जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४

भाग ३ मध्ये खालील प्रतिसाद दिला होता. तोच इथे लेख म्हणून प्रसिद्ध करत आहे.

मोहन भागवत

देशभरातील जनता दिल्ली-बलात्कार गुन्ह्याने संतप्त आणि हतबुद्ध झाली आहे. या परिस्थितीत मोहन भागवत या संघिष्ठ सरसंघचालकांनी बलात्काराच्या घटना या भारतात होत नसून इंडियात होत आहेत असे हास्यास्पद विधान केले आहे. मोहन भागवत यांनी एकदा महाभारत वाचावे म्हणजे द्रौपदी ही भारतालीच होती (इंडियातली नव्हती) हे त्यांना समजून येईल. या महाशयांना ग्रामीण भारतात स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची काहीच कल्पना नसावी हे आश्चर्यकारक आहे. भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणेच या व विधानाचा निषेध न करता मीडियाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे ही नेहमीची टिमकी वाजवली आहे.

इंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ३

रेल्वे, एनर्जी आणि पेन्शन

इंग्लंड वास्तव्यातले अनुभव-भाग २

काही काही अनुभव विलक्षण असतात. फार खोलवर परिणाम करून जातात. आज १२-१३ वर्षे झाली संगणक क्षेत्रात काम करून. इतकी वर्षे झाल्याने आणि बऱ्यापैकी टेक्निकाल आणि त्यातून प्रोडक्ट वाल्या कंपनी मध्ये काम केल्याने भलताच अहंगंड झाला होता. आपल्याला फार कळते आणि आपण फार हुशार आहोत असा की गोड गैरसमज. त्यातून हे गोरे सतत येत जाता कुठल्याही गोष्टीला ब्रीलीयंट, ग्रेट, एक्सलंट ह्याचा असा काही मारा करतात की आपल्याला म्हणजे मुठभर मासच चढते. पुन्हा प्रश्न पडतो की आपण तर असे काही लई भारी काम केले नाही मग इतके का कौतुक. हळूहळू लक्षात आले की ही त्यांची बोली भाषा आहे.

नकाराधिकार

समाजाच्या मानसिकतेत अनेकदा लंबकासारखे बदल घडून ती सतत सर्वोत्तम परिस्थितीच्या दोन्ही बाजूंना झुलती राहू शकते. सध्या बलात्काराच्या विषयावर लंबक वेगाने हलतो आहे. 'बलात्काराची तक्रार करण्याचा आणि शरीरसंबंधास केव्हाही नकार देण्याचा हक्क वेश्येलासुद्धा असतो' हे विधान किमान प्रथमदर्शनीतरी नैसर्गिक न्यायानुसारच वाटते. त्याला थोडा स्पिनः

आज अनेक देशांमध्ये रेप शील्ड कायदे आहेत. बलात्काराची तक्रार करणार्‍या व्यक्तीचे पूर्वायुष्य तपासू नये आणि तिची ओळख लपवावी असे दोन प्रकारचे कायदे लोकप्रिय आहेत. त्यांपैकी, पूर्वायुष्य तपासण्यावरील बंदी अधिक प्रचलित आहे.

गप्पा गणितज्ञाशी! (भाग - १)

डॉ. भास्कर आचार्याबरोबरच्या गप्पा... गणिताच्या!

कदाचित उपशीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल. कोण हा डॉ. भास्कर आचार्य? त्याच्या गप्पातून काय मिळणार? याचा आपल्याशी काय संबंध? मुळात हा कुठल्या विद्यापीठाचा? स्टॅनफोर्ड, ऑक्सफर्ड, हार्वर्डचा की कुठल्यातरी गावठाणातला? त्याच्या नावावर किती पेटंट्स आहेत? खरोखरच तो स्कॉलर आहे का? गूगलवर - लिंकडेनवर त्याच्याबद्दल काय माहिती दिली आहे? ... असे अनेक प्रश्न आपल्याला सुचतील. जरा दमानं घ्या. सगळ सांगतो.

इंग्लंड वस्तव्यातले अनुभव

२००९ ते २०१२ असे तीन वर्ष इंग्लंड देशी वास्तव्य करण्याचा योग आला. एकंदरीत ३ शहरांमध्ये राहिलो. सर्व प्रथम आलो तेंव्हा साहेबाच्या देशात आपला कसा काय टिकाव लागायचा ह्याची चिंता होती. आपले विंग्रजी एकदम मराठोत्भाव त्यामुळे जरा धाक्धुकच होती. सुरवातीला जाम वैताग आला. ह्या गोऱ्या लोकांचे इंग्रजी पण आपल्या मराठी सारखेच कुस बदलते. म्हणजे वेल्श आणि स्कॉटिश लोकांचे इंग्रजी हे लंडन आणि सावुथ मधल्यांपेक्षा फारच वेगळे आहे. कंपनीच्या कामासाठी पहिल्यांदा जेंव्हा ग्लासगोचे विमान पकडले तेंव्हा आपण कुठल्या तरी वेगळ्याच प्रदेशात जात आहोत ह्याची जाणीव झाली. ते लोक काय बोलत होते तेच काही कळत नव्हते.

आपल्या रक्तात काय काय सापडते?

एकादा माणूस लहानपणापासूनच शांत, विनम्र, सरळमार्गी, उदार वगैरे असतो, तर दुसरा एकादा ऊर्मट, धांदरट, अडमुठा, दुष्ट वगैरे असतो. स्वभावातले असले गुणदोष ज्याच्या त्याच्या रक्तातच असतात असे अलंकारिक भाषेत म्हंटले जाते. पण प्रत्यक्षात त्या दोघांचे रक्त प्रयोगशाळेत तपासून पाहिले तर कदाचित ते एकसारखेच निघण्याची शक्यता असते. माणसाच्या रक्तात खरोखर कोणकोणत्या गोष्टी असतात आणि त्या किती प्रमाणात असतात हे आता शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते. त्यातल्या काही मुख्य तपासण्यांबद्दल मला असलेली माहिती या लेखात दिली आहे.

अमानत आणि प्रसार माध्यमे

गेले १३ दिवस दिल्लीस्थित प्रसार माध्यमांना अमानाताच्या बलात्काराचा विषय मिळाला. चांगलेच वातावरण तापवले. ह्या प्रकारची जितकी निंदा करावी तितकी थोडीच आहे. पण काही प्रश्न पडले आहेत. ह्या आधी इतक्या वेळेला ह्या घटना भारतभर घडल्या आणि अजूनही घडतच आहेत मग तेंव्हा ह्या मध्यामानी हा विषय का नाही ताणून धरला. ज्या पद्धतीत बातम्यांचे प्रसारण होत आहे आणि निवेदक ज्या आवाजात बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि काही वेळेला पार्श्वसंगीत ह्याने एक वेगळाच परिणाम जाणवतो असे मला वाटते. ह्याची खरोखर गरज आहे का?

 
^ वर