नवे उपक्रम
नमस्कार,
चर्चेचा विषय वाचून गैरसमज करुन घेऊ नका. मी उपक्रमाच्या नव्या रुपा बद्दल माहिती वगैरे काही देणार नाहीये अथवा ते कसे असावे/नसावे हि चर्चा करणार नाहीये. उपक्रमाचे नवे रुप हे निमित्त मात्र आहे.
दर्जेदार चर्चा/लेख आणि छायाचित्र हे उपक्रमाचे वैशिष्ठय ठरले आहे आणि उपक्रमाने ते पेलले सुद्धा आहे. पण उपक्राच्या नव्या रुपासोबत एक नवी ओळख सुद्धा तयार व्हावी हा एक विचार मनामध्ये घोळत होता (उपक्रम व्यवस्थापनाशी याचा काही एक संबंध नाही. हे आपले माझे विचार आहेत.) म्हणूनच हि चर्चा सुरु करत आहे.
मराठीमधून लेख/कविता/चर्चा, मराठीपणाचे प्रकटीकरण किंवा वर्तमानपत्रे एवढाच मराठीचा आवका महाजालावर जाणवतो. फक्त मराठी भाषेत व्यक्त होणे या पलिकडे जाऊन मराठी लोकांनी आणि संकेतस्थळांनी आपली नवी ओळख तयार केल्यास चांगलेच होईल असे वाटते. मग ते कसे करता येईल बरे? मराठीसंकेतस्थळावर तिच ती माणसे दिसतात आणि तेच ते वाद घालतात हे आपण सर्वजण मान्य करतो. मग काहीतरी वेगळे करुयात का?
मला वाटतं की आपण नवे उपक्रम करु. नवे प्रकल्प राबवू. सदस्यांची विविधता आणि संख्या पाहता हे करायला जास्त मजा येईल. नवे लोकं जोडले जातील आणि मुख्य म्हणजे मराठी माणसे हा एकमेव धागा पकडून बरेच नवे काही तयार होईल? तुम्हाला काय वाटते? गरज हि शोधाची जननी आहे. मग आपण आपल्या/इतरांच्या गरजा येथे मांडू त्यावर चर्चा करू. कोणी पुढे होऊन काम करणारे असेल तर त्याला पाठिंबा देऊ. मग उत्पादन भले काही ही असो, मराठी भाषेसाठीच पाहिजे असा हट्ट नाही. शक्यतो मराठी माणसं इतकच पुरे आहे. तुम्हाला काय वाटत?
- असे उपक्रम प्रकल्प राबवता येतील?
- राबवल्यास उपक्रम व्यवस्थापनाला एखादा लेखन प्रकार येथे टाकता येईल का जेणे करुन प्रकल्प/उपक्रम चर्चा/व्यवस्थापन करणे शक्य होईल आणि सामान्य वापरकर्त्या पर्यंत माहिती सुद्धा पोहोचेल?
- असे उपक्रम राबवले गेल्यास तुम्हाला भाग घ्यायला आवडेल का? आवड असल्यास तुम्ही कशा प्रकारे मदत करु शकता?
- असे करण्यामध्ये तुम्हाला काही अडचणी जाणवतात का? असल्यास कोणत्या?
असे काही झालेच पाहिजे असा काही हट्ट नाही. नव्या रुपा सोबत एक विचार आला, तो येथे मांडावा असे वाटल्याने येथे टाकत आहे.
Comments
प्रचंड
प्रचंड सहमत. मी कित्येकदा स्वतःच्या अतिवावराला आणि अगदि दिग्गज , अभ्यस्त वगैरेंच्या त्याच त्या प्रतिसादांना कंटाळलेला असतो.
मला स्वतःला स्वतःचा कंटाळा येतो; इतरांना तो किती येत असावा ह्याची कल्पना करवत नाही.
त्यामुळे "काहीतरी नवीन" झालेलं कधीही इष्ट.
एकमेकांच्या शहाराजवळ रहात असाल तर नुसती पुस्तके शेअर करणे हासुद्ध एक छान उपक्रम होउ शकतो.
माझ्या डोक्यात अजून काही प्रोजेक्ट्स होते. ते सविस्तर मांडेन.
उदा:- इथले लेख उत्तम आहेत. खरं तर ऑडिओ विडिओ रुपात त्याचं सादरीकरण व्हायला हवं. अगदि इथल्या प्रतिसादांसकट.
हे कसं व्हावं? गप्पांच्या रुपात करावं.
आकाशवाणीत कसे वाचनकार्यक्रम असतात, नभोवाणी असते; अगदि तस्सच. श्रवनमात्र कार्यक्रम; गप्पांच्या रुपात.
आम्ही गल्लीतल्या गल्लीत केले होते; माहितीपर गोष्टीही रंजक थरल्या होत्या.
कुनीतरी पुढाकार घ्यायला हवा बस्स.
उदाहरणच घायचं झालं तर सध्या चंद्रशेखर ह्यांची सुरेख मालिका सुरु आहे. ते त्या मालिकेचे निवेदक बनूनही हा कार्यक्रम रेकॉर्ड करु शकतात ना. उपक्रमावर असा कच्चा माल प्रचंड आहेत. खूप सारे लेख आहेत. विशेषतः नानावटी वगैरेंचे.
घाटापांडेंची ज्योतिषावर बोलु काही ही मालिकाही उत्तम.(प्रश्नोत्तर रुपातील).
काही गोष्टींचं कितीही वर्णन केलं तरी प्रत्यक्ष अनुबह्वापेक्षा ते फारच कमी ठरतं. उदा:- अॅपोकॅलिप्तो अत्यंत थरारक चित्रपट आहे असं कुनी म्हटलं तर ते खरं तर अत्यंत मिळमिळित वर्ण ठरेल. अॅपोकॅलिप्तो काय आहे; ते एकदा प्रत्यक्ष पाहिलं तरच त्याचा प्रभाव, त्यातला थरार जाणवतो. त्याचप्रमाणे ही कल्पना दिसायला अत्यंत सामान्य वआटली तरी ह्यात बरेच पोटेंशिअल आहे असे मला वाटते. साधे उपक्रमाचे घ्या. अगदि सर्वसाधारण, काळा-पांढरा मजकूर असणारी , माहितीपूर्ण साइट. पण इथे काही काळ घलवल्यावर त्या निळ्या-पांढर्या स्क्रीनची मजा जाणवू लागते.
पण कसे?
एखादे उदाहरण देता येईल का?
आंतरजालावर तोचतोचपणा वाढला आहे याच्याशी सहमत. लेख असले तर नवीन असतात बाकी त्याच त्या चर्चा. त्यापेक्षा वेगळे उपक्रम कसे राबवता येतील याच्या कल्पनाही मांडाव्या.
मनोबाची ऐडिया मस्त आहे. :-)
या कल्पना
या कल्पना सदस्यांनी येथे मांडाव्यात. त्यासाठी एक लेखन प्रकार करावा. उदाहरणच द्यायचे झाले तर आता ऑनलाईन दिवाळी अंक नवे राहिले नाही. पण त्यासाठी एखादे ड्रुपलचे मोड्युल विकसित केले तर? किंबा असे तंत्रज्ञान विकसित करायचे प्रकल्प/कल्पना ज्यामुळे तंत्रज्ञानाचा फायदा गावांपर्यंत पोहोचेल. सध्या मोबाईल अॅप्सची चलती आहे. असे एखादे अॅप शेतकर्यांसाठी विकसीत केले कि त्यांना विदा एकत्र ठेवुन अभ्यास करता येईल जसे की, जर जोडीला दुग्धव्यवसाय असेल तर आज किती दुध डेअरीला दिले, स्निग्धांश किती होता आणि दर काय होता? गायी/म्हशींना चारा किती दिला इत्यादी. असे बरेच काही करता येईल. कल्पना बाहेर येतील तसे त्यावर काम करणारे सुद्धा पुढे येतील.
कल्पना
चाणक्य, कल्पना चांगल्या आहेत पण दुर्दैवाने, मराठी आंतरजालाचा असा अनुभव आहे की इथे गांभीर्याने फुकट आणि विनाप्रसिद्धी काम करणारे लोक फारसे नसतात.
त्यापेक्षा, सध्या लहानसा प्रयोग करून बघायला हवा.
मनोबाच्या मनात ऑडिओ-विडिओची कल्पना फार दिवस रेंगाळते आहे हे माहित होतं. त्या प्रकल्पाला तरी सुरूवात करून पाहायला हवी.
सहमत
सहमत आहे. पण कुठेतरी सुरुवात करायला हवी. अनुभव बदलेल कदाचित.
बरेच करण्यासारखे आहे
चर्चा, प्रतिसाद वगैरे सगळीकडेच होत असतात.उपक्रमाने त्या पलिकडे जायला हवे, त्यापल्याड जाऊन विचार करायला हवा. एकंदरच मराठी आंतरजाल हे अतिशय कंटाळवाणे झाले आहे. फ्रेश ब्लड कुठे दिसत नाही. (आता हा पुन्हा आणखी एका वेगळ्या घिश्यापिट्या चर्चेचा विषय.) असो.
तर प्रकल्पांचे, उपक्रमांचे म्हणाल तर इतिहास, भाषा आणि तंत्रज्ञान ह्या तीन क्षेत्रांत काही उपक्रम राबवायला हवेत असे मला आवर्जून वाटते. मन ह्यांनी सुचविलेली ऑ़़डियोविडियोची कल्पनाही चांगली आहे. तसेच उपक्रमावरील गेल्या ५ वर्षांतल्या निवडक लेखन आणि प्रतिसाद एखाद्या ईबुकात एकत्र करायला हवे. बरेच काही करण्यासारखे आहे. पण तूर्तास धागा फार आवडला एवढेच म्हणतो.
धन्यवाद
सहमत आहे. मनोबांची कल्पना उत्तमच आहे. ते सत्यात आणायचे झाल्यास नक्की काय काय करायला हवे याचा अभ्यास करायला हवा.
नभोवाणी वाहिनी
बदल उत्तम, पण ऑडिओ लेख/चर्चेपेक्षा, उपक्रमचे स्वतःची अशी नभोवाणी वाहिनी असल्यास उपक्रमसम वैचारीक व्यासपिठ अधिक लोकांपर्यत प्रभावीपणे पोहचू शकेलसे वाटते, जसे अमेरिकेत नॅशनल पब्लिक रेडीओ असतो त्यासम काही चालू करता येणे शक्य आहे काय हे बघितले पाहिजे.
उपक्रम नेट रेडीओ
चांगली कल्पना आहे. नॉकियाच्या ऑनलाईन रेडीओमध्ये कसले कसले चॅनेल्स आहेत. उपक्रमावरचे निवडकल लेख/लेखमाला जर असे प्रसारित कराता आके श्राव्य माध्यमात तर फारच सुरेख.
ऑडिओ विडिओ....
ऑडिओ विडिओ बद्दलच्या कल्पनेत इतरांनाही रस वाटतो आहे, हे पाहून बरे वाटले. त्याबद्दल डोक्यात बरेच प्रश्न , शंका, कल्पना माझ्या डोक्यात आहेत त्या स्वैर लिहितो.
मला फॉक्स् हिस्टरी, डिस्कवरी ह्यांच्या डॉक्युमेंटरी (लहान, एका एपिसोड मध्ये संपणार्या व मोठ्या, कित्येक एपिसोडस् चालणार्या ) पहायला प्रचंड आवडतात. पण दरवेळी त्या इंग्लिश मधूनच पहाव्या लागतात. काही तुरळक हिंदीतही आहेत (चीन् वगैरे विषयांवरच्या). ह्यामुळे बरेच वैतागायला होते. ज्याला सारांशाने पण त्यातल्या त्यात ऑथेंटिक माहिती किंवा थोडीशीच माहिती हवी आहे त्याने दरवेळी तर मोठ्ठा ग्रंथच घेउन शोधत बसले पाहिजे का ? ह्या गोष्टीत रस असणार्या सामान्यास प्रत्येकास प्रदीर्घ वाचन झेपेल, पचेल रुचेल असे नाही. दृक श्राव्य हाही एक ऑप्शन उपलब्ध असावा.
डिस्कवरी , फॉक्स डॉक्युमेंट्र्या (माहितीपट) माझ्या मायभाषेत याव्यात . असे मला आधी वाटले.
ह्यासाठी काय करता येइल? काही नाही, फक्त डिस्कवरी च्यानेल वाल्यांशी डबिंग करुन द्या म्हणून पाठपुरावा करायचा.
(खरे तर मी स्वतःच शब्दशः भाषांतर करत बसण्यास तयार आहे. पण त्यात प्रताधिकार वगैरेंच्या अनंत अडचणी उद्भवू शकतात.)
शिवाय मराठीत ज्ञान आणतो आहे म्हटल्यावर मनसे किंवा इतर मराठीप्रेमी मंडळीही यथाशक्ती माध्यमातून मदत करतील ही अपेक्षा.
हे झाले निव्वळ "भाषांतर करुन द्या हो" असे म्हणायचे काम.
माह्तिईपूर्ण मराठी ऑडिओ विडिओ ह्याबद्दल ही आयडिया क्षणभर माझ्या डोक्यात चमकून गेली.
दुसरी आयडिया मला त्याहून अधिक मौलिक, उपयुक्त आणि डूएबल वाटते.
.
.
ती आयडिया म्हणजे इथे जे उत्तमोत्तम लेख , चर्चा आहेत, ते सरळ सरळ उचलून ध्वनिमुद्रित करणे. काहिंना ऐकताना कंटाळवाणे वाटू शकेल. पण ज्यांना खरेच रस आहे त्यांचयसाठी हे संग्राह्य असेल असा माझा अंदाज.
पंधराएक वर्षापूर्वी होते तितके आता तंत्रज्ञान दैव दुरलभ राहिलेले नाही. वरती कुणीतरी म्हटल्याप्रमाणे "नोकियाने स्वतःचे चॅनेल सुरु करा" अशी काहीतरी स्कीम्/ऑफरही आणलेली आहे.
हे सर्व किती पुढे जाइल, कितपत झेपेल, कोण करेल हे सर्व आताच ठरवणे नि विचार करणे अवघड आहे. सध्या सुरुवात केलेली उत्तम.
कल्पनेत खरोखरच दम असेल तर ती नक्कीच तग धरेल. काही गोष्टी उत्स्फुर्ततेतूनच आलेल्या बर्या. कित्येक चळवळी अशाच जन्माला अलेल्या आहेत. त्यातल्या कित्येक यशस्वीही झाल्यात. एक करेल, त्याचं पाहून (थोड्याशा इर्ष्येने) दुसरा करेल, त्याच्या पुढे जाण्यासाठी पुन्हा पहिला प्रयत्न करेल; एक आरोग्यपूर्ण अशी चढाओढ होउन जाउ द्यात.
ह्यासाठी उत्तम उमेदवार लेख कुठले? आख्ख्या मराठी आंतरजालावरचे दर्जेदार, आणि ह्या कामासाठी उपयुक्त असे लेख काढायचे म्हटले तरी त्यात एकट्या उपक्रमाचे इतर सर्व स्थळांच्या एकूण लेखांपेक्षा अधिक भरतील इतके लेख आहेत.
चंद्रशेखरांचा दक्षिण भारतातील सफरीबदलचा (बदामी, ऐहोळे वगैरे बद्दलचा) लेख असू देत किंवा त्यांचा अतिपूर्वेतील मंदिर्/शिल्पकला ह्याबद्दलचा लेख असू देत, मला कायम ते "हेरिटेज वॉक" धर्तीच्या एखाद्या सिरिअल दरम्यान(उदा:- सुरभी ह्या गाजलेल्या जुन्या दूरदर्शनच्या सिरिअलचा काही भाग) ती ती ठिकाणे दाखवून आणत आहेत असे जाणवते.
तर त्यांचा कुठलाही लेख घ्यावा, सरळ त्यांनी कथनास सुरुवात करावी.(खरे तर त्यांनी तिथे गेल्यावर त्याचे चलत चित्रण करावयास हवे होते.. त्या चलत चित्रनाच्या पार्शभूमीवर त्यांचे कथन उठून दिसले असते.)
.
दुसरा कँडिडेट म्हणजे "ज्योतिषावर बोलू काही" ही घाटापांडे काकांची मालिका. ती आधीपासूनच त्यांनी FAQ फॉर्मॅट मध्ये ठेवलेली आहे. एक पृच्छा करणारा माझ्यासरखा सामान्य जातक आणि दुसरा उत्तर देणारा /माहितगार अशा धर्तीवर ते लेखन आधीपासूनच आहे. फारच थोड्या संस्करणाची गरज तिथे लागेल. दोन वाचक, चांगले निवेदन. बस्स. इतके पुरेसे आहे.
.
ह्यासाठी काय करता येइल? व्यावसायिक निवेदक किंवा सरावलेले हौशी निवेदक किंवा कोणेकेकाळी त्यात प्रभुत्व असनारे आणि आता इतरत्र रोजी रोटी कमावणारे ह्यांना hire करावे का? तिथे मोठ्या खर्चाचा प्रश्न येइल. एक पर्याय.........
ह्यासाठी मी स्वतः दिवसाचे काही तास देण्यास तयार आहे. होता होइल तितकी मराठी रुपांतरे झालेली उत्तम.
माझे निवेदन काही मराठीतील् सुधीर् गाडगीळ किंवा हिंदी-इंग्लिश मधील् आंतरराष्ट्रिय दर्जाचे निवेदक ह्यांच्या तोडीचे नाही ह्याची पूर्ण कल्पना आहे पण निदान प्रेक्षकापर्यंत माहिती पोचेल इतपत, त्यांना कार्यक्रम पाहताना भाषिक,वाचिक खडा लागू नये इतके निवेदन प्रयत्नाने मी नक्कीच शिकू शकतो. ( कुठोनतरी गाडगील किंवा अन्य एक्सपर्ट सोबत संपर्क प्रस्थापित काढता आल्या तर बरे. निदान निवेदनाचे काही प्राथमिक धडे तरी काही अवधीत त्यांच्याकदून नम्र, विद्यार्थीभावनेने शिकण्यास मिळेल.)
पण त्यासाठी पहिले पाऊल् उचलणे गरजेचे आहे.
ह्यासाठी मिडियामध्ये कुणाला संपर्क करता येइल हे समजत नाही. काही सुचवू शकाल? मदत करु शकाल?
किंवा काही "माध्यमिक मनोगती" वगैरे फार फार जुने धागे मनोगता पाहिले होते, त्यातील् कुणी एखाद्या ठिकाणी कनेक्ट करुन देउ शकेल काय? जालावरतीच कुणी कविता संगीतबद्ध रुपात वगैरे प्रकाशित केल्यात, अशांची काही मदत होउ शकेल का?
मुळात हा प्रकार डूएबल वाटतोय का? किंवा ह्यात कसंभाव्य काय् काय् अडचणी असू शकतात?
.
.
कार्टून् फिल्म् मोगली, रामानंद सागर ह्यांचे रामायण हे आधीच मराठीत आलेले आहेत.
मराठीत अधिकाधिक माहिती आणण्यासाठी हा काळ सुगीचा आहे. (मी मागची पाचेक वर्षे महाराष्टृत, तेही पुण्यात असल्याने हे सांगू शकतो)
मनसेला नवनवीन युक्त्या कामे करण्याच्या, ते प्रोजेक्ट करण्याच्या हव्याच असतात,
उदा:- त्यांनी एकदम दोनेक वर्षांखाली पुण्यात सर्वत्र पोस्टर्स लावली "नव्व्याण्णव रुपयात पॅनकार्ड काढून घ्या" म्हणून.
नंतरही बरीच त्यांनी कामे केली लायसन्स शिबिरे वगैरे. त्यामुळे असे काही होत आहे हे कळल्यास त्यांच्याकडून सक्रिय पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. ( एखाद्या राजकिय पक्षाशी संपर्क केलाच पाहिजे असे काही नाही; ही सुद्ध एक शक्यता आहे इतकेच सुचवतो आहे.)
मराठी जनमानसाचा ठाव घेण्यासाठी महत्वाच्या सिरिज च्या शेवटी किंवा चक्क प्रत्येक एपिसोडच्या शेवटी मराठा सत्तेशी तौलनिक अभ्यासात्मक कमेंट्री करायची.
उदा:- १. राणा रणजितसिंग हा ही प्रचंड पराक्रमी, स्वराज्य संस्थापक होता. पण् त्याच्या मृत्युनंतर त्याचे राज्य फार काळ टिकले नाही. ब्रिटिशांनी लागलिच् टेक ओव्हर केले.
मात्र मराठा राज्य शिवाजी संभाजी ह्यांच्या मृत्युनंतरही टिकले, वाढले.
२.रोमन सत्तेच्या शेवटच्या काळात् सामंतशाही वाढली, ते केंद्रसत्तेला जुमानिसे झाले. रोमन प्रभाव संपत आला.
पेशवे-छत्रपती ही दोनच सत्तास्थाने असताना मराठी राज्य वर्धिष्णू होते. मात्र, जसजसे इंदूर,ग्वाल्हेर, बडोदा,नागपूरकर हे स्वतंत्र होत् गेले, तसतसे म्राठी सत्ताही १९व्या शतकाच्या प्रारंभी दुबळीए होउ लागली.
थोडक्यात् तौलनिक अभ्यास दाखवयाचा. जनमानसचा चांगला ठावही घेता येइल, विषयही प्रभावीपणे मांडाता येइल.
मी इतिहासाचा अभ्यासक वगैरे नसलो, तरी त्याची मला आवड आहे; म्हणून हे उदाहरण घेतले. इतर विषय, जसे की यनवाला, नानावटी ह्यांचे लेख कीम्वा आनंद घारे ह्यांचे ललित अंगाने जाणारे दर्जेदार लेखन ह्यातही कडेकडेने असे फिनिशिंग करता येइल की जेणेकरुन रुक्ष माहितीचा ओव्हरडोस न होवो.
.
.
सध्या अगणित प्रश्न डोक्यात आहेत.
काय करायचे आहे?
कसे जमणार आहे?
सुरुवात कुठून करावी?
एखादा पायलट मॉड्यूल्/प्रयोग म्हणून काही करायचे असेल तर काय करावे लागेल?
(उदा:- मीच एखादा लेख सॅम्पल म्हणून घेउन त्याचे कथन जालावर कुठेतरी ठेवणे नि तुम्हा लोकाम्चा फीडबॅक घेणे. पन मग रेकॉर्ड कसं करु? त्यासाठी काय काय करावं लागेल? चांगला, अधिक स्पष्टतेचा माइक कुठे मिळेल? तो घेउन मी कॉम्प्युटार्मधे रेकॉर्ड करु मकी मोबाइलम्धे? की टेपर्कॉर्डर मध्ये? हे चांगले कुठे मिळेल? काही समजत नाही.)
गोंढळ नको
मनोबा, सध्या गोंधळ नको. हे पहा, सुरुवात तरी करु, ते ही जमेल अशी. एखादा चांगला लेख घ्या. तो, कोणाला तरी वाचुन दाखवा. अनेकदा वाचा मोठ्याने. स्वतःचे समाधान झाल्यास सध्या स्वतःच्या संगणकावर अथवा मोबाईलवर रेकॉर्ड करा. उपक्रमावर तांत्रिक तज्ञ बरेच आहेत. पुढे ते येथे कसे टाकायचे अथवा आणखी काय करायचे ते ठरवू पण सुरुवात तरी करु. मी काय मदत करु? सध्या तुम्हाला रेकॉर्ड करण्यासाठी उचकवणे अथव मोटिवेट करणे करतो आहे :).
+१
चाणक्य म्हणतात तशी सुरूवात करता येईल मग पुढचे पाऊल टाकता येईल.
उपक्रमावरील लेखांचे संदर्भ ग्रंथ
श्री चाणक्य यांनी मांडलेल्या प्रस्तावाशी पूर्ण सहमत.
माहितीपूर्ण मराठी ऑडिओ विडिओ या उपक्रमाला गती मिळाल्यास 'काही भरीव केल्याचे' नक्कीच समाधान मिळेल.
या संबधी माझी अजून एक सूचना:
उपक्रमवरील समुदाय व्यवस्थापकांनी आपापल्या समुदायासाठी लिहिलेल्या काही निवडक लेखांचे व प्रतिसादांचे आढावा घेत संपादन करून तशा एकत्रित लेखांची PDF प्रत संस्थळावर किंवा ई मेलद्वारे उपलब्ध करून दिल्यास संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा वापर करता येईल.
या सूचनेचाही विचार करावा.
चांगल्या प्रतिसादांचे संकलन
चांगल्या प्रतिसादांचे संकलन करून त्यांचा एक स्वतंत्र लेख तयार करणे हा एक चांगला "उपक्रम" ठरू शकेल. अर्थात, तो कोणाला तरी हाती घ्यावा लागेल कारण हे तसे कष्टदायी काम आहे.
विनंती
सध्या व्यवस्थापनाला एक विनंती आहे की उपक्रम असा एक लेखन प्रकार सुरु करावा. तेथे सदस्य नोंदणी करता येणे शक्य असल्यास ती सुविधा द्यावी.
पहिलं पाउल उचललय...
आताच सहज सुरुवात म्हणून पहिले चंद्रशेखर ह्यांचा http://mr.upakram.org/node/3816 "एका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 1" हा धागा उचलायचा प्रयत्न केला. महागात पडले. ते मला सादर करायचे असेल तर त्याचे पुनः संस्क्रण करुन छोटी छोटी वाक्ये केली, बोली भाषेत ते आणले तरच त्याचे निवेदन पेलवेल असे वाटले. त्या लेखातल्या तीन अयशस्वी प्रयत्नानंतर थोडा वेळ वेगळा प्रयत्न करुन पहायचं ठरवलं.
.
देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....(http://mr.upakram.org/node/3819) हा माझाच लेख मोठ्यानं वाचून रेकॉर्ड करुन पाह्यला. तुलनेनं हा बरा जमला.(वाक्ये छोटी होती, पल्लेदार नाही. हा त्यात फायदा.) सध्या रेकॉर्ड केलेल्या प्रकरणाची साइझ आहे ७ एम बी.
.
पब्लिकचा अभिप्राय हवा आहे; सुचवण्या हव्या आहेत. सधय मी जे केलय ते बहुतांशाने सरळ सरळ वाचनच आहे. त्याचं अधिक चांगलं असं श्राव्य माध्यमासाठी रुपांतर जरुरी आहे , ह्याची कल्पना आहे. पण सध्या पहिला रिव्यू हवाय.
फक्त मानवी आवाज असल्यानं अगदि raw, कच्चं मतिरिअल तुम्ही ऐकणार आहात हे सधय ध्यानात असू द्या.
ते बरचसं कंटाळवाणं असू शकतं, योग्य ती वातवरण निर्मिती अजून केली नाही. अल्लाद, मुद्दम वेगळे न जाणवणारे पार्श्वसंगीत, वाचनाच्या आशयाशी एकरूप झालेले पार्श्वसंगीत सध्या नाही . हे लक्षात घेउन अभिप्राय मिळावा.
.
७ एम बी हा प्रकर इ मेल वर पाठवता येइलसे वाटत नाही.
छान
सर्वात पहिला म्हणजे अभिनंदन. ७ एम. बी इमेल ने येऊ शकेल असे वाटते. चंद्रशेखर यांचा लेख तेच चांगल्या प्रकारे सादर करु शकतील कदाचित. जर चर्चा चांगली रंगली असेल तर प्रतिसाद सुद्धा टाकता येतील का? म्हणजे, या चर्चे वर मनोबा म्हणाले की .... मग प्रतिसाद वाचन.
सहजच एक सुचवणी म्हणून, कदाचित असे उपक्रमी असतील ज्यांच्या जवळपासचे लोकं लिहिण्यात रस घेणारे नसतील पण अशी काही मदत करायला उत्सुक असतील तर? मला वाटते कि ज्यांना रस असेल त्यांनी एकदा असा प्रयत्न करुन पहावा.
कसे केले?
कशावर आणि कसे रेकॉर्ड केले? कोणते सॉफ्टवेअर?
सात एमबी पाठवता आले नाही तरी सर्वरवर अपलोड करून उपक्रम प्रशासन ते सदस्यांकडे पोहोचवू शकते का?
साधे विंडोज्
थँक्स टू चाणक्य. साधे विंडोज् ७ चे साउंड रेकॉर्डर सध्या वापरले आहे, अॅक्सेसरीज मधील.
रेकॉर्डिंगची स्पष्टता माझ्या अपेक्षेहून खूपच चाम्गली आहे.
--मनोबा
अजुन थोडे
अजुन थोडे प्रयत्न केल्यास चांगले रेकॉर्डिंग करत येईल असे वाटते. पण सुरुवात म्हणून चांगले आहे. विंडोज सेटिंग अजुन थोडे पाहिल्यास जमेल, उबंटुवर काय वापरावे लागेल कोणी सांगू शकेल का?
फाईल शेअरचे दोन ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे उपक्रमाचे युट्युबवर चॅनेल सुरु करुन तिथे टाकणे अथवा आपापल्या हव्या त्या सर्वरवर टाकणे आणि दुवा देणे. व्यवस्थापनाने मार्गदर्शन केले तर उत्तमच. :)
बाय द बे, यात काही कायदेशीर गोष्टींची काळजी घ्यावी लागेल का?
चढवण्याआधी एमपी३ करावे
मागे मी काही ध्वनिफिती ईस्निप्सवर चढवल्या होत्या. कुठल्याही मूळ रेकॉर्डिंग प्रणालीतून ज्या उच्चपोताच्या फायली येतात, त्या फार मोठ्या असतात. त्याच फायली एमपी३ मध्ये बदलून बर्याच लहान होतात. (अर्थात ऑडियो क्वालिटी कमी होते. परंतु अगदी संगीत असले तरी एमपी३ सुसह्य असते, म्हणजे खालावलेला दर्जा इतका काही वाईट भासत नाही. गद्य भाषणाकरिता तर नाहीच.)
डब्ल्यू-अ-व्ही फायलींपासून एमपी३ बनवणार्या प्रणाली जालावरून मोफत उतरवल्या.
ईस्निप्स
eSnips.com वर शेअर करता येईल.
+१
हा उपाय तूर्तास बेष्ट.
मनोबा, चढव बघू आणि मग स्वतंत्र धाग्यातून माहिती दे.
सहमत
याच सोबत एक सुचना व्यवस्थापनास. रेटिंगची सुविधा दिल्यास या उपक्रमांतर्गत कोणते लेख घेता येऊ शकतील हे लवकर ठरवता येईल.
इंटरनेट
इंटरनेटची स्पीड सध्या गंडली आहे. आठवडाभर तरी लागेल नवीन प्लॅन घेउन सुरु करण्यास.
सावकाश
प्रकल्प सुरु झाला आहे यात आनंद आहे. आता तो मार्गी लागेल याची खात्री आहे.
मनोबा
मनोबा हे पहा. असे काही करता आले तर चांगले होईल ना?
नमस्कार
मी काही दिवसांपूर्वी उपक्रमावर आलो. येथील लेख चर्चा चांगल्या असतात असे प्रकर्षाने जाणवले. इतिहास, धार्मिक लेख, ज्योतिष इ.इ. लेखांवरील चर्चेत भाग घ्यावा एवढा अभ्यास नाही.
"नवे उपक्रम" हा धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचले याबद्दल एक सुचवावेसे वाटते.
१-२ वर्षांपूर्वी "टोस्टमास्टर" या ग्रूपशी जोडला गेलो होतो. ऑफिसच्या वेळा पाळून "टोस्टमास्टरच्या मिटींग्ज ला जाणे अवघड होऊन बसले त्यामुळे १-२ मिटींग्जनंतर त्यातुन बाहेरही पडलो. टोस्टमास्टची साधारण संकल्पना अशी की आठवड्यातून एकदा/ पंधरवड्यातून एकदा अथवा महिन्यातून एकदा ठराविक दिवशी सर्व सदस्यांनी एकत्र यायचे. ( कोणत्याही शाळेचा एखादा वर्ग वगैरे अशा ठिकाणी ) व प्रत्येक मिटींगला जास्तीत जास्त जणांनी इतरांसमोर येऊन कोणत्याही विषयावर ( मात्र सेक्स, धर्म/जात आणि राजकारण हे तीन विषय सोडून) ३ ते ५ मिनिटे बोलायचे. शेवटी एखाद्या वक्त्याच्या सादरीकरणामध्ये काय खटकले, अजून काय चांगले करता येईल यावर कोणाला काही सूचना असल्यास त्या सदस्याने त्या मांडाव्या.
सभाधीटपणा वाढवणे, प्रेझेंटेशन स्किल्स वाढवणे इ.इ. गोष्टींसाठी हा प्रकार खरोखरच उपयुक्त आहे. जो काही एक दिवस निश्चीत केला असेल ( प्रत्येक महिन्याचा २रा व ४था शनिवार अथवा फक्त ४ था शनिवार अथवा कोणताही एक निश्चित दिवस) त्या दिवशी साधारण २ तास एकत्र येऊन आपापल्या आवडी निवडी इतरांसोबत शेअर कराव्या.
उपक्रमावरील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी ( कदाचित वेगळ्या देशात सुध्दा ) असणार हे नक्की पण त्या त्या ठिकाणच्या सदस्यांनी एकत्र येऊन अशा स्वरूपाचा कट्टा जमवावा का?
सभाधीटपणा वाढण्यास, ठराविक वेळेत मुद्देसूदपणे आणि प्रभावीपणे आपले विचार व्यक्त होण्यास यामुळे मदत होऊ शकेल असे वाटते.