इंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता
दिल्लीमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी 'बलात्कार भारतात होत नाहीत इंडियात होतात' दुवा असे वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाश्चात्य विवाहव्यवस्था व भारतीय विवाहव्यवस्था यांबाबत काहीतरी गोलमोल विधाने करुन आणखी गोंधळ उडवून दिला. कोणत्याही स्वरुपाच्या बाईट्ससाठी टपून बसलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी लगेचच हा मुद्दा उचलून धरला. रा.स्व.संघाबाबत जनतेच्या मनात असलेला कमालीची अविश्वास आणि संघाच्या फुटीरतावादी धोरणांविषयीची अप्रीती यामुळे सामान्य जनतेचा या गोष्टींवर चटकन विश्वास बसणे साहजिकच होते. मात्र नव्या जमान्यातील यूट्यूब व तत्सम माध्यमांतून भागवत यांचे भाषण जसेच्या तसे ऐकल्यानंतर काही माध्यमप्रतिनिधींना उपरती झाली आणि त्यांनी ट्विटरवर का होईन माफी मागितली. (मात्र भारत-इंडिया या बलात्काराच्या थिअरीच्या विरोधात अनेक पुरावे सादर करुनही भागवत यांनी कुठेच माफी मागितली नाही हे विशेष!) यानंतर पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले.
माध्यमांनी माफी मागितल्यावर इंटरनेट हिंदूंनी विविध ठिकाणी हा विषय वाजवायला घेतला. (इंटरनेट हिंदू या शब्दाची थोडक्यात व्याख्याः Internet hindus are defined as anonymous trolls and serial abusers, Hindu nationalists and other right wingers are making a serious play to dominate social media.) मात्र या एकंदर चर्चांचा अविर्भाव माध्यमांचा अप्रामाणिकपणा किंवा विश्वासार्हता हा नसून माध्यमांच्या गटारगंगेद्वारे संघाला शूचिर्भूत करवून घेणे हा होता असे दिसते.
भारतातील कुठल्याही बऱ्यापैकी समंजस व्यक्तीचा माध्यमांच्या प्रामाणिकपणावरील विश्वास कधीच उडाला आहे.मात्र माध्यमांच्या अप्रामाणिकपणाच्या गाड्याखाली संघाच्या नळाची यात्रा घडवण्याचे काहीच कारण नाही.
माध्यमे चुकीची ठरली असली तरी त्यामुळे संघ बरोबर ठरत नाही.
उपक्रम संकेतस्थळावरील सदस्य बऱ्यापैकी पुरोगामी आहेत. त्यामुळे उपक्रमींची निष्पक्ष मते वाचायला आवडतील.
Comments
वाक्प्रचारामध्ये दुरुस्ती
हे वाक्य बदलून 'माध्यमांच्या अप्रामाणिकपणाच्या गाड्याबरोबर संघाच्या नळाची यात्रा' असे करावे. बैलगाडीच्या चाकाचे वंगण एका नळकांड्यात किंवा बुधलीत ठेवून ते गाडीला अडकवतात. गाडी चालली की नळाचीही यात्रा होते असा त्यामागचा अर्थ आहे. आजकाल फार रिलिवंट नाही. ज्यांना बैलगाडी माहीत नाही त्यांनी त्यांनी 'कारबरोबर स्टेपनीची यात्रा' असा अर्थ समजून घ्यावा.
माझे लेखन शक्यतो निर्दोष असावे असे मला वाटते. उपक्रमावरही भाषेच्या चांगुलपणाचा कसोशीने आग्रह धरला जातो म्हणून मला येथे येणे आवडते.
'सदस्य' - झोपलेल्याला जागे करता येते ...सोंग घेतलेल्याला नाही
जर 'सदस्य' संघ, वनवासी कल्याण आश्रम, सामाजिक समरसता मंच आणि सिमी, तालिबान, ओवेसी हे सारखेच आहेत असे म्हणत असतील तर ते नक्कीच नोबेल पुरस्कारासाठी पात्र ठरतात.
दुर्दैवानी कॉंग्रेस, समाजवादी, साम्यवादी आणि मिडिया ह्यांनी एक महत्वाची गोष्ट भारतीयांच्या गळी उतरवली आहे.
"जर तुम्ही मुस्लिम आतंकवादाविरोधात बोलला तर तुम्ही हिंदू आतंकवादी."
'सदस्य' ह्याच भयगंडाने पछाडलेले आहेत.
हा हा
माफ करा संघ व परिवारातील संघटना या सिमी आणि तालिबान यांच्यापेक्षा भिन्न आहेत हे मला आता समजले आहे. कृपया मला नोबेल पुरस्कार देऊ नये.
माझे शुद्धीपत्रक खालीलप्रमाणेः
१. संघात सर्व जातीच्या स्त्रीपुरुषांना संघटनेत सारखेच प्रतिनिधित्व मिळते.
२. संघाचे आजपर्यंतचे सर्व संघचालक हे विशिष्ट जातीचे पुरुष होते हा केवळ एक योगायोग आहे. संघ जातपात मानत नाही.
३. संघाने झेंड्यासमोरील कवायती वगळता शिक्षणसंस्था, सहकारी कार्यकारी उद्योग, पायाभूत सेवा आदी क्षेत्रात भरीव कार्य केले आहे
४. संघ मुस्लीम आणि दलितविरोधात नाही. संघ फुटीरतावादी नसून भारतीयांची जात व धर्मनिरपेक्ष संघटना उभी करण्यासाठी प्रयत्न करतो.
५. संघाने जातीभेद निवारणासाठी एक गाव एक पाणवठा, दलितांना मंदिरप्रवेश यासाठी मोठी आंदोलने केली आहेत.
६. गुजरातेत झालेल्या दंगली ही केवळ मीडियाची बकवास आहे.
७. बाबरी मशीदीचे पतन संघाने केले नाही. अयोध्यापुरता एक छोटासा भूकंप झाला व फक्त मशीद पडली. मात्र त्यानंतर झालेले बॉम्बस्फोट व दंगली या मुसलमानांनी हेतुपुरस्सर घडवून आणल्या.
८. महाराष्ट्रात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व सनातन प्रभात यांनी दिवाळीचे फटाके चुकून थिएटरमध्ये उडवले आणि त्यांना हकनाक अटक झाली.
वगैरे वगैरे
हुश्श!
हुश्श!
बरे झाले एकदाचे समजले तुम्हाला!
इंटरनेट हिंदू
<< (इंटरनेट हिंदू या शब्दाची थोडक्यात व्याख्याः Internet hindus are defined as anonymous trolls and serial abusers, Hindu nationalists and other right wingers are making a serious play to dominate social media.) >>
जिहादी मुस्लिम आतंकवादी आणि माथेफिरु पाकिस्तानी लोकांकडून भारत /हिंदुधर्म व संस्कृती यावर सर्वच माध्यमातून प्रचंड गरळ ओकले जात आहे . त्यातच आजकालची तथाकथित सुशिक्षित (?) इंग्रजाळलेली कॉन्व्हेंट एज्युकेटेड नवीन पिढी आणि कथित विज्ञानवादी नास्तिक ढोंगी (अ)विचारवंत यांना हिंदू धर्माचे आणि रूढी-परंपरांचे वावडे आहे. जुने ते सगळे टाकावू / मागासलेले आहे आणि धर्म,देव, संस्कार,संस्कृती याबद्दल आस्था दाखवणे म्हणजे वैचारिक मागासले पणा असे मानणारे अनेक लोक आहेत , त्यातच काही फुटीरतवादी जातीय संघटना /ब्रिगेड हिंदू धर्माचा सर्वनाश करण्याची प्रतिज्ञा करून मैदानात उतरल्या आहेत.
अशा परिस्थितिमध्ये हिंदू धर्माचे /संस्कृतीचे रक्षण व्हावे अशी तळमळ असणारे काही हिंदू तरुण जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती आणि धर्माभिमान यांनी प्रेरित होवून हिंदू संघटनांची बाजू घेवून इंटरनेट वर कार्यरत असतील ,तर अशा मंडळींना trolls and serial abusers म्हणून संबोधणे कितपत योग्य आहे ? याचा विचार व्हावा........................!
काही सहमती
आरएसएस, सिमी, बजरंग दल, ब्रिगेड वगैरे तत्सम फुटीरतावादी संघटना भारताला सर्वनाशाकडेच नेत आहेत. माझ्या प्रस्तावाचा मुद्दाही तोच आहे. किंबहुना हिंदू धर्म व संस्कार यांविषयी मला आस्था असल्यानेच त्यांना अशा बडव्यांच्या तावडीतून माझ्या धर्माला वाचवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे.
इंटरनेट हिंदू हा माझा शब्द नाही. मिडियास्युडोसेक्युलरिस्ट सागरिका घोष यांचा तो शब्द आहे. मात्र त्यांनी भागवतधर्मीयांची माफी मागितल्याने त्यांच्या वक्तव्याला काही एक वजन प्राप्त झाले आहे असा माझा समज आहे.
आरएसएस फुटीरतावादी नक्किच नाही
आरएसएस, सिमी ह्यांना तुम्ही एकाच तराजूत तोलता आहात ह्यावरुन तुमची कुवत लक्षात आली.
आरएसएस मूर्ख असेल, काहितरी बडबडत असेल पण फुटीरतावादी नक्किच नाही आणि fanatic पण नक्कीच नाही.
फुटीरतावादी आणि फॅनॅटिक
फुटीरतावादी आणि फॅनॅटिक या शब्दांची तुमची व्याख्या सांगितल्यास थोडी विस्ताराने चर्चा करता येईल.
हाण्ण!
तुम लढो, हम पिच्छु कपडे संभालता हैच.
कोणी कपडे काढले आहेत
कपडे वगैरे कोणी काढले नाहीत हो. दादा कोंडके म्हटल्यावर जोक मारलाच पाहिजे का?
नै नै..
जोक नाही हो, तुम्हाला पाठींबाच आहे. पण 'मैदानात उतरलोय' वगैरे म्हणल्यावर आधिच वितभर असलेली छाती दपडली ना आमची. त्यामुळे आमच्या औकातीनुसार झेपणारी मदत करावी म्हणलं.
इंटरनेट हिंदू
हां शब्द बहुदा रामचंद्र गुहा ह्यांनी प्रचलित केला. सागरिका घोष बाईंकडून असले काही अपेक्षित नाही. तार स्वरात आपलाच मुद्दा फक्त मांडणे आणि दुसर्याला बोलू न देणे ह्यापलीकडे काही जमते असे वाटते नाही. ते देखील राजदीप सरदेसाईची पत्नी म्हणून ही संधी मिळते आहे नाहीतर ह्यांना सहन करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले नसते.
मान्य
घोष बाईंकडून अपेक्षा नाहीतच. मात्र त्यांनी मोठ्या मनाने चूक कबूल तर केली. राजदीप सरदेसाईची पत्नी म्हणून संधी मिळत असली तरी तो सुद्धा तेवढाच दिवटा आहे.
व्याख्या:
कात्रे जी,
सहज भेटलाच आहात, अन विषयही निघाला आहे म्हणून डकवतो :
उपक्रमाचे सूज्ञ सदस्य ट्रॉलची व्याख्या जाणून आहेतच.
तर सदस्यहो, हे पहा:
अँड धिस पर्सन हॅज द गट्स टू कम टू उपक्रम अँड टेल टेल्स :)
वरील प्रतिसाद १००% व्यक्तिगत रोखाचा आहे.
हे मला ठाऊक आहे.
हा देखिल अत्यंत घृणास्पद व वैयक्तिक प्रतिसाद लिहितो आहे.
महोदय,
आपण स्वतंत्र भारताचे नागरिक (अद्यापही ) आहात काय?
गणित
उपक्रमावर अचानक वाढलेल्या 'इंटरनेट हिंदूंच्या' संख्येमागचे गणित उमजले असेलच एव्हाना..
असो.
धन्यवाद उपक्रम!
साती?
बाकीचे फारसे माहित नाहीत पण "साती" चे नाव वरच्या यादीत बघून हसू आले आणि अभिमानही वाटला.
इब्लीसपंत, वरचा प्रतिसाद वैयक्तिक वगैरे असण्यापेक्षा अतिभयंकर विनोदी आहे. हसून हसून पुरेवाट झाली. तुम्ही जरा माबोवरचे इब्लीस असाल तर तुम्ही आणि साती यांची नावे वरच्या यादीत... :))))))))
०
तीव्र निषेध.
माझा जामोप्या हा आय डी कधीच बंद झालेला आहे.
नव्या यादीत माझ्या नव्या नावाचा अनुल्लेख केल्याबद्दल निषेध
..
...
नक्की चर्चा विषय समजला नाही
नक्की चर्चा विषय समजला नाही. पण इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे वगैरे वाचताच पळ काढावासा वाटु लागले आहे इतके तेथील वार्तांकन उथळ होत चालले आहे.
कधी कधी वाटते ही तथाकथित 'न्यूज च्यानेले' आणि 'बिग बॉस' सारखे कार्यंक्रम यांच्यात अधिक 'करमणूक' कोण करते? (अर्थात अधिक वाह्यात कोण?)
असो. बाकी संघ वगैरे 'गैरराजकीय' पक्षांच्या (विनाकारण दिलेल्या) राजकीय मतांवर बोलून काहिच साध्य होणार नाही. अंगाशी आल्यावर आम्ही राजकीय नाही म्हणून ते हात वर करतील.
वाचायला आवडतील ती मते निष्पक्ष
उपक्रम संकेतस्थळावरील सदस्य बऱ्यापैकी पुरोगामी आहेत. त्यामुळे उपक्रमींची निष्पक्ष मते वाचायला आवडतील.
निष्पक्ष मते मागाविण्या करता चर्चेचा प्रस्ताव-लेख निष्पक्ष असावा लागतो. तुमचा प्रस्ताव-लेख निष्पक्ष नाही. तुम्ही काही विचार मांडले आहेत व ते अश्या प्रकारे मांडले आहेत कि याच्या विरुद्ध विचार असणारे (तुमच्या मते) प्रतिगामी, internet Hindu, Right Winger, फुटीरतावादी, व भारताला सर्वनाशाकडेच नेणारे serial abuser आहेत. तेंव्हा या चर्चेत भाग घेणार्यांकडे दोनच पर्याय उरतात. तुमच्या मताला दुजोरा देउन स्वत:वर निष्पक्ष असल्याचा शिक्का मारून घेणे किंवा तुमच्या मताला छेद देउन स्वत:वर "internet Hindu . . . serial abuser" असल्याचा शिक्का मारून घेणे.
आरएसएस व सिमी यांना तुम्ही समान मानता या वरून या विषयात तुमचे ज्ञान किती अगाध आहे हे लक्षात येते. तरी चर्चा होणारच असेल तर चर्चे करता काही मुद्दे देत आहे.
१: "इंटरनेट" असण्याचा सम्मान फक्त हिंदूंनाच का?
२: सोशल मिडीयाला dominate करण्याचे पवित्र कार्य करण्याचे कंत्राट कोणा कडे आहे?
३: व त्यांना ते कुणी दिले?
४: "इंटरनेट हिंदूंनी विविध ठिकाणी हा विषय वाजवायला घेतला" हेच वाक्य "इंटरनेट विचारवंतांनी विविध ठिकाणी हा विषय वाजवायला घेतला" असे लिहिणे जास्त बरोबर आहे असे तुम्हाला वाटते का?
पण्डितजी,
वर डकवलेला फोटू पाह्यला का?
पद्धतशीरपणे फाटे फोडत आपला अजेंडा घुसडणे कसे जमते ते तिथे लिहिलेले आहे.
त्यांचा प्रस्ताव निष्पक्ष नसला तर तुमचा तरी कुठे निष्पक्ष आहे? फक्त तुमच्या उत्तराला लाल अन पिवळा रंग दिलेला दिसतो आहे. म्हणजे एकंदर भगवाच आहे की.
विचार आणि प्रचार
यातला फरक समजण्याएवढा संमंजसपणा असला तर कोणत्याही विषयावर चर्चा घडू शकते. नाही तर 'तू तू मै मै' चालत राहणार.
वा
विचार आणि प्रचार हा जोरदार टोला मारून तुम्ही संघवाल्यांचे छप्परच उडवले आहे. जियो!!
असू देत
हिंदू जर right winger असतील तर त्यात आक्षेप काय आहे? right winger असतील पण fanatic नाहीयेत ना.
मी हिंदू घरात जन्म घेउन गेली २५ वर्ष पूर्ण नास्तिक आहे. पण मला आजुबाजुच्या हिंदू नी मारुन नाही टाकले, किंवा माझ्या मित्रांनी वाळीत नाही टाकले.
हिंदू नास्तिक असु शकतो. इतके समजुन घेण्यासाठी जो प्रगल्भ पणा लागतो तो हिंदूं मधे आहे.
अरे वा
हिंदू धर्मातील तीस टक्क्याहून अधिक प्रजेला वाळीत टाकण्यात आले होते, त्यात तुमचा समावेश नाही हे वाचून आनंद झाला. मी हिंदू घरात जन्म घेऊनही मला आजूबाजूच्या हिंदू-मुसलमान-ज्यू-ख्रिश्चन-शीख-बौद्ध-जैन कोणीच मारून नाही टाकले. माझ्या श्रद्धेवर यापैकी कोणाचाही आक्षेप नव्हता इतका प्रगल्भपणा यांच्याकडे आहे असे वाटते.
प्रतिसाद संपादित
सदर प्रतिसाद संपादित केला आहे याची नोंद घावी. इतर संकेत स्थळांवर सुरु असलेल्या चर्चेचा दुवा उपक्रमवर देता यावा किंवा तेथील मुद्दे येथे चर्चेसाठी घ्यावे परंतु तेथील सदस्यांवर टीका किंवा आरोप करण्यासाठी उपक्रम संकेत स्थळाचा वापर करू नये.
- संपादन मंडळ.
मत
जर हेच मत द्यायचं असेल तर ठीक आहे. माध्यमे चुकीची असली म्हणून भागवत बरोबर ठरत नाहीत असे म्हणता येईल बहुधा.
बाकी चर्चा प्रस्ताव गोलमाल वाटतो. तो योग्यप्रकारे मांडला असता तर चर्चा योग्य झाली असती. दोषारोप, एकमेकांना नावे ठेवणे वगैरेंमधून नेमके काय साध्य झाले ते प्रतिसादांतून दिसत आहेच.
उत्तरे
चर्चाप्रस्तावात भाग घेऊन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. काही उत्तरे खालीलप्रमाणे
आरएसएस आणि सिमी यांना एकाच तराजूत मोजण्यामागे कारणे आहेत. दोन्ही संघटनांवर भारत सरकारची बंदी होती किंवा आहे. दोन्ही संघटना या विशिष्ट धर्मीयांच्या संघटनासाठी व त्या अनुषंगाने हिंसक प्रतिक्रिया देण्यासाठी कटिबद्ध आहेत. संघ म्हणजे केवळ आरएसएस च्या ब्यानरखाली शाखेत कवायती करणारे स्वयंसेवक नसून संघ परिवार या व्यापक नावाने ज्यांना ओळखले जाते ते विहंप, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, वनवासी कल्याण आश्रम, सामाजिक समरसता मंच, पतितपावन संघटना, वंदे मातरम संघटना वगैरे वगैरे मांदियाळीतील लोक. आता या सर्व संघटनांची ध्येये वेगळी आहेत की काय याची मला पुरेशी कल्पना नाही. हव्यातच कशाला एवढ्या वेगळ्या संघटना. खरेतर हे त्यांचे मुखवट्यांचेच जग आहे. मात्र कार्य मात्र सामान्यपणे एकसारखेच आहे. ओरिसातील ख्रिश्चन मिशनरीची जिवंत जाळून हत्या, आधी मशीद पाडणार नाही असे उत्तर प्रदेश सरकारला आश्वासन देऊनही मशीद पाडणे, गुजरातेतील दंगली, महाराष्ट्रातील चित्रपटगृह वगैरे बाँबस्फोट आदी आणि कित्येक इतर प्रकारची कार्ये संघाच्या खाती जमा आहेत. यातील गोष्टी या दंगलींची पूर्वतयारी या स्वरुपाच्या आहेत. मुसलमानांवरील तथाकथित अत्याचाराचा बदला म्हणून सिमीने स्फोट करणे आणि हिंदूवरील तथाकथित अत्याचाराचा बदला म्हणून संघाने हल्ले करणे या पार्श्वभूमीवर दोन्ही संघटना एकाच तराजूत तोलण्यास हकत नाही.
संघ अराजकीय वगैरे काही नाही. जनसंघ-भाजपा ही त्यांचीच पिल्ले आहेत. संघाचे माजी संघटक दामूआण्णा दाते यांच्या स्मरणशिल्पे पुस्तकातील संघाच्या राजकारणाबाबत संघ म्हणजे बाजीराव, सत्ता म्हणजे मस्तानी अशा स्वरुपाच्या अलंकारांनी नटलेला हा संवाद वाचा म्हणजे संघाचे धोरण समजून येईलः
'जुन्या प्रचारकांनी श्री गुरुजींना प्रश्न विचारला की, तुम्हीच आम्हाला सांगितले आहे की, 'वारांगनेव नृपनीती अनेक रूपः' तर मग त्या राजसत्तेच्या वारांगनेच्या मागे आपण का लागलोय? यावर श्रीगुरूजी म्हणाले आपण कुठे वारांगनेच्या मागे लागलोय? नृपनीती म्हणजे वारांगना नव्हे. पण दिल्ली जिंकून आल्यावर एखादा बाजीराव दरबारात बसलाय व त्याच्या तालावर मस्तानी नाचते आहे तर चिंता करण्याचे कारण नाही'
मी माझे मत सांगितले. सर्व बाजूंनी पाठिंबा द्यायचा मात्र आपले मत सांगायचेचे नाही हे बोटचेपे धोरण मला मान्य नाही. मी माझे मत सांगितले. उपक्रमी निष्पक्ष आहेत माझ्या विरोधातील मतांचे स्वागतच आहे.
इंटरनेटवर हा विषय वाजवणारे लोक विचारवंत आहेत असे मला वाटत नाही. एकांगी प्रतिक्रिया, अश्लील वाक्प्रचारांचा वापर (एका चर्चेत एका सदस्याने वारंवार आवडतीचा शेंबूड गोड नावडतीचे मीठ अळणी हा वाकप्रचार वापरून वात आणला होता. अरे तुला शेंबूड आवडतो तर पोटभर खा, सारख्या ढेकरा देऊन आम्हाला कशाला त्रास देतोस असे म्हणावे वाटले होते पण आमचे संस्कार आड आले) असे करणारे लोक ट्रोल आहेत असे मला वाटते. पुस्तकातील संदर्भ, माहिती वगैरे देऊन चर्चा केली तर त्याला अर्थ आहे. संघशक्तीच्या जोरावर बुलीइंग करण्याने मुद्दा सिद्ध होत नाही.
काँग्रेस सरकार कोणावरही बंदी घालते,
ख्रिश्चन मिशनरीची हत्या एव्हडेच एक वाईट काम घडले आहे. मशिद पडली ते बरेच झाले. २००२ नंतर गुजरात मघला नासका आवाज बंद झाला.
काँग्रेस सरकार कोणावरही बंदी घालते, त्याला काय अर्थ आहे. ओवेसी वर बंदी घालत नाही घाबरुन
वा!
तुमच्या विचारांना अधिकृत स्वरुप दिल्याबद्दल आभारी आहे. एखादी व्यक्ती केवळ दुसऱ्या धर्माची आहे या कारणावरुन तिची हत्या करण्यामध्ये तुम्हाला काही वावगे दिसत नाही. आरएसएस आणि सिमीमध्ये असलेले साम्य तुम्हीच अधोरेखित केल्याबद्दल हार्दिक आभार.
ओवेसीला अटक झाली आहे
तुमच्या माहितीसाठीः ओवेसीला अटक झाली आहे
कोण ओवेसी
कोण ओवेसी? इतके दिवस नाव नव्हते ऐकले? अटक का झाली म्हणे?
पेपर बिपर वाचत चला.
झालेच तर संस्स्थळांवरील चर्चा, यूट्यूबच्या लिंका इ.
थोडक्यात, अभ्यास वाढवा. समजेल कोण ते. अन का अटक झाली ते.
उत्तर
उत्तर सदस्य यांच्या कडून अपेक्षीत आहे. मी काय करावे या बद्दल तुम्हाला थोडेच विचारले आहे? एका व्यासपीठावर बोलताना/लिहिताना जर व्यक्त्याला/चर्चा विषय सुरु करणार्याला एक प्रश्न विचारला आहे तर इतर सदस्यांना समजेल असे त्यांनी उत्तर सांगणे अपेक्षीत आहे. या भारतात असे अनेकजण आहेत ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांना संकेतस्थळ, यूट्यूब म्हणजे काय ते सुद्धा माहित नाही. त्यामुळे माझा प्रश्न चुकीचा नाही. शक्य असेल तर योग्य उत्तर सदस्य यांनी द्यावे अथवा त्यांच्या वतीने तुम्ही सांगा मी देतो म्हणून आणि द्या. उगाच येथे नसते शहाणपण शिकवू नका.
ओवेसीबाबत
भारतातील अनेकांकडे इंटरनेट नाही. त्यांना संकेतस्थळ किंवा यूट्यूब माहीत नाही. या कारणांमुळे जर त्यांना ओवेसीबाबत पुरेशी माहिती नसेल तर ती या चर्चेत - थोडक्यात इंटरनेटवर - मी दिली तरी त्यांच्यापर्यंत पोचणारच नाही.
आता तुम्हालाच जर ही माहिती हवी असेल तर खालील दुवे पाहा.
http://en.wikipedia.org/wiki/Akbaruddin_Owaisi
https://www.google.com/#hl=en&tbo=d&output=search&sclient=psy-ab&q=akbar...
.
किती हा आळस?
जरा लिहा ना इथे माहिती. हि दुसर्यांची मते इथे डकवून काय होणार?
का बरे? तुम्ही इथे लिहा. त्यांच्या पर्यंत कसे नेता येईल याची सुद्धा चर्चा करु. वाटल्यास लेख लिहा. श्रीयुत ओवेसी यांचे चरित्र आणि अटक.
बाय द वे ... संपादकनां नम्र विनंती, धार्मिक/जातीय तेढ वाढवणारे लेखन/चर्चा येथे चालूच ठेवणे हे कितपत योग्य आणि कायद्याला धरुन आहे? हे पहाता येईल का? हे असे दुवे पसरवणे कितपत योग्य आहे? विकिवरची माहिती जी कोणीही ग्राह्य मानू शकत नाही अथवा एका सर्च इंजिनवरचे दुवे जे कोणीही ग्राह्य मानू शकत नाही ते उपक्रमावरुन प्रसारित केले जात आहेत हे योग्य आहे का? किंबहुना उपक्रम अशा माहिती प्रसाराला/प्रचाराला मदत करते आहे का?
या विषयांवर मत व्यक्त करायला अशा माध्यमांचा वापर करावा का जिथे तुम्ही नक्की कोण आहात अथवा तुमचा नक्की हेतू काय आहे याची शहानिशा करण्याचा सरळ मार्ग सामान्य सदस्यांना नाहीये? संपादन मंडळ योग्य तो निर्णय घेईलच. असो...
किती हा आळस?
जरा लिहा ना माहिती थोडी अभ्यासपूर्ण. हि दुसर्यांची मते इथे डकवून काय होणार?
का बरे? तुम्ही इथे लिहा. त्यांच्या पर्यंत कसे नेता येईल याची सुद्धा चर्चा करु. वाटल्यास लेख लिहा. श्रीयुत ओवेसी यांचे चरित्र आणि अटक.
बाय द वे ... संपादकनां नम्र विनंती, धार्मिक/जातीय तेढ वाढवणारे लेखन/चर्चा येथे चालूच ठेवणे हे कितपत योग्य आणि कायद्याला धरुन आहे? हे पहाता येईल का? हे असे दुवे पसरवणे कितपत योग्य आहे? विकिवरची माहिती जी कोणीही ग्राह्य मानू शकत नाही अथवा एका सर्च इंजिनवरचे दुवे जे कोणीही ग्राह्य मानू शकत नाही ते उपक्रमावरुन प्रसारित केले जात आहेत हे योग्य आहे का? किंबहुना उपक्रम अशा माहिती प्रसाराला/प्रचाराला मदत करते आहे का?
या विषयांवर मत व्यक्त करायला अशा माध्यमांचा वापर करावा का जिथे तुम्ही नक्की कोण आहात अथवा तुमचा नक्की हेतू काय आहे याची शहानिशा करण्याचा सरळ मार्ग सामान्य सदस्यांना नाहीये? संपादन मंडळ योग्य तो निर्णय घेईलच. असो...
तो आमचा धंदा आहे :)
कुणी निंदा कुणी वंदा, शहाणपण शिकविणे हा आमचा धंदा.
तुम्हाला त्यांनीच समजवून सांगितले तर समजेल का? इतरांनी सांगितले तर नाही समजणार? :(
अरेरे. मग केवळ कीबोर्ड अन थोडेफार टायपिंग येते इतक्या बळावर मसंवर वावर जरा कठीणच आहे की नाही?
उपकार झाले काँग्रेस सरकार चे
उपकार झाले काँग्रेस सरकार चे
अनेक गोष्टींची तुम्हाला पुरेशी कल्पना नाही
आता या सर्व संघटनांची ध्येये वेगळी आहेत की काय याची मला पुरेशी कल्पना नाही.
याचीच नव्हे तर इतर अनेक गोष्टींची तुम्हाला पुरेशी कल्पना नाही. जसे हिंदू धर्मातील तीस टक्क्याहून अधिक प्रजेला वाळीत टाकण्यात आले होते ही तुमची टीका.
वर्ण व्यवस्था, जाती प्रथा, हे सर्व वाईटच होते व आहे हे निर्विवाद मान्य. मात्र हे फक्त हिंदू धर्मातच होते/आहे असा एक भाबडा गैर समज आहे. वास्तव असे आहे कि लोकशाही, मानवी हक्क इत्यादी उदारमतवादी संकल्पना समाजात येण्या आधी, कुठल्यातरी parameter वरून आपला एक गट बनवून समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करणे हे सर्वच धर्मात व संस्कृतीत होते व आज पण आहे.
जसे, काळ्यांची गुलामगिरी, ज्यात काळ्यांना इतकी वाईट वागणूक देत असत कि आपल्या वर्ण व्यवस्थेचे दोष पण त्यापुढे फिके पडावेत. दक्षिण आफ्रिकेत तर वर्ण भेद १९८९ पर्यंत होते. केवळ ज्यू आहेत म्हणून साठ लाख ज्यूंना ठार मारण्यात आले, ते कुणी केले? पण गम्मत अशी कि वर्ण व्यवस्थे करता जसे अक्ख्या हिंदू धर्माला जबाबदार धरण्यात येते तसे गुलामगिरी करता किंवा ज्यूंच्या शिरकांडा करता कोणी अक्ख्या ख्रिस्चन धर्माला जबाबदार धरत नाहीत. आज पण तथाकथित पुढारलेल्या व उदारमतवादी देशात ज्यूंना तुच्छतेने वागविले जाते. मुसलमान तर त्यांचा जगायचा अधिकार पण मान्य करण्यास तयार नाहीत. within Christianity, प्रोटेस्टंट व कथोलिक यांच्या मधील वैरभाव उत्तर आयर्लंड मधील अराजकाचे कारण आहे. शिया व सुन्नी यांच्यातील वैर आज पण युद्धे भडकवत आहे, लाखांनी माणसे मारत आहे. व अहमदिया हा एक तिसराच पंथ आहे व सगळ्यात कमजोर. सिक्खांच्यात काही "डेरा" यांच्यातील वैमनस्या मुळे प्रचंड हाणामारी होत असते. व त्यांच्यातील निरंकारी नावाचा पंथाचा इतर पंथ द्वेष करतात. मिझोरम, नागलंड इत्यादी राज्यात आता ख्रिश्चन धर्माची majority आहे, पण म्हणून त्यांची आपापसातील inter-tribes किन्वा इन्टर एथनिक भांडणे अजिबात कमी झालेली नाहीत व ही भारतातील सगळ्यात अशांत राज्या पैकी आहेत.
इतर अनेक गोष्टीं प्रमाणे या सर्वाची पण तुम्हाला पुरेशी कल्पना नव्हती का असून तुम्ही त्या कडे डोळेझाक केलीत?
त्यांनी
"त्यांनी शेण खाल्ले त्याबद्दल आधी बोला."
हे लॉजिक वेडगळपणाचे आहे.
या लॉजिकमुळे तुम्ही काय खाल्ले ते दडपले जात नाही.
स्वच्छता करायला सांगितली तर शेजारच्या घरातला संडास धुवायला आपण धावत नाही. सुरुवात स्वतःपासून होते. ते हिंदू आहेत. मीही आहेच. सुरुवात माझ्याच घरापासून करणार. आपल्याच धर्मातील चुकांबद्दल आपण बोलणार. तुमच्यात त्यांच्या चुकांबद्दल बोलण्याचा तर दम नाहीच, उलट स्वतःचा संडास साफ करायचीदेखिल इच्छा नाही.
हिटलरचे कौतुक या देशात कुणाकुणाला आहे हे न कळण्याइतके उपक्रमी दुधखुळे नाहीत. या ज्यू अन क्याथोलिकांच्या पोष्टी फेसबुकावर टाकत जा. इथे उपयोग नाही.
आता कसे बोललात...
आमच्या घरात घाण आहे तर ती आम्ही साफ करणार. जर शेजारी येउन सांगायला लागला तर त्याला हेच सांगावे लागते की तू आधी तुझे घर बघ.. आणि त्यात जर तो असे म्हणला की हे घर तू घण केलेस म्हणून आता मी सांगेन तसे इथे तू वागले पाहिजे तर त्याला प्रतिकार तर केलाच पाहिजे.
असो.. यावरच लवकरच इथे एक सविस्तर प्रतिसाद देइन असे म्हणतो..
मूळ चर्चा मागे राहू नये
एकमेकांची उणीदुणी काढण्यामध्ये 'सदस्य' आणि तत्सम प्रवृत्तीचे लोक ह्यांना अपेक्षित असलेली चर्चा मागे राहू नये.
हिंदू चांगले कि वाईट / हिंदूंचे वागणे देशहिताचे कि देशद्रोही / जागतिक पातळीवर हिंदू अतिरेकी म्हणून वावरतात का / हिंदू धर्म तेव्हढाच वाईट बाकी सगळे चांगले / संघ आणि परिवार म्हणजे हिंदू अतिरेकी / सीमेवरचे जवान रोज मारतात पण त्यामुळे क्रिकेट मध्ये राजकारण आणणे मूर्खपणाचे / टि व्ही वरचे बातम्या देणारे हेच खरे / संघाचे लोक आता जुने झालेत आणि मुर्खासारखे बोलतात /
'सदस्य' आणि तत्सम प्रवृत्तीचे लोक ह्यांचे हे विचार खरोखरीच वंदनीय आहेत.
आमच्या अमेरिकेत तर त्यांना आयुष्यभर कसलीही ददात पडली नसती.
मी हिंदू आहे.
महोदय,
हिंदू असणे म्हणजे इतरांना कमी लेखणे नाही.
एकमेकांची उणी दुणी?
इतरांत मुस्लिम, म्हणजे इतर धर्मिय येतात. वर कुठेतरी 'मिशनरी मारले ते वैट झाले' असं वाक्य आलंय. म्हणजे मुसलमाण मारलेत ते बरे. हिटलरने ज्यू मारलेत ते बरे. मी अमुक, मग तमुक देश, प्रांत, शहर, गल्ली, घर यांचा द्वेष करावा. हे झाले की मग हळू हळू माझ्याच घरातल्या बायका पोरांचा द्वेष करावा. वेगळे लिंग अन वय होते ना? हिंदूंच्यात बायका अन शूद्रांना दिलेली सन्मानाची वागणूक अत्यंत प्रसिद्ध आहे.
तरीही,
"हिंदू चांगले कि वाईट / हिंदूंचे वागणे देशहिताचे कि देशद्रोही / जागतिक पातळीवर हिंदू अतिरेकी म्हणून वावरतात का / हिंदू धर्म तेव्हढाच वाईट बाकी सगळे चांगले / संघ आणि परिवार म्हणजे हिंदू अतिरेकी / सीमेवरचे जवान रोज मारतात पण त्यामुळे क्रिकेट मध्ये राजकारण आणणे मूर्खपणाचे / टि व्ही वरचे बातम्या देणारे हेच खरे / संघाचे लोक आता जुने झालेत आणि मुर्खासारखे बोलतात /
'सदस्य' आणि तत्सम प्रवृत्तीचे लोक ह्यांचे हे विचार खरोखरीच वंदनीय आहेत."
हे कोणते लॉजिक होते?
मी हिंदू आहे. माझे हिंदुत्व कुणाचपाशी सिद्ध करायची मला गरज नाही.
अवांतरः
या वाक्यात आनंद आहे. सक्काळी स्मरण करा. काय म्हंतात ते? प्रतःस्मरणीय. गांधी अन आंबेडकर इन्क्लूड केलेत म्हणे आजकाल? वा!
*हॅपी* (इब्लिस)
विनोदी जमात
इंटरनेट हिंदू ही जमात मनमोहन, सोनिया, राहुल गांधी ह्यांच्याबद्दल आणि कॉन्ग्रेस पक्षाबद्दल अतिशय फालतू विधाने करीत असतात. भागवत, सिंघल, मोदींच्या मूर्खपणांबाबत ह्यांची भूमिका काय असते ? असो. विनोदी जमात आहे. चर्चा वाचतो आहे. इब्लिस आणि सदस्य ह्यांची मते कुण्याही शहाण्या भारतीय हिंदूला पटण्यासारखीच आहेत.
मी वेडा आहे
इब्लिस आणि सदस्य ह्यांची मते कुण्याही शहाण्या भारतीय हिंदूला पटण्यासारखीच आहेत.>> मी पूर्ण वेडा आहे, कबूल करतो. तुमची मते पटत नाही म्हणजे वेडाच असणार.
झोपल्याचे सोंग घेऊ नये
मी वर दिलेल्या प्रतीसादामधील काही भाग परत सांगतो. आपण ह्या प्रचाराला बळी पडतो आहोत का प्रत्येकाने ओळखावे.
दुर्दैवानी कॉंग्रेस, समाजवादी, साम्यवादी आणि मिडिया ह्यांनी एक महत्वाची गोष्ट भारतीयांच्या गळी उतरवली आहे.
"जर तुम्ही मुस्लिम आतंकवादाविरोधात बोलला तर तुम्ही हिंदू आतंकवादी."
संघ परिवार, शिवसेना, ह्यापैकी कुणीही मुस्लीम वा ख्रिस्ती ह्यांच्या विरोधात नाहीये. भारतामध्ये प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे. परंतु काही गोष्टी कधीच बदलत नाहीत जसे इतिहास आणि धर्मग्रंथ.
भारतावर मुस्लिम आणि ख्रिस्ती ह्यांनी आक्रमणे केली, इथल्या संस्कृतीचा बऱ्याच प्रमाणात विध्वंस केला. परंतु कुठल्या का कारणाने असेना भारत हा मुर्तीपुजाकांचाच देश राहिला. आजही इथले ८०% लोक मुर्तीपुजकच आहेत. पूर्वी अरब सुध्धा मुर्तीपुजकच होते पण त्यांनी इस्लामचा अंगीकार केला आणि त्यांनी मूर्तीपूजा थांबवली. तसेच काहीसे युरोप मधेही झाले.
भारतामध्ये कुठेही गेल्या सर्व महत्वाच्या मंदिरची, मूर्तींची मोडतोड झालेली आहे, त्याबाजूला एक तर मशीद उभी राहिलेले असेल. आता १९४७ पासून हिंदू धर्म हा एकाच समान धागा असलेल्या लोकांना एक देश मिळाला. परंतु एक लक्षात घेतले पाहिजे कि, भारत काही एका धर्मासाठीचा देश नाहीये. त्यामुळे जुन्या मशिदी व चर्चेस पाडून तिथे परत मंदिरे उभारणे हा कुठल्याच संघटनेचा कार्यक्रम नाहीये. आणि भारत हे हिंदूंचे राष्ट्र असते तरी असे कुणीही केले नसते. उगीच संघ परिवार आणि शिवसेनेवर कुणीही स्वताचा न्यूनगंड लपवण्यासाठी चिखलफेक करू नये.
कुठल्याही धार्मिक दंगली घडण्यास कारण कोण देते हे सुध्धा लक्षात घ्यावे. गुजरात दंगल हा सर्व मिडियाचा आवडत विषय. का घडली ती दंगल? गोध्रा ह्या ठिकाणी अयोध्येमधून परतणाऱ्या हिंदूचा १ अख्खा डबा पेटवून देण्यात आला. विचार करा जर पाकिस्तान मध्ये तेथील हिन्दुनी हज यात्रेहून परतणाऱ्या भाविकांचा डबा पेटवला असता तर? दंगलीचे समर्थन करत नाहीये पण कारण स्पष्ट करत आहे. नंतर जे घडले ते फार दुर्दैवी होते.
आता जगभर परिस्थिती सुधारत आहे. 'ग्रंथधारक' असणारे देशसुध्धा आता दुसऱ्या धर्माचा जगण्याचा आणि पूजेचा अधिकार आणि आदर मान्य करत आहेत. भारतात तर हिंदू धर्मामध्ये सर्वच पूजा पद्धतींना मान्यता असल्याने ८०% लोक दुसऱ्याच्या धार्मिक भानगडी मध्ये पडण्यास उत्सुक नसतात.
भारतात मागच्या काही वर्षांपासून दुर्दैवाने दरवर्षी बॉम्ब स्फोट होत आहेत, त्याला कारणीभूत आहे तो भारताचा शेजारी देश. कुणीही शहाणा माणूस जर तुमचा शेजारी भांडकुदळ असेल, तुमच्या घरातील लोकांना मारत असेल, तर त्याच्याशी संबंध तोडतो. भारतात मात्र अशा शेजाऱ्याला मोस्ट प्रेफेरड नेशन चा दर्जा दिला जातो.
दुर्दैवाने पाकिस्तान ला दुखावणे म्हणजे भारतातल्या मुस्लिमांना दुखवणे असा समाज मिडिया, काँग्रेस, समाजवादी आणि साम्यवादी लोकांचा आहे. सामान्य मुस्लिम मात्र पाकिस्तानची एकदा ठेचा असेच म्हणतो. खूपच थोडे मुस्लिम आता स्वताला भारताचे मालक आणि हिंदूंना गुलाम समजतात. ओवेसी साहेबांची चित्रफीत पहावी म्हणजे हे कुठले लोक आहेत ते समजेल. हे सगळे लोक भारतातले ते मुसलमान आहेत जे निजामाच्या राजवटी मध्ये उनाडक्या करत होते आहे आणि आता कुणीच कामधंदा देत नाही म्हनून रडत आहेत.
सदस्य, इब्लीस आणि इतर मंडळींना एकाच विनंती आहे कि झोपल्याचे सोंग घेऊ नये. मिडिया आणि कॉंग्रेस च्या प्रचाराला बळी पडून काही चांगले होणार नाही. आज भारतामध्ये ५ कोटी बांगलादेशी राहतात. ते लोक भारताच्या नागरिकांपेक्षा जास्त महत्वाचे झालेले आहेत. तुमच्या माझ्या सारख्या ला कोण विचारतो?
हिंदू आतंकवादी आणि इंटरनेट हिंदू
>>जर तुम्ही मुस्लिम आतंकवादाविरोधात बोलला तर तुम्ही हिंदू आतंकवादी
आतंकवादाविरोधात "बोलणार्यांना" आतंकवादी म्हटले गेल्याचे उदाहरण कुठे पाहण्यात आलेले नाही. हिंदू आतंकवादी हे बिरुद प्रत्यक्ष आतंकवादी "कृत्ये करणार्यांना" लावले जाते.
इंटरनेट हिंदू हे विशेषण बहुधा जालावर असा खोटा कांगावा करणार्या लोकांसाठी वापरले जाते.
डोके असले तर कधी कधी विचार केलेला बरा असतो.
माझ्या सारख्याला विचारतात. तुमच्या सारख्याला कुणी विचारत नसतील तो तुमचा प्रॉब्लेम आहे.
खाली त्यांनी ६५ अन ७१ चं विचारलं आहे. ते काय आहे ते तरी समजलंय का तुम्हाला?
तुम्ही करता तसा इतरांचा द्वेष मी केला नाही तर मी डायरेक्ट हिंदूच नाही, अन वरून 'राष्ट्रद्रोही' आहे हा जावाई शोध कसा काय लागू शकतो बुवा?
५ कोटीचा आकडा कुठून आला? बांग्लादेशची संपूर्ण लोकसंख्या किती आहे हो?
***
नक्की का?
परिवार? अन शिवसेना अन संघ परिवार सिनोनिमस कधीपासून झाले?
तो काय नाव त्याचं..? फादर स्टेन्स का काय होतं? दोन कच्ची बच्ची होती म्हणे सोबत ते जिपडं जाळून टाकलं तेव्हा? बजरंग दल परिवाराबाहेर आहे बहुतेक. असेल ब्वा..
***
वर तुम्हाला उद्देशून एकदा लिहिलेले प्रतिसादास उत्तर पूर्ण दुर्लक्षित करून नवा प्रतिसाद लिहायचा, अन वरतून मखलाशा करायच्या ही स्टाईल लै जुनी हाय मान्सा.
येक्दा म्हनायचं मिशन्री मार्ला ते वाईट झालं.
येक्दा म्हनाय्चं हाज वरून येनारा डब्बा जाल्ला तर? मग फुडं लिवायचं, 'नंतर झालं ते वाईट जालं' वा! लै ब्यालन्स्ड. मग झोपेचं सोंग बिंग बोलायच.
धर्मामधे मान्यता? अहो, घटनेने मान्यता दिली आहे सगळ्यांना आपली पूजा आपापल्या घरात करायची. रस्त्यावर कुणीही आणली तरी मी शिव्याच देणार. मग जात-पात धर्म-बिर्म मला फरक पडत नाही.
उठा! जागे व्हा.
उत्तिष्ठ. जाग्रत.