सामाजिक

महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव

दिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले.

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.

स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ?

स्किझोफ्रेनिया म्हणजे काय ते मला नक्की माहीत नाही. इथे कोणी मानसोपचार तज्ञ असल्यास तिने / त्याने बरोबर काय ते सांगावे. माझ्या माहिती प्रमाणे स्किझोफ्रेनिया म्हणजे dual personality. जसे,

समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }

नकाराधिकार

समाजाच्या मानसिकतेत अनेकदा लंबकासारखे बदल घडून ती सतत सर्वोत्तम परिस्थितीच्या दोन्ही बाजूंना झुलती राहू शकते. सध्या बलात्काराच्या विषयावर लंबक वेगाने हलतो आहे. 'बलात्काराची तक्रार करण्याचा आणि शरीरसंबंधास केव्हाही नकार देण्याचा हक्क वेश्येलासुद्धा असतो' हे विधान किमान प्रथमदर्शनीतरी नैसर्गिक न्यायानुसारच वाटते. त्याला थोडा स्पिनः

आज अनेक देशांमध्ये रेप शील्ड कायदे आहेत. बलात्काराची तक्रार करणार्‍या व्यक्तीचे पूर्वायुष्य तपासू नये आणि तिची ओळख लपवावी असे दोन प्रकारचे कायदे लोकप्रिय आहेत. त्यांपैकी, पूर्वायुष्य तपासण्यावरील बंदी अधिक प्रचलित आहे.

अतुलनीय

कारकीर्दीचा सर्वमान्य काळ संपला तरी रंगमंचावरून exit न घेण्याची उदाहरणे अनेक आहेत. बाल गंधर्व, अमूलचे वर्घीस कुरियन, दिल्ली मेट्रोचे ई श्रीधरन, सिने व नाट्य भूमी वरचे काही कलावंत, काही एकल खेळाडू, आणी राजकारणी.

विशेषज्ञांच्या भाकितांची ऐशी तैशी!

कुठल्याही दिवसाच्या कुठल्याही वृत्तपत्रावर ओझरती नजर फिरवा, राशीफलांच्या नेहमीच्या रतीबाबरोबरच कुठल्याना कुठल्यातरी विशेषज्ञांच्या भाकितांचा उल्लेख ठळक मथळ्याखाली वाचायला हमखास मिळतोच.

शासकीय नितीमत्ता

नितीमत्ता हा विषय तसा बराच चर्चला गेलेला असला तरी काही अनुभव आले की पुन्हा जाग्रुत होतोच. माझेही आज तसेच झाले.

भारतीय लोकाशाहीचे भविष्य - अध्यक्षीय, संसदीय की आणखी काही?

भारतीय लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि महान लोकशाही आहे असे आपण वारंवार ऐकतो अथवा ऐकवतो. प्रत्यक्षात आज त्या लोकशाहीची अवस्था काय आहे हे प्रत्येक सुजाण नागरिक जाणतो. आपली सध्याची लोकशाही हि संसदीय पद्धतीची आहे जिथे लोकं त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात आणि मग ते प्रतिनिधी त्यांचा नेता निवडून देतात. तो नेता मग पंतप्रधान बनतो आणि आपले मंत्रिमंडळ बनवतो. हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्षात काय होते ते आपण पहातो. प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारण बिघडवत आहेत.

नवश्रीमंतांचा मंत्रघोष: ग्रीड इज गुड

श्रीमंतांच्या सामाजिक मानसिकतेचाच विचार करत असल्यास दुसऱ्या महायुद्धानंतरच्या 50- 60 च्या दशकापासून आजपर्यंतच्या काळापर्यंत त्यांच्या मानसिकतेत हळू हळू बदल होत गेला आहे, हे लक्षात येईल. स्वत:च्या हिताची काळजी, दान - देणगी - सबसिडी सबझूट, संवेदना - सहानुभूती या अविवेकीपणाची व भिकेच्या डोहाळ्याची लक्षणं, दुर्बलांसाठी हे जग नाही, पैसा हेच सर्वस्व, स्पर्धेतील यशच खरे यश,... इत्यादी गोष्टी आजकाल शिकवाव्या लागत नाहीत; त्या उपजतच आहेत की काय असे जणू वाटत आहे. यांच्या समर्थनार्थ वेगळ्या पुराव्याची गरज नाही, इतक्या त्या स्वयंसिद्ध आहेत हे, काही अपवाद वगळता, प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेल्या आहेत.

 
^ वर