भारताला युद्ध करावे लागले तर?

मंडळी,
भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे युद्धच वगैरे आता राहिले असे वाटत नाही. पण भारताने असे काही खेळीमेळीचे पाऊल उचलले की पाकिस्तान कडून लगेचच एखाद्या भ्याड हल्ला, अतिरेकी हल्ला किंबा थोडक्यात म्हणजे युद्धजन्य परिस्थिती तयार करण्याची खुमखुमी असतेच. हे आता आपल्याला अंगवळणी पडले आहे. खास करुन नियंत्रण रेषेवर काही ना काही घडामोडी होतातच. मग नेहमी प्रमाणे आपले सरकार चर्चा/वाटाघाडी आणि मग सबुरीचे धोरण घेऊन पुढचा हल्ला होण्याची वाट पहात बसते. पण समजा नजीकच्या भविष्यात खरेच युद्ध झाले तर? अमेरिकेला सुद्धा सध्या कोणते नवे युद्ध नाहीये, चीनला सध्या ताकद दाखवायची खुमखुमी आहे आणि कोणत्याही शेजारी राष्ट्रासोबत त्यांचे ही फारसे प्रेमळ संबंध नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या उपखंडात भारत पाकिस्तान युद्ध ही जगाला हवी असलेली घटना घडू शकते काय? घडल्यास ते युद्ध कशा प्रकारे होईल आणि भारताचा यावेळी खरच निभाव लागेल का? अंतर्गत कलह, अस्थिर आणि दुबळे सरकार, पाकिस्तानच्या छुप्या युद्धामुळे भारतात एकाचवेळी सीमेवर आणि आतमध्ये असे हे युद्ध लढले जाईल का? कि असे युद्ध आतच सुरु झाल्यास यावेळी सुद्धा त्याला पहिल्यांदा एक गँगवॉर अथवा तत्सम दृष्टीने पाहिले जाईल? तुम्हाला काय वाटते? युद्ध झाल्यास भारतासाठी अंतिम निर्णय काय असेल?

लेखनविषय: दुवे:

Comments

युद्ध

भारत कध्धी कध्धी आगळीक करत नाही. :-)

आत्ताच्या ताज्या घटनांत तरी भारताने आधी तथाकथित बेकायदेशीर कृती केली आहे असे दिसते.

>>नेहमी प्रमाणे आपले सरकार चर्चा/वाटाघाडी आणि मग सबुरीचे धोरण घेऊन पुढचा हल्ला होण्याची वाट पहात बसते.

सहमत आहे. भारत सरकार आणि भारतीय सैन्य सीमेपाशी नेमके काय करत असते हे सरकार मला रोजच्या रोज कळवत नाही हे खरे आहे. त्यामुळे सरकार/सैन्य काहीच करत नाहीये असे मानायला मी मुखत्यार आहे.

लोकसभा, राज्यसभा असे त्यांचे कामकाज दाखवण्यासाठी चॅनेल सुरू केले गेले आहेत. तसेच भारत पाक सीमा, वाघा बॉर्डर, अरुणाचल सीमा, काश्मीर येथील घटना रोजच्या रोज थेट प्रक्षेपित करण्यासाठी वेगवेगळे चॅनेल सुरू करावेत अशी मागणी मी येथे नोंदवत आहे.

>>अंतर्गत कलह, अस्थिर आणि दुबळे सरकार,

७१ च्या युद्धाआधीही साधारण परिस्थिती अशीच होती. ६७ च्या निवडणुकीत काँग्रेसला काढावर बहुमत मिळाले होते. पुढे ६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली होती. इंदिरा गांधींचे सरकार कसेबसे कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर टिकून होते. (९९ मधले सरकारही असेच होते). सरकार अस्थिर आहे किंवा कसे यावर बहुधा युद्धाचे परिणाम अवलंबून नसणार.

सरकार माध्यमांतून चालणार्‍या कंठशोषाला फार भीक घालत नाही ही चांगली गोष्ट आहे असे वाटते.

+१

सरकार माध्यमांतून चालणार्‍या कंठशोषाला फार भीक घालत नाही ही चांगली गोष्ट आहे असे वाटते.

पहिले काहिसे विनोदी वाक्य स्मायली असल्याने हलकेच घेऊन अख्खाच्या अख्ख्या प्रतिसादाशी सहमत आहे असे म्हणतो.

वरील अवतरणांशी विषेश सहमती.

कुरापत

आपण पण खूप कड्या केल्या आहेत हो. श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ ही उत्तम उदाहरणे आहेत. पाकिस्तान मध्ये पण आपण भरपूर हातचलाखी केली आहे. बलुचिस्तान आणि अफगाण सीमेवर भरपूर उद्योग करतो. फक्त ते आपल्याला माहिती नाहीये. १९७१ च्या वेळी साम माणकेशा सारखा कसलेला सेनानी होता. सध्याच्या लोकांबद्दल माहिती पण ज्या पद्धतीने मनमोहन सिंग काराबह्र करत आहेत ते पहाता युद्ध होईल असे वाटत नाही आणि दुर्दैवाने झाले तर आपल्या सैनिकांचेच जास्त बळी जातील.

ह्म्म्म

युद्ध होणे परवडणारे नाहीच. खास करुन यावेळी पाकिस्तान चिथावण्या देत आहे. पण याच सोबत नेहमीचा चर्चेचा मार्ग सुद्धा थांबवायला हवा. जोवर हल्ले पुर्णपणे थांबत नाहीत तोवर चर्चा नाही.

नेतृत्व

असे वाटते पण मुदलात चांगले खंबीर नेतृत्व पाहिजेल. घोडे तिथेच पेंड खाते आहे.

हास्यास्पद

<<आपण पण खूप कड्या केल्या आहेत हो. श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ ही उत्तम उदाहरणे आहेत. पाकिस्तान मध्ये पण आपण भरपूर हातचलाखी केली आहे. बलुचिस्तान आणि अफगाण सीमेवर भरपूर उद्योग करतो. फक्त ते आपल्याला माहिती नाहीये<<>>> - हे हास्यास्पद आहे :-)

:)

एल.टी.टी.ई. विसरू नका. भारताने प्रभाकरनला तयार केले. तामिळनाडूत त्याची उत्तम बडदास्त ठेवली जात असे. शेवटी तो जेंव्हा हाताबाहेर गेला तेंव्हा शांतीसेना पाठवून आपण आपलेच नुकसान करून घेतले. शेवटी राजीव गांधी मारले गेले तेंव्हा भारताने त्याची रसद पूर्णपणे थांबविली. नाहीतर तो अजूनही श्रीलंकेत टिकून राहिला असता. नेपाळच्या सर्व राज घराण्यांना आपण भरपूर खेळवले आहे. बलोच लोकांना हत्यारे आणि दारूगोळा आपण देतो. पण ह्या गोष्टी मान्य केल्या तर इतके वर्ष जगापुढे आपण एकदम अलिप्ततावादी आहोत ह्याला तडा जातो. त्यामुळे मुख्य प्रसार माध्यमात ह्या गोष्टींवर फार लिहून येत नाही. द हिंदू आणि ईकोनोमिक्स अन्ड पोलिटिकल विकली जरूर वाचा. त्यात अश्या गोष्टी येत असतात.

आणि हो आत्ताही युद्धाचे ढोल अपलींच प्रसारमाध्यमे बडवत आहेत. पाकिस्तानच्या वृत्तपत्रात ह्याला दुय्यम महत्व आहे. आपल्या २ सैनिकांना मारण्या आधी त्यांच्या पेपर मध्ये त्यांच्या एका सैनिकाला सीमेवर मारल्याची बातमी होती. ती बातमी आपल्याकडे अजिबात आली नव्हती. तो राजदीप सरदेसाई त्याची त्या २ पाकिस्तानी पत्रकारांनी चांगली बोलती बंद केली होती. त्याचा प्रोग्राम मध्ये त्याला जास्त बोलता येत नव्हते कारण मुळातच तोकडी माहिती होती असे मला तरी वाटून गेले.

यावेळेला निकाल वेगळा पण लागू शकेल

लोक हो तुम्ही १९७१ ची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याची तुलना करु नका. १९७१ मधे कोणी ही सेनापती असता तरी भारत सहज जिंकला च असता ( मला माणेकशा बद्दल पूर्ण आदर आहे ). १९७१ मधे आपली सैन्यशक्ती पाकीस्तान पेक्षा खुप जास्त होती. पाक सैन्याला पूर्व पाकीस्तानात कुठलाही supply route नव्हता. स्थानिक जनता विरोधात होती. त्यामुळे १९७१ युद्ध जिंकणे ह्यात काही विषेश नव्हते.

कारगील युद्ध जिंकले असा काही लोकांचा गोड समज आहे. आपल्याच मालकीची ठिकाणे काही थोड्या ( हजार पण नाहीत ) लोकांनी काबिज करुन ठेवली आणि ती आपण परत मिळवली. आपलीच गोष्ट आपण परत मिळवणे आणि ते सुद्धा शेकडो प्राण आणि काही हजार कोटी खर्च करुन!!. जर भारताने पाकीस्तानची थोडी तरी भुमी जिंकली असती तर त्याला विजय म्हणता आले असते. कारगील युद्धात पाक ला फार नुकसान झाले नाही, खर्च दुसर्‍या देशांनी केला, माणसे अनेक देशातील होती.

आत्ता जर युद्ध झाले तर निकाल १९७१ सारखा लागण्याची शक्यता नाही.
१. नंगे कओ खुदा भी डरता है. पाकीस्तान कडे गमवण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे त्यांना कसलीही भीती नाही.
२. युद्धाच्या खर्चाची पाक ला भीती नाही, सर्व मुस्लिम देश sponser करतात.
३. हत्यारे, विमाने, सैनिक ह्यांची संख्या सारखी आहे. भारता ला ३ सीमा आणि नक्षल area मधे सैन्य divide करुन ठेवायला लागते.
४. पाक ला मुस्लिम देश आणि चीन कडुन मुबलक आणि फुकट शस्त्र पुरवठा आहे. कारगील सारख्या limited युद्धात च आपला boforse तोफांचा दारुगोळा संपला होता.

जर फार थोड्या काळासाठी युद्ध झाले तर भारताला विजयाची शक्यता आहे. लांबले तर कठिण आहे.

युध्द

अख्खा पाकिस्तान जिंकलो तर.....बापरे.............

 
^ वर