भारतरत्नाचे दावेदार

सचिनला भारतरत्न द्यावे अशी मागणी होत असताना, विश्वनाथन आनंद हाच भारतरत्नाचा दावेदार असल्याचे वृत्त आता प्रसारित होत आहे.

लोकसत्तेतील हे वृत्त म्हणते -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=230...

‘..आता भारतरत्न कोणाला?’ असा प्रश्न विचारून विश्वनाथन आनंद आणि सचिन तेंडुलकर असे दोन पर्याय देण्यात आले होते. या सर्वेक्षणाला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतरत्नसाठी विश्वनाथन आनंदच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्वेक्षणामध्ये जवळपास पंच्च्याहत्तर टक्के जणांनी विश्वनाथन आनंद हाच भारतरत्नचा खरा दावेदार आहे असे म्हटले आहे.
भारतरत्नसाठी विश्वनाथन आनंदच्या नावावर शिक्कामोर्तब करताना तोच आजच्या तरुणांसमोरचा खरा आदर्श असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. तो बुद्धिमान तर आहेच, पण आपल्या जगज्जेतेदाचा कुठलाही गर्व त्याला नसल्याच्या प्रतिक्रिया वाचकांनी नोदवल्या आहेत.

  1. या बाबत उपक्रमींना काय वाटते?
  2. भारतरत्नासाठी सचिन आणि विश्वनाथन खेरीज इतर खेळाडू त्यांना दिसतात का?
  3. खेळाडूला भारतरत्न द्यायचे झाल्यास कोणते निकष असावे?
  4. खेळाडूंना सोडून इतर क्षेत्रातील एखादी व्यक्ती भारतरत्नाची मानकरी व्हावी असे त्यांना वाटते का?

Comments

:)

कुणालाच देऊ नये. एकाला दिल्यास दूसर्‍यास दुखावल्यासारखे होइल. आणि अजून बरेच दिग्गज (ध्यानचंद इ.) होउन गेले आहेत त्यांना वगळ्यासारखे होइल. नसता सगळ्यांना द्यावा :)

---------------------
-धनंजय कुलकर्णी

शिळ्या कढीला ऊत

लोकसत्तेला शिळ्या कढीला ऊत (ऊत की उत? विसरले!) आणण्यात इंटरेष्ट दिसतो. ;-)

2.भारतरत्नासाठी सचिन आणि विश्वनाथन खेरीज इतर खेळाडू त्यांना दिसतात का?

ध्यानचंद तर स्ट्राँग ऑप्शन असावेतच पण समजा, अभिनव बिंद्राने या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले तर तो ही या यादीत सामील होईल काय? नेमबाजांना प्रसिद्धी वलय फारसे नाही.

यावरून आठवले,

मागे बीसीसीआयचा संघ हा भारताचा संघ असल्या/ नसल्याबद्दल उपक्रमावर चर्चा झडली होती. ती शोधायचा कंटाळा येतो पण त्यालाच अनुसरून विचारायला हवे की व्यावसायिक खेळाडूंना भारतरत्न द्यावे का? विश्वनाथन आनंद हा व्यावसायिक बुद्धीबळपटू आहे की भारतातर्फे खेळतो? प्रश्न सहजच विचारला आहे. माझे वैयक्तिक मत असे की भारतातर्फे खेळत नसेल पण भारतीय नागरीकत्व असेल तर तेवढे पुरेसे आहे.

भारतरत्नसाठी विश्वनाथन आनंदच्या नावावर शिक्कामोर्तब करताना तोच आजच्या तरुणांसमोरचा खरा आदर्श असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. तो बुद्धिमान तर आहेच, पण आपल्या जगज्जेतेदाचा कुठलाही गर्व त्याला नसल्याच्या प्रतिक्रिया वाचकांनी नोदवल्या आहेत.

असा गर्व कोणाला आहे? सचिनला का?

 
^ वर