राजकारण
वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!
गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'. आणि बहुतेक सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं तसं इथेही पुनर्वसनाच्या नावाने बोंब आहे. मात्र मागच्या आठवड्यात मेल आलं की आता तिथे सत्याग्रह चालू होतोय. सत्याग्रह म्हणजे, आपल्या हक्काच्या जमिनीवर पेरणी करणं, तिथे ठाम उभं राहणं. पाणी चढलं तरी हरकत नाही. पाहिजे तर बुडून मरू पण हक्क सोडायचा नाही. नर्मदेतले अशा पद्धतीचे फोटो बघितलेच असतील बहुतेकांनी. इथेही तसंच काहीसं.
ढोबळेंसारखे अधिकारी आम्हाला हवे आहेत का?
नाना पाटेकरांनी नुकतेच "पुण्यातही ढोबळेंसारखा अधिकारी हवा" असे विधान केले आहे. वसंत ढोबळे यांना "मुंबईचे सिंघम" म्हणून ओळखले जात आहे. ढोबळे हे कोण आहेत, त्यांच्या कारकिर्दीचा थोडासा आढावा खालील लेखावरून येईल.
मनमोहन सिंग ह्यांच्याकडे अर्थ खाते
प्रणव मुखर्जींना राष्टपतीपदासाठी उमेदवार घोषित केल्यापासुन अर्थ खाते कुणाकडे जाणार हा प्रश्न होता.
आईची जात: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मिश्रजातीय संततीस आईची जात लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी लोकसत्तेत जाहीर झाली होती. यावर भाष्य करणारा एक विस्तृत लेख लोकप्रभा साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे.
पंतप्रधानपदासाठी विरोधीपक्षाचा उमेदवार
पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव बातम्यांत येऊ लागले आहे. मोदी यांनी एक कुशल, चांगला प्रशासक म्हणून नावलौकिक कमावला आहे.
निर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे
निर्मल दरबार नावाचा कार्यक्रम अनेक प्रसिद्ध टीव्ही चॅनल्सवर गेली काही वर्षे दिसत असे. या कार्यक्रमातून निर्मलजीतसिंह नरुला हा इसम चमत्काराचे दर्शन घडवतो. हा कार्यक्रम स्थगित करण्याबद्दल न्यायालयाने आदेश दिले आहेत.
भारतरत्नाचे दावेदार
सचिनला भारतरत्न द्यावे अशी मागणी होत असताना, विश्वनाथन आनंद हाच भारतरत्नाचा दावेदार असल्याचे वृत्त आता प्रसारित होत आहे.
लोकसत्तेतील हे वृत्त म्हणते -
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=230...
सार्वजनिक संवादाची पातळी खालावली आहे का?
पुरावे न सादर करता अण्णांनी पंतप्रधानांवर केलेले आरोप वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दिसतात. त्यापैकी एक बातमी -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229953:2012-06-01-11-18-33&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
हफीज सईदसाठी ५६ करोड?
हफिज सईद कोण आहे हे उपक्रमींना माहित असावे. अधिक माहिती येथे बघा: http://www.mr.upakram.org/node/3717
आरुषी खून खटला आणि सीबीआय
गेली ४ वर्षे चाललेला आरुषी खून खटला किंवा नोयडा दुहेरी खून खटला वृत्तपत्रांचे पहिले पान अडवत असतो. या खटल्याविषयी सर्व उपक्रमींना माहिती असावी असे येथे गृहित धरले आहे.