जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

आंद्रे साखारॉव्ह: विश्वशांतीचा ध्यास घेतलेला अणुशास्त्रज्ञ


'नेचर' या विज्ञानविषयक साप्ताहिकातील 'मिलेनियम एस्सेज' या सदर लेखनात एका वैज्ञानिकाने आंद्रे साखारॉव्हच्या (1921 - 1989) कार्याची तुलना महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याबरोबर करता येते असा उल्लेख केला होता. कुशाग्र बुद्धिमत्ता, आसाधारण मानसिक धैर्य व प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर कुठल्याही राजकीय वा लष्करी दबावाला वा विरोधाला न जुमानता, प्रसंगी स्वत:चे जीवन धोक्यात घालून आपले उद्दिष्ट साधणारे विसाव्या शतकातील हे दोन महान नेते होते. पाशवी शक्तीविरुद्ध एकाकी लढताना लोक जागृती हेच ध्येय समोर ठेवून त्यानी आयुष्यभर लढा दिला. कारण या दोघानाही भविष्यकाळात मानव वंशावर कोसळणाऱ्या संकटांची पूर्ण कल्पना होती. माणूस म्हणून स्वत:वरील जबाबदारी टाळणे वा ऐन मोक्याच्या क्षणी निष्क्रीय राहणे ही एका प्रकारे स्वत:शीच केलेली प्रतारणा आहे, असे त्यांना वाटत होते.

एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 4

सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या 24 वर्षाच्या राज्यकालानंतर इ.स.110 मध्ये त्याचा पुत्र वशिष्ठीपुत्र पुळुमावी हा सातवाहनांच्या गादीवर आला. पुळुमावीने 28 वर्षे राज्य केले. इ.स.

ढोबळेंसारखे अधिकारी आम्हाला हवे आहेत का?

नाना पाटेकरांनी नुकतेच "पुण्यातही ढोबळेंसारखा अधिकारी हवा" असे विधान केले आहे. वसंत ढोबळे यांना "मुंबईचे सिंघम" म्हणून ओळखले जात आहे. ढोबळे हे कोण आहेत, त्यांच्या कारकिर्दीचा थोडासा आढावा खालील लेखावरून येईल.

इकडून तिकडे का नाही?

"इकडून तिकडे का नाही?" असा प्रश्न मध्यंतरी मनोबांनी विचारला होता.

छायाचित्र आस्वाद: सुर्यास्त

आमच्या घरापासुन थोड्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला फिरताना ही पायवाट दिसली. क्षितीजापर्यंत वळणे घेत पोहचणारी पायवाट आणि योगायोगाने त्याच्या टोकाशी अस्ताला चाललेले सूर्यबिंव असा छान देखावा कॅमेर्‍यात टिपता आला.

लेखनविषय: दुवे:

हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा

महाराष्ट्रात वृत्तपत्रांची मोठी परंपरा आहे. सुरुवातीला अनेक असणारी वृत्तपत्रे व्यावसायिक गणित न जमल्याने बंद पडली. आता हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच प्रमुख वृत्तपत्रे उरली आहेत.

एका साम्राज्याच्या शोधात कार्ले गुंफा भाग 3

मगध देशामध्ये राज्य करणार्‍या शुंग राजघराण्याची इ.स.पूर्व 26 मध्ये संपुष्टात आलेली कारकीर्द व कुषाणांचा इ.स.

सुमारीकरणाचा उत्कर्षबिंदू की उथळीकरणाची नीचतम पातळीँ?

आजकाल जिथेतिथे 'विद्वान', 'व्यासंग' आणि 'व्यासंगी' हे शब्द प्रतिसादांतून लिखाणांतून मुक्तपणे फेकण्यात -- राजेश खन्नाच्या शैलीत सुपरफॉस्फेट, युरिया फेकावी तसे -- येतात.

सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.

अजि म्या ब्रह्म पाहिले

शीर्षकाचा श्रेयाव्हेर - (असे लेखाच्या सुरुवातीसच करण्याची पद्धत नसली तरी श्री. श्रावण मोडक यांच्या अन्य संस्थळावर वाचलेल्या एका प्रतिसादावरून हे शीर्षक सुचले आहे हे मान्य करतो.)

 
^ वर