उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मोहन भागवत
सदस्य
January 5, 2013 - 3:36 am
देशभरातील जनता दिल्ली-बलात्कार गुन्ह्याने संतप्त आणि हतबुद्ध झाली आहे. या परिस्थितीत मोहन भागवत या संघिष्ठ सरसंघचालकांनी बलात्काराच्या घटना या भारतात होत नसून इंडियात होत आहेत असे हास्यास्पद विधान केले आहे. मोहन भागवत यांनी एकदा महाभारत वाचावे म्हणजे द्रौपदी ही भारतालीच होती (इंडियातली नव्हती) हे त्यांना समजून येईल. या महाशयांना ग्रामीण भारतात स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची काहीच कल्पना नसावी हे आश्चर्यकारक आहे. भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणेच या व विधानाचा निषेध न करता मीडियाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे ही नेहमीची टिमकी वाजवली आहे. ग्राऊंड रियॅलिटी बद्दल जेव्हा संघ आणि भाजपाला जाणीव होईल तो सुदिन.
दुवे:
Comments
अजून कसे बोलले नाहीत.
तसा में भा ज पा चा मतदार. पण गेले काही वर्ष ह्या लोकांची डोकी फिरली आहेत असे स्पष्ट मत झाले आहे. हे संघचालक आणि भाजपाचे कोणीतरी अजून कसे विदुषकी बोलले नाहीत हा माझ्या मनात विचार आलाच होता. म्हणजे आधी कोंग्रेस वाल्यांनी मुक्ताफळे उधळली आणि त्यावर कडी साक्षात सरसंघचालकांची केली म्हटल्यावर धन्य जाहलो . ह्या सगळ्या धेंडांना आता घरी बसवायची वेळ आली आहे. ५८/६० व्या वर्षी शासकीय कर्मचारी निवृत्त होतात तसेच ह्या सगळ्या लोकांना ५८-६० व्या वर्षी संसदीय घटने मधून घरी बसवायची सोये करावी बुवा. बाकी संघचालकांना कोण घरी पाठवणार हा प्रश्नच आहे.
काँग्रेस
काँग्रेसवाल्यांनी काय मुक्ताफळे उधळली?
हे घ्या
सत्यनारायण - आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष
http://www.indianexpress.com/news/callous-congress-leader-lashes-out-at-...
अभिजीत मुखर्जी (प्रणवजींचे पुत्र, आणि मेंबर ऑफ पार्लमेंट)
http://india.blogs.nytimes.com/2013/01/03/indian-women-celebrate-dented-...
आणि खरे तर इथे सर्वांचीच मुक्ताफळे मिळतील - तीही वाचा.
http://www.dnaindia.com/india/report_delhi-gang-rape-politician-speak-on...
लाँग लिव इंडिया (किंवा भारत!)
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
द्रौपदी
द्रौपदीवर बलात्कार झाला नव्हता (नाही म्हणून केस विक होत नाही) पण जनता इतकी बिथरली आहे की बलात्कार्यांचा गुणगौरव करू लागली आहे.
फेबुवर मी एक कविता टैप काहीतरी वाचलं त्यात "रावण आमचा भाऊ हवा कारण त्याने आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेतला पण परस्त्रीला भ्रष्ट केले नाही" असे गुणगान होते.
म्हणजे यांना रावणाचे पूर्वी आपल्या सुनेवर केलेल्या बलात्कारामुळे (शापातून) केमिकल कॅस्ट्रेशन झाले होते आणि तो परस्त्रीला हात लावू शकत होता हेच माहित नाही.
किंवा, आधी आपापल्या भावांनी केमिकल कॅस्ट्रेशन करून नपुंसक व्हावे अशी काहीशी इच्छा असावी... नेमके कळले नाही. असो.
द्रौपदी
द्रौपदीचे उदाहरण हे स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारासाठी दिले होते. पतींनी जुगारात पणाला लावणे, रजस्वला असताना दरबारात बोलावणे, वस्त्रहरणाचा प्रयत्न, दुर्योधनाने मांडी दाखवून विनयभंग करणे हे काही त्यास्वरुपाचे प्रसंग. शिवाय हे हिंदूंचे स्वतःचेच महाकाव्य असल्याने संघिष्ठांना प्रिय असावे. शिवाय महाभारताच्या नावात भारत आहे इंडिया नाही. असो.
नाही नाही
ते बरोबरच आहे... पण मी अगदी डायरेक्ट बलात्काऱ्याचे उदाहरण दिले आणि त्याचा उदो उदो चालला आहे असे सागितले. तेही रामायण आणि तेथेही इंडिया नाहीच.
वीट आलाय
बलात्काराच्या बातम्या, चर्चा आणि त्यावर राजकारण्यांची मुक्ताफळे यांचा आता वीट आलाय. एका घटनेचा राजकिय स्वार्थासाठी किती वापर होतो याचे एक उत्तम उदाहरण. पक्ष संघटना कोणतीही असो, काही प्रश्न पडतात ते असे.
पुन्हा मुक्ताफळे
भागवत महोदयांनी पुन्हा तोंड वाजवून अजून मुक्ताफळे उधळली. ह्यांना आता नारळ द्यावा महावास्त्र देवून सत्कार करून वान्प्रस्थाश्रामाला पातःवा बुवा. असे केल्याने कदाचित अर्थात काही लोकांचे किंबहुना मीडीया वाल्यांचे जरा नुकसानच होएईल हो. ह्यांना अशी विनोदी आणि हमखास टी.आर. पी वाढवून देणारी लोक कशी मिळतील मग.
http://ibnlive.in.com/news/women-should-be-just-a-housewife-and-men-an-e...
माध्यम प्रतिनिधींची माफी
या बातमी संदर्भात ट्विटरव्दारे माध्यम प्रतिनिधींनी माफी मागितली आहे...
असो.
ट्वीटर वर का?
माफीच मागायची असेल तर ज्या वृत्तपत्रे किंवा च्यानेलवर हे लोक काम करतात तेथे माफी का नाही मागत? ट्वीटर वर का? ज्याना माफी वगैरे मागायची उपरती झाली आहे त्यांनी हटकून ट्वीटर का निवडलं?
धन्यवाद
धन्यवाद चुकीच्या माहितीवर आधारित असल्याने माझे विधान नक्कीच चुकले. पण वर प्रियाली ह्यांनी म्हटल्याप्रमाणे हा प्रश्न मलाही पडला आहे की हे स्वतःच्या कार्यक्रमात का नाही सांगितले. नजम सेठी ह्या पाकिस्तानी पत्रकाराच्या अनेक कार्यक्रमात तो सरळ सांगतो की ही ही गोष्ट मी चूकीची सांगितली आणि त्याबद्दल माफी मागतो. इतका पळपुटेपणा कशासाठी? पण बहुदा सर्वच ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळतो. चूक कबुल करणे तसे कठीणच असते
तो प्रश्न
तो प्रश्न तुम्हाला आणि मलाच काय पण एका अर्थी पिअर फिटरला पण पडलेला दिसतो आणि त्यामुळेच असल्या माध्यमांची विश्वासार्हता किती मानावी हा पुढचा प्रश्न येतो. खालील ट्विटसंवाद बघितल्यास ते समजेल.
असे दिसते आहे की ही बातमी पिटीआयने आधी दिली. पिअर फिटरच्या एका ट्विटप्रमाणे ज्याने ही खोटी बातमी दिली त्या व्यक्तीस आता काढून टाकण्यात आले आहे. (Pierre Fitter @pierrefitter : @gchellappan when it was investigated, ANI realised he had not sent complete feed. They've fired him. ). पिटिआय ने देखील आता त्या बातमीच्या वर "(Rerun with additional quote)" असे म्हणले आहे पण ती बातमी मिळू शकत नाही. पुर्वीच्या काळात माध्यमांना इतके देखील मान्य करायची गरज नव्हती. पण आताच्या आंतर्जालाच्या, ट्विटर आणि सोशल मेडीयाच्या काळात किमान इतके तरी मान्य करायला लागत आहे, ही नक्कीच सुधारणा आहे. अजून काही दिवसांनी माध्यमांना जाहीर पणे देखील (खोटे बोललो/चुकलो वगैरे) सांगावे लागेल याची खात्री आहे.
राहता राहीले लग्न आणि काँट्रॅक्ट आणि पाश्चत्या... कॉर्नेल विद्यापिठाच्या लॉ डिपार्टमेंटच्या संस्थाळवर खालील माहिती सापडली...
व्याख्या:
The legal union of a couple as spouses. The basic elements of a marriage are: (1) the parties' legal ability to marry each other, (2) mutual consent of the parties, and (3) a marriage contract as required by law.
Overview
In the English common law tradition from which our legal doctrines and concepts have developed, a marriage was a contract based upon a voluntary private agreement by a man and a woman to become husband and wife. Marriage was viewed as the basis of the family unit and vital to the preservation of morals and civilization. Traditionally, the husband had a duty to provide a safe house, pay for necessities such as food and clothing, and live in the house. The wife's obligations were maintaining a home, living in the home, having sexual relations with her husband, and rearing the couple's children. Today, the underlying concept that marriage is a legal contract still remains, but due to changes in society the legal obligations are not the same.
असो.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
काही न उमगलेले
चला, श्री. विकास यांना निदान सागरिका घोष आणि चेतन भगत यांची साक्ष विश्वासार्ह वाटते हे पाहून गदगदून आले.
मग भागवत यांनी विवाहाबाबत नक्की काय म्हटले होते ते कळेल काय? तुम्ही ट्विटरवर माहिती दिलेल्या samvada.org या संकेतस्थळावर जाऊन आलो. तेथे हे दिसले.
RSS senior functionary Ram Madhav has said that Mohan Bhagwat has been misquoted and added that he was referring to western marriages which are based on a contractual system.
हा शोध कोठून लावला हे कळले नाही. पाश्चात्य समाजात बायकांनी घरकाम करावे व नवऱ्याने घराची जबाबदारी उचलावी असा लग्नाचा करार असतो हे माझ्यासाठी नवीनच आहे. ही नवी माहिती दिल्याबद्दल राम माधव यांचे आभार. .
व्यक्तिगत टिप्पणीवजा काही मजकूर संपादित.
आठच्या आत घरात
अशी मुक्ताफळे येतील आणि लवकरच बायकांनी घराबाहेर पडू नका अशी सुचवण झाली तर आश्चर्य नाहीच. ब्लॉगवर एक तुकडा लिहिला होता तो येथे देते.
-------------
"मुलींनी रात्री आठनंतर घराबाहेर पडू नये."
"बरोबर आहे. ही सावधगिरीची सूचना आहे. मुंबई किंवा शिकागो-न्यूयॉर्कच्या वाईट भागांत पुरुषांनीही रात्री बेरात्री एकटे दुकटे फिरू नये. जर कायदा रक्षण करू शकत नसेल तर आपण सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबवायला हवेत."
“हो पण एखाद्या कुप्रसिद्ध एरियात न जाणे आणि राजरोस सर्वत्रच आठनंतर बाहेर न पडण्याची सक्ती येणे यांत काहीतरी फरक आहे ना.”
“असला तरी सावधगिरी बाळगण्यात काही चूक आहे का?”
"खरंय पण मला कॉल सेंटरमध्ये नाइट ड्यूटी असते."
"मग दुसरा जॉब बघ."
"पण माझी मैत्रिण डॉक्टर आहे. तिलाही नाइट शिफ्ट्स असतात."
"हॉस्पिटलने त्यांची रात्री राहण्याची सोय करावी. ते शक्य नसल्यास तिनेही हा जॉब करू नये. सुरक्षितता नाही ना तिथे."
"पण माझी तिसरी मैत्रिण पत्रकार आहे. तिलाही रात्री बेरात्री न्यूज कवर कराव्या लागतात."
"मला वाटतं या परिस्थितीत तिने या जॉबला तिलांजली द्यावी किंवा रात्रीबेरात्री ज्या न्यूज कवर कराव्या लागतात त्यांची जबाबदारी घेऊ नये."
“म्हणजे?”
“पाककृती, फ्याशन, मुलांचे संगोपन, मुलाखती, अनाथाश्रम-वृद्धाश्रमांना भेटी असे विषय तिला कवर करता येतीलच की.”
"पण माझ्या आणखीही मैत्रिणी आहेत. काही आयटीत आहेत. त्याही रात्री बेरात्री प्रोजेक्ट्ची डेडलाईन पूर्ण करतात, एक सिरिअल्समध्ये कामं करते. तिचीही शूटींग्ज दिवसात उशीरा असतात आणि एक तर आयपीएस आहे."
"हो हो पण मी म्हणालो ना आधी की या परिस्थितीत रात्री आठनंतर घराबाहेर पडणे योग्य नाही. मध्यंतरी महिला कॉन्स्टेबल्स सोबत काय झाले होते ते विसरलीस का? स्त्रिया या देशात सुरक्षित नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा काळजी घेतलेली बरी एवढेच मला म्हणायचे आहे."
"म्हणजे रात्री आठनंतर लांडगे रस्त्यांवर फिरतात असे समजायचे?"
" दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झालीये खरी."
"पण मग आता रात्री आठनंतर बायका दिसत नाही म्हटल्यावर लांडगे संध्याकाळी सहालाच सावज शोधायला बाहेर पडले तर? जंगली श्वापदे नाही का... त्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले की रानाबाहेर पडून इतरांवर हल्ले करत... तसेच."
"हम्म! माहित नाही बुवा. मध्ययुगीन पडदापद्धती कशी वाटते? नाही सुरक्षिततेसाठी अशा पर्यायांचाही विचार करून ठेवू सध्या."
“असे असेल तर स्त्रीभ्रूणहत्येचा मार्गच काय वाईट आहे? सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा?”
---------------------------------------
आम्ही सर्व काळजीपोटीच सांगतो आहे म्हणणारे कोठे जाऊन थांबणार कळत नाही. असो.
पुरुषांच्या जगात स्त्रीचे स्थान
पुरूषी नजरेतून सुशिक्षित स्त्री
* अती विद्येने स्त्रिया व्यभिचारी होतील
* स्त्रियांस सोङचिठ्ठी द्यावयाची असेल तरच स्त्री शिक्षणाविषयी अनुमोदन करावे.
* अनेक स्त्रिया करण्याची पुरूषांना आज मोकऴीक आहे. आपल्या हातून कदाचित परद्वारी गमन होते. स्त्रिया शिकल्या की त्या प्रश्न करतील “आम्हांला मोकळीक का नसावी ”
* स्त्रियांस शिकवून भाक-या भाजाव्या काय ?
* स्त्रिया विद्वान झाल्यातर भ्रतार, आप्तपुरूष, वङील माणसे त्यांचा वचक बाळगणार नाहीत.
* स्वंयवर, पुर्नविवाह, पुरषासारखे अधिकार मागणे याकरिता स्त्री बंड करेल.
* बायका शिकू लागल्या तर त्यांचे नवरे मरतात.
* बायकांना शाळेत पाठवले तर पुरुषांच्या दर्शनाने भीड मर्यादा राहणार नाही
* शाळेमध्ये कलावंतीण/हीन जातीच्या संसर्गाने पवित्रता व सदाचार जाईल.
स्त्रियांना शिक्षण देऊ नये यासाठी अट्टाहास करणारे वर उल्लेख केलेले मुद्दे ‘ज्ञान प्रसारक‘ या मराठी मासिकाच्या जानेवारी 1852 च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. यावरुन स्त्रियाबद्दल, स्त्री शिक्षणाबद्दल त्याकाळी व्यक्त होत असलेली घृणा, तिरस्कार यांचा अंदाज येईल. गेल्या दीडशे वर्षात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले आहे. टोकाच्या मतांची धार बोथटली आहे. परंतु पुरुषी मनाच्या कोप-यात यातील अनेक अवशेष अजूनही शिल्लक आहेत. याचा प्रत्यय प्रसार माध्यमाद्वारे आपल्याला पदोपदी येत असतो. पारंपरीक पुरषांना स्त्रीची सतत लाजरी, बुजरी, संकोची, वर मान करुन न बोलणारी अशीच प्रतिमा आवडते. सुशिक्षित, जागृत स्त्री मात्र त्या प्रतिमेला धक्का देत असते. पुरुषांच्या जगात स्त्रीचे नेमके काय स्थान आहे? याविषयी मोठ्या प्रमाणात अभ्यास होत असून वर्तनशास्त्राच्या संशोधकांनी याविषयीच्या अनेक मिथकांचा भांङाफोड केला आहे.
अधिक माहितीसाठी
किटी पार्टी ?
किटी पार्टी नावाचा एक विरंगुळ्याचा प्रकार असतो ज्याची व्याख्या अशी सांगतात "अनेकांनी एकत्र येवून जे उपस्थित नाहीत त्यांची टिंगल, ती पण थिल्लर स्वरूपाची, करणे". यातून काही निष्पन्न होत नसते, जसे - काही वैचारिक मंथन वगैरे काहीही होत नसते. निव्वळ औट घटकेची मौज - बघा तो/ती कसा/कशी मूर्ख आहे - एवढेच या टिंगलीचे raison de etre (असण्याचे कारण) असते. या व्याख्ये प्रमाणे या धाग्याचा मथळा "किटी पार्टी" अधिक योग्य होता.
राजकारणी अनेकदा मूर्खा सारखे बोलतात यात नवीन काहीच नाही. "आठच्या आत घरात" हे अव्यव्हार्य आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच, पण त्या कोण्या ब्लोग लेखकाला हे ही लक्षात आलॆलॆ दिसत नाही कि बलात्कार रात्री आठच्या नंतरच होतात असे ही नाही. तर, असली मुक्ताफळे कोणी उधळण्याची चूक केली व आपण ती उगाळण्याची चूक करीत आहोत. ('ध' चा 'गा' केला :-)
दिल्लीच्या घटने नंतर जेंव्हा पोलिसांवर टीका होत होती तेंव्हा दिल्ली पोलिस आयुक्त यांनी असे म्हंटले कि ९५% बलात्कार हे ओळखीच्या व अनेकदा तर घरच्या व्यक्तींकडून होत असतात. मला माहीत नाही हे खरे आहे का, पण या वक्तव्याला अजून कोणीही challenge केलेले माझ्या वाचनात आले नाही, तेंव्हा खरे असावे. तसे असेल तर परिस्थिती फारच भयानक आहे. सुरक्षा यंत्रणेत जे काही बदल सुचविले जात आहेत - रात्रीच्या बस मध्ये होम गार्ड, यत्र तत्र सर्वत्र CCTV , वाहनांच्या काळ्या काचा काढून टाकणे, बस चालक, कंडक्टर यांची पोलिस तपासणी, वगैरे - हे सर्व उपाय फक्त ५% बलात्कार रोखू शकतात. बाकी ९५% चे काय?
तेंव्हा, राजकारण्यांची / ब्लोग्यांची टिंगल करणे सोडून काही अशी चर्चा व्हावी, ज्याने बलात्कार थांबले नाहीत तरी किमान आपले प्रबोधन काही वैचारिक मंथन तरी होईल.
सहमत
सहमत आहे. राजकारण्यांचे वक्तव्य मिडिया दाखवते आणि आम्ही ते पाहतो आणी त्यावर चर्चा करतो. चर्चा नेमकी कशावर व्हावी हे सुद्धा आम्ही विचारात घेत नाही.
चेष्टेचा भाग सोडल्यास एक मुद्दा आत्ताच कार्यालयात चघळला की एक वेळ स्त्रियांची सुरक्षा ते ही त्या ५% असलेल्या म्हणून आठच्या नंतर बाहेर जायचे सोडल्यास वि़कृत पुरुषांकडून इतर पुरुषांना सुद्धा धोका आहे. :) त्यावर काही कायदे आहेत का?
हे मात्र नक्की की विधायक चर्चा होणे गरजेचे आहे आणि त्यातुन समाज प्रबोधन सुद्धा. नाहीतर नेहमी प्रमाणे हेच सगळे चार दिवस चघळले जाईल आणि पुढची एखादी घटना मग ती कसली हि असो, अशीच एखादी,एखादा आतंकवादी हल्ला अथवा धार्मिक दंगल झाली कि त्या नुसार चर्च घडतील. निष्पन्न काहीच नाही. २०१४ च्या निवडणुका आलेल्या असताना या सगळ्याची शक्यता जास्त वाटते.
सहमत
शनिवारच्या लोकसत्तेत २ उत्तम लेख आहेत. खरे आहे की चर्चा ही ह्या निर्बुद्ध (खरे म्हणजे हुशार लोक, परिस्थितीचा योग्य फायदा काढून सत्तेत कसे यायचे एवढेच पाहणार) राजकारण्यांच्या आणि दिल्लीस्थित मिडीयाच्या हातात असल्याने पुढे जाताच नाही.
http://www.loksatta.com/chaturang-news/question-of-men-sexuality/
http://www.loksatta.com/chaturang-news/sexual-satisfaction-or-aggression/
ह्या लेखातील काही मुख्य मुद्दे मला पटले. मला असे वाटते की खालील मुद्यांवर बरीच चर्चा झाली पाहिजेल
१) मुले साधारणपणे १०-१२ व्याच वर्षी वयात येतात. लग्न होएइपर्यन्त कधी तिशी उलटून जाते. मग ह्या शरीराचे काय करायचे? ह्याचे उत्तर मिळत नाही. मुळातच सेक्स ही फारच भयावह आणि घाणेरडी गोष्ट आहे हे लहानपणा पासून बिंबवले आहे. कोणीच बोलत नाही तेंव्हा न कोत्या मार्गाने मुले ह्या गोष्टींची माहिती करून घेतात.
ह्या उलट इंग्लंड वास्त्याव्यात दुसऱ्या टोकाची मुक्तता पाहायला मिळाली. एक तर कुठेही लोक बिनधास्त गळ्यात गळे आणि नको त्या गोष्टी करत असतात. चूक का बरोबर हा मुद्दा वेगळा. फक्त हे पाहून लहान मुले नक्कीच प्रभावित होत असावीत. माझ्या मुलाच्या शाळेत म्हणजे ४-५ वर्षांची मुले ही माझी गर्लफ्रेंड आणि तो माझा बॉयफ्रेंड आणि आई-वडील त्याला बिनधास्त पाठींबा देणारे पहिले. आपल्याला हे फार विचित्र वाटले. ह्याविषय कोलेजला जाईपर्यंत जवळपास सगळं गोऱ्या मुलांचे तरी सगळे करून झालेले असते. आपल्याला हे परवडणार आहे क?
ह्यातला सुवर्णमध्य गाठणे अवघड आहे.
२) मुळातच माणूस हा एक जनावर आहे. सर्व प्राणीमात्रात बळी तो कानपिळी हीच वर्चस्व ठरविण्याची परंपरा आहे. निदान माझा तरी हा समज बी. बी.सी. वरचे ३ माहितीपट पाहून झाला आहे. ह्यातले २ तर भारतातील माकड आणि वाघ/सिंहावर केले होते. समान धागा म्हणजे तरुण नर आपली ताकद दाखवून जुन्या वा म्हाताऱ्या नराला चक्क मारून तरी टाकतो किंवा २ नरांमध्ये श्रेष्ठत्वाची लढाई होवून मादीला आकर्षित करतो. हाच रानटीपणा म्हणा किंवा निसर्गनियम म्हणा माणसात असणारच. त्यावर कबु ठेवायला नैतिकतेची बंधने आपणच तयार केली आहेत. ह्यात काही पुरुषांवर कदाचित अन्य्याय होत असेल किंवा काहींना ती जाचक वाटत असतील किंवा काही मुळातच स्वतःची खुमखुमी दाखवण्यासाठी हे असले प्रकार करत नसतील कश्यावरून? कितीही संस्कार केले तरी मूळ निसर्गनियम कसा काय मोडता येईल?
३) सध्या स्त्रिया खूप स्वतंत्र झाल्या आहेत. आर्थिक बाबतीत काही पूर्ण स्वतंत्र तर काही अजूनही पारंपारिक बंधने ग्राह्य मानून संसारात राहता आहेत. पण आपणही काही कमी नाही हे त्यांना माहितीच आहे. त्यामुळे काही वेळेला पुरुषाला एखादी स्त्री नकार देते किंवा ती आपल्या पुढे आहे. ह्याचा नक्कीच राग येतो. किंवा ही गोष्ट सहन होत नाही. मग हे असले प्रकार करायला धजावतात. नाहीतरी आपल्याकडे कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात आहे असे काही वाटत नाही. त्यामुळे असे केल्याने शिक्षा होते हेच दिसून येत नाही. मग कसली अलि भीती.
जगात सगळीकडे हे प्रकार चालतात. मुख्यत्वे करून पुढारलेल्या देशात सर्रास चालताच. पण घटना पोलिसात नोंदविली जाते आणि त्यांना शिक्षा होते हे पण दिसून येते. नवीन कायद्यांची अजिबात गरजच नाहीये. आहेत तेच जरी कठोरतेने राबवले तरी बऱ्याच गोष्टी काबूत येईल. पण ते करणार कोण? ह्याला काय करायला पाहिजेल ह्यावर कुठेही चर्चा चालू नाहीये. सगळी चर्चा त्या ६ आरोपींना एक तर फाशी द्या नाहीतर स्त्रियांनी घर बाहेर पडू नका अशीच चालू आहे. शिक्षा कडक असून उपयोगाची नाही तो होएईल आणि होणार ह्याची जोपर्यंत खात्री अथवा भीती वा जरब बसत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार.
लैंगिकतेच शमन कि दमन?
मंगला सामंत यांचा लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख खुपच चांगला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजशास्त्रीय दृष्टीकोन , मानसाशास्त्रीय दृष्टीकोन यांचा चांगला संगम लेखात आहे.
मंगला सामंत
हा खरच चांगला लेख आहे. पण गम्मत अशी आहे की असा एखादाच लेख येतो आहे. सगळे फक्त कायदा कडक करा ह्याच्याच मागे आहेत. पण मुदलात कितीही कायदे केले तरी शरीराचे काय करायचे आणि असलेल्या कायदे कोण राबवणार. मुळात ह्याला काहीही सोपे उत्तर आणि एकच उत्तर मिळेल असे मला वाटत नाही. पण सध्या सगळ्यांनाच आणि जास्त करून मिडियावाले ह्यांनी सर्व चर्चा ह्या फक्त टी.आर.पी साठीच केल्याने कोणीच खोलात जात नाहीये. मला दुसरी गम्मत कळत नाही चर्चा करणारे ज्येष्ठ आणि स्वतःला शहाणे समजणारे लोक चर्चेचेत हे मुद्दे का मांडत नाहीत? ह्यांना कोणी रोखले आहे.
धन्यवाद
एका संकुचित विषयावर व्यापक स्वरुपाची चर्चा केल्याबद्दल उपक्रमींचे हार्दिक आभार. थोडासा वेगळा विषय चर्चेला घेतला आहे कृपया मते कळवा.
http://mr.upakram.org/node/3922