उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
सुशीलकुमार शिंदे
सदस्य
January 22, 2013 - 1:10 am
भारताचे विद्यमान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत असे बिनबुडाचे विधान करुन देशाचे नाक कापून घेतले आहे. गृहमंत्र्यांना जर देशातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची माहिती असेल तर त्यांनी सरळ कायदेशीर कारवाई करुन त्यावर इलाज करावा. खळबळजनक विधाने करुन प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापायी भारताची विश्वासार्हता धुळीस मिळवू नये.
दुवे:
Comments
सावधान
देशाच्या गृहमंत्र्याबद्दल सोशल मेडियामध्ये लिहिताना सावधान. तुमच्यावर त्यांचा पहारा असू शकतो. खास करुन दहशतवादासारखा संवेदनाशील मुद्दा असताना. ते भारताचे सन्माननीय गृहमंत्री आहेत. असेच बिनबुडाचे विधान कसे करतील? तुम्हीही लिहिताना असे कसे लिहिले आहे? अनियंत्रीत चर्चेच्या व्यासपीठाचा गैरवापर होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.
सहमत आहे
उपक्रमाचा ट्वीटर होउ नये.
उपक्रम ला शुभेच्छा देत आहात कि शाप?
उपक्रम ला शुभेच्छा देत आहात कि शाप?
हाच सूर
हाच सूर बहुतांश वृत्तपत्रांनीही आजच्या अग्रलेखांत लावला आहे.
थोडे थांबा.
माननीय शिंदेंचे विधान वेगळेच आहे. त्यांनी नेहेमीप्रमाणे संघ परिवार आणि या वेळी भाजप ह्यांच्यावर दुगाण्या झाडल्या आहेत.
विस्तृत प्रतिसाद नंतर. मागच्या चर्चेचा तुमुही परस्पर समारोप केला होता. आता थोडे थांबा.
अभिनंदन
अफजलगुरूच्या फाशीचा निर्णय घेतल्याबद्दल शिंद्यांचे आभार. उरलेल्या दहशतवाद्यांनाही संपवून टाका.
मरणान्तानि वैराणि
मरणान्तानि वैराणि निवृत्तं न: प्रयोजनम् |
क्रियतामस्य संस्कार; ममाप्येष यथा तव ||
हे शिकवणाऱ्या हिंदू धर्माचे म्हणे हे समर्थक.