निर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे

निर्मल दरबार नावाचा कार्यक्रम अनेक प्रसिद्ध टीव्ही चॅनल्सवर गेली काही वर्षे दिसत असे. या कार्यक्रमातून निर्मलजीतसिंह नरुला हा इसम चमत्काराचे दर्शन घडवतो. हा कार्यक्रम स्थगित करण्याबद्दल न्यायालयाने आदेश दिले आहेत. तान्या ठाकूर आणि आदित्य ठाकूर या दोन लहान/तरुण मुलांनी निर्मल बाबाबद्दल फसवणूकीची तक्रार केली आहे. या तक्रारीविरुद्ध अलाहाबाद हायकोर्टाने सध्या स्टे ऑर्डर काढली आहे. याचे सविस्तर वृत्त येथे वाचा:

http://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/Allahabad-High-Court-sta...

The FIR was lodged against Baba on the complaint of two children, Tanya Thakur (16) and her brother Aditya (13). They had approached the chief judicial magistrate (CJM) after their application was initially rejected by the police. Later, on the direction of the CJM, police registered an FIR. In their petition before CJM, the children stated that Nirmal Baba is cheating ordinary and poor people facing various problems in life through his improbable solutions

निर्मलबाबाचे कार्यक्रम पाहणार्‍या माणसाला फसवणूक सहज दिसून येते. यासाठी यू-ट्यूबवर हे कार्यक्रम पाहावे. बाबाविरुद्ध लहान मुलांनी केलेल्या या तक्रारीमुळे सामान्य माणसे हे प्रश्न धसाला लावू शकतात हा विश्वास वाटतो आणि सोबत काही प्रश्न पडतात -

  1. प्रतिष्ठीत टीव्ही चॅनल्सनी असे कार्यक्रम दाखवू नयेत याबद्दल त्यांची तक्रार कोठे करावी?
  2. कायद्याच्या कचाट्यात न सापडण्यासाठी कार्यक्रमापूर्वी दाखवल्या जाणारा डिस्क्लेमर वगळता टीव्ही चॅनल हे कार्यक्रम प्रसारित करताना कोणती पळवाट वापरतील?
  3. हे कार्यक्रम जाहीरातींसारखे दाखवले जात असताना अंधश्रद्धा निर्मूलन संघटनांनी ते हाणून पाडल्याची उदाहरणे दिसतात काय?

निर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमेनिर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे

Comments

गरज नाही

>>निर्मलबाबाचे कार्यक्रम पाहणार्‍या माणसाला फसवणूक सहज दिसून येते.<<

असे असल्यास व अन्यथा देखिल - सुपरमॅन, स्पायडरमॅन, शक्तिमान(वाह्यात मालिका) वगैरे वर बंदी नसल्यास असल्या कार्यक्रमांवर बंदी आणणे स्वातंत्र्यविरोधी असेल, फारतर श्रेयअव्हेर(डिसक्लेमर) वगैरे दाखविणे गरजेचे करावे.

सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि शक्तीमान

सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि शक्तीमान त्यांचे ते चित्रविचित्र कपडे घालून लोकांत राजरोस फिरत नाहीत असे वाटते आणि ते भक्तगण गोळा करण्यासाठी मेळावे आयोजित करत नाहीत किंवा पैसे उकळत नाहीत. काल्पनिक पात्रे आणि खर्‍या व्यक्ती वेगळ्या असल्याने नियमही वेगळे लागणे गरजेचे वाटते.

प्रश्नांची उत्तरेही माहित नाहीत पण पल्लवी छेलावडा नावाची एक बाई टीव्हीवर जाहीरातींतून सर्वत्र धूमाकूळ घालत असते तिला हॅल्थ आणि वॅल्थचे योग्य उच्चार शिकवणे गरजेचे आहे.

परिणाम्

>>सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि शक्तीमान त्यांचे ते चित्रविचित्र कपडे घालून लोकांत राजरोस फिरत नाहीत असे वाटते आणि ते भक्तगण गोळा करण्यासाठी मेळावे आयोजित करत नाहीत किंवा पैसे उकळत नाहीत<<

तक्रार परिणांमांबद्दल आहे, मॅनलोकांमूळे जीव गेल्यास अशाप्रकारच्या मालिका बंद करणार का? पेरेन्टल गायड्न्स वगैरे डिसक्लेमर ठीक आहेच न?

>>प्रश्नांची उत्तरेही माहित नाहीत पण पल्लवी छेलावडा नावाची एक बाई टीव्हीवर जाहीरातींतून सर्वत्र धूमाकूळ घालत असते तिला हॅल्थ आणि वॅल्थचे योग्य उच्चार शिकवणे गरजेचे आहे.
उच्चार ठीक असल्यास धुमाकूळ चालेल काय? ;)

हो!

तक्रार परिणांमांबद्दल आहे, मॅनलोकांमूळे जीव गेल्यास अशाप्रकारच्या मालिका बंद करणार का? पेरेन्टल गायड्न्स वगैरे डिसक्लेमर ठीक आहेच न?

मालिकेचे उद्दिष्ट मनोरंजन असेल तर अज्ञान बालकांसाठी पेरेन्टल गायडन्स वगैरे डिस्क्लेमर हवेत. हे मान्य आहे.

पण बाबाबुवांकडे जाणार्‍या सज्ञान व्यक्तींना (बायदवे, या कार्यक्रमांना मनोरंजन म्हणून प्रसारित केले जाते की कसे? असे वर्गीकरण बहुधा नसावे.) कोणत्या पेरेन्टचे गायडन्स ठेवावे? ह. घ्या.


उच्चार ठीक असल्यास धुमाकूळ चालेल काय? ;)

हेहेहे! नाही पण दुर्लक्ष करणे सोपे जाईल. या बाईच्या भन्नाट उच्चारांमुळे उगा कान टवकारले जातात.

उत्तरे


फुकटात - न्या. काटजू आहेत ना!
कष्ट घेऊन - पोलिस/कोर्ट/अण्णा यांच्याकडे दाद मागा किंवा आत्मघातकी हल्लेखोर प्रशिक्षण केंद्र उघडा.

ती पळवाट नाही, पुरेशी खबरदारी आहे.

नाही. त्यांना लोकसहभाग आणि प्रसिद्धी हवी असते. ती पुरेशी मिळत नाही असे दिसते तेव्हासुद्धा असल्या प्रश्नांचा सरकारकडे तक्रार करून सोक्षमोक्ष लावण्यात त्यांना रस नसतो.

आयबीएफ्

1.प्रतिष्ठीत टीव्ही चॅनल्सनी असे कार्यक्रम दाखवू नयेत याबद्दल त्यांची तक्रार कोठे करावी?

हल्ली टिव्हीवर प्रत्येक कार्यक्रमादरम्यान एक स्क्रॉल जातो की तक्रार करायची असेल तर आयबीएफ् कडे तक्रार नोंदवा.
ती कशी नोंदवावी याच्या गाईडलाईन्स इथे वाचायला मिळतील. तिथेच तक्रारीचा फॉर्मही तरवून घेता येईल

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

निर्मल बाबा आणि प्रसार माध्यमे

केवळ निर्मलबाबांचे कार्यक्रम नाहीत तर अंधश्रधा पसरवणाऱ्या सर्व कार्यक्रमावर उदा. अंधांना दृष्टी देण्याचा दावा करणारे कार्यक्रमावर हि बंदी घालावी अशी मागणी करता येईल.
जनभारती

कार्यक्रम सुरु आहेत असे वाटते

निर्मलबाबांचे कार्यक्रम टिव्हीवर व्यवस्थित सुरु आहेत असे वाटते. काल "चॅनेल गाइड" हाताळताना बहुधा आजतक वाहिनीवर हा कार्यक्रम होता असे दिसले. पाहण्याचा योग आला नाही. वेळ काढून बघेन म्हणते. या कार्यक्रमादरम्यान नेमके कोणते डिस्क्लेमर्स दाखवले जातात ते पाहणे रोचक वाटते.

वर चर्चेत दिलेला दुवा चालत नाही.

करमणूक

कार्यक्रम पाहून माझी करमणूक झाली, बाबा संकटनिवारणासाठी 'पाणीपुरी/रसगुल्ले/पापडीचाट' खाण्याचा व गरिबांना वाटण्याचा सल्ला देतात, एकार्थी चांगलेच आहे, बाबांना खायला घालण्यापेक्षा स्वतः खायला सांगत आहेत.

मस्तपैकी....

हा फक्त निर्मलबाबांचा प्रश्न नाही. थोडे अतिरेकी वाटेल पण माझे असे स्पष्ट मत आहे की झाडून सगळ्याच महाराजांनी तथाकथित भक्तांच्या अज्ञानाचा खरे तर मनातील असुरक्षिततेच्या भावनेचा (जी की या पैकी बहूतेकांना लोकांच्या माना मुरगाळून कमावलेल्या नं. दोनच्या पैशामूळे आलेली आहे.) काही ना काही फायदा उचललेला आहे. या सगळ्यांना त्यांच्या अज्ञानाची फळे भोगू द्यावीत. आणि बाबांना त्यांच्या कर्तृत्वाची फळे चाखू द्यावीत. खुपच कळवळा आला असेल तर विनाकारण कोल्ह्याला द्राक्षे आंबट असल्यासारखे वागण्यापेक्षा मस्तपैकी दाढी वाढवून (हल्ली गुळगुळीत ठेऊन सुद्धा) भगवी वस्रे परिधान करावीत. शुभेच्छा.

 
^ वर