मंत्र विज्ञान
मंत्र विज्ञान
सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे ,अनेक भक्त सप्तशती/देवीच्या मंत्रांचे जप,/हवन,//पाठ करतात
आस्तिक दृष्टीकोनातून विचार केल्यास मंत्र-विज्ञानाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असे मिळू शकेल ---=
१. मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो
२. ब्रेनवेव्ह साऊंड थेरपी नुसार विशिष्ट ध्वनिलहरी वर मन एकाग्र झाल्यास मेंदूच्या अवस्था बदलतात ,
म्हणजे १-४ हर्ट्झ डेल्टा,/ ५- ८ हर्ट्झ थिटा / ९-१२ हर्ट्झ अल्फा /१३-१६ हर्ट्झ बीटा .........इ.या मेंदूच्या अवस्थांचा मूड्स आणि स्वभावाशी जवळचा संबंध आहे .
३. मंत्र निर्माण करताना वरील ध्वनिलहरी शास्त्र /स्पंदन शक्ती आणि त्याचा मेंदूवरील परिणाम याचा अभ्यास केला गेलेला असावा.
५. मंत्राजपा बरोबरच संकल्प आणि उद्देश यांचाही विचार होतो. मंत्रजपा नंतर मन अधिक शक्तिशाली/ शांत व सूक्ष्म होते असा अनुभव आहे ,अशा सूक्ष्म मनाने ईश्वरी शक्तीशी लवकर तादात्म्य /तल्लीनता//तद्रूपता होऊ शकते .
६. सूक्ष्म आणि शक्तिमान मनातून निघणारे विचार प्रत्यक्षात येण्याची शक्यता जास्त असते ,संदर्भ -C W LEADBEATER- THOUGHT POWER
७. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मंत्रशक्तीचे दिव्य अनुभव येत असावेत ,असं माझा कयास आहे, अधिक सखोल आणि सर्वंकष शास्त्रीय संशोधन होण्याची आवश्यकता आहे .
Comments
संकल्पना
काही संकल्पनांचे अर्थ येथील सामान्य वाचकांसाठी स्पष्ट करणे गरजेचे आहे. दोन व्यक्ती संवाद करतात तेव्हा दोघांनाही शब्दांचे अर्थ समानच अभिप्रेत असले तर संवाद सुकर होतो.
उदा. १. तरल असा सूक्ष्म देह २. मन सूक्ष्म होणे
>>मंत्र निर्माण करताना वरील ध्वनिलहरी शास्त्र /स्पंदन शक्ती आणि त्याचा मेंदूवरील परिणाम याचा अभ्यास केला गेलेला असावा
शक्यता अगदीच नाकारता येत नाही. परंतु एका निरीक्षणाचे स्पष्टीकरण मिळाले तर बरे होईल. बहुतेक मंत्र हे केवळ काही ध्वनी लहरी नसतात (उदा. ओम, र्हीम, क्लीम). बहुतेक सर्व मंत्रांना संस्कृत किंवा कुठच्या तरी भाषेत काहीतरी अर्थ असतो. कधी ते मंत्र म्हणजे देवाची स्तुती असते (त्वं प्रत्यक्षं ब्रह्मा_सि- अथर्वशीर्ष) तर कधी ते कशाची तरी मागणी करणारी प्रार्थना करत असतात (शुभंकरोति कल्याणम). ध्वनीलहरी/स्पंदने हा जर त्यांचा पाया असेल तर बहुसंख्य मंत्रांना काही लौकिक अर्थ असू नये. (बहुतांश मंत्र भाषिक दृष्ट्या अर्थहीन स्वरांची/अक्षरांची मालिका असायला हवी).
(शंकेखोर) नितिन थत्ते
प्रभावी मंत्र
एक प्रभावी मंत्र आहे. नास्तिकांना देखील त्या मंत्राचा फायदा होतो. तुम्हाला आत्यंतिक राग येतो तेव्हा तुम्ही १ ते १० अंक सावकाश म्हणा. अनेक वेळा म्हणल्यास अधिक प्रभावी. रागाच्या भरात एखादी आतताई कृती होण्यापासून हा मंत्र तुमचा बचाव करतो.
ध्वनी आणि भावना
ध्वनी लहरी आणि भावना या बद्दल एक निरिक्षण वाचले होते. त्यात वरुन एक प्रश्न पडला.
दोन माणसे प्रेमळ संवाद करताना शक्यतो कमी आवाजात करतात आणि भांडताना जोरजोरात. दोघांमधेल अंतर दोन्ही प्रसंगांमध्ये तेच असेल तर आणि ऐकण्याची क्षमता तीच असेल तर आवाजात बदल का?
गृहितक चुकले.
ऐकण्याची क्षमता तीच नसते.
भांडताना मनाची कवाडे बंद असतात. त्यामुळे समोरच्याच्या डोस्क्यात घुसवण्यासाठी घसा खरवडून ओरडले तरच घुसेल असे वाटत रहाते. (बहिरा माणूस जोरात बोलतो, तसे) या उलट, प्रेमळ कूजनात नुसते कानच नव्हे, सर्वांग 'रिसेप्टिव्ह' झालेले असते. सबब, कुजबुजणेच नव्हे, तर मनातले विचारही समोरच्याला 'ऑपॉप' कळतात.
-(अनुभवी) इब्लिस.
विज्ञान
विज्ञान त्यालाच म्हणतात ज्याचा पुन्हा पुन्हा आणि सार्वत्रिक प्रत्यय येऊ शकतो. आपण जेंव्हा मंत्र विज्ञान म्हणता तेंव्हा या "विज्ञानाचा" प्रत्यय प्रत्येक व्यक्तीवर आणि प्रत्येक वेळी दिसायला हवा.
माझी खात्री आहे कि हे शक्य नाही. प्रय्योगासाठी १० व्यक्ती निवडल्या तर कदाचित त्यातील चार व्यक्तींना प्रत्यय येईल, चार जण लोक लाजेस्तव प्रत्यय आला असे म्हणतील - पण दोघांना मात्र अपेक्षित परिणाम जानवणार नाही. उदा. - मी मध्ये वेगवेगळ्या भाषेतील प्रार्थना ऐकत होतो. जरी त्या सर्वसाधारणपणे सौम्य आणि तालयुक्त असल्या तरी काही भाषांची सवय नसल्याने मला त्या कर्णकटू वाटल्या.
माझ्या मते भारतीय भाषा याला अपवाद नसाव्यात.
भंपक पणा
हा शुद्ध भंपक पणा आहे. so called मंत्र जेव्हा तयार केले तेंव्हा काय शास्त्रीय ज्ञान होते?
तसे काय आवडते संगीत अॅकले तरी चांगले च वाटते. त्यात विषेश ते काय?
ध्वनिलहरी
इथे १- ४ Hz, 5-8 Hz, 9-12 Hz आणि 13 -16 Hz असे बँड्स अभिप्रेत आहेत का? आणि मग ही डेल्टा, थिटा, अल्फा, बीटा प्रकरणे नक्की काय आहेत?
पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल, तर हे बँड्स नक्की कुठल्या धर्तीवर ठरवले गेले आहेत?
मानवी कानास २० Hz च्या खाली ऐकू येत नाही. तेव्हा त्यापेक्षा कमी कंपनलहरीं कुणी मानवाने उच्चाराव्यात कशा? आणि त्या बरोबर उच्चारल्या गेल्या आहेत हे त्याच व्यक्तिस, तसेच ते ऐकणार्या व्यक्तिसही कळावेच कसे? (हे सगळे विज्ञानाच्या पलिकडचे आहे, असे समजल्यास प्रश्नच मिटला).
अहो,
त्यांनी उगा क्ष य ज्ञ वगैरे वारंवारीतेच्या ध्वनींची उदाहरणे देऊन मग पुढे म्हटले आहे त्यांना जे म्हणायचे ते. संदर्भासहित घ्या की ते. ते अमुक तमुक शुद्ध ध्वनी, त्यांच्यात काही चमत्कारी शक्ती असलीही, तरी जसेच्यातसे पुन्हा उत्पन्न करणे मानवी घशास शक्य आहे का? असे ते म्हणताहेत.
ईईजी उर्फ एलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफ
मंत्रातंत्राने मेंदूवर काही परिणाम होतो का ते प्रयोग करून ठरवावे लागेल.
पण तुमच्या -
-या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. ईईजी उर्फ एलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफ या मेंदूतील विचारप्रक्रियेने निर्माण झालेल्या विद्युततरंगांना बाह्य इलेक्ट्रोडमधून अंकित करण्याच्या प्रक्रियेत जे तरंग मिळतात त्यांना त्यांच्या तरंगवारंवारितेनुसार (कंप्रतेनुसार) ही नावे दिलेली आहेत. मनुष्य आनंदात/शांतीचा अनुभव घेताना/रिलॅक्स असताना/डोळे मिटलेले पण जागृत असताना - त्याच्या मेंदूत (प्रामुख्याने ऑक्सिपीटल इलेक्ट्रोड्स ओ१/ओ२) अल्फा तरंग निर्माण होतात. तर मेंदू कार्यरत असताना बीटा आणि त्यापेक्षा जास्त कंप्रतेचे गॅमा तरंग निर्माण होतात. इ.इ. माहिती इथे
तरंग कशाचे?
हे जे तरंग निर्माण होतात ते ध्वनीचे असतात की इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतात?