राजकारण

नितीन गडकरी

भारतीय जनता पक्षाचे (खाण्याप्रमाणेच!) बोलण्याचा धरबंद नसलेले विद्यमान अध्यक्ष श्री. नितीनभाऊ गडकरी यांनी स्वामी विवेकानंद यांची तुलना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासोबत केल्याने मोठाच गोंधळ माजला आहे. मुळात स्वामी विवेकानंद यांचे सर्वसमावेशक हिंदुत्त्व, 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' असे ख्रिश्चन-मुस्लिम बांधवांना शिकागोमध्ये उद्देशून भाषण, याचा मागमूसही भाजपा आणि संघाच्या आक्रमक हिंदुत्त्वात सापडत नाही. तरीही संघिष्ठांचा कोणताही कार्यक्रम शक्यतो विवेकानंदांचे स्मृतीपूजन करून होतो असे वाटते. मात्र गडकरींच्या या फ्रॉईडियन स्लिपमुळे विवेकानंदांबाबत भाजपाचा मुखवटा आणि चेहरा हा असा उघड झाला आहे.

राज्य - हक्क - विकास आणि देश

सध्या नितिश कुमारांचा मुद्दा - "बिहारला विषेश दर्जा हा बिहारचा हक्कच आहे" चर्चेत आहे. या मुद्यामागे असलेले राजकारण सर्वचजण जाणतात. पण हि एक धोक्याची घंटा वाटते आहे. भारतातले प्रादेशिक पक्ष, प्रत्येक राज्याच्या मागण्या आणि त्यासाठीचे होणारे केंद्र सरकार बरोबरचे सौदे जर असेच सुरु राहिले तर आपली देश हि संकल्पना लवकरच बदलत जाईल असे वाटते. या विषयाला धरुन अनेक प्रश्न समोर येतात. ते तसे जुनेच आहेत. पण सध्याच्या वातावरणाला जास्त अस्थिर बनवणारे आहेत. तुम्हाला काय वाटते?

बिहारला असा विषेश दर्जा द्यावा का?
असे केल्यास अशी कोणती राज्य आहेत ज्यांना असा दर्जा देणे जास्त गरजेचे आहे?

असिम त्रिवेदी

असिम त्रिवेदीला अटक झाल्यानंतर माध्यमांमधे बराच धुरळा उडाला. इतके दिवस असिम त्रिवेदी हा प्राणी कोण आहे हे बर्‍याच जणांना (मला तरी) माहितही नव्हते. माध्यमांमधुन नाव झळकू लागल्यावर कुतुहलाने ह्याची चित्रे शोधली. संविधानावर लघवी करणारा कसाब किंवा विधानसभेचे केलेले शौचकुप वगैरे चित्रे फारंच सुमार वाटली. त्यामधे ना कसला विनोद होता ना चित्रकारी. अर्थातच सुमार चित्रे काढतो म्हणून कुणाला अटक करू नये. ह्याला अटक झाली आणि त्यामुळे अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी वगैरे ओघाने आलेच.

चिल्लर पार्टी

पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या काल न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.

फेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.
मला पडलेले काही प्रश्न –

राज यांनी मोर्चा काढून काय साधले?

राज ठाकरेंनी आझाद मैदानावर यशस्वी मोर्चा काढून एका दगडात अनेक पक्षी टिपले आहेत असे सर्वत्र म्हणले जात आहे. यावर लोकसत्तेतील अग्रलेख "राज आणि पृथ्वीराज" येथे वाचा -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245...

हातच्या काकणाला आरसा कशाला?

पुढील लेखन 'ई-सकाळ'मध्ये आत्ताच वाचले आणि अंगावर काटा उभा राहिला.

अण्णा, काय केलंत हे?

अण्णा हजारे३ ऑगस्ट २०१२ रोजी उपोषणाची सांगता करण्याचा अण्णांचा निर्णय मनाला विषण्णतेचा चटका लावून गेला. असे वाटले कीं अतीशय पूजनीय, साक्षात् त्यागमूर्ती असलेल्या ज्या व्यक्तीला सार्‍या देशाने एका उत्तुंग आसनावर (pedestal) बसविले होते त्या व्यक्तीने सार्‍या राष्ट्राचा आज जणू अवसानघातच केला. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील उपोषणानंतर तर त्यांनी मला "संभवामि युगे युगे" असे अर्जुनाला सांगणार्‍या भगवान श्रीकृष्णाची आठवण करून दिली होती. पण मुंबईच्या त्यांच्या उपोषणाकडे जनतेने केलेल्या दुर्लक्षामुळे मनात शंकेची पाल चुकचुकतच होती.

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.

त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.

सरकारी खर्चाने साहित्य संम्मेलने करावीत का?

लोकसत्ता व्यासपीठावर रंगलेल्या साहित्य मैफिलीत विविध साहित्यिकांनी साहित्य संमेलनाविषयी आपापली मते मांडली. त्याची बातमी लोकसत्तेत इथे वाचा -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=241...

बातमीचा काही भाग खाली पहा -

सीरियात चाललेली उलथापालथ

नातेवाईकांच्या किंवा जातीवर आधारलेल्या राजकारणात रक्ताच्या नात्यांनाच शेवटी महत्व येते. सध्या सरकारविरोधी उठावात रस्त्यावर सांडले जाणारे रक्त आहे सुन्नी मुसलमानांचे. त्यामुळे एव्हाना तलास कुटुंबियांवर सुन्नींची बाजू घेण्यासाठी प्रचंड दबाव येऊ लागला असावा. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या शिया पंथाला जवळ असणार्या ’अलावी गटाच्या सत्ताधार्यां ना समर्थन देण्याची जी किंमत भविष्यकाळात मोजावी लागेल ती तेंव्हां मोजण्याऐवजी आता आपण आपले समर्थन मागे घेण्याची वेळ आताच आलेली आहे असा हिशेब तलास कुटुंबियांनी केलेला असावा! या निर्णयामागचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाहीं.

 
^ वर