नकाराधिकार

समाजाच्या मानसिकतेत अनेकदा लंबकासारखे बदल घडून ती सतत सर्वोत्तम परिस्थितीच्या दोन्ही बाजूंना झुलती राहू शकते. सध्या बलात्काराच्या विषयावर लंबक वेगाने हलतो आहे. 'बलात्काराची तक्रार करण्याचा आणि शरीरसंबंधास केव्हाही नकार देण्याचा हक्क वेश्येलासुद्धा असतो' हे विधान किमान प्रथमदर्शनीतरी नैसर्गिक न्यायानुसारच वाटते. त्याला थोडा स्पिनः

आज अनेक देशांमध्ये रेप शील्ड कायदे आहेत. बलात्काराची तक्रार करणार्‍या व्यक्तीचे पूर्वायुष्य तपासू नये आणि तिची ओळख लपवावी असे दोन प्रकारचे कायदे लोकप्रिय आहेत. त्यांपैकी, पूर्वायुष्य तपासण्यावरील बंदी अधिक प्रचलित आहे.

(ओळख लपविण्याचा कायदा अमेरिकेत घटनाबाह्य ठरला आहे परंतु ब्रिटन आणि भारतात तो सध्या वापरात आहे. तक्रारदार व्यक्तीची ओळख ट्विटरवर उघड केल्याबद्दल गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये बाराजणांना अटक करण्यात आली होती Ched Evans rape case: nine more people arrested in Twitter investigation. दिल्लीच्या सामूहिक बलात्कार-खून प्रकरणातील पीडित मुलीची ओळख प्रसिद्ध केल्याबद्दलसुद्धा दोन वृत्तपत्रांवर कारवाई झाल्याची बातमी प्रतिद्ध झाली आहे. ब्रिटनमध्ये त्या मुलीचे नावच बदलून देण्यात आले. तितकाच मार्ग मला योग्य वाटतो, ओळख लपविण्याचा सर्व प्रयत्न शासनाने नक्कीच करावा परंतु भोचक अशा अनैतिक शोधप्रयत्नांना शिक्षा देऊ नये. विषयांतर समाप्त.)

कोणताही व्यवसाय करण्यासाठी शासनाची अनुमती आणि/किंवा मदत मिळते तेव्हा ते उत्पादन/सेवा समाजाला पुरविण्याचे एक समाजोपयोगी कार्य घडत असल्याच्या कारणामुळेच तशी अनुमती/मदत देण्यात आलेली असते. त्याच्या मोबदल्यात, समाजाला उत्पादन/सेवा नियमितपणे उपलब्ध करून देण्याचे उत्तरदायित्वसुद्धा स्वीकारावे लागते.

पर्याप्त कारणाशिवाय अशिलाला वकील नाकारू शकत नाहीत. दिवसा भाडे नाकारणार्‍या रिक्षावर (तत्त्वतः) कारवाई होऊ शकते. गाणी, कथा, कादंबर्‍या यांचे प्रकाशन आणि विक्री न केल्यास त्यांचे वितरण, भाषांतर, इ. करण्याचा सक्तीचा परवाना (कंपल्सरी लायसन्स) रास्त किमतीला कोणीही घेऊ शकते. औषधांच्या पेटंटबाबतसुद्धा तसेच आहे.

त्यामुळे, वेश्येला किंवा प्रणयाराधनात गोंधळलेले संकेत देणार्‍या (=सुरुवातीलाच ठाम नकार न देता, काही काळ झुलवून मग नकार देणार्‍या) तक्रारदार व्यक्तीला सामान्य बलात्काराच्या तक्रारदार व्यक्तीपेक्षा कमी हक्क मिळणेच योग्य ठरेल असे मला वाटते.

वेश्येने कोणकोणत्या कारणांसाठी नकार देणे योग्य आहे ते कायद्यात नोंदविणे हे शांत डोक्याचे लक्षण ठरेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

रिक्षाचे भाडे

रिक्षाच्या भाड्याप्रमाणे वेश्येचे भाडे प्रमाणित नसते. रिक्षावाल्याप्रमाणेच तो तिचा व्यवसाय आहे असे म्हटल्यावर ती सर्वच गिर्‍हाइकांना नकार देऊन आपल्या पोटावर पाय ओढवून घेऊ शकत नाही. परंतु प्रमाणित दर नसल्याने, भाव परवडत नाही (नकार द्यायला काहीतरी कारण) असे ती कधीही सांगू शकते असे वाटते.

त्यामुळे, वेश्येला किंवा प्रणयाराधनात गोंधळलेले संकेत देणार्‍या (=सुरुवातीलाच ठाम नकार न देता, काही काळ झुलवून मग नकार देणार्‍या) तक्रारदार व्यक्तीला सामान्य बलात्काराच्या तक्रारदार व्यक्तीपेक्षा कमी हक्क मिळणेच योग्य ठरेल असे मला वाटते.

वेश्येने कोणकोणत्या कारणांसाठी नकार देणे योग्य आहे ते कायद्यात नोंदविणे हे शांत डोक्याचे लक्षण ठरेल.

हे ठीक.

गाणी, कथा, कादंबर्‍या यांचे प्रकाशन आणि विक्री न केल्यास त्यांचे वितरण, भाषांतर, इ. करण्याचा सक्तीचा परवाना (कंपल्सरी लायसन्स) रास्त किमतीला कोणीही घेऊ शकते. औषधांच्या पेटंटबाबतसुद्धा तसेच आहे.

हे ही ठीक एका वेश्येने नकार दिल्यास दुसरी वेश्या शोधणे किंवा तिला रास्त किंमत देणे योग्य ठरेल. सक्तीचा परवाना ही विकत घ्यावा लागतो म्हणजे तो बलात्कार नव्हे.

ह्म्म्म्म्म

वेश्येने कोणकोणत्या कारणांसाठी नकार देणे योग्य आहे ते कायद्यात नोंदविणे हे शांत डोक्याचे लक्षण ठरेल.

नवे प्रश्न आहेतच. बाय द वे, वेश्या व्यवसायाचा परवाना असतो का? बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करणार्‍यांबद्दल काही कडक कायदे आहेत का? नाही म्हणजे वेश्यांचा नकार ऐकला नाही म्हणून बलात्कार आणि बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करणारीने सुद्धा ऐत्यावेळी नकार दिला म्हणून बलात्कार अशा अनेक घटना होतील. त्याचा व्यत्यास असा होऊ शकतो की संबंधांना नकार देणारी स्त्री हि वेश्या आहे की नाही याने काहीच फरक पडत नाही. मग कायदेशीर वेश्या, बेकायदेशीर वेश्या आणि उतर असे किती प्रकार आणि प्रत्येकाची नकाराधिकाराची व्याख्या आणि मग संबंधीत कायदे हे जास्त क्लिष्ट प्रकरण नाही का? एकिकडे नकाराधिकाराची भाषा कायदा शिकवतो आणि एकिकडे पत्नी शारिरीक संबंधांना नकार देते म्हणून सुद्धा कायदा घटस्फोट मान्य करतो. सगळेच गोंधळवणारे आहे. मला वाटते कि भारतातल्या या घटना घटना घडण्याचे मुळ कारण वेगळे आहे. विकृती हे कारण आहेच पण त्या विकृतीचे मुळ कशात आहे त्यावर उपाय गरजेचा आहे.

मूड नाही

वेश्येने कोणकोणत्या कारणांसाठी नकार देणे योग्य आहे ते कायद्यात नोंदविणे हे शांत डोक्याचे लक्षण ठरेल.

मूड नाही एवढे कारण पुरेसे ठरावे.

त्यामुळे, वेश्येला किंवा प्रणयाराधनात गोंधळलेले संकेत देणार्‍या (=सुरुवातीलाच ठाम नकार न देता, काही काळ झुलवून मग नकार देणार्‍या) तक्रारदार व्यक्तीला सामान्य बलात्काराच्या तक्रारदार व्यक्तीपेक्षा कमी हक्क मिळणेच योग्य ठरेल असे मला वाटते.

काही काळ झुलवून मग होकार त्यानंतर पुन्हा नकार या कॅटॅगरी ला कुठे टाकायच? अशा प्रकारच्या केस मधे जर तक्रार केली तर प्रश्न उदभवतोच. वर्तमान पत्रात कधी कधी बातम्या येतात कि लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार. वस्तुतः लग्नाचे आमिष दाखवून शरिर संबंध ठेवले असे म्हणता येईल पण तो बलात्कार कसा? हा प्रश्न आहेच.

शंका...

ह्या विषयावर माझे मौन तोडत आहे. एक शंका :-
कोणताही व्यवसाय करण्यासाठी शासनाची अनुमती आणि/किंवा मदत मिळते तेव्हा ते उत्पादन/सेवा समाजाला पुरविण्याचे एक समाजोपयोगी कार्य घडत असल्याच्या कारणामुळेच तशी अनुमती/मदत देण्यात आलेली असते.
हे सर्वत्र लागू होते का? सिगारेट उत्पादन( पैसे मिळवणारा घटक सोडून) समोजोपयोगी आहे का?
नक्की मुद्दा समजला नाही. सर्वच सेवा समजोपयोगी गृहित धराव्यात की निव्वळ व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन.
.
मुळात आपण उल्लेख केलेला व्यवसाय भारतात किंवा इतरत्र कायदेशीर आहे का हे कुणी सांगेल का प्लीज?
.
परवा मी इलेक्ट्रिशिअनला घरी येउन आमचा गीझर दुरुस्त करण्याची केलेली विनंती त्याने नाकारली. त्याचा नकार बेकायदेशीर आहे का?(सिरियसली विचारतोय.)
तसे नसेल तर self employed प्रकारात येणारांना ग्राहक नाकारण्याचा संपूर्ण हक्क हवा असे माझे मत.
.
(शाहरुख, सलमान , आमीर ह्यांना चित्रपट नाकारायचा अधिकार आहे ना, तसेच काही.पण कायदेशीररित्या अभिनय्/चित्रपट इंडस्ट्री आहे की नाही ठाउक नाही.)
.
ह्या सर्वाहून महत्वाचे म्हणजे व्यक्तीचे शरीर ह्यात थेट गुंतलेले असते. त्यावर संपूर्ण्/एकमेव/प्रथम हक्क त्या व्यक्तीचाच असायला हवा. ह्या तर्काला विरोध करणारा कुठला कायदा असेल तर कायदाच बदललेला बरा.
.

सेल्फ एम्प्लॉइड

तसे नसेल तर self employed प्रकारात येणारांना ग्राहक नाकारण्याचा संपूर्ण हक्क हवा असे माझे मत.

चांगला मुद्दा (किती वेश्या self employed असतात कोण जाणे, तरीही.) अनेक व्यवसायांना तो लागू व्हावा.

?

पटले नाही.

बारा ते चार बाकरवडी न विकण्याचा चितळ्यांना हक्क असेल तर वेश्येलाही नकाराधिकार असायला हवा.

तुमच्या लॉजिकप्रमाणे सव्वाबारावाजता चितळ्यांचे दुकान फोडून बाकरवडी घेणे (त्या रिकाम्या दुकानाच्या गल्ल्यावर योग्य ते पैसे ठेवून) हे न्याय्य मानले जायला हवे.

अवांतर: बलात्कार्‍यांना कठोर शासन करण्याच्या उत्साहात, (डोमेस्टिक व्हायोलन्स कायद्याप्रमाणे) प्रिझम्प्टिव्ह गिल्ट असलेली कलमे बनवली जाऊ नयेत अशी इच्छा आहे.

+१

तुमच्या लॉजिकप्रमाणे सव्वाबारावाजता चितळ्यांचे दुकान फोडून बाकरवडी घेणे (त्या रिकाम्या दुकानाच्या गल्ल्यावर योग्य ते पैसे ठेवून) हे न्याय्य मानले जायला हवे.
+१.

अवांतर: बलात्कार्‍यांना कठोर शासन करण्याच्या उत्साहात, (डोमेस्टिक व्हायोलन्स कायद्याप्रमाणे) प्रिझम्प्टिव्ह गिल्ट असलेली कलमे बनवली जाऊ नयेत अशी इच्छा आहे.
+१

शंका.

समाज-सेवा(पब्लिक सर्व्हिस) करणार्‍यांना उदा. सार्वजनिक वाहतूक, पोलिस, पोस्टमन, सरकारी कार्यालये वगैरेंना नकाराधिकार नाही, पण वेश्या-व्यवसाय/सेवा सरकार-मान्य आहे काय (व त्या संबंधित बाबी - आरोग्य, दर, वय, निवृत्ती वगैरे).

विषयांतराबद्दल - भोचकपणाबद्दल शिक्षा म्हणजे त्यांचे (फक्त त्यांचे)खाजगी आयुष्य चव्हाट्यावर अणावे, बाकी शिक्षेची गरज नाही.

हम्म....

विचार म्हणून चांगला. पण असलं कायद्याचं 'फाइन ट्युनिंग' करायची गरज निर्माण व्हायला भारत अजून १०-१५ पिढ्यांनीतरी उत्क्रांत व्हायला हवा. सध्याचं वातावरण आणि आकडे बघता आपल्याकडे उलट 'बार्बेरिक' कायद्यांची गरज आहे असं वाटतं. (अधिच बलात्कार झालेली बाई 'वेश्या' आहे असं सिद्ध करण्यची चढाओढ लागलेली असते.)

सध्याच्या बहुसंख्य बाजारपेठेत नकाराधिकार असावा

सध्याच्या बहुसंख्य बाजारपेठेत नकाराधिकार असावा.

काही थोड्या बाजारपेठा त्या मानाने मुक्त असतील - म्हणजे तासाला हजारो रुपये किंवा डॉलर घेऊन मुक्तपणे शरीरसंबंध ठेवणार्‍या काही वेश्या असतील. अशा वेश्या होकार देण्याआधी धोक्याची पर्याप्त पडताळणी वगैरे करत असतील, कदाचित शुल्काचा काही भाग आगाऊ घेत असतील. अशा परिस्थितीमध्ये नकार दिल्यास कमीतकमी आगाऊ रक्कम परत करायला पाहिजे, आणि कदाचित त्या रकमेपेक्षा जास्त थोडे पैसे परत करायला पाहिजे. (मागे न्यू यॉर्क राज्याचा राज्यपाल एलियट स्पित्झर एका वेश्येबरोबर जात असल्याचे प्रसिद्ध झाले, आणि त्याला राजीनामा द्यावा लागला. त्या वेश्येचा ताशी दर असाच राजेशाही होता, आणि जेथवर मी कथा ऐकली, तेथवर कळते, की व्यवहारात वेश्या मुक्त होती. दलाल बाईच्या वाड्यात बंदिस्त वगैरे नव्हती.

परंतु बहुसंख्य वेश्याव्यापाराचे व्यवहार वेगळ्या प्रकारे होतात. अगदी थोड्या माहितीनिशी सुरुवातीला होकार दिला जातो. शुल्कसुद्धा शरीरसंबंध पूर्ण घडल्यानंतर दिले जाते. त्यामुळे नकार देण्याकरिताची कारणे ग्राहकाला किंवा वेश्येला थोड्या वेळानंतर कळू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्या वेळेला ग्राहकाला किंवा वेश्येला "नको" म्हणता यावे.

नेव्हाडा राज्यातील कायदेशीर वेश्याव्यवसायातसुद्धा वेश्यांना आपले हित नीटसे बघता येत नाही, असे विकिपीडिया पानावरून कळते. (पण तो परिच्छेद "असमतोल असू शकेल" अशी खूण पानावर आहे.)

रिक्षावाले

रिक्षावाले सेल्फ एम्प्लॉईड आहेत. त्यांना ग्राहक नाकारण्याचा अधिकार नाही.

सुधारणा

"रिक्षा स्टॅण्डवर उभे राहून" भाडे नाकारण्याचा अधिकार नाही.

आणि

सवारी नाकारली म्हणून त्या रिक्षावाल्याला धाकदपटशा करण्याचा किंवा त्याच्या नरडीवर चाकू ठेवून त्याला मीटर डाऊन करायला सांगण्याचा अधिकारही नाही.

+१

सहमत आहे.
मूळ चर्चाप्रस्तावात चाकू दाखवून भाडे घ्यायलाच लावण्याचे काहीसे समर्थन दिसले. (बळजबरीने भाडे घ्यायलाच लावले तर रिक्षावाल्याच्या तक्रारीची दखल घ्यायची गरज नाही असं सुचवल्यासारखे वाटले).

प्रत्येक व्यवसाय हा समाजाशी करार ठरावा

एखादा लेखक बौद्धिक श्रम घेऊन गाणे लिहितो, एखादा गायक शारिरीक श्रम घेऊन ते गातो. परंतु त्या गाण्याचे वितरण, वितरकांना रास्त वाटेल त्या किमतीला, सक्तीने होते तेव्हा बौद्धिक मालमत्तेवरसुद्धा अतिक्रमण होतेच की! बलात्कार, दुकान उघडून पैसे ठेवून मिठाई नेणे किंवा रिक्षावाल्याला धाक दाखवून रिक्षात बसणे हे चूक आहेत असे मलाही वाटते परंतु त्यांपेक्षा कंपल्सरी लायसन्स वेगळे कसे? वेश्येच्या उदाहरणात, शरीरावरील अतिक्रमण हे मालावरील अतिक्रमणाशी एकरूप होते ही निव्वळ एक स्पेशल केस आहे.
स्वतःचा व्यवसाय म्हणजे स्वतःचे राज्य हे अतिसुलभीकरण आहे, दुकानदारावर सामाजिक उत्तरदायित्व असलेच पाहिजे. वायरमन, अभिनेते, मिठाईवाले किंवा रिक्षावाले यांच्याविरुद्ध (गिर्‍हाईक नाकारल्याबद्दल) फारसे गुन्हे घडल्याचे वाचनात नाही, त्यांची मुजोरी लोकांना मान्य आहे असे दिसते. 'वेश्येवर बलात्कार' ही घटना मात्र चर्चिली जाते म्हणजे मिठाईची क्रेविंग किंवा रिक्षाची गरज यापेक्षा वेश्येची गिर्‍हाईके अधिक गरजू असावीत ना?

करार

प्रत्येक व्यवसाय हा करारच असतो. त्यात व्यावसायिक* "ऑफर" देतो. ती ग्राहकाने स्वीकारली तर करार लागू होतो.

दुपारी चितळे दुकान बंद ठेवतात त्यावेळी ते ग्राहकांना "ऑफर" देत नाहीत. ऑफर दिलेलीच नसल्याने ग्राहक आणि चितळे यांच्यात करार होत नाही म्हणून दुकान फोडून ग्राहक माल घेऊ शकत नाही. तसेच वेश्येलाही गिर्‍हाईक नाकारता यावे.

तसेच रिक्षास्टॅण्डवर उभा असलेला रिक्षावाला "ऑफर" देत असतो म्हणून ग्राहकाने ऑफर स्वीकारल्यास त्याला भाडे नाकारण्याचा हक्क नसतो. (रिक्षास्टॅण्डखेरीज इतरत्र तो भाडे नाकारू शकत असावा असे वाटते).

करार झाल्यानंतरही एका पार्टीने आपले करारांतर्गत कर्तव्य पूर्ण केले तर दुसर्‍या पार्टीकडून तो त्याचे कर्तव्य पूर्ण करण्याची किंवा करार रद्द करण्याची मागणी करू शकतो. परंतु दुसर्‍या पार्टीला करार रद्द करून नुकसानभरपाई देण्याची सूट असते. म्हणजे दुसर्‍यापार्टीने करारातील कर्तव्य केलेच पाहिजे असा आग्रह धरू शकत नाही. समजा गिर्‍हाइक आणि वेश्या यांच्यात योग्य तो करार झाला आणि गिर्‍हाइकाने ठरलेला मोबदला दिला तरीही गिर्‍हाइक वेश्येवर बलात्कार करू शकत नाही. गिर्‍हाइक फारतर वेश्येकडून आपले पैसे अधिक नुकसान भरपाई (आता आयत्यावेळी दुसर्‍या वेश्येकडे जायला लागेल व जास्त पैसे द्यावे लागतील म्हणून) मागू शकतो. संभोग दिलाच पाहिजे अशी मागणी करू शकत नाही.

*काहीवेळा ऑफर ऐवजी "इन्व्हिटेशन टु ऑफर" असा शब्दप्रयोग पाहिला आहे. म्हणजे व्यावसायिक इन्व्हिटेशन टु ऑफर देतो, ग्राहक ऑफर देतो आणि व्यावसायिक ती ऑफर स्वीकारतो असा प्रकार पाहिला आहे.

गुन्हे

वायरमन, अभिनेते, मिठाईवाले किंवा रिक्षावाले यांच्याविरुद्ध (गिर्‍हाईक नाकारल्याबद्दल) फारसे गुन्हे घडल्याचे वाचनात नाही, त्यांची मुजोरी लोकांना मान्य आहे असे दिसते. 'वेश्येवर बलात्कार' ही घटना मात्र चर्चिली जाते म्हणजे मिठाईची क्रेविंग किंवा रिक्षाची गरज यापेक्षा वेश्येची गिर्‍हाईके अधिक गरजू असावीत ना?

छे! छे! आता हे ही अतिसुलभीकरण झाले की. वेश्येकडे जाणारी गिऱ्हाईके "कामातुराणा ना भय ना लज्जा" प्रकारातील असावी. त्यांच्या गुन्ह्यांना पाशवी वगैरे विशेषणे लावता येतील. तसे मिठाई खाणाऱ्याना म्हणता येत नाही. शिवाय जेव्हा वायरमन, रिक्षावाले आणि प्लंबरची कामे बायका सर्रास करू लागतील तेव्हा त्यांना घरी बोलावून सेवा देण्याविषयी कसकसे गुन्हे घडतील हे पाहणे रोचक ठरावे.

अभिनेत्यांना जरा दूर ठेवू. त्यांची पिळवणूक वगैरे कशी चालते हा स्वतंत्र विषय ठरावा.

 
^ वर