अमानत आणि प्रसार माध्यमे
गेले १३ दिवस दिल्लीस्थित प्रसार माध्यमांना अमानाताच्या बलात्काराचा विषय मिळाला. चांगलेच वातावरण तापवले. ह्या प्रकारची जितकी निंदा करावी तितकी थोडीच आहे. पण काही प्रश्न पडले आहेत. ह्या आधी इतक्या वेळेला ह्या घटना भारतभर घडल्या आणि अजूनही घडतच आहेत मग तेंव्हा ह्या मध्यामानी हा विषय का नाही ताणून धरला. ज्या पद्धतीत बातम्यांचे प्रसारण होत आहे आणि निवेदक ज्या आवाजात बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि काही वेळेला पार्श्वसंगीत ह्याने एक वेगळाच परिणाम जाणवतो असे मला वाटते. ह्याची खरोखर गरज आहे का?
बरेचदा असे वाटते की दिल्लीत ही घटना घडली आणि त्यातुन मध्यमवर्गीय किंवा सधन आणि शिक्षित लोकांच्या बाबतीत घडली म्हणून ह्याला इतकी प्रसिद्धी मिळाली असावी का? म्हणजे अश्याच घटना इतर ठिकाणी होतात तेंव्हा नाही प्रसिद्धी मिळत. त्या घटना दिल्ली पर्यंत पोहोचताच नसाव्यात काय. मग त्या मुलींचे काय?
सध्या सगळ्याच पक्षाच्या राजकारण्यांनी कमरेचे सोडले आहे. पण ज्या पद्धतीने सतत प्रश्नांचा मारा होतो आहे ते पाहता कधी ना कधी हे लोक चुकीचे बोलणारच आणि तेच पकडून मग त्या त्या राजकारण्याला चांगलेच झोडपण्याचे काम चालू आहे. अर्थात राजकारणी जे काही बोलले त्याचे समर्थान करताच येत नाहीये पण मला असे वाटते की बहुदा मुद्दामहून त्यांच्या चुकीच्या बोलण्याची किंवा सापळ्यात पकडून त्याची जोरदार घटना करण्याची वृत्ती जास्त फोफावते आहे. राजकारणी बदनाम झालेच आहेत पण ह्यातुने फार काही सध्या होताना दिसत नाहीये.
लोकांच्या दबावाने म्हणा किंवा प्रसार माध्यमांच्या दबावाने म्हणा पोलिसांनी त्या सहा नराधमांना अटक केलीच आहे. मग आता रोज उठून निदर्शने करून काय सध्या होणार आहे? हां त्यांना जर का शिक्षा झाली नाही तर मात्र अशी निदर्शने केल्यास जास्त सयुक्तिक राहील असे माझे मत आहे. म्हणजे ह्या पलीकडे पोलीस आणि राजकारणी सध्याच्या अवस्थेत काय करणार आहेत? खटला तर कोर्टात उभा राहिला पाहिजेल ना.
असो पण ह्यातुने काहीतरी चांगले घडावे आणि कायदा आणि त्याची अंमलबजावणी कडक व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो.
Comments
राग
या आणि अलिकडया अशा अनेक घटनांमधून लोकांचा सध्याच्या परिस्थितीवरचा, ती सांभाळणार्यावरचा, हाताळणार्यांवरचा आणि स्वतःवरचा राग व्यक्त होतो आहे. या घटना प्रातिनिधीक आहेत. दिल्ली हरयाणामध्ये अलिकडे याचा अतिरेक झाल्याने प्रसिद्धी माध्यमे सुद्धा तेच चघळत आहेत.
मान्य आहे.
पण नुसता आरडा ओरडा करून आणि कडक कायदा करून काय फायदा? त्याची अंमलबजावणी कोण करणार. आहेत तेच कायदे धडपणे अवलंबिले जात नाहीयेत नवीन भर घालून काय होणार हो?
बघत काय सामील व्हा.
मराठी माणसाची वृत्ती खूपच कूपमंडूक होत चालली आहे. एक प्रकारचा न्यूनगंड त्याला सतत भेडसावत असतो. त्यामुळेच स्वत: काही न करणे आणि काही चांगले करणाऱ्या लोकांना नावे ठेवणे हेच तो करत आहे.
बापरे
बापरे आता ह्यात मराठीचा कुठे मुद्दा आला हो.
तुम्हाला म्हणायचं काय नक्की?
म्हणजे दबाव असल्यामुळेच ही कृती झाली हे तुम्हाला मान्य आहे काय?
मुखर्जीचं, 'या आंदोलनात सहभागी झालेल्या दिल्लीतील महिला रात्री डिस्कोमध्ये जातात आणि दिवसा इंडिया गेटवर मेणबत्त्या हातात घेऊन आंदोलनात सहभागी होत होत्या' असं एका कार्यक्रमात म्हणणं किंवा अनिसूर रहमान यांचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उद्देशून ‘बलात्कारासाठी तुम्ही किती मोबदला घ्याल,’ असं विचारणं यात कोणता सापळा होता हे कळलं नाही किंवा यात काही विशेष नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
काही मुद्दे बरोबर आहेत पण
तुमचे बरोबर आहे. पण मला प्रश्न पडतो की ह्या मूर्खांना मुळातच प्रतिक्रिया विचारून काय फायदा आहे. ह्या सगळ्यांची उत्तरे एकतर पोलिटिकली बरोबर असली पाहिजेत असे गृहीत धरले जाते आणि मग काही वेगळे आले की मीडीयाला नवा विषय मिळतो चघळायला.
माझ मत असे आहे की ह्या लोकांना विचारून काय फरक पडला? ह्या घटना काय पहिल्यांदाच होता आहेत का? जो उठेल त्याला प्रतिक्रिया विचारून काय फरक पडणार आहे. मुळात इतक्या घटना घडल्या आणि त्यात पाकडलेल्या किती गुन्हेगारांना शिक्षा झाली का? ह्यावर का नाही चर्चा होत? पोलिस गुन्हा नोंदवून घेत नाहीयेत आणि पकडले तर बाकीच्या अनंत कारणांनी हे नराधम सुटतात किंवा शिक्षा झाली तर ६-७ वर्षात पुन्हा बाहेर येतात. ह्यावर नको का चर्चा व्हायला? असे प्रश्न विचारून धारेवर धरता येते की. पण ते होताना दिसत नाहीये.
शक्य आहे
हे शक्य आहे पण मला वेगळाच वास येतो आहे (त्यात तथ्य नसूही शकेल.) दिल्लीत अशी घटना मोठी केली की निदर्शने, कँडल मार्च, उपोषणे होतील. त्यातून एकंदरीत कायदा, सरकार यांना धक्का बसेल. स्थान डळमळीत होईल असे तर नसावे?
काल सल्लूचा बड्डे होता म्हणून आठवलं. त्याच्या गाडीखाली अशीच एक दुर्दैवी व्यक्ती आली होती पण तिचे भांडवल मिडियाने केलेले आठवत नाही.
काय सांगावे
काय सांगावे. असू शकेल हो. एक तर त्या रडीया प्रकरणात ज्या पद्धतीने एकदम सगळ्यावर पांघरून घातले गेले त्यावरून हि सगळी मंडळी एकतर आपल्या व्यवसाय बंधूना फारसा त्रास देत नाहीत. शिवाय सल्लू मिया वगैरे ह्यांच्यावर काही झाले आणि बॉलीवूडने ह्यांना बातम्या देणे बंद केले तर ह्यांचे दुकान चालणार कसे. तो शायनी का कोण होता त्याच्यावर मात्र सगळे तुटून पडले आणि त्याला आत घालवला. म्हणून तर ह्यांच्या मनात आले की कुठलीही घटना चालवली जाते आणि मनात नसले किंवा दुसरे काही चघळायला मिळाले की पहिले अडगळीत टाकतात.
शक्य आहे का?
आजकाल सो कॉल्ड लोकांप्रमाणे बोलणे सुरु झाले आहे. मिडिया हा सोईची भुमिका घेतो. राजकीय पक्षांनी एकमेकांना पुरक बोलणे, एका व्यक्तीने एखाद्या विरुध्द मते मांडली की मते योग्य की अयोग्य यावर चर्चा किंवा कारवाई करण्याएवजी इतर लोक विरोधी बोलणारा मागे कसा चुक होता याचे दाखले देतांना दिसतात. चुक ही चुकच असते ती सांगण्यास कोणी सज्जनच असावा हा नियम का?
पण तरीही विशासार्हतेचे काय
चुक ही चुकच असते ती सांगण्यास कोणी सज्जनच असावा हा नियम का?>>> हे वाक्य पटले पण तरीही विशासार्हता असा काही प्रकार असतोच की असे नाहि का वाटत?
विश्वास
विश्वास कोणी व कसा राखावा व आपण काय करावे हा आपला प्रश्न. सदर घटनेला मिडियाने उचलले यात सामान्य जनतेचा फायदा झालाच ना. आपल्याकडे नितीमत्तेची जी फुटपट्टी लावली जाते ती दुट्टप्पीच असते. सद्य स्थितीला राजकारणी, मिडीया वा तत्सम घटकांची विश्वासार्हता नसली तरी आपण त्यातल्या त्यात आपले व देशाचे हित पाहुनच कामापुरता त्यांचा वापर करुन घ्यावा व हेच व्यावहारिक धोरण ठेवावे असे माझे मत आहे. क्रांती किंवा इतर पर्याय आपल्याला मानवणारे नाहीत.
पटत नाही बुवा
माझे असे मत आहे की फायदा हा नुसता तात्कालिक आहे. म्हणजे तोही त्या मुली पुरताच. काही महिन्यांपूर्वी त्यात गोलाप कांडा बद्दल आले होते. तेंव्हा का बरे मीडीयाने ते उचलून धरले नाहीये. हे सहा नराधम सर्वसामान्य होते आणि त्यांच्या पैकी कोणीही सन्मान्य राजकीय व्यक्ती नव्हते वा राजकीय पक्षाशी निगडीत नव्हते म्हणून हे इतके झाले नाहीतर हे प्रकरण आपोआप बंद झाले असते. जो पर्यंत बडी धेंडे सामन्यांप्रमाणे पकडली जात नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाही.
बाकी क्रांतीचे म्हणाल तर ते कठीणच आहे. सध्याची अवस्था आहे रे वाल्यांना सोयीची आहे आणि तेच सगळीकडे कायदे करणारे आणि राबवणारे आहेत त्यांना काहीच फरक पडत नाहीये. त्यामुळे क्रांती होणारच नाही ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.