उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
नवीन् कल्पनेचे किंवा संशोधनाचे पेटंट् कसे नोंदवावे?
अभिजीत राजवाडे
May 14, 2012 - 6:08 pm
नवीन् कल्पनेचे किंवा संशोधनाचे पेटंट् कसे नोंदवावे याबद्दल् माहिती शोधत् आहे, कृपया मदत् करावी. याचे अमेरिकेतील् आणि भारतातील् नियम काय् आहेत् याची माहिती देखील् द्यावी.
दुवे:
Comments
पेटंट
कल्पनेचे पेटंट मिळत नाही. अडचण आणि तिचे उत्तर् ह्याचे पेंटट मिळते. आणि पेंटट मिळेपर्यंत कोणालाही तुमचे संशोधन सांगु नका अगदीच गरज असेल तर गोपनीयतेचा करार करा, वर्तमानपत्रात जाहीर करु नका.
अजुन माहीती असेल तर संपर्क करा.
असो, तुम्हाला शुभेच्॰हा.
पेटंट
कल्पनेचे पेटंट मिळते. त्यासाठी रीतसर वकिलांकडून करार इत्यादी प्रक्रिया करावी लागते. मी माझ्या 'मल्टीमीडिया कादंबरी' या कल्पनेचे व 'कुहू' या शीर्षकाचे पेटंट घेतलेले आहे. ही प्रक्रिया दिल्लीतूनच होते, राज्यात सोय नाही. त्यामुळे काम दिल्लीतून करून घ्यावे किंवा एजंटकडून करून घ्यावे. एजंटकडून करून घेतले तर आपले बरेच व्याप व खर्च वाचतात. तुम्हांला हवे असल्यास एजंटचे नाव / फोन देऊ शकेन.
कॉपिराइट आणि पेटंट
इथे कॉपिराइट आणि पेटंट ह्यांत गल्लत होते आहे असे वाटते. साहित्यिक-वाङ्मयीन, नाट्यात्मक, सांगितिक आणि कलात्मक (लिटररी, ड्रमॅटिक, म्यूझिकल व आर्टिस्टिक) निर्मितीला कॉपिराइट कायदा लागू होतो. ह्या लेखात थोडक्यात फरक दिलेले आहेत.भारतात कॉपिराइट घेण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नसते. निर्मितीच्या क्षणापासून कॉपिराइट निर्मात्याचे होतात.
गल्लत नाही.
कॉपिराइट आणि पेटंट वेगळे हे मलाही माहीत आहे. पुस्तकाचे कॉपिराइट असतातच, हे तीसाहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाल्याने व अनुवाद / माध्यमांतरं झाल्याने मला ठाऊक आहे. मी पेटंटविषयीच बोलते आहे. 'मल्टीमीडिया कादंबरी' ही कल्पना, ती विकसित करण्याची प्रक्रिया, त्यासाठीचे संशोधन ( त्यात तांत्रिक भागही आला) याचे 'पेटंट' मी घेतले आहे. 'बौद्धिक मालमत्ता कायद्यानुसार' ही 'कल्पना गहाण ठेवून' या प्रकल्पासाठी सारस्वत बँकेने मला कर्जही दिले आहे.
कल्पनेचे पेटंट मिळत नाही.
फक्त कल्पनेचे पेटंट मिळत नाही.
'मल्टीमीडिया कादंबरी' ही कल्पना, ती विकसित करण्याची प्रक्रिया, त्यासाठीचे संशोधन ( त्यात तांत्रिक भागही आला)
ती विकसित करण्याची प्रक्रिया, त्यासाठीचे संशोधन ( त्यात तांत्रिक भागही आला) असल्यामुळे पेटंट मिळाले आहे.
थोडक्यात
भारतात पेटंटचा अर्ज (पेटंट अप्लिकेशन) आधी कुणी दाखल केला (फर्स्ट टु फाइल) हे बघतात. तर अमेरिकेत आधी कोणी आविष्कार केला (फर्स्ट टु इनवेंट) हे बघतात. अमेरिकेत शोध लावल्यापासून एका वर्षाच्या आत आविष्कार करणारा पेंटट अर्ज दाखल करू शकतो. भारतात तसे काही नाही. मात्र मान्यताप्राप्त ट्रेड शो, एक्झिबिशने किंवा स्कॉलरली जर्नल ह्यातून तुमचा आविष्कार आधीच जनतेसमोर आला असल्यास अर्ज दाखल करताना 12 महिन्यांची सूट मिळते.
केवळ कल्पनेसाठी पेटंट मिळत नाही. एखादे उत्पादन किंवा प्रकिया ह्यासाठी पेटंट मिळत असते. त्यामुळे तुमच्या मनात एखाद्या उत्पादाची (प्रॉडक्ट) कल्पना आली असल्यास त्याचे पेटंट तुम्हाला घेता येईल. फक्त पेटंट अर्जात ड्रॉइंग आणि इतर तांत्रिक माहिती देता यायला हवी. कल्पना हवेतली नको. प्रोटोटाइप बनवून दाखवले नाही तरी चालेल पण तो प्रॉ़डक्ट बनविता येण्याजोगा आणि वापरता येण्याजोगा आहे, ह्याची पेंटट तपासनिसाला खात्री पटायला हवी. आविष्काराला नॉवेल्टी, इनवेंटिव स्टेप आणि इंडस्ट्रियल ऍप्लिकेबिलिटी हे तीन निकष लावून पेटंट देण्यात येते.
होय...
हे बरोबर.
दिल्लीतूनच नव्हे..
मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता ह्या चार महानगरांत पेटंट नियंत्रकाची कार्यालये आहेत. प्रत्येक केंद्राचे कार्यक्षेत्र ठरलेले आहे. तुम्ही कुठे राहाता ह्यावर केंद्राची निवड अवलंबून असते. उदा. पुण्यातला आवेदक असल्यास त्याला मुंबईतून ही सगळी प्रक्रिया करावी लागेल.
उदाहरण.
भरपुर माहिती मिळाली आणि त्याबद्दल सर्वांचे खुप खुप आभार!!
समजा एका रविवारी दुपारी वामकु़क्षी करताना माझ्या डोक्यात टाईममशीन ची कल्पना आली.
पण माझा सध्याचा व्यवसाय आणि टाईममशीन यांचा दुरपर्यंत संबंध नसल्यामुळे मला ते कसे बनवायचे हे माहित नाही.
पण मी समजा त्याचा ब्लॉक डायग्राम आणि ते कसे दिसेल याचे चित्र काढुन दिले तर त्यावर पेटंट मिळु शकते का?
-अभिजीत राजवाडे
एका अटीवर मिळेल
चालण्यासारखे (यूजेबल) टाईममशीन आहे असे दाखवून द्यायला लागेल.
नितिन थत्ते
धन्यवाद!!
आभार नितीन!!
अभिजीत राजवाडे
ताकाला जावून भांडे का लपवता?
हे काय भलतंच?
इथील अनेकांनी आपल्या प्रश्नाला गंभीरपणे उत्तरे दिली अन् तुम्ही त्या सगळ्यांची थट्टा करीत, रविवारी दुपारी वामकुक्शी घेताना, असे म्हणत आहात? ये अच्छी बात नही है!
मला स्वतःला श्रीमंत व्हायचे आहे, करोडपती-अब्जोपती व्हायचे आहे. त्यासाठी मी अनेक पुस्तके वाचत असतो, व्यक्तिमत्त्व विकासाहेतू वेगवेगळ्या कार्यशाळांना उपस्थिती लावून जे शिकत येईल ते शिकण्याचा प्रयत्न करीत असतो. जगात कोणतीही गोश्ट फुकट मिळत नसते तसेच फुकट मिळालेल्या गोश्टीचा मान देखील राखला जात नसतो. आपल्या वरील वाक्यातून त्याची प्रचिती येत आहे.
महाराश्ट्रात कित्येक मराठी गुणीवंत मंडळींनी समाजासाठी काहितरी नवीन देण्याहेतू नव्या गोश्टी आपल्या स्वखर्चाने अस्तित्वात आणल्या परंतु त्या गोश्टी ह्या महाराश्ट्रात पैसे देवून म्हणाव्या तशा विकत घेतल्या गेल्या नाहीत. त्या गुणीवंत व्यक्तीला श्रीमंत होणं दूरच, उलट केलेला खर्च देखील मिळवताना नाकी नऊ आले. काहि अपवाद असतीलही.
मला ठाऊक असलेली सद्द्याची उदाहरणे घ्यायची झाली तर..
वरील प्रतिसादातील कविता महाजनबाईंनी मराठीतील पहिली मल्टीमिडीया कादंबरी स्वखर्चाने बाजारात आणली. याआधी त्यांनी देखील याच संकेतस्थळावर सांगितले होते कि त्या कार्यासाठी घेतलेले कर्ज त्यांना अजूनपर्यंत फेडावे लागत आहे.
श्री. विद्द्याधर अमृतेंनी मराठीतून ऍटलास आपल्या कश्टाने तयार करून स्वखर्चाने छापून बाजारात आणला. पण तो त्यांना अनेक ठिकाणी मोफत वाटावा लागतोय, कारण कोणी खरीदारच त्यांना मिळत नाही आहे.
श्री. शुभानन गांगल, श्री. ओंमकार जोशी यांनी देखील आपल्या-आपल्या परीने समाजाला काहितरी देण्याचा प्रयत्न केला होता. पण बदलाचे वारे युरोप-अमेरिकेतूनच येतात व आपल्या चिंटुकल्या संशोधनाला कुठच्या कुठे वाहून नेतात.
अशी अनेक उदाहरणे आहेत, असे असताना तुम्हाला टाईममशीनची कल्पनेसाठी पेटंट हवा आहे असे म्हणून येथील संकेतस्थळावरील सदस्यांची, प्रतिसादकांची थट्टा करावीशी वाटते?
केवळ पेटंट घेवून श्रीमंत नाही होता यायचं. ती केवळ आपली कल्पना कोणी चोरू नये ह्यासाठीची एक पायरी आहे. कल्पना बाजारात विकणं, ही पुढची पायरी आहे असे मी माझ्य चिंतनातून समजलो आहे.
अरे बापरे!! तुम्हाला काय् झाले.
अहो महाराज्, माझा प्रश्न् काय् आहे ते आधी समजुन् घ्या आणि नंतर् माझा पाहिजे तेवढा राग राग् करा. तुमच्या राग करण्याने मला माझे उत्तर् मिळत असेल् तर् तेच् अपे़क्षीत् आहे.
कल्पनेची आकृती (ब्लॉक डायग्राम) आणि ते कसे दिसेल याचे चित्र काढुन दिले तर त्यावर पेटंट मिळु शकते का?
आणि मी सुद्धा या संकेतस्थळाचा भाग आहे. मी काही परका नाही. मी कुणाचीही इथे थट्टा केली नाही आणि ती करण्याचा माझा उद्देशही नाही.
मला माझी खरी कल्पना काय् आहे हे सांगायचे नव्हते म्हणुन् टाईम् मशीन् चे रुपक् घेतले.
"आणि प्रतिसाद् वाचुन\ समजुन , प्रतिसाद् देणे त्यामुळे चर्चा भलत्याच् दिशेला सरकणार् नाही आणि त्यातुन् सकारात्मक् संदेश् जाईन् हि विनंती."
तुम्ही वडिलधारे आहात, माझ काही चुकल् असेल् तर् मोठ्या मनाने माफ करा पण् उत्तर् द्या.
तुम्हाला विनंती आहे जरा हलके घेणे.
(वाळ्याचा पंखा आवडणारा) अभिजीत राजवाडे