मंटो

मंटो या लेखकाच्या साहित्यात व व्यक्तिमत्वात ज्यांना रस आहे, त्यांनी हे जरूर वाचावे. खूप वेगळा आणि चांगला, सविस्तर, ( उदयप्रकाश यांच्या शब्दांत सांगायचं तर 'समीक्षेतील साहस' वाटावं असा ) हा लेख आहे. मंटो यांच्या काही कथा मी पूर्वी मराठीत अनुवादित केल्या होत्या. इतर अनेक अनुवादकांनीही केलेल्या आहेत. इस्मत चुगताईंवर त्यांनी एक सुरेख लेख लिहिला होता. "मेरा दोस्त मेरा दुश्मन" अशा शीर्षकाची एक मालिका सारिका या मासिकात होती. त्यात दोन ( वाचकांना जे एकमेकांचे 'स्पर्धक' वाटतात अशा ) समकालिन लेखकांनी एकमेकांविषयी लिहायचे अशी मूळ कल्पना होती. अशा जोड्या निवडून वर्षभर आधीच त्यांनी पूर्ण मालिकेचे १२ जोड्यांचे २४ लेख लिहून घेतले होते. दुसराही आपल्यावर लिहिणार आहे, हे कुणालाच माहीत नव्हते. त्यात मंटो आणि इस्मत चुगताई यांनी एकमेकांवर लिहिलेले लेख वाचताना आजही वेगळीच खुमारी जाणवते.
http://www.junputh.com/2012/05/take-him-away-lord-for-he-chases-after.html
जनपथ: Take him away, Lord, for he chases after filth : Manto@100
www.junputh.com

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

सवडीने लेख वाचतो. तूर्त धन्यवाद.
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

दुवा हवा होता का?

मंटो या लेखकाच्या साहित्यात व व्यक्तिमत्वात ज्यांना रस आहे, त्यांनी हे जरूर वाचावे.

सारिकातल्या इस्मत चुगताई ह्यांच्या लेखाचा दुवा हवा होता का? (खालचा जनपथावरील लेख 'समीक्षेतले साहस' वाटले नाही.)

नुकताच मोहम्मद हनीफ ह्या पाकिस्तानी लेखकाचा लेख बीबीसीच्या साइटवर वाचला. आणखी एक लेख तिथेच वुसतुल्लाह खान ह्यांचा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ठंडा गोश्त

नुकतीच् मंटो ची ठंडा गोश्त हि लघुकथा वाचली. अंगावर् येते ती कथा. या लेखकाबद्दल् आणखी जाणुन घ्यायचे होते. या लेखाने त्याची कसर थोडीफार् भरुन् निघेल्.

आभार्,

अभिजीत राजवाडे

 
^ वर