आईची जात: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मिश्रजातीय संततीस आईची जात लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी लोकसत्तेत जाहीर झाली होती. यावर भाष्य करणारा एक विस्तृत लेख लोकप्रभा साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिन्क येथे देत आहे.
http://www.lokprabha.com/lokprabha/20120629/prasangik.htm
या लेखातील काही भाग खाली दिला आहे.-
मिश्र संततीला आईच्या मागास जातीचं लेबल मिळालं तर त्याला विरोध कोण करणार? विरोध करणाऱ्याला पुरुषप्रधान झापडबंद संस्कृतीपासून ते मागासविरोधीपर्यंत सर्व प्रकारची दूषणं देऊन कानकोंडं करण्याची प्रचंड सोय या प्रस्तावात आहे.
अनुलोम विवाह म्हणजे उच्चवर्णीय पुरुष व निम्नवर्णीय स्त्री यांचा विवाह आणि प्रतिलोम म्हणजे उच्चवर्णीय स्त्री व निम्नवर्णीय पुरुष यांचा विवाह.
आंतरजातीय विवाहांमध्ये ही विसंगती निर्माण होण्यामागे अनेक सामाजिक घटक आहेत. महाराष्ट्रातील कथित उच्चवर्णीय समाज निम्न जातीतील सून स्वीकारण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतात, त्याचवेळी जातीय शिडीवर उच्च समजली गेलेली मुलगी मात्र सून म्हणून पटकन स्वीकारली जाते. कनिष्ठ जातीतल्या मुलीशी असलेले मुलाचं प्रकरण येनकेनप्रकरेण हाणून पाडायचा प्रयत्न होतो.
आई-वडिलांनी आंतरजातीय विवाह केलाय म्हणजे त्यांना जाती व्यवस्थेतील चढ-उतरंड मान्य नाही असं गृहीत धरायला हरकत नसते. आपण आंतरजातीय विवाह म्हणजे आपल्या समाजातील जातीय उच्च-नीचतेच्या कल्पना उखडण्याच्या वाटचालीतला एक भाग समजला आहे. आंतरजातीय विवाहातून जन्मणाऱ्या संततीला जातीय अभिनिवेश असणारच नाहीत अशी एक सोयीस्कर समजूत आपण आधीच करून ठेवलेली आहे. या समजुतीच्या नेमकं विसंगत या प्रस्तावाचं स्वरूप असणार आहे हे आपल्या लक्षात यायला हवं.
या निर्णयावरून आणि लेखात आलेल्या अनेक मुद्द्यांवरून काही प्रश्न पडतात.
१. आईची जात लावू दिल्याने समाजातील समानतेत/विषमतेत फरक पडेल काय?
२. आईची जात अंगीकारणं म्हणजे जर पुरुषप्रधान संस्कृतीचा त्याग असू शकेल तर नेमक्या कुठल्या नवीन सामाजिक पद्धतीला आपण स्वीकारणार आहोत? (हा प्रश्न लेखात आला आहे.)
३. आरक्षणाचा फायदा सोडून आईची जात लावण्याचा फायदा इतरत्र कुठे दिसतो?
४. जात लावण्याच्या अधिकारासह वारसाहक्क, संपत्तीवाटप, वंशवृद्धी इ. ही बदलण्याची गरज दिसते का?
याच विषयावर विविध संकेतस्थळांवर सुरू असलेल्या चर्चेंमध्ये वेगळेपणा दिसावा म्हणून शीर्षक संपादित केले आहे. - संपादन मंडळ.
Comments
उत्तरे
चूक ऐच्छिक या शब्दामुळे आहे असे मला वाटते.
कुतूहलः क या उच्चवर्णीय पुरुषास ख या उच्चवर्णीय स्त्रीपासून ग हे अपत्य झाले. क ने खच्या अनुमतीने घ या निम्नवर्णीय स्त्रीशी कागदोपत्री करार करून विवाह केला तर ग ला सावत्र आईची जात लावता येईल काय? (नंतर घ ला काडीमोड दिला तर ग ची पदवी रद्द होईल काय?) थोडे समांतर उदाहरण येथे आहे.
एक विचार
>>आरक्षण असेपर्यंत जात टिकेल आणि जात असेपर्यंत श्रेष्ठत्वाची संकल्पनासुद्धा टिकेल असे मला वाटते.
समजा, आरक्षणाच्या फायद्यासाठी जातबदल केली गेल्यास, २/३ पिढ्यांनंतर श्रेष्ठत्वाची संकल्पना थोडी भोंगळ होईल काय? किंवा आरक्षणाची संकल्पनाच अडचणीत येईल काय?
कायदेशीर मार्ग
दत्तक घेतलेल्या मुलांबद्दल कसे?
असो. ह्यातून कायदेशी मार्ग काढता येण्यासारखा आहे. बायलॉजिकल आई असल्यासच अशी जात लावता यावी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आंतरजातीय विवाह
आंतरजातीय विवाहामुळे जातीव्यवस्थेला धक्का पोहोचेल हे विधान खोटे नसावे. असे कायदे आले तरी आरक्षणाचा एक मुद्दा सोडून फार फरक पडेल असे वाटत नाही.
तसे वाटत नाही पण आरक्षितांची संख्या वाढेल का? (म्हणजे प्रयत्न केल्यास सर्वांनाच आरक्षण मिळवण्याची संधी चालून येईल) मिश्र संततीला आईच्या मागास जातीचं लेबल मिळालं तर त्याला विरोध होणार नाही हे निरीक्षण खरे आहे.
आईची जात अंगीकारणे ही केवळ जातीचे फायदे मिळवण्यासाठी उपयुक्त दिसते. त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीचा त्याग होईल असे वाटत नाही.
इतरत्र कुठेच नसावा. किंबहुना, इतरत्र फायदा करून घेण्याचा हेतू नसावा.
एकाने सुरुवात केली तर इतरांनी मागे का राहायचे?
सुनेला निम्नजातीतील म्हणून स्वीकारण्यास कां कु करणारे नातवंडांना सोईसुविधा मिळत असतील तर त्यात खो घालतील असे वाटत नाही. त्यामुळे अनुलोम विवाह करणार्यांचा फायदा होऊ शकेल. कदाचित सुनेचे स्टेटस वाढेल. :-)
खरं आहे.
मते आणि पाठींबा मिळवण्यासाठी विविध प्रकारांनी जातीचे राजकारण खेळले जाते त्यावरून 'जात नाही ती जात' हेच खरे!
खबरदार
काही मजकूर संपादित.
प्रश्न समजला नाही कोणत्या बाबतीतली समता? स्त्रीपुरुष? जातींमधील? प्रश्न संदिग्ध!
मुळात त्याग होईल असे वाटत नाही त्यामुळ पुढील प्रश्न गैरलागू
वैयक्तिक स्वार्थासाठी का होईन वेळा जातीमुळे विवाहास संमती मिळण्यास होणारा विरोधाचे प्रमाण अल्पसे कमी होऊ शकते (केवळ शक्यता)
नाही कळले. मुलीला तसंही संपत्तीत वाटा आहे. पत्नीला असतो. प्रश्न मला कळला नाही
ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>