एकच आडनाव असणार्‍या दोन व्यक्ति लग्न करू शकतात का ??

माझे एका मुलीवर प्रेम आहे...आणि मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगून टाकल्या आहेत... ती माझ्याशी लग्न कारला तयार आहे पण समस्या एकच आहे की आमच्या दोघांचे आडनाव सारखेच आहे...माझ्या घरी काही समस्या येणार नाही पण तिने तिच्या घरी विचारावे म्हणून सहज याबद्दल विचारलं तर घरून तिला अस उत्तर मिळाले की "आडनाव सारखेच आहे, तुमचे लग्न होऊ शकत नाही " कारण काय तर तुम्ही भाऊ बहीण लागता म्हणे... तस पहिलं तर आमच्या कुटुंबाचे आणि तिच्या कुटुंबाचे दूर दूर पर्यन्त संबंध नाहीत ... आम्ही मूळ सांगलीचे आणि ते मूळ नागपुरचे.... असं कसं होऊ शकता कृपया कोणी मला मदत करू शकेल का इथे याबद्दल???? पालकांच्या सामाजिक हट्टा पुढे आम्ही नमते घेऊ का??

आडनाव सारखेच आहे ही काही समस्या होऊ शकते का???? वरुन काही एक संबंध नसताना आम्हाला भाऊ बहीन समजतात ते..

कृपया मला मदतीची अपेक्षा आहे.... तिच्या पालकांना कसं समजाऊ मी ????

लेखनविषय: दुवे:

Comments

खाप पंचायत

इथेही खाप पंचायत अवतरली का?
आडनाव एक असले तर जात आणि गोत्र एकच असण्याचा संभव असतो. जात एक निघाली तर उत्तमच,पण पुढे गोत्रही एकच निघाले तर मात्र प्रश्न येईल कारण शास्त्रास सगोत्रविवाह मान्य नाही. तुम्ही सांगता तसे तुमचे नातेसंबंध जवळजवळ नाहीतच, असले तरी अति-अतिदूरचे, तेव्हा वडीलधार्‍यांनी सुज्ञपणाने लग्नास संमती देणे योग्य ठरले असते.

पंचायतच म्हणायची आमची

आपला प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.... नेमके वर्णन तुम्ही थोडक्यात केले आहे.. आणि जवळच्या नातेसंबंधाचा प्रश्न येतच नाही...गोत्र सुद्धा एक असण्याचा प्रश्न येत नाही बहुतेक... धन्यवाद राही

माफ करा,

जात एक निघाली तर उत्तमच,पण पुढे गोत्रही एकच निघाले तर मात्र प्रश्न येईल कारण शास्त्रास सगोत्रविवाह मान्य नाही.

आपणास धर्मशास्रास असे म्हणावयाचे आहे काय?

होय

शास्त्रे-पुराणे, शास्त्री-पंडित, शास्त्राधार इ. शब्दांमधून जे शास्त्र दिसते,तेच मला अभिप्रेत आहे. शास्त्र या शब्दाला विज्ञान,सायन्स हा अर्थ अगदी अलीकडे,गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत- जेव्हा आधुनिक अशा वैद्यक,रसायन,भौतिकादि विज्ञानाशी लोकांचा परिचय वाढला, तेव्हा चिकटलेला आहे. त्याआधी शेकडो वर्षे शास्त्र हा शब्द धर्म,नीती,न्याय इ.शी संबंधित अर्थाने वापरला जात होता. उपरोल्लेखित वाक्यात संदर्भाने हा अर्थ सूचित/स्थापित होतो असे वाटते.

नमस्कार पवन

दोघांचही रक्त (रक्तगटासाठी आणि इतर व्याधींसाठी) तपासून घ्या. काही समस्या नसेल आणि तुम्ही दोघं सज्ञान असाल तर खुषाल लग्न करू शकता.

खूपदा इतर कारण तोंडावर सांगून अपमान करण्यापेक्षा वडीलधारी मंडळी अशी कारणे पुढे करतात हा अनुभव आहे. त्यामुळे विरोध करण्यासाठी वेगळं काही कारण नाहीना याची (प्रेयसीला विचारून) खात्री करून घ्या. विरोध असण्याची खूप कारणं असू शकतात. पण मोठ्यामंडळीसाठी शारिरीक कारणं (उदा. व्यक्तीमत्व रुबाबदार नसणं, खूप बारीक किंवा खूप जाड असणं, रंग काळा असणं, टक्कल असणं, उंची कमी असणं, चश्मा असणं, तोतरेपणा वगैरे) सहसा नसतात व आर्थिक कारण असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुमच्या प्रेयसीने जर अ‍ॅरेंज मॅरेजच्या बाजारात उडी मारली तर (पार्डन माय लँग्वेज) तीच्या अ‍ॅसॅट्स नुसार तीला तुमच्यापेक्षा चांगला (दिसायला चांगला, पगार आणि शिक्षण जास्त, नोकरी चांगली वगैरे) नवरा मिळेल असं तुम्हाला वाटतं का? याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न कर. त्यानुसार पुढचा सल्ला देइन.

-तुझाच दादा :)

नमस्कार दादा.

*****रक्त गटाबद्दल नक्कीच आम्ही पुन्हा एकदा शहानिशा करू.... पण त्याचा (रक्त गट)काय नियम आहे तो मला समजेल का आपणाकडून ????? *****

सज्ञान तर आहोतच (अभियांत्रिकी शिकत आहोत...)
त्यामुळे विरोध करण्यासाठी वेगळं काही कारण नाही याची (प्रेयसीला विचारून) खात्री करून घेतली आहे... कारण फक्त एकच आहे -पालकांची असणारी भूमिका

तीच्या अ‍ॅसॅट्स नुसार तीला तुमच्यापेक्षा चांगला (दिसायला चांगला, पगार आणि शिक्षण जास्त, नोकरी चांगली वगैरे) नवरा मिळेल असं तुम्हाला वाटतं का?--- मुळीच नाही

मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे

अच्छा...

खात्री करून घेतली आहे... कारण फक्त एकच आहे -पालकांची असणारी भूमिका

मग फिकर नॉट.

तीच्या अ‍ॅसॅट्स नुसार तीला तुमच्यापेक्षा चांगला (दिसायला चांगला, पगार आणि शिक्षण जास्त, नोकरी चांगली वगैरे) नवरा मिळेल असं तुम्हाला वाटतं का?--- मुळीच नाही

हम्म. आजवरच्या बघितलेल्या असंख्य उदाहरणावरून बहुतेकवेळी प्रेमविवाहामध्ये पुरुष (निव्वळ व्यावहारिक पातळीवरून विचार करायचं झाल्यास) घाट्यातच असतो. ;)

बाकी "अ सक्सेसफुल मॅरिएज इज वेन बोथ दी पार्टनर्स फील दॅट दे हॅव गॉट बेटर स्पाउस दॅन वॉट दे डिजर्व" असं काहिसं वाचल्याचं स्मरते. आणि रक्तगटाबद्दल वगैरे खाली काहींनी सांगितलच आहे. त्यामुळे तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा देउन मी माझे एकसष्ठ शब्द संपवतो. जै हिंद.

धन्यवाद दादा

अ सक्सेसफुल मॅरिएज इज वेन बोथ दी पार्टनर्स फील दॅट दे हॅव गॉट बेटर स्पाउस दॅन वॉट दे डिजर्व
खूप छान लिहिले ज्यांनी कुणी लिहिले....

असो

आपल्या शुभेच्छा आमच्या साठी महत्वाच्या आहेत.... जो काही अति उत्तम प्रतिसाद दिलात त्याबदल पुन्हा एकदा मनापासून
धन्यवाद....

रक्तगटासंबंधी.

अनेक ठिकाणी रक्तगटाविषयी लिहून लिहून टंकाळा आलाय.
म्हणून, थोडक्यात,

लग्नाआधी रक्तगट 'जुळतात' का हे पाहून काडीचाही फरक पडत नाही.
आर.एच. निगेटिव्ह फीमेल असेल, व तुमचा आर.एच. + असेल, तर तिला बाळंतपणाच्या वेळी एक इंजेक्शन जास्त घ्यावे लागेल. त्याचे काय हजार पांचशे जास्त खर्च होतील इतकेच त्यात अडचणीचे आहे. खूप रेअर परिस्थितीत गुंतागुंत उद्भवू शकते, पण मग ती इतरही ला़खो कारणांनी उद्भवू शकते.

रक्तच तपासायचे असेल, तर एड्स नाही ना? यासाठी तपासावे.

किंवा, आम्ही पत्रिका बित्रिका पहात नाही बै. फक्त रक्तगट तपासणी केली. असं आम्ही बै मॉडर्न हे सांगण्यासाठी, तपासावा.

बाकी दादांशी बाडिस.
(सदर लेखक आधुनिक वैद्यकशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, वैद्यक व्यावसायीक आहेत)

टायटल

आडनाव जर टायटल किंवा व्यवसाय (जोशी/पाटील/देशमुख/कुळकर्णी/भोई/सुतार/कुंभार) स्वरूपाचं असेल तर ते एक असणे याला काही अर्थ नाही.

बाकी इतरांनी सांगितलं आहेच.

उत्तर भारतीय

उत्तर भारतीय लोकांत हे असे काहीसे चालते म्हणे. "मेहरा" आडनावाची माझी एक पंजाबी मैत्रिण सांगे की सर्व मेहरा आडनावाचे लोक आमचे बंधू असल्याने समान आडनावाच्या लोकांशी आम्ही लग्न करत नाही तर "देसाय"/देसाई आडनावाचे गुजराथी फक्त त्याच आडनावाच्या लोकांशी "सहसा" लग्न करतात.

बाकी, या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. ही केवळ कारणे आहेत.

महाराष्ट्र

धन्यवाद प्रियाली ...

काही टिप्स

>> कृपया मला मदतीची अपेक्षा आहे.... तिच्या पालकांना कसं समजाऊ मी ????

माझ्या मते याबाबत थेट मदत कोणीही करू शकणार नाही. पण मी काही टिप्स देऊ शकतो ज्या कदाचित आवडतील.
लग्नाबाबत थोडे थांबलं तर उत्तम. आधी तुम्ही दोघ एकमेकावारच प्रेम पुरेसे परिपक्व होऊ द्यात. सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करा आणि तुम्हाला एकमेकांची साथ नक्की हवी आहे हा विचार पक्का करा. पालकांशी बोलत राहा. त्यांना विचार करायला वेळ द्या. कुठल्याही परिस्थितीत संवाद थांबवू किंवा बिघडवू नका.

केवळ आडनाव सारखे आहे म्हणून तुम्ही भाऊ बहीण आहात याला कोणताही शास्त्रीय (वैज्ञानिक) आधार नाही. जनुकीयरित्या एकाच आडनावाचे लोक खूप वेगळे किंवा वेगळ्या आडनावाचे / जात्तीचे लोक खूप सारखे असू शकतात. सध्याच्या वैज्ञानिक आकलनानुसार फक्त रक्तगट महत्वाचा असतो. विशिष्ट परिस्थितीत रक्तगट होणार्या संततीवर परिणाम करू शकतात. याबद्दलची माहिती तुम्ही डॉक्टरांकडून मिळवा.

वेळेनुसार गोष्टी बदलत राहतात आणि विरोध योग्य नसेल तर तो गळून पडतो. त्यामुळे शांत आणि समंजसपाने मार्ग काढा.

नक्कीच

नक्कीच आपण ज्या टिप्स दिल्या त्या आवडल्या.... आम्ही अजून किमान ५ वर्षे तरी थंबाणारच आहोत... तोपर्यंत तिच्या पालकांच्या मनात थोड्या पार प्रमाणात अप्रत्यक्षरीत्या सहमति मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करीन... आणि आपण जे राक्त्गताबद्दल नमूद केलेत त्याबद्दल आम्ही नक्कीच पुन्हा एकदा शहानिशा करू... आपल्या प्रतिसदाबद्द्ल धन्यवाद... आपली कृपा अशीच आमच्यावर राहुद्या.

लग्न हे संततीसाठीच?

मुळात लग्न हे केवळ संततीसाठीच करायचे आहे काय?
नसल्यास हे गोत्र, रक्तगट, आडनाव, नाव, जात वगैरे कशानेही काय फरक पडतो?

जर त्या व्यक्तीबरोबर कायम एकत्र रहायचे असेल - त्यात अनंद मिळत असेल - तर लग्न म्हणताच केवळ या बाबींनाच प्राधान्य का?

त्यापेक्षा तुमचा स्वभाव व त्या व्यक्तीचा स्वभाव किती 'कंपॅटिबल' आहे. आजचा प्रियकर म्हणून कोणतीही जबाबदारी नसताना तुमचे प्रम उद्याच्या मिरच्या-कोथिंबिर जगात एक जबाबदार नवरा म्हणून कितपत निभावू शकाल (आनि व्हायसेव्हर्सा) वगैरे बाबींवर लग्नाचा निर्णय घ्यावा हे सुचवतो

लग्नच कशाला?

मुळात लग्न हे केवळ संततीसाठीच करायचे आहे काय?
नसल्यास हे गोत्र, रक्तगट, आडनाव, नाव, जात वगैरे कशानेही काय फरक पडतो?

जर लग्न संततीसाठी करायचेच नाही तर मग कशासाठी करायचे ते नक्की ठरवा. उगाच एक पुरुष म्हणून कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापेक्षा आणि संतती होऊन पुढे जास्त क्लिष्ट प्रश्न उभे करायचे नसल्यास लिव्ह ईनचा विचार करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच खुष ठेवता येईल. प्रेयसीला साथ मिळेल, भाऊ बहिण समजत असतील तर आयुष्यभर बहिणीची सुरक्षा करतो आहे असे समजुन जगा असे पालकांना सांगता येईल, आणि पटलेच नाही तर वेगळा निर्णय घेता येईल.
मुळात तुम्हाला प्रेम म्हणजे काय करायचे आहे ते ठरवा? मग लग्नाची गरज आहे का ठरवा? मग लग्ना नंतरच्या गरजांचा आणि बाटून घ्यायच्या जबाबदार्‍यांचा विचार करा. हे विषय सध्या तुमच्या दोघांच्या सुद्धा डोक्यात नसतील तर तुमच्या पालकांना त्यांचे अनुभव विचारा.
जर त्या व्यक्तीबरोबर कायम एकत्र रहायचे असेल - त्यात अनंद मिळत असेल - तर लग्न करायलाच हवे का याचा विचार करा?

+१

सुंदर प्रतिसाद.

सहमत आहे.

लग्न संततीसाठीच (संततीला औरसत्व प्रदान करण्यासाठीच) करायचे अशी लग्नामागची मूळ कल्पना आहे. इतर कोणत्याही गोष्टीसाठी लग्नाची आवश्यकता नसते.

-१ संतती हा परिणाम हेतू नव्हे!

संतती हा हेतू नसून परिणाम आहे.

संतती झाली नाही / नको असेल तरीही लग्न करणे कायद्याच्या दृष्टिने गरजेचे असते. कारण लग्न न करता जोडीदाराच्या संपत्तीवर नैसर्गिक अधिकार मिळत नाही.

माझ्यामते संपत्तीचे नैसर्गिक वाटप हा लग्नामागचा मुळ हेतू आहे. जर आपल्या जोडीदाराच्या संपत्तीवर नैसर्गिक हक्क नको असेल तर मग लग्नाचे कारण उरत नाही.

लग्न न करताही झालेल्या अपत्याला संपत्तीवर हक्क सांगता येतो (उगाच का तिवारीची केस गाजतेय ;) ). काही राज्यांचा अपवाद वगळता तसा हक्क बिनलग्नाच्या जोडीदाराकडे नाही.

हेतु?

संतती हा परिणाम दिसायला हेतू काय असावा? कि असाच एक निर्हेतुक प्रयोग होऊन परिणाम हवा असुदेत अथवा नसुदेत असा येतो? सध्याच्या चर्चेचा मुद्दा पवनला लग्न का करायचे हा आहे? संपत्तीसाठी संतती झालीच पाहिजे असे कुठे आहे? दत्तक घेऊन सुद्धा संपत्तीचा प्रश्न सोडवता येतो.
बाय द वे, तिवारींचे लग्न झाले आहे. तुम्हाला लग्नाच्या बायको पासून झालेले अपत्य म्हणायचे आहे का?
या चर्चेत, पपा (पवन आणि पायल) अजुन शिकत आहेत. सध्या त्यांची काही एक कमाई नाही हे मी गृहित धरतो आहे. त्यामुळे येथे सध्यातरी संपत्तीचा मुद्दा निकाली निघतो आहे असे वाटते. त्या बद्दल पपानी येथे स्पष्टीकरण दिल्यास जास्त मुद्देसुद चर्चा करता येईल.

बापरे....

तुम्ही प्रतिसाद देणारे सर्वजण खरच खूप विद्वान आणि उच्चशिक्षित लोक आहात हो इथे ..... तुमच्या सारख मला नाही बोलता येत त्याबद्दल क्षमस्व.. पण आपण विचारलेला मुद्देसूद प्रश्न म्हणजे की पवनला लग्न का करायचे हा आहे? ... तर उत्तर अस की माझे तिच्यावर खूप प्रेम आहे ('तसले' आकर्षण नाही हं)... तिचा स्वभाव चांगला आहे , मनमिळाऊ आहे आमची आज पर्यन्त कित्येक वेळा भांडण झाली आहेत पण तरीसुद्धा आम्ही एक मेकांशीवय नाही राहू शकत.. भांडणे तात्पुरत्या वेळेपूरीच असतात आमची ... परत तिच मला समजवते की आपला कुठं चुकल,, का चुकलं वगेरे वगेरे... या सर्व चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन मला या मुलीशी लग्न करायला आवडेल आणि मी फक्त तिच्याशीच लग्न करायला तयार आहे . बाकी कोणाशीही नाही.. असो.

(यामध्ये संपत्तीसाठी संतती हा मुद्दा निकाली काढला तरी चालेल... )

---------- व्याकरणात काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व

प्रेम आणि लग्न

पवन, स्पष्टच सांगायच तर लग्नाचा विचार करण्या एवढा तु अजुन मोठा नाही झालास. तुमच्या पालकांना हेच तुम्हाला प्रत्यक्षपणे सांगायचे आहे. तु ज्याला प्रेम म्हणतो आहेस ती किती जुने आहे? मला वाटतं कि तुम्ही दोघांनी मिळून आयुष्यात काय बनायचं आहे, करायचं आहे ते ठरवा. पहिला ते मिळवा. ते मिळवताना जे काही करावं लागणार आहे तितकी वर्षे थांबा आणि मग तोवर तुमचे प्रेम टिकलेच, असले तसले कसले ही तर मग लग्नाची चर्चा कर. नाहितर हा विषय लोकांना चघळायला चांगला आहे.

नवी माहिती

आमच्या मते लग्न हि स्त्री-पुरुष शारीरिक संबंधाना समाजाने दिलेली स्वीकृती आहे. जर केवळ संतती साठी लग्न करायचे हि सर्वमान्य बाब असेल तर मग लग्नाशिवाय च्या नात्याला सर्वत्र नाके का मुरडली जातात? आणि विविध माध्यमातून/वर्तमानपत्रातून "काकू" किंवा "काका" लोक उगाच "हितोपदेश" का करतात? (यात लोकांना तुमचे प्रेम अयशस्वी ठरले तर काय अशी भीती घालणे हा प्रकार यशस्वीरीत्या वापरला जातो.)

ज्या दिवशी भारतीय समाज या गोष्टीना [प्रेमाला आणि ते व्यक्त करण्याच्या पद्धतीला ;-) ] खुलेपणाने स्वीकारेल तो सुदिन म्हणावा.

रजा घेतो!

संततीसाठीच लग्न करायचे या मानसिकतेतूनच सगोत्र विवाहाला परवानगी नाकारण्यापासून ते काही कारणाने मूल होउ न शकणार्‍या जोडप्यांना होणारा -दिला जाणारा- भयंकर मानसिक त्रास जन्म घेतो.

तूर्तास इतकेच म्हणतो.. आणि या धाग्यावर रजा घेतो!

आय अ‍ॅम सॉरी

संततीसाठी लग्न हा मुद्दा मी ठासून मांडला होता म्हणून हे स्पष्टीकरण.

लग्नातून झालेल्या संततीलाच प्रॉपर्टीत हक्क हा दृष्टीकोन होता. संततीसाठी लग्न नाही करायचे.... संतती लग्न न करताही होते. ती औरस ठरावी म्हणून लग्न करायचे.

जेव्हा लग्न सिस्टिम सुरू झाली तेव्हा बायकोला मालमत्तेत वाटा ही संकल्पनाच नव्हती. प्रॉपर्टी संक्रमित व्हायची ती (पुरुष) संतती कडेच.

ज्या समाजात मालमत्तेचे अवडंबर नसते (उदा आदिवासी, भटक्या जमाती) त्या समाजात लग्नाचेही (औरसत्वाचेही) अवडंबर नसते.

[प्रेम जिव्हाळा या लग्नसंस्थेला चिकटलेल्या आनुषंगिक बाबी आहेत. जोडीदारांत प्रेम नाही म्हणून लग्न नाही/रद्दबातल, औरसत्व रद्दबातल, संपत्ती संक्रमण रद्दबातल अशी लग्नव्यवस्थेची संकल्पना नाही].

लोकसंख्या

भारतीय समाजाने प्रेम आणि प्रेम व्यक्त करण्याच्या विशिष्ट पद्धतीला मनापासून स्वीकारल्यानेच लोकसंख्या दणदणीत वाढली आहे.

पवन,

एक प्रश्न विचारतो, तुमचे व भावना या दोघांचे सध्या वय वर्षे किती आहे? कॉलेजच्या कितव्या वर्षाला आहात?

नमस्कार सर

माझे वय 20 वर्षे आहे आणि तिचे ( पायल ) वय 19 वर्षे आहे.... !!! मी यंत्र अभियांत्रिकी च्या तिसर्‍या वर्षी आहे आणि ती दुसर्‍या वर्षी (सीए)

हं.

आपल्या वयाला अनुसरून आपल्याला पडलेले प्रश्न योग्य आहेत, पण सेम आडनावाचा बागुलबुवा वडीलधार्‍यांनी मुद्दाम उभा केलेला दिसतो आहे. आडनावाने काडीचाही फरक पडत नाही, जेनेटिक आजारांचा संबंध जोडला तरी सगोत्र = कॉन्सॅन्ग्युनस असे नाही.

पण स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न बिग्न दूरच्या गोष्टी आहेत हे ध्यानी घ्या, आमच्या काळी सज्ञान व्हायचे वय २१ वर्षे असे ;)
तुम्ही अजून ५ वर्षे थांबू म्हणत आहात, पण आधी विंजिनेर व्हा. मग पोस्ट ग्रॅज्युएशन, नोकरी इ. बघा, मगच लग्नाचा विचार करा. ५ वर्षे कमी पडतील असे वाटते. २७-२८ हे सहसा योग्य वय होते आजकाल.

ह्या हिशोबाने तुमच्या भरधाव निघालेल्या प्रेमरथाला ती आडनावाची मोगरी लावली गेलेली दिसते आहे.

(तुमची आयडी पाहून तुमचे नांव पवन अन तिचे भावना असेल असे वाटले होते, तो अंदाज चुकलेला दिसतो.)

:)

आपण दिलेल्या प्रतिसादाचा मी नक्कीच विचार करीन ... आपण म्हणता तसे मी आतापासूनच लग्नाचा विचार करायला नाही पाहिजे... तुम्ही म्हणता तसे मी आधी विंजेनर होतो , नंतर पोस्ट ग्रॅजुएशन , नोकरी आणि नंतर लग्नाचा विचार करीन... तोपर्यंत आम्ही काहीतरी उत्तुंग यश मिळवण्यात आणि अभ्यासात लक्षं देण्यात प्रयत्नशील राहतो .. नंतर काय मोगरी लावूदेत नाहीतर नाकाबंदी करूदेत.. आमची इच्छा पूर्णा होऊन जाईल.

(अंदाज जरी चुकला असला तरी भावना मात्र ओळखल्यात त्याबद्दल शंकाच नाही )

आपल्या प्रतिसदाबद्दल धन्यवाद सर..

प्यार किया तो डरना क्या

अहो पवनराव 'गर्जेल तो पडेल काय?'
अशी तुम्ही चर्चा वगैरे करुन काही होत नाही? .रच्यांना या चर्चेचा दुवा पाठवून त्यांनाच चर्चा करु द्या. आणि करुन टाका भावनाताईंशी लग्न.

दक्षिणा

एखाद्या ज्योतिषाला दक्षिणा कम लाच द्या. तो घरच्यांना सांगेन कि सगोत्र विवाह नाही. तसेच पत्रिका जुळते आहे असे ही सांगेल. नाही तर पत्रिका हा मोठा अडथळा घरचे उभे करतील.

बिन्धास्त करा लग्न

अनामिक,

अजिबात न घाबरता बिन्धास्त लग्न करा. एक आड्नाव किंवा एक गोत्र असल्यामुळे काहिहि होत नाही.
संतती ला सुद्धा काही problem नाही.

 
^ वर