जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

नवीन् कल्पनेचे किंवा संशोधनाचे पेटंट् कसे नोंदवावे?

नवीन् कल्पनेचे किंवा संशोधनाचे पेटंट् कसे नोंदवावे याबद्दल् माहिती शोधत् आहे, कृपया मदत् करावी. याचे अमेरिकेतील् आणि भारतातील् नियम काय् आहेत् याची माहिती देखील् द्यावी.

जमातनिहाय नागरी कायद्याविषयी डॉ. भी. रा. आंबेडकरांचे धोरणात्मक संकेत

जमातनिहाय नागरी कायद्याच्या बाबतीत अधूनमधून चर्चा होते, आणि अजून भारतात समान नागरी कायदा का नाही? याबाबत रुखरुख व्यक्त होते.

पात की पातक?

भ्रूण=एंब्रियो आणि गर्भ=फीटस असे अर्थ असताना गर्भपाताला भ्रूणहत्या म्हणण्याची सुरुवात का झाली असावी? वास्तविक, गर्भारपणाच्या १० आठवड्यांनंतर भ्रूणाचे गर्भात रूपांतर होते. परदेशात बहुसंख्य गर्भपात हे भ्रूणावस्थेतच होत असले तरी भारतात मात्र तसे नाही. विशेषतः, सोनोग्राफीने लिंगनिवड करण्यासाठी भ्रूणपात शक्य नसतात, ते गर्भपात असतात. तरीही, हल्ली भ्रूणहत्या हाच शब्द का बरे प्रचलित झाला असावा?

वैयक्तिक आयुष्याची प्रतिबिंबे

या किंवा इतर संकेतस्थळांवरील लेखन आणि प्रतिसाद बघताना लेखक-लेखिकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक अंदाज येत जातो. कुणाचे विचार कसे असतील, कुणाची कुठल्या विषयावर काय प्रतिक्रिया असेल याबाबत एक तर्क करता येतो.

मंटो

मंटो या लेखकाच्या साहित्यात व व्यक्तिमत्वात ज्यांना रस आहे, त्यांनी हे जरूर वाचावे. खूप वेगळा आणि चांगला, सविस्तर, ( उदयप्रकाश यांच्या शब्दांत सांगायचं तर 'समीक्षेतील साहस' वाटावं असा ) हा लेख आहे.

या महापुरुषांचा सत्कार आपण कसा करावा?

या मूळ चर्चेतील काही विषयांतरीत प्रतिसाद येथे वेगळ्या चर्चेत हलवले आहेत याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

ही आजची लिंक पहा : http://www.facebook.com/kavita.mahajan.5

भारतीय लेखिका

"भारतीय लेखिका" ही ४० अनुवादित पुस्तकांची मालिका मी संपादित करते आहे. त्यासाठी लिहिलेली ही भूमिका.

दिवेआगर

लेखनविषय: दुवे:

भारताची "अग्नि"परिक्षा-भाग-२

भारताची "अग्नि"परिक्षा-भाग-२
लेखन आणि संकलन: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

१९ एप्रिल रोजी भारताने अग्नि-५ या लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!) या आधी भारताने आग्नि-१ ते अग्नि-४ अशा चार प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची चांचणी केली होती. या पाची प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची आणि सध्या विकसन अवस्थेत भावी प्रक्षेपणास्त्रांची संक्षिप्त माहिती कोष्टकें आणि कांहीं आकृत्यांच्या रूपाने मी शेवटी दिली आहे.

या यशस्वी चांचणीवर अनेक देशांच्या सरकारांतर्फे तसेच प्रसारमाध्यमांतर्फे वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी Stratfor या नियतकालिकातील "भारत चीन यांच्यातील कडवी स्पर्धा" हा रॉबर्ट काप्लान यांचा लेख उल्लेखनीय वाटला म्हणून त्या लेखावर आधारित एक लेख भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१) द्वारा मी इथे प्रकाशित केला होता. आता दुसरा भाग इथे देत आहे.

सत्यमेव जयते

आमीरखानचा परिपूर्ण कार्यक्रम पाहिला. मनाच्या तळाशी दडपून ठेवलेले स्वतःचे आणि इतरांचेही अनेक अनुभव तडफडत घुसमटत पृष्ठभागावर आले. पाणी लाल झालं तरंगातरंगात. जखमी वाटत राहिलं.
पण श्वास तर घेता येतोय...

 
^ वर