नितीन गडकरी

भारतीय जनता पक्षाचे (खाण्याप्रमाणेच!) बोलण्याचा धरबंद नसलेले विद्यमान अध्यक्ष श्री. नितीनभाऊ गडकरी यांनी स्वामी विवेकानंद यांची तुलना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासोबत केल्याने मोठाच गोंधळ माजला आहे. मुळात स्वामी विवेकानंद यांचे सर्वसमावेशक हिंदुत्त्व, 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे ख्रिश्चन-मुस्लिम बांधवांना शिकागोमध्ये उद्देशून भाषण, याचा मागमूसही भाजपा आणि संघाच्या आक्रमक हिंदुत्त्वात सापडत नाही. तरीही संघिष्ठांचा कोणताही कार्यक्रम शक्यतो विवेकानंदांचे स्मृतीपूजन करून होतो असे वाटते. मात्र गडकरींच्या या फ्रॉईडियन स्लिपमुळे विवेकानंदांबाबत भाजपाचा मुखवटा आणि चेहरा हा असा उघड झाला आहे.

एकंदरीत गडकरींवर होणारे भ्रष्टाचाराचे व बेताल वक्तव्याचे आरोप पाहता त्यांना दूर सारणे योग्य ठरले असते. मात्र गडकरींना कायम ठेवून भाजपाने मोठी घोडचूक केली आहे असे वाटते. भाजपाशासित राज्यांमधील वखवखलेल्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत (येडियुरप्पा किंवा शिवसेनेचे राणे यांचे सरकार) काँग्रेसच्या थोड्याश्या कमी भ्रष्टाचाराचा मला तरी योग्य वाटतो.

Comments

?

कुणाच्या खाण्याबद्दल कॊमेंट करणे समाजात अशिष्ट समजले जाते.

बाकी.... असो.

बास का राव

मी नागपुरी वडाभाताबद्दल नाही तर सध्या चर्चेत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होतो. थोडक्यात पैसे खाणे.

गडकर्‍यांनी विवेकानंदा बद्दल काहीही वाइट म्हणले नाही

गडकरी फक्त उदाहरण देत होते की बुद्धीचा जसा वापर करु तसा माणुस बनतो. चांगला वापर केला तर संत व्हाल, वाईट केला तर दाऊद व्हाल. ह्यात काय चुक आहे?

भारतीय राजकारणी सुद्धा खुप बुद्धीमान आहेत पण त्यांची बुद्धी फक्त स्वार्थ साधण्यात वाया जाते.

मलाही असेच वाटते

कॉंग्रेस ने वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे, आणि मीडियाच्या साथीमुळे तो साध्यही झाला आहे.

भावना दुखावल्या

विवेकानंदांची दाऊदशी तुलना केल्याने आम्हा हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

भावना?

या अशा नाही त्या गोष्टींवरून दुखावल्या जाणार्‍या भावना असतील तर, सुरुळी करा भावनांची!!

भावना

ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्यापैकी किती जणांना कुठलाही संदर्भ न वापरता विवेकानंदांच्या कार्याबद्दल १० ओळी बोलता येतील ?

हम्म.

नाही.नक्कीच सांगता येणार नाही.परंतु स्वामी विवेकानंदांची तुलना दाऊदशी करता येत नाही याची समज जरूर आहे.

 
^ वर