला विचारतो की "हे घर खरेच तुझे आहे का, यासाठी काही दस्तऐवज आहे का?" तो म्हणतो, की "हे घर माझे नाही याबाबत तुमच्याकडे काही पुरावा किंवा दस्तऐवज आहे का?" मी माझे सर्व खिसे धुंडाळतो, बस्ता धुंडाळतो, पण "ते घर त्याचे नाही" याबद्दल माझ्यापाशी काहीएक पुरावा सापडत नाही. माझे असे म्हणणे आहे, "ते घर त्या माणसाचे आहे की नाही याबद्दल माझे काहीएक मत नाही. नसेलही किंवा असेलही. तरी अशा प्रकारच्या माहितीवरून मी माझे वागणे बदलणार नाही=खरेदीखतावर सही करणार नाही."

अधिक सल्ल्यासाठी मी माझे अधिवक्ते श्री. हैयैयो यांच्यापाशी जातो. प्रांजळपणे कबूल करतो की ते घर त्या विक्रेत्याचे नाही याबद्दल माझ्यापाशी काहीही पुरावा नाही. श्री. हैयैयो काही ठिकाणी चौकशी करतात. असे कळते की पानशेतच्या पुरात त्या घराच्या मालकीची कागदपत्रे जी हरवली, त्यानंतर काही कागदोपत्री पुरावा कुठलाच सापडत नाही. ते मला कायद्याचे पुढील तत्त्व सांगतात. त्या विक्रेत्याचा मालकीहक्क 'अस्तित्त्वांत नाही' असे आपल्याला सिद्ध करतां येत नसेल, तर ती 'अस्तित्वांत आहे' असे गृहित धरावे लागेल. त्याचा मालकीहक्क 'अस्तित्वांत आहे' असेही त्याला सिद्ध करतां येत नसेल, तरी संशयाचा फायदा देवून त्याचा मालकीहक्क 'अस्तित्वांत आहे' असेच गृहित धरण्यांत येते."

मी म्हणतो : ठीक आहे, मी कायदेशीरपणे गृहीत धरतो की त्याला मालकीहक्क अस्तित्वात आहे. मला घर आवडले आहे, आणि किंमतही परवडते आहे. म्हणजे आता मी खरेदीखतावर सही करतो. असे वागण्यास कायद्याची मुभा आहे, असे अधिवक्ता म्हणून तुमचा सल्ला आहे का?

अधिवक्त्याने काळजीपूर्वक विचार करून उत्तर द्यावे. कारण ही खरेदी-विक्री कायदेशीर असल्यास मी बेवारशी घरे हेरून, कायदेशिरपणे ती विकण्याचा धंदा सुरू करायचे म्हणतो आहे.

तेच कायद्याचे तत्त्व तुम्ही काटेकोर भाषेत मला सांगाल का? (भाषा सोपी नसली तरी चालेल.)

पुन्हा एकदा.

पुन्हा एकदा.

"एखादी गोष्ट 'अस्तित्त्वांत नाही' असे सिद्ध करतां येत नसेल, तर ती 'अस्तित्त्वांत आहे' असे गृहित धरतांत.
तीच गोष्ट 'अस्तित्त्वांत आहे' असेही सिद्ध करतां येत नसेल, तर मात्र संशयाचा फायदा देवून ती गोष्ट 'अस्तित्त्वांत आहे' असेच गृहित धरण्यांत येते."

सदर सिद्धांताचा उपयोग हा कायद्याच्या क्षेत्रात येणा-या अभौतिक गोष्टींच्या संदर्भात केला जातो. उदा. जगन्नियंता, परमेश्वर, पूर्वसंचित, प्राक्तन, पुनर्जन्म, जादुटोणा, भानामती, चेटूक, काळी जादू, माया इ. इ. गोष्टींची आणि त्यांच्या अस्तित्त्वाची शक्याशक्यता पडताळणे. ह्याप्रकारच्या प्रश्नांतून कायदा अशाप्रकारे आपली सोडवणूक करून घेतो. भौतिक गोष्टींच्या संदर्भात सदर सिद्धांताचा उपयोग केला गेला असल्याचे माझ्या पाहण्यात आजवर तरी आलेले नाही.

राहतां राहिला आपला प्रश्न. :- त्या अस्तित्वाचा आधार घेऊन मी माझ्या वागण्यात काही फरक करावा का?

माझे उत्तर थोडे स्टीरिओटाईप् होते आहे, पण निरुपाय होतो आहे. निम्नलिखित उत्तरे म्हणजे माझे वैयक्तीक मत नव्हे.

१. म्हटले तर हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कायदा वैयक्तिक प्रश्नांत दखल देत नाही.
२. म्हटले तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. 'सामाजिक प्रश्न' असे एकदा म्हटले, की ते सोडविण्याचे कायद्याचे विशेष असे एक तंत्र आहे. ह्याबाबत अनेक मतप्रवाह आहेत.
३. दोन व्यक्तींमधला व्यक्तिगत वाद (घर-खरेदीखत इत्यादी.) कायद्याच्या तंत्राने सोडवायचा असेल तर तो संपूर्णपणे कायद्याच्या कक्षेत बसवूनच सोडवावा लागतो.

धन्यवाद.

हैयो हैयैयो!

प्रथम

संपादकांना इतक्या त्वरेने कार्यवाही केल्याबद्दल धंन्यवाद!
-------------------------------
मंडळी,

धनंजय चतुर आहे यात संशयच नाही.
त्याने माझ्या प्र्श्नाला बगलच दिली आहे .
वरील सर्व शब्द बंबाळात त्याने मूळ प्रश्न हरवून टाकला आहे.

मी त्याला विचारले होते
पण तू कधी शांतपणे बसून विचार केला आहेस का, की माझे आयुष्य असेच का? वेगळे का नाही? मी अजून काही का केले नाही? त्यावर मी अजूनही वेगळ्या प्रकारे आयुष्य जगू शकतो असा युक्तीवाद बरेच जण करतात परतु त्यावर काम करू शकत नाहीत. तुमच्या भाग्याकडे, प्रक्तनाकडे तुम्ही जातच राहता, यातून सुटका नसते. तू शास्त्रज्ञच का झालास? तू ट्रक ड्रायव्हर का नाही झालास? किंवा पोलिस का नाही झालास?

तर यावर त्याने दिलेले उत्तर हे दिशाभूल करणारे व प्रश्नाचे भलत्याच अंगाने विश्लेषण करणारे आहे असे नाही का वाटत?

माझ्या वरील प्रश्नात कुठे ही त्याने लहानपणी काय केले याचे उल्लेख नाहीत हे स्पष्टच आहे. माझे म्हणणे इतकेच होते की, जे लोक 'आमच्या आयुष्यातील घटनांची सुत्रे ही सर्वस्वी आमच्याच हाती होती व आहेत' असे मानतात ते एका अभिमानी भ्रमात जगत असतात. मी ही असाच अनेक वर्षे जगलो. वृथा अभिमानात! पण आपणच ठरवून आपल्या जीवनाला बदलणे मात्र शक्य होत नाही हे सत्य आहे.

या शिवाय माझ्या आणि धनंजयाच्या दृष्टीकोनात फरक आहे. तो रोजच्या जगण्यातले काही पाहतो आहे (असे मला वाटते आहे.) तर मी जे जगून झाले आहे त्याचा एकत्रीत निष्कर्ष पाहतो आहे.
एकत्रीत निष्कर्ष असाच शब्द मी माझ्या आधीच्या लिखाणातही वापरला आहे.

आता धनंजयाच्या (किंवा इतर कुणाच्या) आयुष्यातही या घटना अशाच घडणार अश्या काही शक्यता सापडल्या तर? आणि या शक्यता त्याने ती गोष्ट करण्या आधीच तेथे दिसत असल्या तर?
[ म्हणून मी त्याच्या कुंडलीत गुरु, शुक्र व नेपचून चा प्रभाव असेल असे विधान केले होते. (त्यात अत्यंत तेजस्वी बुधही असायला हवा खरंतर!)]

आता मागे पाहतांना मात्र जेंव्हा मी विश्वाच्या नियंत्याने माझ्या साठी मांडलेला
नकाशा पाहतो तेंव्हा मला त्या घटनांमध्ये सुसुत्रता सहजपणे दिसते.
इतकेच काय त्या त्या वेळी अनेकदा या घटना 'अश्या घडू नयेत' म्हणून जीव तोडून प्रयत्नही केला होता. कारण तेंव्हाच्या तार्कीक बुद्धीला तसे घडणे पसंत नव्हते.

पण आता मागे वळून पाहतांना त्या घटनाक्रमाच्या एकत्रीत परिणामांचे प्रतिबिंब जेंव्हा माझ्या कुंडलीत पडलेले दिसते तेंव्हा विस्मयीत होवून जगन्नियंत्याला मान्य करण्याशिवाय माझ्या हातात काहीच उरत नाही...

आपला
गुंडोपंत

प्रश्नच समजला नाही, म्हणून शब्दबंबाळ

--------------------------------------
मुळात या ठिकाणचा माझा प्रतिसाद शब्दबंबाळ नव्हता.
"ही कल्पना काव्यात रंजक असली तरी जीवनातील निर्णय घेताना तोट्याची ठरू शकते. उदाहरण वर विकास यांनी दिलेले वापरावे. त्यामुळे अज्ञानात सुख आहे असे म्हणणे पटत नाही." अशी तीन सोपी वाक्ये होती.
यास एक प्रतिसाद असा काही सुरू झाला : "आपला जन्मच का झाला हे माहीती नाही? आपण कधी व का मरणार हे माहीती नाही... इ. इ."

याचा संबध माझ्या मूळ अ-बंबाळ वाक्यांशी एक तर लावताच येत नाही, नाहीतर माझ्या वाक्यांमधली आणि "जन्म-मरण..." मधली तुम्ही न लिहिलेली लांबलचक शृंखला शब्दबंबाळपणे सांगणे आले.

:-) माझा शब्दबंबाळपणा नको तर माझ्या सर्वात आधीच्या वाक्यांपासून पुन्हा चर्चा सुरू करूया. :-)

ही घ्या ती वाक्ये :
"ही कल्पना काव्यात रंजक असली तरी जीवनातील निर्णय घेताना तोट्याची ठरू शकते. उदाहरण वर विकास यांनी दिलेले वापरावे. त्यामुळे अज्ञानात सुख आहे असे म्हणणे पटत नाही."
आणि या वाक्यांतून साखळी स्पष्ट दिसणारा प्रतिसाद तुम्हीच सुटसुटीतपणे लिहावा.
------------------------------------------------------------------

तुझा प्रश्न काय आहे तोच समजला नाही.

पण तू कधी शांतपणे बसून विचार केला आहेस का,
शांतपणे विचार अनेकदा केला आहे.

की माझे आयुष्य असेच का?
'का' हा शब्द व्यवहारात मी वापरलेला जाणतो. त्यामुळे काही व्यावहारिक उत्तर देईन. पण ते उत्तर 'माझे आयुष्य असेच कसे' प्रश्नाचे असेल. म्हणजे माझ्या शाळेत अमुक शिक्षणाची सोय होती, माझ्यापाशी वाहनचालकाचा लायसेन्स नव्हता, माझा अमुक ठिकाणी उच्चशिक्षणाचा अर्ज स्वीकारला गेला, तमुक ठिकाणी अर्ज फेटाळला गेला, इ.इ. झाले सोपे उत्तर. पण तुमच्या पुढच्या भाषेवरून वाटते की हे उत्तर तुम्हाला अभिप्रेत नाही. तुमच्या मते 'का?' प्रश्नाचा अर्थ काय आहे. त्याचे व्यवहारात पटलेल्या एखाद्या उत्तराचे उदाहरण देऊ शकाल काय?

उदाहरणार्थ "गॅस का पेटला?" चे उत्तर "रामा गड्याने माचीसकाडी पेटवून धरली म्हणून गॅस पेटला" हे उत्तर चालेल काय? कारण माचीसच्या प्रत्येक काडीने गॅस पेटत नाही - कधीकधी एक-एक काडी विझूनच जाते. यास "प्राक्तन" म्हणायचे काय? याला तुम्ही "प्राक्तन" म्हणत असलात तर असे सोपे उदाहरण चर्चेस घेऊ. उगाच लांबलचक कालावधीची आयुष्याची घटनाशृंखला नको. "प्राक्तन" यापेक्षा काही वेगळे असल्यास तेही सांगा.

आता तुम्ही म्हणता की या ठिकाणी पूर्ण आयुष्याचे एकत्रित निष्कर्षच महत्त्वाचे आहेत. पूर्ण आयुष्याचे एकत्रित निष्कर्ष काढायला विदागार (डेटाबेस) मोठे लागते, आणि सर्व घटनांची जोडणी करायला फार वेळ लागतो. हे मला सोयीचे नाही. शांतपणे विचार करून या निष्कर्षाप्रत मी पोचलो आहे. "प्रचंड घटनाक्रमाचे विश्लेषण करते मर्यादित काळात सोयीचे नाही." याच गोष्टीला गुंडोपंत "प्राक्तन" म्हणतात काय? "माझे आयुष्य मर्यादित आहे," या सामान्य ओळखीच्या तत्त्वाला नवे गोंडस नाव देऊन काय साधते? उलट "प्राक्तन" या शब्दाच्या "ललाटलिखित" या व्यवहारातील प्रयोगाशी गोंधळ होतो. "मर्यादित वेळेमुळे माझी सोय नाही = ते विश्लेषण कुठेतरी लिहिलेले आहे" असा विचित्र अर्थ निघतो.

वेगळे का नाही?
वरील प्रमाणेच.

मी अजून काही का केले नाही?
कारण काल मर्यादित आहे, आणि स्थल मर्यादित आहे. मर्यादित काला-स्थलात मी अमर्याद शक्यता मूर्त करूच शकत नाही. सामान्य गणित.

त्यावर मी अजूनही वेगळ्या प्रकारे आयुष्य जगू शकतो असा युक्तीवाद बरेच जण करतात
मी हा युक्तिवाद करत नाही. हा एक भ्रामक युक्तिवाद आहे. भूतकाळात ज्या शक्यता होत्या त्यापैकी कुठलीही एक वर्तमानात मूर्त होते. "वेगळ्या प्रकारे आयुष्य जगू शकतो" = "आहे ते अमूर्त करू शकतो आणि पूर्वीच्या अन्य अमूर्त शक्यता मूर्त करू शकतो" असे म्हणणे निरर्थक आहे. कोणीतरी कुठलातरी वेगळाच युक्तिवाद केला असेल जो तुम्ही या प्रकारे मांडला आहे. कदाचित
"माझे आयुष्य आहे त्यापेक्षा वेगळे असते तरीही तर्क्य असते" असा काही युक्तिवाद असावा. हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. त्याचा "वेगळ्या प्रकारे जगू शकतो" असा अर्थ काढणे विपर्यस्त आहे.

परतु त्यावर काम करू शकत नाहीत.
अर्थातच. ज्या वाक्याला अर्थच नाही, त्यावर काय काम करू शकणार?

तुमच्या भाग्याकडे, प्रक्तनाकडे तुम्ही जातच राहता, यातून सुटका नसते.
वरील वाक्यांशी संदर्भ? वर राम्यागड्याच्या माचीस-पेटीचे उदाहरण दिले तो संदर्भ मानला तर गुंडोपंतांचा अर्थ लागतो का? पूर्ण आयुष्याबद्दल "मर्यादित वेळेतली सोय" म्हटले, तो अर्थ गुंडोपंतांना अभिप्रेत आहे काय? अर्थ समजावला नाही तर हे वाक्य विचारशृंखलेत असंदर्भ आणि प्रक्षिप्त वाटते.

तू शास्त्रज्ञच का झालास? तू ट्रक ड्रायव्हर का नाही झालास? किंवा पोलिस का नाही झालास?
"का?" हा प्रश्न व्यवहारात अत्यंत सरळ उत्तराचा आहे. त्याचा अर्थ "कसे?" किंवा "हेतू+कसे?" हेच उत्तर तुम्हाला ठीक वाटत असेल तर वर दिले आहे - शाळेत अमुक सोय होती, अर्ज... इ.इ.
यापेक्षा तुम्हाला वेगळे उत्तर हवे असल्यास प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारावा.

आता धनंजयाच्या (किंवा इतर कुणाच्या) आयुष्यातही या घटना अशाच घडणार अश्या काही शक्यता सापडल्या तर? आणि या शक्यता त्याने ती गोष्ट करण्या आधीच तेथे दिसत असल्या तर? [ म्हणून मी त्याच्या कुंडलीत गुरु, शुक्र व नेपचून चा प्रभाव असेल असे विधान केले होते. (त्यात अत्यंत तेजस्वी बुधही असायला हवा खरंतर!)]
:-) याविषयी तुमची आमची खरडवहीत चर्चा झाली आहे. मी खरेच जाऊन कुंडली बघू नये, असा निष्कर्ष निघाला होता. तरी या प्रशंसेबाबत मनापासून आभार. :-)

माझे म्हणणे इतकेच होते की, जे लोक 'आमच्या आयुष्यातील घटनांची सुत्रे ही सर्वस्वी आमच्याच हाती होती व आहेत' असे मानतात ते एका अभिमानी भ्रमात जगत असतात.
त्यांच्यापैकी मी नाही. (खरे म्हणजे असे म्हणणारे व्यवहारात कोणीच नसावे.) "माझ्या आयुष्यातील घटनांची काही सूत्रे माझ्या हातात आहेत, काही माझ्या आईवडलांच्या, काही माझ्या शिक्षकांच्या, काही शेजारच्या वाण्याच्या, काही माझ्या अंगावर पाणी सांडलेल्या वेटरच्या... (यादी संपली नाही) हातात आहेत" असे मानतो. यात भ्रम काय? "प्राक्तन" ही नवीन कल्पना लागू करण्यात तात्विक बोजडपणा आहे.

मग

"आहे ते अमूर्त करू शकतो आणि पूर्वीच्या अन्य अमूर्त शक्यता मूर्त करू शकतो" असे म्हणणे निरर्थक आहे.
का बरं असं वाटतं तुला?
मला तरी माझ्या तोकड्या माहीतीच्या आधारावर अनेक लोक माहीत आहेत की त्यांनी आयुष्यात कोणतीही अमूर्तही शक्यता दिसत नसतांना ही गोष्टी करून दाखवल्या आहेत. फार कशाला आपले दादा कोंडकेच पाहा ना.
अपना बाजारच्या एका हेल्परची मराठी चित्रपटसृष्टीचा दादा बनण्याची काय शक्यता होती? पण झालेच ना तसे?

मालाडचा दादा मेहमूद चित्रपट सृष्टी गाजवण्याची काय शक्यता होती? झालाच ना तो?

ते सोड पण सगळ्या जगाला हवे असलेले मिळालेले राजेपदच सोडून देण्याची आठव्या हेन्री (का एडवर्ड?) ची काय शक्यता होती? पण सोडलेच ना? (विपरीत राजयोग!)
राणी व्हिक्टोरियाला ते मिळण्याची तशी काहीच शक्यता नसतांना तीला त्याचा भोग मिळावा?

वरील उदाहरणांवरून हे स्पष्ट होतेच की आहे ते अमूर्त करू शकतो आणि पूर्वीच्या अन्य अमूर्त शक्यता मूर्त करू शकतो" असे म्हणणे निरर्थक आहे. या विधानात काही अर्थ नाही.
तुझे हे विधान बरोबर नाही.

कोणीतरी कुठलातरी वेगळाच युक्तिवाद केला असेल जो तुम्ही या प्रकारे मांडला आहे.
छे! छे! असे असते तर मी त्याचा संदर्भही दिला असता! उलट त्यामुळे अजूनही कुणी तरी असाच विचार करणारे आहे असे माझ्या विधानास बळही प्राप्त झाले असते. तेंव्हा किमान गुंडोपंतांवर असा आरोप करण्या आधी नक्कीच विचार करायला हवा होतास!

कदाचित
"माझे आयुष्य आहे त्यापेक्षा वेगळे असते तरीही तर्क्य असते" असा काही युक्तिवाद असावा. हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. त्याचा "वेगळ्या प्रकारे जगू शकतो" असा अर्थ काढणे विपर्यस्त आहे.
आता परत तेच! मी म्हणतो आहे की तुझे आताचे आयुष्य हे तुला तू घडवले असे वाटत असले तरी, ते 'डेस्टाईन्ड' (बरोबर ना?) आहे/होते. तू फक्त चालतो आहेस. आता यात शब्दांचे खेळ खेळून अनेक अर्थ काढत बसणार असलास तर मग तू कुणा भाषा प्रभूशी वाद घाल. कारण मला तसे करणे खरच जमत नाही. माझ्या सुमार बुद्धी व तोकड्या शब्द संपदेवर मी तुझ्यासारख्या विद्वान माणसासोबत किती वाद घालणार?

"माझे आयुष्य मर्यादित आहे," या सामान्य ओळखीच्या तत्त्वाला नवे गोंडस नाव देऊन काय साधते? उलट "प्राक्तन" या शब्दाच्या "ललाटलिखित" या व्यवहारातील प्रयोगाशी गोंधळ होतो. "मर्यादित वेळेमुळे माझी सोय नाही = ते विश्लेषण कुठेतरी लिहिलेले आहे" असा विचित्र अर्थ निघतो.

मला काही गोंधळ होतो असे वाटत नाही. तूच जरा पाहिलेस तर हा सगळा गोंधळ सुटतो हेच दिसून येईल.
"मर्यादित वेळेमुळे माझी सोय नाही = ते विश्लेषण कुठेतरी लिहिलेले आहे" असा विचित्र अर्थ निघतो.

कसले तुमचे हे विश्लेषण? कसला विचित्र अर्थ?
अगदीच तर सरळ आहे माझा मुद्दा -आपल्याला लाख वाटत असले की आपणच आपले आयुष्य घडवतो, तरी ते एका ठरवलेल्या मर्गावरूनच जाते (हा माझा निष्कर्ष आहे, तो तू मान्य करावा असा माझा आग्रह नाही!)
यात विचित्र ते काय बॉ? उलट किती सोपे झाले आयुष्य!

मला कदाचित माझा मुद्दा तुझ्या इतक्या बंबाळपणे मांडता येत नसेल, पण मला असे म्हणायचे आहे की, माझे आयुष्य मर्यादीतच नाही, तर त्यातले स्वातंत्र्यही मर्यादीतच आहे. आपण आखुन दिलेल्या मार्गावरच चालत असतो असे मला वाटते. याला प्राक्तन म्हणा नाही तर बंदिजीवन किंवा तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते.

"प्राक्तन" ही नवीन कल्पना लागू करण्यात तात्विक बोजडपणा आहे.
कदाचित आपल्या प्राक्तन या संज्ञेला समजण्यात/छटेत गोंधळ असवा असे मला वाटते आहे.
पण म्हणून प्राक्तन या शब्दावरून मला दुसरा शब्दाचा खेळ खेळायचा नाही.
(लै दमलो! आता कळंलं पुर्वी सोमरस का पीत ते!).

पण आयुष्यात सर्व गोष्टी आपल्या ठरवल्या प्रमाणे होत नाहीत, हे सत्य आपण वेळोवेळी पाहत असतो. खरं तर अनेकदा आपण ठरवतो एक आणि पोहोचतो भलतीकडेच. हे कसे?
तुम्ही म्हणाल त्यात काय?
एका विशिष्ट गोष्टीच्या प्रणामांचे प्रमाणीकरण केले की त्यातल्या शक्यते(तर्कते?)नुसार तुम्ही यातल्या एका ठिकाणी निश्चितच पोहोचणार आहात. आणि कुठे पोहोचाल हे तर त्यावरून काढताही येईल.
अरे, मग सगळे या शक्याशक्यतेच्या मानवनिर्मीत नियमाला अनुसरून माहीतीच आहे असे वाटायला लागते. मग कशाला शोधायचे की किती लोक र्‍हूदरोगाने मरणार ते? ते तर असेही तार्कीक रीतीने काढताच येईल.
मग प्रत्यक्षातला विदा जमवा त्यावर इतका वेळ खर्च करा हे तरी कशाला करायचे? पण ते करावे लागते कारण,
१. शक्याशक्यतेचा तर्क बरोबर आहे हे सिद्ध करणे
२. प्रत्यक्षातला विदा वेगळाच असणे.

मग पुढे जावून् मी म्हणेन की, आपण असे विश्लेषण करू की किती शक्याशक्यतेचे तर्क बरोबर येतील व त्यातला हा तर्क आहे बरोबर की चुक मध्ये येतो की नाही ते पाहू या. मग तर प्रत्यक्ष विदा कडे जायलाच नको!
(व पुढे जावून शक्याशक्यतेच्या तर्कांचे किती तर्क बरोबर येतील्... ;)) )

पण हे सगळे गणिताने सिद्ध करता येत आहे असे वाटले तरी प्रत्यक्षात तुम्ही काही फक्त त्यावरच विसंबून राहत नाही, हे कसे?
असले कसले हे तुमचे विश्लेषण कामाचे?
मग अपना बाजारच एक हेल्पर कसा काय चित्र्पटसृष्टीचा दादा होतो? कोणते तार्कीक विश्लेषण असे सिद्धकरते की आमुक इतके राजे त्यांचे राजेपद सोडतील?
म्हणजे ज्या तर्कशास्त्रास तुम्ही जीवनाचा मुख्य आधार मानता त्याचा पायाच कमकूवत आहे असे ध्वनीत होत नाही काय?
तूच म्हणाला होतास ना? की कितीही प्रयत्न केले तरी २० मधले एक मूल मरतेच? का?

माझे म्हणणे इतकेच होते/आहे की ज्या जन्म व मृत्युवर आपले नियंत्रण नाही व या सर्वस्वी आपल्या हातात नसलेल्या आयुष्याला आपण जबाबदार आहोत असे मानणे कसे शक्य आहे? जर मी माझा जन्म व मृत्यु ठरवू शकत असेन तर मी माझ्या आयुष्याची जबाबदारीही घ्यायला तयार आहे.

आता माझ्याच उदाहरणावरून मलाच परत रिंगणात तुम्ही शिकले सवरलेले भाषा पंडीत लोक घ्याल यात शंका नाही!

कदाचित मी माझ्या अल्पबुद्धीच्या बाहेरची उदाहरणे घ्यायलाही नकोत.

माझा जन्मच का झाला याला वालावलकर सर 'एक निसर्गक्रम' असे लेबल लावून थोडक्यात वासलात लावतात.
मी मानतो की, ज्याला जसे पाहिजे तसे तो आयुष्याकडे पाहुच शकतो.
एक निसर्गक्रम म्हणून जगले काय नि मेले काय. कशाला हवा ज्ञानाचा आणि अभिमानाच्या कल्पनेचा पसारा? आणी कशाला द्यायचे ते आपल्या कल्पनेचे विचार इतरांना?

मला एक माझ्या (किंवा मानवाच्या एकत्रीत बुद्धीच्या) ताकदीपेक्षाही मोठी शक्ती आहे जी माझे विचार नियंत्रीत करते असे मानायचे आहे तर त्यात बिघडले कुठे?

वर आलेले दुर्योधनाचे उदाहरणही पूर्ण नाही. तेच उदाहरण घ्यायचे असेल तर महाभारतात आलेल्या कर्माच्या सिद्धांतानुसार त्याने त्याचे काम केले असेही म्हणता येईल. उगाच अर्धवट उदाहरणे देवून आपल्या विवादाला बळ देणे योग्य नव्हे. हे तर वाक्यवाक्याच विपर्यास करणार्‍या पीत पत्रकारितेसारखे झाले.

या शिवाय जगन्नियंता आहे असे मानणे धोकादायक आहे असेही राजेंद्र, एकलव्य, नवीन म्हणतात मग माणूस सगळीच जबाबदारी या जगन्नियंत्यावरच सोडून देईल असाही त्यातून अर्थ काढतात. पण असे सर्रास घडतांना दिसते का? नाही दिसत!
कारण जो तो आपल्या वकुबाने समाजाला योग्य ते काम करतच असतो. त्या नीतीनियमांमध्ये राहून काम करतो.

पण हे सर्व प्रयत्न करूनही जेंव्हा यश मिळते किंवा मिळत नाही तेंव्हा, यात माझा भाग प्रयत्नांचा होता परंतु इच्छा जगन्नियंत्याची होती, असे मानले व त्यामुळे माझे आयुष्य तरी जरा निवळले. हे तत्व माझ्या पुरते मला लागू आहे. तुम्हाला मान्य नसेल आणि आपल्या अयुष्यातल्या सर्व घटनांची व जगाची सर्वच जबाबदारी तुमच्याच खांद्यावर घायची असेल तर हा तुमच्या निर्णय आहे. यामुळे मी या चर्चेच्या सुरुवातीलाच असे म्हणालोही होतो की, आम्हाला आमच्या अज्ञानात सूख. तुमच्या मते आम्ही विज्ञानाची(च) कास न धरणारे अज्ञानीच! तुम्हाला जगाचे ज्ञान झाले आहे त्यात तसे मानण्यात तुमचे सूख. माझी काय नाय नाही बॉ!

म्हणून प्रत्येकच वेळी निरिश्वरवादच कसा श्रेष्ठ असे दाखवून देण्याची आवश्यकता काय हे मला कळत नाही.

हे वरचे सर्व सोडा. पण आयुष्यात एक अशी वेळ येतेच जेंव्हा आपणच आपल्याला विचारतो की
मी कोण? मी इथे का?

तेंव्हा या प्र्श्नाचे उत्तर शोधायला कर्माचा सिद्धांतच उपयोगी पडतो. आता तुम्ही माझी टरच उडवणार असाल तर मी येथेच थांबतो कारण
या सिधांतावरून भल्या भल्यांची टर उडवली गेली आहे त्यात मी कोण?

माझे ज्ञानही अतिशय तोकडे आहे. पण माझ्या या वेड्या-वाकड्या शब्दातले अर्थ आपण समजून घ्याल, अशी या भाषागरीब व 'वादविवाद बिचार्‍या' गुंडोपंताला आशा आहे!

आपला
गुंडोपंत

आपण वेगवेगळ्या भाषा बोलत आहोत

संवाद करणार्‍यांचे शब्दांचे अर्थ एकच असल्याशिवाय संदेशन होणार नाही.

माझ्या मते काही वापरण्याजोग्या(=बर्‍यापैकी असंदिग्ध) व्याख्या मी वरील "शब्दबंबाळ" प्रतिसादांत दिलेल्या आहेत. तुम्ही वेगळ्या असंदिग्ध व्याख्या दिल्यात तर त्या वापरीन.
कोणाही एकाचा, पण असंदिग्ध, व्याख्या-संच वापरला तर आपण एक भाषा बोलायला लागू. पण तुम्ही व्याख्या देत नाहीत.

अगदी "अमूर्त", "मूर्त" हे शब्दही आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरत आहोत.
"काहीही शक्यता नाही"च्या अर्थ माझ्या लेखी "शक्यता शून्य आहे".
एखादा राजा राज्यत्याग करेल याची शक्यता शून्य नाही. विकीपीडियावरच्या दुव्यावर ७६ राजत्यागांची यादी आहे. आणि आजपर्यंत एकही राजत्याग झाला नसता तरी राजत्यागाची शक्यता शून्य होत नाही.
पण तुम्ही म्हणता की असल्या घटनांची काहीही शक्यता नाही. तुमचा शब्दार्थ काहीतरी वेगळाच आहे असे दिसते. सामान्य शब्दांचे अर्थही वेगळे असतील तर मग संदेशन कसे होणार?

तुमच्या मते आम्ही विज्ञानाची(च) कास न धरणारे अज्ञानीच! तुम्हाला जगाचे ज्ञान झाले आहे त्यात तसे मानण्यात तुमचे सूख.
यापुढे काय म्हणण्यालायक आहे? त्यामुळे तुम्हाला तपशीलवार उत्तर देणार नाही.

पण

तसे मानण्यात तुमचे सूख.

पण हा तर माझा या चर्चेतील पहिलाच प्रतिसाद होता... त्या नंतर ही सगळी चर्चा घडली.
यनावाला सदैवच निरिश्वरवादाचे दाखले देत हिंडत असतात. त्यांना प्रत्युत्तर म्हणून मी हे वाक्य दिले होते.

पण त्यावर इतकी चर्चा झाल्यावर तुला आठवावे की, यापुढे काय म्हणण्यालायक आहे?

विस्मयीत

आपला
गुंडोपंत

काही मुद्द्यांचा माझ्या वकूबाप्रमाणे घेतलेला परामर्श

१. स्वातंत्र्य - आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचे , आपल्या आयुष्याला आणि आपल्या वर्तुळातल्या (आणि अर्थातचे हे वर्तुळ छोटे-मोठे होते) व्यक्तिंच्या आयुष्याला दिशा देण्याचे / दिशा बदलविण्याचे स्वातंत्र्य.

एक बाजू असे मांडताना दिसते की, हे स्वातंत्र्य असे बहुदा अस्तित्वात नाहीच. जे आहे ते आभासी आहे. जोतो जीव लिहून दिलेल्या/नेमून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमणा करत असतो. सर्व अस्तित्वे आणि त्यांचे स्वभाव-विभाव, आयुष्यातील घटना या सर्व अनुक्रमे कठपुतल्या आणि त्यांच्या क्रीडा होत.

याचा एक प्रतिवाद असे करता येणे शक्य आहे की : नाही, प्रत्येकाला निवडीचे स्वातंत्र्य आहे. आणि जो तो छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आयुष्य बदलवणार्‍या गोष्टींपर्यंत ही निवड करतो/करते. आणि हे प्रचंड जग हे एकमेकांना स्पर्श करणार्‍या , घासणार्‍या, छेदणार्‍या, छोट्या-मोठ्या निवडींचे पर्यवसान आहे. काहीतरी करण्या-होण्याची इच्छा, तसे करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या क्रियांचे पर्यवसान आपल्याला हवे तसे होत नाही, याचा अर्थ असा नव्हे की विधिलिखितामधे तसे लिहीलेले नव्हते. याचा असाही अर्थ निघू शकतो की, बाबा रे , गाडीमधे जागा ठराविक लोकांकरता आहे. तुला ही गाडी पकडता आली नाही; ठीक आहे तू वेगळी गाडी पकडलीस.

२. वर उल्लेखिलेल्या मुद्द्यापेक्षा थोडा जास्त मूलगामी मुद्दा आहे अस्तित्वाच्या आकलनाचा. जेव्हा आपण आपले (आणि इतर जीवांचेही) अस्तित्व म्हणजे जगन्नियंत्याच्या /नियतीच्या/इतर कुठल्या नावाने ओळखल्या जाणार्‍या थोरल्या प्रतीच्या अस्तित्त्वाची सावली मानतो, किंवा काहीनाही तरी त्या थोरल्या शक्तीकडे काही एक ताबा आहे असे मानतो तेव्हा मग आपोआपच "त्या" थोरल्या अस्तित्त्वाच्या स्वरूपाबद्दल, आणि त्या अनुषंगाने येणार्‍या "विधिलिखित" , "पूर्वसुकृत", "कर्मविपाक", "देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम" यासारख्या गोष्टींबद्दल चर्चा सुरू होते.

जर आपण आपल्या अस्तित्त्वालाच "जन्म-मृत्यूच्या दोन बिंदूंमधे चालू असणारी , आणि या दोन बिंदूंच्या पुढे-मागे काहीही नसणारी , एक स्वयंपूर्ण , सेंद्रिय गोष्ट" असे मानले तर वरील बर्‍याचशा बाबींचे निराकरण करता येते. असे केल्याने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य (जे इतरांच्या स्वातंत्र्यामुळे मर्यादित ठरते) व घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी या सर्व गोष्टी आपल्या स्वतःवर येतात. "आकाशातल्या बापा"कडे जात नाहीत.

३. प्रीडीटर्मिनिझम् -(मराठी शब्द ??) : तुमच्या आमच्या आयुष्यात जे घडते ते एका प्रचंड मोठ्या प्रणालीचा एक भाग आहे अशी बाजू "ग्रेटर बीईंग"च्या संदर्भात येते. त्या "ग्रेटर बीइंग"ला नाकारल्यानंतर अर्थातच हा मुद्दा मोडीत निघतो. "पण मग विचित्र नेमानेमाचे काय ?" अशा प्रश्नांची उत्तरे "रॅंडमनेस्" असे द्यावे लागते/देता येते. आपल्यातील गणितज्ञ रॅंडमनेस् ची संकल्पना जास्त चांगली समजावून सांगू शकतील.

विवेचन आवडले

निर्णयस्वातंत्र्याचा (फ्री विल) आणि कार्यकारणभावाच्या अवश्यसंबंधाचा (डिटर्मिनिझम) मुद्दा या चर्चेत कळीचा आहे. विवेचन आवडले.

या दोन टोकाच्या विचारांमध्ये समन्वय साधण्याचा (=त्यांतील संदिग्ध व्याख्यांमुळे होणार्‍या गोंधळाचे विश्लेषण करण्याचा) प्रयत्न रेमंड स्मल्यान या तत्त्वज्ञानी/तर्कशास्त्र्याने केला आहे. पण त्याची लिहायची पद्धत फार खेळीमेळीची आणि चटकदार आहे. त्या चर्चेचा/नाटकुल्याचा दुवा येथे.

(रेमंड स्मल्यान यांच्या कोड्यांवर आधारित तर्कक्रीडा उपक्रमींना परिचितच आहेत.)

वा आवडेल

३. प्रीडीटर्मिनिझम् -(मराठी शब्द ??) : तुमच्या आमच्या आयुष्यात जे घडते ते एका प्रचंड मोठ्या प्रणालीचा एक भाग आहे अशी बाजू "ग्रेटर बीईंग"च्या संदर्भात येते. त्या "ग्रेटर बीइंग"ला नाकारल्यानंतर अर्थातच हा मुद्दा मोडीत निघतो. "पण मग विचित्र नेमानेमाचे काय ?" अशा प्रश्नांची उत्तरे "रॅंडमनेस्" असे द्यावे लागते/देता येते. आपल्यातील गणितज्ञ रॅंडमनेस् ची संकल्पना जास्त चांगली समजावून सांगू शकतील.

यावर काही प्रकाश पडला तर मला वाचायला फार आवडेल.
कुणास ठावूक पुर्वी बदलली तशी माझी मतेही बदलतील. बदल हाच आयुष्याचा गाभा आहे आणि स्विकारायला गुंडोपंत तयार असतात.
पण पण बघु तरी या काय यातून येते ते.
कुणी लिहितंय का रॅंडमनेस् वर?

वेगळा लेख आणलात तरी चालेल.
आपला
गुंडोपंत

जबाबदारी

शिवाय जगाची जबाबदारी 'सर्वस्वी माझ्या डोक्यावर नाही इतकेच काय माझी जबाबदारी सुद्धा माझ्या डोक्यावर नाही ' तो' सगळे बघून घेईल हा विचार आपल्याला अगदी मुक्त होण्याची वेगळीच संधी देतो.
मला वाटते हा युक्तिवाद धोकादायक आहे. एकदा जबाबदारी झटकली की तुम्ही काही केले तरी ते 'मी केले नाही. त्याने माझ्या हातून करवले' असे म्हटले तर कुठल्याच गुन्ह्याबाबत कुठल्याच गुन्हेगाराला शिक्षा देता येणार नाही. या संदर्भात धनंजय यांनी वर दिलेले दुर्योधनाचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. मग ग्लोबल वॉर्मिंग होते आहे, प्रदूषण वाढते आहे या सर्वांची जबाबदारी माझी नसेल तर मला काय त्याचे? (इथे जबाबदारी झटकण्यासाठी लोक किती भन्नाट सबबी देतात याबद्दलचे सार्त्र यांचे उदाहरण आठवते.)

बाकी एक्झिस्टेंशिअलिझ्म मानायचे की नाही याचे प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. :-)
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

पूर्वकर्म मानणार्‍यांना काही मूलभूत प्रश्न

१. आज मी गेल्या कित्येक जन्मात केलेल्या कर्माची फळे भोगत असेन तर माझ्या 'पहिल्या' जन्मात मला मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य होते का? असलेच तर मला ते 'माहीत' होते का?

२. समजा माझा पुढचा जन्म कुत्र्याचा झाला तर त्यावेळी 'मी या जन्मात कुत्रा आहे कारण मागच्या जन्मात केलेली (कु)कर्मे' हे जर मला माहीतच नसेल तर कर्मसिद्धांत मानणे किंवा न मानणे याने काय फरक पडणार आहे?

३. कर्माची फळे आपल्या रोजच्या आयुष्यात कोणत्या 'लेवल' पर्यंत येतात? म्हणजे आज मला भूक लागली नाही, बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही, लवकर जाग आली, जेवताना एका घासात खडा आला (किंवा कांदेपोहे खाताना एका घासात दोन शेंगदाणे आले :) इ.इ. सर्व गोष्टी पूर्वकर्मावर आधारित आहेत का?

४ माझ्या हातून होणारी प्रत्येक गोष्ट पूर्वकर्मामुळे असेल, म्हणजे मला माझ्या मनाप्रमाणे काहीच करता येत नसेल तर "तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे" हे गीतेतले वचन खोटे आहे की काय?

५. जर सर्व काही पूर्वकर्माने होत असेल, म्हणजे माझे या जन्मातले प्रत्येक कर्म 'आधीच ठरलेले' आहे तर पूर्वकर्माचा 'संचय' एक-दोन जन्मातच संपायला हवा. त्यानंतर काय?

अवांतर - जर माहीत असूनही या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर तुमच्या कीबोर्डाची शंभर शकले होऊन तुमच्या पायावर लोळण घेतील :)
अतिआवांतर - कीबोर्डाची शकले होणे हे कीबोर्डाचे पूर्वकर्म की वापरणार्‍याचे? :)

अति-अवांतर

खालची अतिअवांतर टीप मस्तच.

धन्यवाद | उत्तरे?

>> खालची अतिअवांतर टीप मस्तच.
धन्यवाद! :) तुम्हीही अदृश्य अक्षरात काही लिहिलेय का हे 'सिलेक्ट' करून पाहिले. :) वर विचारलेले प्रश्न मला कर्मसिद्धांताबद्दल नेहमी पडतात. 'पूर्वकर्म मानणार्‍यांसाठी' असे आधी लिहिले असले तरी पूर्वकर्मसिद्धांत न मानणारे परंतु त्याचा अभ्यास असणार्‍यांनी वरील प्रश्नांची उत्तरे माहीत असल्यास द्यावीत ही विनंती.

कर्माची फळे

मा फलेषु कदाचन् |
कर्म करत रहा, फळाची अपेक्षा धरु नकोस.
वरील मांडणीत असे अपेक्षीत असते कि तू (सु)कर्म करत रहा, त्याची चांगली फळे तुला मिळतील पण त्याची तू अपेक्षा धरु नकोस. म्हणजे
१) अपेक्षाभंगातून होणार्‍या संभाव्य दु:खाची सोडवणुक
२) तुझ्या (सु)कर्माचे श्रेय लाटणार्‍या ला जाब विचारण्याची बंदी
३) तुला(सु) फळ मिळालेच तर ती तुला मिळालेली सवलत आहे तुझा तो हक्क नव्हेच.
४) तुला (कु) फल मिळाले तर मात्र भोग आपल्या (कु)कर्माची फळे. ती याच जन्मात भोगायला मिळाली तर 'बघ हिशोब चुकता केल्याशिवाय सुटका नाही' या ला पुरक मांडणीचा तू वाहक.
५) जर तसे झाले नाही तर ती फळे तुला पुढच्या जन्मात भोगायला लागतील हा इशारा.
६) तुला तुझ्या (सु) कर्माची (सु) फले तर मिळालीच नाही पण उल्टी (कु) फळे भोगायला लागली तर ही तुझ्या पुर्वजन्मीच्या (कु)कर्माची फळे आहेत याची सोय.
प्रकाश घाटपांडे

जगन्नियंता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कर्तव्यकर्म आचरावे
...............................
ज्या नैसर्गिक घटना घडतात त्यांच्या संदर्भात कोणाचाही कसलाही हेतू नसतो.त्या निसर्ग नियमांनुसार घडत असतात.पाऊस पडतो तो कोणत्याही उद्दिष्टासाठी नाही.तसेच अतिवृष्टी, अवर्षण, भूकंप, वादळे होत असतात.
पुनरुत्पत्ती करणे, आपल्यासारखे सजीव निर्माण करणे ही प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रवृत्ती (नॅचरल इन्स्टिंक्ट) आहे.त्यामुळे माणसाच्या जन्मामागे तसा कोणताही हेतू नाही.('म्हातारपणीचा आधार' असा माता पित्यांचा हेतू असू शकतो.) त्यामुळे:
आपला जन्मच का झाला हे माहीती नाही?
आपण कधी व का मरणार हे माहीती नाही.
आपण आयुष्यात 'हेच का करतो दुसरे काही का नाही' याची कोणतीही कारणी मिमांसा करण्याची कोणतीच कुवत जर आपल्या कडे नाही . ....श्री.गुंडोपंत

**यांतील "आपला जन्मच का झाला? " हा प्रश्न अप्रस्तुत आहे. सजीवाचा जन्म ही एक नैसर्गिक घटना असते. त्यामागे कोणतेही उद्दिष्ट नाही.
**माणूस का मरतो हे माहिती आहेच.नेमका कधी मरणार हे माहित नसते.पण आयुर्मानाची सर्व साधारण संभवनीयता काढता येते.जीवनातील नियोजनासाठी तेवढी पुरेशी असते.( एल्‌.आय‌. सी कडे तक्ते असतात.) कधी अनपेक्षितपणे काही घडते. पण ते लॉ ऑफ़्‍ रॅंडमनेस अनुसार गृहीत धरायला हवे.त्याची संभवनीयता कमी असते.मरणाचा निश्चित दिवस माहित नसला तरी काहीच बिघडत नाही.
**"आपण आयुष्यात हेच का करतो दुसरे का नाही? " हा प्रश्न निरर्थक आहे . श्री. गुंडोपंत यांनी 'गुंडोपंत हेच नाव का घेतले? धोंडोपंत अथवा अन्य काही का नाही? कुठले तरी नाव घेणे आवश्यक होते. त्यांना योग्य वाटले ते त्यांनी निवडले. तद्वतच आपण त्यावेळची परिस्थिती पाहून यथामती निर्णय घेत असतो. कालांतराने तो चुकीचा वाटला तरी त्यावर खेद करू नये.भूतकाळातील अनुभवांवरून धडे घ्यावे. पण "गतं न शोच्यम्‌ ।"एक सुभाषित आहे:
"गते शोको न कर्तव्यो, भविष्यं नैव चिंतयेत् ।।
वर्तमानेन कालेन प्रवर्तन्ते विचक्षणा: ॥"
(इथे नैव चिंतयेत्‌ म्हणजे चिंता करूच नये. विचारच करू नये असे नाही.)
" आपण आयुष्यात हेच का करतो दुसरे काही का नाही? " असा प्रश्न कोणाही सुबुद्ध माणसाला पडू नये.आपण जो निर्णय घेतला तो त्यावेळच्या परिस्थिती प्रमाणे बरोबर होता."अरेरे! त्यावेळी असे करायला नको होते." अशी खंत निष्फ़ळ आहे.

गतम्‌ न शोच्यम्‌

गते शोको न कर्तव्यो । जुने जाउ द्या मरणालागुनी, किंवा लेट अस बरी द पास्ट.--वाचक्‍नवी

क्या बात है! पण

" आपण आयुष्यात हेच का करतो दुसरे काही का नाही? " असा प्रश्न कोणाही सुबुद्ध माणसाला पडू नये.आपण जो निर्णय घेतला तो त्यावेळच्या परिस्थिती प्रमाणे बरोबर होता."अरेरे! त्यावेळी असे करायला नको होते." अशी खंत निष्फ़ळ आहे.

मान्य आहे यनावाला. हे आपले विवेचन सुयोग्यच आहे. मलाही ते काहीसे मान्यच आहे. पण प्रत्यक्ष जीवनात तसे घडत नाही ना त्याचे काय करावे?

त्या क्षणी येणारे विचार हे आपल्याला आवरता येत नाहीत त्याचे काय करायचे?
त्याविचारांनी येणार्‍या भावना व त्या भावनांमुळे येणारे कार्य हे आवरता येत नाही हे पण तितकेच खरे की नाही?
आपण आपल्या विचारातून जन्मलेल्या भावनेला कधीच बळीच पडला नाहीत?
आपणास आयुष्यात कोणतीही निष्फ़ळ खंत नाही?

तसे असेल तर आपण पुरुषोत्तम आहात! धन्य आहात!
आपली परवानगी असेल तर हा अज्ञ विकारवश गुंडोपंत 'आपल्या विकारांवर व विचारांवर कसा व ताबा मिळवावा', यासाठी आपला शिष्य बनायला आजपासून तयार आहे!
असा भगवंतासम गुरु मिळायला भाग्यच लागते या शंका नाही!
तेंव्हा मला नक्की कळवा, मी आपला ऋणी राहीन.

पण!!!
पण जर आपणास अशी खंत असेल,
तर मग आपण सुबुद्ध असुनही ही निष्फळ आहे असे माहीती असूनही येणारी खंत का येते आहे?

आपला
विकारवश पण शिष्योत्तम होवू इच्छिणारा
गुंडोपंत

सही बात है! पण


'आपल्या विकारांवर व विचारांवर कसा व ताबा मिळवावा'


एका वाहनचालकाचा एकही अपघात न करता दीर्घकाळ सेवा केल्या बद्दल सत्कार होतो. त्याचे रहस्य जेव्हा विचारले जाते त्यावेळी असे लक्षात येते की तो मशीन सेक्शन चा चालक असल्याने त्याने केलेले वाहनचालन हे फक्त आगारात अंतर्गत होते.
गुंडोपंत खर आहे तुमच म्हणण. ताबा मिळवायचा असेल तर संकुचित व्हाव लागेल. जर आपली सदसद विवेकबुद्धी नियमनासाठीच खर्च झाली तर तुमच्या हातून कार्य काय होणार? प्रत्येकाला स्वतःशी हा संघर्ष करावा लागतो. जगात उत्तुंग कार्य झाली आहेत ती वेड्या माणसांकडूनच; शहाणी माणसं विवेकाच्या जोखडीत अडकून बसली. वेड्या माणसाची ताकद ही विघातक कार्यात खर्च होउ नये याची काळजी शहाण्या माणसांनी घेतली तरी खूप झाले.
प्रकाश घाटपांडे

श्रीमंत आणि भिकारी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे लिहितात "मला तर नेहमी वाटते एक बाळ श्रीमंताच्या घरात जन्माला येते. आणि त्याच वेळी एखाद्या रोडवर एखादी भिकारीन एका बाळाला जन्म घालते. च्यायला त्या बाळाला कोणाच्या घरी जन्म घालायचे याचे काही तर्क शास्त्रात आणि विज्नानात उत्तर असेल का ?"

........
श्रीमंताच्या घरात एका स्त्रीचा एका पुरुषाशी समागम झाला. त्या स्त्रीला मूल झाले. रस्त्यावरील एका भिकारणीचा एका पुरुषाशी संबंध आला. तिने रस्त्यावर बाळाला जन्म दिला. यात नवल ते काय? यात तर्कशास्त्र आणि विज्ञान यांचा संबंध कुठे येतो? मूल जन्माला कसे येते हे सर्वज्ञात आहे. ही दोन मुले एकाच वेळी जन्माला आली याचेही आश्चर्य वाटायला नको. कारण प्रतिक्षणी शेंकडो मुले जन्मतात. त्यांतील काही श्रीमंताघरी तर काही रस्त्यावर जन्मणारी असणारच. दोन्ही एकाच नक्षत्रावर जन्माला येऊन एकाच्या तोंडात चांदीचा चमचा दुसर्‍याच्या तोंडात प्लॅस्टिकचा याचे आश्चर्य वाटते काय? तर राशी भविष्य हे थोतांडच आहे. त्यावर विश्वास ठेवू नये म्हणजे झाले.

जगन्नियंता

जोवर आपण उत्तरे शोधण्यासाठी अश्या एका शक्तीची कल्पना करतो की जीला हातपाय आहेत अथवा ती सर्वशक्तीमान आहे इत्यादी तोवर तर्क-वितर्क चालूच राहणार. नियंता म्हटले की त्याला विचारशक्ती असली पाहिजे म्हणजे मन असले पाहिजे. म्हणजे तर मोठाच गोंधळ होणार. याच मुळे त्याला प्रसन्न करुन घ्यायची चढाओढ लागते. विवेकानंद ज्ञानयोगात (व्याख्याने) म्हणतात की गायी साठी देव म्हणजे प्रगत-सर्वशक्तीमान-हजार पायाची गाय असेल तर माणसासाठी तसा हजार डोळ्याचा माणूस.

मी का आहे? कोण आहे ? हे सनातन प्रश्न आहेत. पण जग हे निर्हेतूक आहे असे मानणे हे देव स्थितप्रज्ञ आहे या मनण्याशी जवळचे वाटते. आणि मला तरी ते पटते.
आता हेतू नसतानासुद्धा घटनांमध्ये काही सूत्र आहे का ते तपासले पाहिजे. म्हणजे हवेमध्ये असलेले कण रँडम मोशन मध्ये असतात असे गृहित धरले, ते निर्हेतूक पणे फिरत आहेत, तरी त्यांवर गुरुत्व, एकमेकांतील आकर्षण-पराकरकर्षण काम करते. मग मी या त्यांच्या फिरण्याला हे दोन आयाम देईन. आणि त्यांतील एखाद्या विशिष्ट कणाच्या हालचालीचा मला अंदाज लागेल. (मी ज्योतिषी सुद्धा बनू शकेन) . कणाच्या या फिरण्याचे मी तपशीलवार् वर्णन करेन.

पण ते सर्व निर्हेतूक आहे असेच मानेन. जर हे सर्व मी एका तर्कात बसवले तर मग यातली योजना (निर्हेतूक-आपोआप बनलेली) माझ्या लक्षात लेईल. ती आपोआअप उदयाला आलेली प्रणाली पदार्थावर आणि मनावर कार्य करते असे आता मी मानतो विवेकानंद म्हणतात की सूक्ष्माचा जडावर आणि जडाचा सूक्ष्मावर परिणाम होत असतो. माझ्यासाठी आज तरी कोडे उलगडलेले वाटते आहे. प्रणाली काम कसे करते ते मला नीटसे समजले नाही तरी मला चालणार आहे.

म्हणजे तुम्ही जगंनियंत्यावर सोपवले आणि मी या निर्हेतूक प्रणालीवर.
आता मी तुकोबांची ओवी आठवतो.. तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे.
--लिखाळ.

मी तरी नक्की

मी ज्योतिषी सुद्धा बनू शकेन) . कणाच्या या फिरण्याचे मी तपशीलवार् वर्णन करेन.

अरे नक्की बन. मी तरी खरंच येईन माझे भविष्य जाणून घ्यायला.

म्हणजे तुम्ही जगंनियंत्यावर सोपवले आणि मी या निर्हेतूक प्रणालीवर.

निर्हेतूक प्रणाली? काही हरकत नाही... हा विचार सारखाच पण वेगळा आहे.
निरिश्वरवादी व इश्वरवादी यांच्या मधल्या लोकांना जरा स्पेस देणारा आहे. ते काय म्हणतात ते नेहरूंचा तिसरा की काय तो गट, अलिप्तराष्ट्र वाले! ;)))

आपला
गुंडोपंत

देवाला कामधंदा नाही काय?

आपल्या आयुष्यात काय, केव्हा आणि कसे घडावे यासारख्या उचापत्या आपल्या आपण सांभाळाव्यात... उगाच जगन्नियंत्याच्या भरवश्यावर तंगड्या वर करणे बरे नव्हे.

एकलव्य कठपुतळा

 
^ वर