तर्काची इंगळी डसलीऽ गं बाई मला!

मित्रांनो आधी हाच लेख मी काहिसा घाईघाईत सादर केला होता. त्यामुळे सादरीकरणात बरेच दोश राहून गेले होते. त्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो.
चिंतन सद्यकाळाच्या समस्याबद्दल असावं, त्या समस्यांवर तोडगा म्हणून असावं. भाशेचा वापर आपणाकडून कोणत्या गोश्टीसाठी केला जातोय, ह्यावर त्या भाशेतून प्रकट होणार्‍या शक्तीच्या मर्यादा स्पश्ट होत जातात. मला ह्या चर्चेत सॉफ्टवेअर प्रॉग्रॅमर म्हणून काम करणार्‍या मंडळींचा सहभाग जास्त अपेक्शित आहे. इतरांनी देखील भाग जरूर घ्यावा.

भाशाशास्त्र, ध्वनीशास्त्र, तर्कशास्त्र व तंत्रविद्न्यान ह्या चार वेगवेगळ्या विशयांचा विकास एकमेकांवर अवलंबून आहे असे वाटते.

भाशाशास्त्रा विशयामध्ये, विचारविश्वातून ‘लिपी’ ही संकल्पना वास्तवात कशी आकाराला आली, हे आकळण्यासाठी मला ‘तार्कसूत्रिकतेचा आधार’ (इं.: लॉजिकल बेस) ही संकल्पना विकसित व्हावी असे वाटतेय. तार्कसूत्रिकतेचा आधार विकसित झाला तर मराठी भाशेतून वेगवेगळे शब्द, संकल्पना जन्माला घालणं व ते इतरांना समजावून सांगणं सोपं जाईल असे वाटते. यासाठी मला खाली मांडलेल्या विचारांमध्ये काही त्रूटी, दोश, चूका राहून गेल्या असतील तर त्या तुम्ही दाखवून द्याव्यात, अशी मी येथील वाचकांना विनंती करतो.

वरील अपेक्शित संकल्पनेला खालील विचार प्रेरक आहे.

‘एखादी संकल्पना जेंव्हा रेशांमधून व्यक्त करता येऊ लागली, तेव्हा त्या ठराविक भाशेची लिपी वास्तवात आली असावी.’

आत्ता ते कसे? तर खालीलप्रमाणे –

‘प्रेरणा’ - हि एक शक्ती आहे.
‘अवकाश’ - ही एक पोकळी आहे. मुळात ही पोकळी एक ‘शून्यमंडळ’ आहे.
‘द्न्य’ – हि एक व्यवस्था आहे जिथं ‘स्तरांचं विभाजन व विभागणी’ कशी करायची, हे ठरवलं जातं. स्तरांचं विभाजन व विभागणी कां करायची? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ‘संतुलन राखण्यासाठी’
प्रेरणारूपी शक्तीमुळे ‘क्रिया’ घडतात.
‘शून्यमंडळ’ हे प्रेरणेच्या ‘क्रियाशीलतेला’ आवर घालणारी व्यवस्था आहे.
ह्या ‘आवर घालण्याच्या’ व्यवस्थेतूनच ‘आवरण’ तयार होतं, विविध स्तरांवरील आवर घालण्याच्या प्रक्रियेतून ‘आवरणे’ तयार होत जातात.
‘आवरण’ तयार झाल्यानंतर ‘द्न्य’ नामक व्यवस्था कुंठीत शक्तीचं तीच्या क्रियाशील स्वभावाचं अस्तित्व टिकवण्यासाठी मर्यादित विस्ताराला चालना मिळावी म्हणून शून्यमंडळासोबत वाटाघाटी घडवून आणते. ह्या वाटाघाटीमध्ये कुंठीत शक्तीच्या विस्ताराला चालना दिली जाते. परंतु विस्तार जेंव्हा वाढत जाऊन आपली चरम मर्यादा गाठतो, तेव्हा शून्यमंडळाकडून निर्माण झालेल्या आवरणास तडा जातो.

ह्या टप्प्यावर शून्यमंडळ बिथरतं याउलट प्रेरणेच्या रूपातील कुंठीत शक्ती मुक्त झाल्यामुळे ती ‘महत्त्वाकांक्शेच्या’ रूपात रुपांतरीत होते.

शून्यमंडळामुळे उत्पन्न झालेल्या ‘आवरणाला तडा’ जाण्याचा संकेत ‘द्न्य’ नामक व्यवस्थेला मिळताच, तिचा पहिला प्रतिसाद असतो तो प्रेरणारूपी शक्तीला प्रचंड विरोधाचा करण्याचा. तडा जिथं गेलीय, ज्यामुळं गेलीय ती बाब हुडकून काढत प्रेरणेला नव्या नियमांच्या रुपात जेरीस आणत बंदिस्त करण्यासाठी नवी नियम-सूत्रं-शास्त्रं तयार होत जातात. तसे करण्याने विघटन करणारी ‘तोडवादी’ शक्ती कमी होवून, ‘तूझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी ‘जोडवादी’ अवस्था तयार होते. इथं ‘तडजोडी’ चं हे दुसरं मंडल तयार झालं की, विविध स्तर जन्म घालण्याची व्यवस्था जन्म घेते.

यापूढच्या कृतीशीलतेच्या प्रकट स्तरावर फक्त ‘क्रिया’ व ‘ती क्रिया का घडली?, अशीच का घडली?, तशीच का नाही? ह्या संबंधित प्रश्नमंजुशा’ ह्या दोनच बाबी उरतात. परंतु नाण्याची तिसरी बाजू देखील असते ती असते, ‘स्तर बदलत नेणं’.

जर, ‘स्तर बदलत नेणं’ ही सुद्धा एक क्रिया म्हटली तर हि क्रिया देखील पर्यायी क्रियांसाठी नवी ‘प्रश्नमंजुशा’ तयार करत जाते. नवनव्या स्तरावर क्रियेला वेगवेगळे नांव द्यावे लागते कारण प्रत्येक क्रियेचा गुणधर्म (इं.:प्रॉपर्टीज), वर्तन वेगवेगळे असते.

आता हे सारं टप्याटप्याने पाहू. (संगणकातील सॉफ्टवेअर प्रोग्रॅमसारखं. हो! पण मी प्रोग्रॅमर नाही.)

टप्पा 1 {जेव्हा ‘क्रिया’ एका नव्या ‘कारणास’ जन्म देते तेंव्हा तेच उत्पादित ‘कारण’ एका नव्या ‘क्रियेला’ जन्म देते.}
टप्पा 2 {ज्या क्षणी ‘कारण’ एका नव्या ‘क्रियेला’ जन्म देते, तिथं ‘क्रिया-प्रतिक्रियेचे’ एक मंडल पूर्ण होते. या एका मंडलाला, आपण ‘वृत्त’ म्हणुया.}
टप्पा 3.0 {जेंव्हा एक ‘वृत्त’ एक ‘क्रिया’ म्हणून जन्माला येते तिथं लगेचच ‘कारण’ उत्पन्न होते. हे ‘कारण’ असते – ‘पर्यायी क्रियांसाठी नवी ‘प्रश्नमंजुशा’’ इथुनपुढे हे ‘कारण’ प्रेरणादायी असते नव्या क्रियेला जन्म देण्यासाठी. म्हणजे ‘जास्तीत जास्त किती वृत्त जन्माला घालता येतील?’ ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. जिथं उत्तर शून्याच्या अगदी उलट असेल तिथं प्रचंड विरोध होतो. ‘विरोध होणं’ ही ‘क्रिया’ आहे, त्या प्रेरणादायी कारणासाठीची, - जी नुकतीच जन्माला आली होती. हा जन्म असतो ‘मृत्यु’ चा म्हणजे इथं, ‘तो फेरा पूर्ण होवू न देण्याचा’. वृत्ताच्या ह्या स्वभावाला ‘वृत्ती’ म्हणूया.}
टप्पा 3.1 {हि ‘मृत्युच्या जन्माची’ क्रिया पूर्ण होता-होता, ती क्रिया एका नव्या ‘कारणाला’ जन्म देते. त्या कारणाचा विशय असतो, ‘कोणत्या कारणामुळे विरोध झाला ते शोधणे’. उत्तर सापडताच त्या कारणाची दिशा अगदी उलट फिरवली जाते. म्हणजे ‘जास्तीत जास्त किती वृत्त जन्माला घालता येतील?’ ह्या प्रश्नाच्या अगदी उलट व तडजोडी पद्धतीचा प्रश्न जन्माला येतो, “कमीत कमी किती वृत्ते वेगळ्या पद्धतीने पूर्ण करता येतील?
// म्हणजे 3.0 या टप्प्यावर संबंधित ‘वृत्त’ –‘तो फेरा पूर्ण होवू न देण्याचे’ एक ‘कार्य’ म्हणून जन्माला येते तेंव्हा वरील ‘कारण’ एका नवीन क्रियेला जन्म देते.}
टप्पा 3.2 { हि नव्याने उत्पन्न झालेली क्रिया असते, ‘विरोधात्मक वृत्तीच्या ‘कार्य-उत्पत्ति’ करणार्‍या कारणांचा शोध घेत, त्या शोधांवर आधारीत सकारात्मकतेचा पाठपुरावा करीत ‘ते कार्य कशा पद्धतीने घडवता येऊ शकेल? हे ठरवणारी प्रणाली’ विकसीत करण्याबाबतची.’ वृत्ताच्या ह्या क्रियेला ‘तडजोडी प्रक्रिया’ म्हणूया. म्हणजे या टप्प्यात ‘फेरा कशाप्रकारे पूर्ण करता येईल? हे ठरवण्याची क्रिया घडते. // याच कारणास्तव वृत्तीतच दडलेल्या प्रमादी प्रवृत्तींचा दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय असतो तो - ‘वाढीच्या प्रक्रीयेतील आपल्या ‘मूळ’ वृत्तीत किंचित बदल घडवून पुन्हा नव्याने आपली प्रक्रीया चालू ठेवणं. म्हणजेच ‘वाढ’ चालू ठेवणं.’ या उपायातून जी महावाढ होत जाते तिला ‘वृद्धी’ म्हणूया. }

टप्पा 4.0 {फेरा पूर्ण न होवू देणं कसं काय शक्य आहे? हा प्रश्न इथं उपस्थित होतो. त्यासाठी ‘फेरा पूर्ण होण्याआधीच एक आभासी ‘आर’ अस्तित्वात येते व ती ‘आर’ फेरा पूर्ण होवू न देण्याचं काम पूर्ण केलं की लगेचच नाश पावते.}
///आर म्हणजे ‘एखाद्या संकल्पनेची दुमड’

आर –

Comments

रंजक....

सध्या फक्त वरवर चाळलाय; रंजक वाटला लेख.

--मनोबा

वेळ मिळाल्यास जरूर वाचा.

लेख वरवर न्याहाळल्याबद्दल आभारी आहे. वेळ मिळाल्यास जरूर वाचा.

तर्काची इंगळी डसलीऽ गं बाई मला!

गावरान
"श" व "ष' या अक्षरात् घोटाळा झालेला दिसतोय. बाकी लेख मनोरंजन आहे.

हो! लेख (व त्यावरील प्रतिसाद) मनोरंजक आहे.

'लेख मनोरंजक आहे. अथवा मनोरंजन करील असा आहे' असे तुम्हाला असे म्हणायचे आहे का? मांडलेल्या तर्कसुत्रात काहि त्रूटी, चूका आहेत कां? ह्यावर खरतरं मनोरंजनाचा अलोट आनंद घेता आला असता. तुम्ही तो घेतला कां?

पण मी हे काय करतोय, असे का बोलतोय? अरंरं....तर्काची इंगळी डसलीऽ गं बाई मला!

रंजक

रंजक.

लिपिशास्त्राला साखळीत दिलेले स्थान (माझ्याकरिता) आश्चर्यकारक आहे.

साधारणपणे ज्याला वर्ण म्हणतात (फोनीम) ते ध्वनिशास्त्राच्या आणि व्याकरणशास्त्राच्या जोडक्षेत्रात येते.

लिपीमधून वर्ण/अक्षरे किंवा शब्दरूपे (मॉर्फिमे) किंवा अर्थरूपे (सेमिमे) अंकित करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या भाषांत आहेत. ज्या समाजांत मॉर्फिमे आणि सेमिमे चिन्हित करण्यास प्राधान्य आहे (चिनी भाषा) तिथे ध्वनिशास्त्राचा संबंध दुय्यम किंवा नगण्य असतो.

इंग्रजीत ध्वनिशास्त्राचा लिपीशी बराच संबंध आहे. परंतु अर्थ-संबंध नगण्य नाही. (red/read/read रेड/रेड/रीड लाल/वाचले/वाचतो ; need/kneed/knead नीड/नीड/नीड गरज/गुडघ्याने ढुशी दिली/कणीक मळली ; night/knight नाइट/नाइट रात्र/शिलेदार ; वगैरे... अर्थसंबंधावरून लिपीतील चिन्हे निवडतात.) मराठीतही अशी उदाहरणे शोधून सापडतील, पण इंग्रजीपेक्षा फार कमी.

स्वागत!

लेख वाचल्याबद्दल आभारी आहे.

साधारणपणे ज्याला वर्ण म्हणतात (फोनीम) ते ध्वनिशास्त्राच्या आणि व्याकरणशास्त्राच्या जोडक्षेत्रात येते.


हे कसे काय बुवा? वर्ण म्हणजे काय?
माझी मतं पुढीलप्रमाणे: कृपया तुमची मतं ह्याहून वेगळी असतील तर जरूर सांगावित :-
वर्ण म्हणजे भाशेतील ‘भुईमुगाच्या शेंगा’. भुईशेंगेच्या आत जसा दाणा असतो, तसा वर्णाच्या आत विचारांचा, भावनांचा अर्थ दडलेला असतो. जशी शेंग फोडून दाणा खायचा असतो, त्याची टरफले चाटायची नसतात, अगदी तसंच वर्णाच्या आतील अर्थ समजून घ्यायचा असतो, आकळायचा असतो.

वर्ण दोन तत्त्वांमध्ये विभाजित असतं.
एक तत्त्व असतं, ‘दृश्य भाग’ – जे त्या विशिश्ट वर्णाची ओळख आपणहून दाखवतं.
दुसरे तत्त्व असतं, ‘अदृश्य भाग’ – जे त्या वर्णाची ओळख ओळखून घेण्यासाठीच असतं.

लिपीतील ‘दृश्य तत्त्व’ हे एखाद्या लिपीचा ‘आकृतिबंध’ (इंग्रजी: विजेबल अँड डिफायनेबल एलिमेंट इन ग्राफिक्स) असतो. एखाद्या अदृश्य संकल्पनेचं पाहता येण्याजोगं रूप ह्या दृश्यतत्त्वाचा गुणविशेश असतो. या गुणावरूनच लिपीच्या ह्या अंगाला ‘आकृती’ म्हणता येईल. या भागात आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या आकृती येतात. त्यांना ‘वर्णाकृती’ म्हणू.

लिपीतील ‘अदृश्य तत्त्व’ हे त्या लिपीतील चिन्हांचे एकमेकांसोबतच्या मांडणीबाबतचे नियम असतात. त्या नियमांना प्रवृती किंवा मूलवर्तन (इंग्रजी: बेसिक इंस्टींक्ट) असे म्हणू.

ध्वनिशास्त्र व व्याकरण यांच्यामध्ये कोणताच दुवा असू शकत नाही असं तुम्ही कसं बरं म्हणू शकता?, कृपया तुमचा मुद्दा स्पश्ट करा.

लिपीशास्त्र देखील एकटे स्वबळावर ध्वनिशास्त्र व व्याकरण यांना जोडू शकत नाही. त्या दोघांना जोडण्यासाठी तर्कशास्त्राची जोड नकोच? हा असा तर्क तुम्ही मांडत आहात कां?

अखेरचे तुम्ही मांडलेले मुद्दे वरील मुद्द्यांवर आपले एकमत झाल्यानंतर आपोआप बेदखल होतील असे वाटते.

गैरसमज

ध्वनिशास्त्र व व्याकरण यांच्यामध्ये कोणताच दुवा असू शकत नाही असं तुम्ही कसं बरं म्हणू शकता?

असे मी म्हटलेलेले नाही. अगदी उलट म्हटलेले आहे. "वर्ण" संकल्पना ही ध्वनिशास्त्र आणि व्याकरण यांच्यातला दुवा आहे. (असे स्पष्ट म्हटलेले आहे "साधारणपणे ज्याला वर्ण म्हणतात (फोनीम) ते ध्वनिशास्त्राच्या आणि व्याकरणशास्त्राच्या जोडक्षेत्रात येते."; जोडक्षेत्र म्हणजे दुवा)

"वर्ण"संकल्पना येथे "फोनीम" या अर्थाने वापरली आहे. प्राचीन भारतीय व्याकरण-अभ्यासकांत जवळजवळ हाच अर्थ आहे. "फोनीम" संकल्पनेबाबत अधिक माहिती या विकीदुव्यावरती मिळेल.
त्यातील पहिले व्याख्या-वाक्य असे :

The phoneme is defined by the International Phonetic Association as "the smallest segmental unit of sound employed to form meaningful contrasts between utterances".
वेगवेगळ्या अभिव्यक्त-उच्चारणात अर्थभिन्नता निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे किमान अवयव-एकक म्हणजे "फोनीम" होय.

प्राचीन भारतीय व्याकरणकारांनी व्याख्या-वाक्य दिलेले नाही, पण त्यांची हीच व्याख्या असावी, असे दिसते. "संस्कृतात ऌ यास वर्ण मानावे की नाही" आणि "संस्कृतात ह्रस्व ऍ यास वर्ण मानावे की नाही" या चर्चांमध्ये साधारण याच व्याख्येला धरून निर्णय केलेला आहे. (अवांतर : याच व्याख्येला धरून "मराठीत ह्रस्व-दीर्घ इ-उ असे वेगळे वर्ण नाहीत", आणि "श-ष हे वेगळे वर्ण नाहीत" या तुमच्या मताशी मी आंशिक सहमत आहे. माझ्या मते हे वेगळे वर्ण म्हणून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, पण अर्थभिन्नता करण्यात अजून कमजोर तग धरून आहेत.)

लिपीशास्त्र देखील एकटे स्वबळावर ध्वनिशास्त्र व व्याकरण यांना जोडू शकत नाही.

माझ्या मते ध्वनिशास्त्र आणि व्याकरणाला जोडायला लिपिशास्त्राची गरज नाही. "वर्ण" संकल्पनेचा दुवा पुरेसा आहे. (वैज्ञानिकांना सर्वत्र आवश्यक* असलेल्या तर्कशास्त्रासह, हे वेगळे सांगणे लागू नये, तरी सांगतो. कारण असे -)

त्या दोघांना जोडण्यासाठी तर्कशास्त्राची जोड नकोच?

कुठल्याही विज्ञानात कसलीही जोड करण्यासाठी तर्कशास्त्र हवेच. म्हणजे वनस्पतिशास्त्रात पेशींचे वर्णन करणारे पेशीशास्त्र आणि अवयवांची रचना करणारे रचनाशास्त्र यांची जोडणी करायला सुद्धा तर्कशास्त्र लागते. जी गोष्ट सगळीकडे लागते, तिचा इथे विशेष उल्लेख करण्याची गरज काय? नाहीतर प्रत्येक पाककृतीमध्ये "ही पाककृती ऑक्सिजन असलेल्या हवेत शिजवायची आहे" असे सांगावे लागेल.

आता वाक्यरचनाशास्त्र (सिन्टॅक्स) या प्रकारात तर्कशास्त्राचा आणखी थोडा थेट संबंध येतो. सामान्यपणे विज्ञानात आवश्यकता असते, त्यापेक्षा थेट संबंध. पण तो वेगळा विषय आहे.

गैरसमज दूर व्ह्यायला हवेतच!

तुमच्या वरील प्रतिसादामध्ये ‘वर्ण’ म्हणजे ‘फोनिम’ अशी व्याख्या घेतलेली आहे. मतांमधील भेद ह्यावरतीच बेतलेला आहे. पण तुम्ही पाश्चात्य विचारसरणी व प्राचिन भारतीय विचारसरणी एकच गोश्ट सांगते, हे जे म्हणताहात ते पटण्याजोगे नाही, मान्य करण्याजोगे नाही. तसेच पाश्चात्यांनी जे शोधलयं, ज्यावर विचार केला आहे ते अगदी अंतिम आहे आत्ता त्यावर पुनर्विचार करणे शक्यच नाही, अशी श्रद्धा दिसून येते. परंतु, जग बदलत असतं, सिद्धांत बदलत आलेले आहेत. कोणतेच विचार ‘अंतिम’ नसतात, हे काळाने सिद्ध केलेलं आहे.

‘ध्वनीचा उच्चार’ म्हणजे ‘वर्ण’ होत नाही. ‘अक्शर’ हि संकल्पना ‘उच्चार’ व ‘लिखितरूप’ ह्या दोन अर्थाने वापरली जात आली आहे. परंतु ‘वर्ण’ हा ‘उच्चारता येण्याजोग्या ध्वनीचा’ देह असतो. अशीच मान्यता प्राचिनकाळी भारतात होती हे आत्तापर्यंतच्या माझ्या वाचनातून मी जाणले आहे.

फोनिम म्हणजे ‘अक्शर’ – ‘एक उच्चारता येण्याजोगा ध्वनी’. असा ध्वनी जो स्पश्टपणे, खणखणीतपणे, त्या ध्वनीच्या वेगळेपण जाणवण्याइतपत उच्चारता, ऐकता येतो असा.’ अशी व्याख्या फोनिमची करता येऊ शकेल. आंतरराश्ट्रीय स्तरावरील व्याख्या उच्चाराबाबत आहे, लिखीतरुपाबाबत नाही.

ह्या चर्चेचा प्रस्तावात मी म्हटले होते
- भाशाशास्त्र विशयामध्ये, विचारविश्वातून ‘लिपी’ ही संकल्पना वास्तवात कशी आकाराला आली, हे आकळण्यासाठी मला ‘तार्कसूत्रिकतेचा आधार’ (इं.: लॉजिकल बेस) ही संकल्पना विकसित व्हावी असे वाटतेय.

आधी दिलेल्या प्रतिसादात मी लिपीच्या दृश्य व अदृश्य भागाबद्दल माहिती दिली होती. मी आता त्या दोन भागातील संकल्पनांची माहिती देतो. ती समजून घेतल्यावर आपल्यातील मतभेद ‘वर्ण’ संकल्पनेबाबत मिटतील असे वाटते.

लिपी संकल्पनेच्या परीघात आधी अक्शर संकल्पनेचा उगम होतो, त्यानंतर वर्ण संकल्पना अस्तित्त्वात येण्याची गरज निर्माण होते. कारण आधी आपल्याला स्वत:ला उमजते, समजते. मग जे आपल्याला आपल्याआत जे ‘समजले, उमजले ते’ दुसर्‍यांना सांगण्यासाठी चिन्हांची गरज भासते. चिन्हांच्या दृश्यरूपालाच ‘वर्ण’ म्हटले जाते. त्या ‘वर्णचिन्हांवर’ बोट ठेवत मग दोन किंवा दोनापेक्शा जास्त व्यक्तींमध्ये चर्चा-संवाद चालू होतो. (मी नॉरमल संभाशणाबाबत बोलत नाही आहे.)

अक्शर हि संकल्पना तीच्या प्रत्यक्श रूपातूनच ती कशी अस्तित्वात आली हे सांगते.
क्शर व स्वर ह्यांच्या एकत्र येण्यातून अक्शराचा उच्चार होतो.

क्शर म्हणजे काय?
- क्शर व क्शरचिन्हं व ध्वनी व भाशेचा अभ्यास करताना ज्या उच्चारीत अर्थपूर्ण ध्वनींचे लहानात लहान भाग विलग करता येत नाहीत अशा ध्वनीकणांना क्शर म्हणता येतं. ह्या ध्वनींचा उच्चार करण्यासाठी मात्र नादमय ध्वनींचा उच्चार होणं आवश्यक असतं. अन्यथा क्शरांचा उच्चार करता येत नाही. उदा.-
'ग्' ह्या वर्णाचा उच्चार ‘अ+ग’ असा एकत्रित करावा लागेल.
तसेच ‘ग’ ह्या वर्णाचा उच्चार करायचा झाला तर ‘ग्+अ’ असा एकत्रित करावा लागतो.

स्वर म्हणजे काय?
- ध्वनी व भाशेचा अभ्यास करताना मुखावाटे ध्वनीस्फूटानंतर कोणता वैशिश्टपूर्ण ध्वनी उच्चारला गेला आहे, हे लिखितरूपात सांगता येण्यासाठी, समजवून घेता येण्यासाठी मानवी संभाशणात नित्याने क्शरांच्यासोबतीने येत असलेल्या विविध नादमय ध्वनींना स्वर म्हणता येऊ शकतं.

क्शरांना व स्वरांना चिन्हं कशी मिळाली, ह्याचा अभ्यास करण्यासाठीच चर्चाप्रस्ताव ठेवला आहे.

चर्चेचा उद्देश आहे – लिपीतील तार्कसूत्रिकतेचा आधार (इं.: लॉजिकल बेस) विकसित झाला तर मराठी भाशेतून वेगवेगळे शब्द, संकल्पना जन्माला घालणं व ते इतरांना समजावून सांगणं सोपं जाईल असे वाटते. हा विचार आधी कोणीही केलेला नाही.

असहमत

मित्रांनो आधी हाच लेख मी काहिसा घाईघाईत सादर केला होता. त्यामुळे सादरीकरणात बरेच दोश राहून गेले होते. त्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो.
यात आता सादर केलेला लेख हा 'निर्दोश' ('फिर्दोश', 'मदहोश' प्रमाणे) आहे असे गृहितक आहे. ते मान्य नसल्याने असहमत.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

'आंखे खोलके देख कालियाऽऽ' असं शोलेतील ठाकूर दरडावतो.

म्या काय म्हटलं होतं?

मित्रांनो आधी हाच लेख मी काहिसा घाईघाईत सादर केला होता. त्यामुळे सादरीकरणात बरेच दोश राहून गेले होते. त्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो.

'सादर लेख' आणि 'सादरीकरणात' ह्या दोन भिन्न-भिन्न गोश्टी नाही आहेत कां?
'सदर लेखात दोश होते ते मी दूर केले' असं मी कुठं टंकलय?

मी जे लिवलय ते हे आहे-
खाली मांडलेल्या विचारांमध्ये काही त्रूटी, दोश, चूका राहून गेल्या असतील तर त्या तुम्ही दाखवून द्याव्यात, अशी मी येथील वाचकांना विनंती करतो.

तोडी घाई झाली तुमच्याकडून हो नां? पण कां असं का व्हावं?...तर्काची इंगळी डसलीऽ संजोप रावांना!

वर्ण म्हणजे भाशेतील भुईमुगाच्या शेंगा..

हा आणि तत्सम युक्तिवाद, चर्चा, लेख आणि प्रतिसाद वाचून मेंदूला मुंग्या आल्या. आपल्याला थोडीफार मराठी भाषा कळते असा जो काही अहंकार मनात होता तो पिकल्या पानाप्रमाणे गळून पडला.
आम्हां अज्ञ पामरांसाठी कुणी याचे सुलभ मराठी भाषांतर करेल काय?

वेगळ्या शब्दांत....

हीच गोष्ट वेगळ्या शब्दांत सांगायची तर
वर्ण म्हणजे नुसत्या शेंगा नसून भाशारूपी सुती,मऊसूत धोतराच्या दुकानातील लेंगा आहेत
समजलें?

--मनोबा

सपश्ट शब्दांत..

हो! पण खबरदार!

लेंगा घालण्यापूर्वी योग्य जागेवरची शिलाई व्यवस्थित आहे कां, ते जरूर पाहा.

शेंग न खाता, टरफलं खाल्ली की काय?

श्री. द्न्यानेश पामर, नमस्कार!
गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा!

काय झालं? कुठं अडलंय? काही कळेल का आम्हाला? तुमच्या मेंदूला मुंग्या आल्या असतील तर तुम्हाला 'मुंग्या घालवायची पावडर' हवी आहे कां?

आमच्या माहितीप्रमाणे पैसे देवून सुविधेचा लाभ घेण्यास सोपं असं 'सुलभ शौचालय' असतं. भाशेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 'सुबोध' हा शब्द वापरला जातो. तुम्हाला नेमकं काय हवंय?

अगं गं गं! तर्काची इंगळी डसली रे डसली!!!

 
^ वर