असिम त्रिवेदी
असिम त्रिवेदीला अटक झाल्यानंतर माध्यमांमधे बराच धुरळा उडाला. इतके दिवस असिम त्रिवेदी हा प्राणी कोण आहे हे बर्याच जणांना (मला तरी) माहितही नव्हते. माध्यमांमधुन नाव झळकू लागल्यावर कुतुहलाने ह्याची चित्रे शोधली. संविधानावर लघवी करणारा कसाब किंवा विधानसभेचे केलेले शौचकुप वगैरे चित्रे फारंच सुमार वाटली. त्यामधे ना कसला विनोद होता ना चित्रकारी. अर्थातच सुमार चित्रे काढतो म्हणून कुणाला अटक करू नये. ह्याला अटक झाली आणि त्यामुळे अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी वगैरे ओघाने आलेच.
मुसलमानांच्या भावना दुखावणारी एक चित्रफितही नुकतीच पाहिली. ज्यावरुन सध्या जगभरात दंगे होत आहेत ती चित्रफित थर्डग्रेडची आहे. सुमार पद्धतीने प्रेषिताची उडवलेली रेवडी फारंच बालिश आहे. पण इतके दंगे होत असले तरी मूळ चित्रफित अजुनही युट्युबवर उपलब्ध आहे, त्यावर बंदी न आणण्याचे कारण अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्य.
पण दोन्ही घटनांमधे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा समान घटक असला तरी फरक म्हणजे सुजाण लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया. वादग्रस्त चित्रफितीवर बंदी घालण्याचे समर्थन किंवा विरोध करणारे मूळ चित्रफितीला घृणास्पदच म्हणतात. पण असिम त्रिवेदीच्या अटकेविरुद्ध असणारे मात्र त्याच्या सुमारपणावर काहीही बोलत नाहीत. जणू काही असिम त्रिवेदी हा कुणी देशाचा हिरोच आहे अश्या पद्धतीने फेसबुकावर त्याचे चाललेले समर्थन दिसले. त्याची चित्रे सुमार, घृणास्पद आणि निर्बुद्ध आहेत हे त्याच्या अभिव्यक्तिचे समर्थन करतना कुणीही अधोरेखित केलेले दिसत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करताना हे अधिरेखित होणे महत्वाचे आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे देशद्रोहाच्या कलमाचा. ते कलम पोलिसांनी घातले होते पण त्या कलमाखाली खटला चालवायचा का नाही हे गृह खाते ठरवते. असिमच्या केसमधे गृहखात्याने हे कलम काढून टाकलेले आहे. पोलिस काय कोणतेही कलम लावुन चौकशीला घेऊ शकतात आणि पोलिस म्हणजे सरकार नव्हे. असिम त्रिवेदीनेही ह्याचा वापर उत्तमरीत्या करुन स्वतःची पब्लिसिटी वाढवत ठेवली आहे.
एकंदरीतच इंडीया अगेन्स्ट करप्शन ह्या लोकांनी आणलेला वात पहाता काही रिफॉर्मस होणे तर लांबच ही नविनंच डोकेदुखी सुरू झाली आहे असे वाटते.
Comments
अभिव्यक्ती
हे वाचकांना ठरवू द्यात. एखाद्याचे अभिव्यक्त होणे हे दुसर्या व्यक्तिच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा दुरुपयोग असू शकतो. मंगेश तेंडुलकरांनी आयबीएन लोकमत वर चित्राच्या सुमार दर्जावर भाष्य केले आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे. देशद्रोहाचा गुन्हा म्हणजे जरा अतिच होत होते.
सहमत
मान्य आहे. पण निदान 'सुजाण' वाचकांनीतरी ह्या चित्रांविषयी नापसंती दाखवायला हवी होती असे वाटते. देशद्रोह वगैरे अतिच आहे हेही मान्य आहे पण तो पोलिसांचा गाढवपणा आहे. अर्थात पोलिसांना वरुन आदेश आल्याची शक्यता आहेच, पण शेवटी (हायकोर्टाने कानउघडणी केल्याने का असेना) देशद्रोहाचा खटला झाला नाही हे महत्चाचे.
सुमार
चित्रांचा आशय भावनेतून आला असावा, पण चित्रकला सुमार आहे, सटल नाही, त्यामूळे त्याचा म्हणावा तसा सुपरिणाम होत नाही. पण असावे बुवा ते स्वातंत्र्य, आपण आपले दुर्लक्ष करावे म्हणजे झालं.
भडक आणि सवंग
असीम त्रिवेदीची व्यंग्यचित्रे मला भडक आणि सवंग वाटली. पण मी त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांच्या पायमल्लीचा विरोध करतो. राजद्रोहाचा गुन्हा अतीच वाटला. मुसलमानांच्या प्रेषितावरची चित्रफितही भडक आणि सवंग वाटली. आणि इंटरनेटच्या जमान्यात अशी बंदी घालून उपयोग नाही हेही लक्षात घ्यायला हवे. हुसैनच्या भारतमातेच्या चित्रावरून जो गदारोळ हिंदुत्ववाद्यांनी उठवला होता त्यात आणि ह्यात काही फरक आहे काय?
असेच
माझीही प्रतिक्रिया अशीच आहे. पण इंडिया अगेन्स्ट करप्शनवाल्यांनी पहिल्या वाक्याची सोयिस्कर बोळवण केल्याने त्रिवेदी सारख्या सुमार लोकांना वलय प्राप्त झाले.
+१
असीम त्रिवेदीची व्यंग्यचित्रे मला भडक आणि सवंग वाटली. पण मी त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांच्या पायमल्लीचा विरोध करतो
सहमत.
हुसैनच्या भारतमातेच्या चित्रावरून जो गदारोळ हिंदुत्ववाद्यांनी उठवला होता त्यात आणि ह्यात काही फरक आहे काय?
नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना समानच आहे. मग तो असीम त्रिवेदी असो, सलमान रश्दी असो, तस्लिमा नसरीन असो, एम एफ हुसेन असो, विजय तेंडूलकर (घाशीराम कोतवाल) की दीपा मेहता (वॉटर) असो.
एकाला एक न्याय लावणारे दुसर्याला दुसरा लावू शकत नाहीत.
मलाही
मलाही वृत्तपत्रातून बातम्या वगैरे झळकल्यावरच कळले. त्रिवेदीची चित्रे हिणकस आहेत. मला त्यात व्यंगचित्राची नजाकत दिसत नाही पण त्याचे पर्यवसन देशद्रोहात होत नाही असे मला वाटते.
ही देखील यट्यूब वर पाहिली आणि मला ती विकृती वाटली पण त्यापायी अमेरिकन राजदूताचा मृत्यू ओढवावा ही अतिशय खेदाची बाब.
बाकी, भावना दुखावणे या नावाखाली गुन्हे वगैरे दाखल करता येतातच. तेव्हा ते होणारच.
दर्जा सुमार आहे खरे
व्यंगचित्रांचा दर्जा सुमार आहे, हे खरे आहे.
माझ्या फेसबुक पानावर मात्र मी केवळ अभिव्यक्ति-स्वातंत्र्याचाच मुद्दा नमूद केला. बातमीच्या दिवशी मला तोच मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटला.
माझे मत
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी हा विषय सध्या एकाच वेळी तीन प्रकरणांमध्ये आहे.
असीम त्रिवेदी: चित्रे भडक आहेत, अनुल्लेखाने मारता आले असते तर बरे झाले असते. देशद्रोहाचा खटला चूक वाटतो, राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान करण्याचा खटलाही 'उपरोध/उद्वेग' या कारणाने चालविण्यात येऊ नये. मात्र, त्याला प्रसिद्धी देणे हाच उद्देश त्याच्यावर कारवाई करणार्या अधिकार्यांचा असू शकेल (त्यांची चौकशी होणार असल्याचे वाचले होते).
केट मिडलटनः हिच्या निष्काळजीपणामुळे छायाचित्रे घेण्यात आली. छायाचित्रकार तिच्या घरात घुसला नव्हता, त्याने बाहेरून दुर्बीण वापरून छायाचित्रे मिळविली. त्यामुळे, त्यांच्या प्रसिद्धीवरही बंदी येऊ नये. महंमदाच्या चित्रांविषयी नि:पक्षपाती असलेले फ्रेंच हिच्यासाठी दुटप्पी वागत आहेत.
इनोसन्स ऑफ मुस्लिम्सः अतिशय घाणेरडी चित्रफीत आहे, असीम त्रिवेदी काही फेसबुकी मेणबत्तीवाल्यांना आवडू शकतो. परंतु, या चित्रफितीत तर महंमदाविषयी बीभत्स आणि अश्लील असे खोटे दावे करण्यात आलेले आहेत. इजिप्शियन ख्रिश्चनांनी अत्याचारांना कंटाळून बनविली असली तरी तिचा उद्देश निषेध्/उद्वेग नाही. मुस्लिमांना राग आणणे हाच उद्देश आहे. तरीही, बंदी घालणे चूकच आहे*. काही पाश्चिमात्य सरकारे (उदा. जर्मनी) बंदीचा विचार करीत आहेत ते आश्चर्यकारक वाटले. (फीत निर्मात्याने स्वतः ज्यू असल्याचा दावा केला होता. ज्यूंच्या दिशेने मुस्लिमांचा हल्ला सुरू करण्याचा हा प्रयत्न हा मला गुन्हा वाटतो.) Viewpoints: Anti-Islam film and self-censorship येथील काही मते वाचनीय वाटली.
एक रोचक बातमी: Toronto group hopes to screen anti-Islam film in name of tolerance
* भावना दुखावतात त्या अभिव्यक्तींनाच संरक्षणाची आवश्यकता असते. त्यामुळे, भावना दुखाविणार्या अभिव्यक्तींना बंदी ही 'अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरील सर्वंकष बंदी'च ठरते. 'वाईट कृतीचे आवाहन' करणार्या अभिव्यक्तींना नक्कीच बंदी असावी, उदा., त्रिवेदीच्या 'संसद शौचकूप आहे' या व्यंगचित्रात, 'अफजलगुरूसारख्या सफाई कर्मचार्यांनी पुन्हा यावे' असा विध्यर्थ दडला असल्याचे न्यायालयाला वाटू शकते (मला तसे वाटत नसले तरी न्यायाधीशांचे मत माझ्या मतापेक्षा वेगळे असते तरी मला आश्चर्य वाटले नसते).
“If we don’t believe in freedom of expression for people we despise, we don’t believe in it at all.” - Noam Chomsky
देशद्रोह?
देशद्रोह वगैरे कै च्या कै च आहे.
असो. हुतात्मा चौकात एका स्मारकचिन्हाची मोडतोड केल्याबद्दल भरपूर फेसबुकी आणि राष्ट्रभक्तीछाप गदारोळ झाला होता. तो गदारोळ 'एका काचेची शोकेस' तोडण्याविषयी (पक्षी-तोडफोडीचा निषेध म्हणून) नसून 'स्मारकचिन्हाची' मोडतोड केल्याबद्दल होता अशी माझी समजूत आहे.
स्मारकचिन्ह तोडणे हे निषेधार्ह असेल तर संसदेचे किंवा राजमुद्रेचे विडंबन सुद्धा निषेधार्ह का नसावे?
अवांतर: त्या स्मारक तोडणार्या व्यक्तीला त्या स्मारकाविषयी खास द्वेष असावा असे वाटत नाही. तोडण्यास सोपी आणि खळ्ळ असा छानसा आवाज होईल अशी गोष्ट म्हणून त्याने ती तोडली असावी असा कयास आहे.
अवांतरात अवांतर
अवांतर: त्या स्मारक तोडणार्या व्यक्तीला त्या स्मारकाविषयी खास द्वेष असावा असे वाटत नाही
सदर स्मारक हे १८५७ च्या उठावाच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधले आहे असे समजते.
हे जर खरे असेल तर, त्याची तोडफोड करणार्या व्यक्तीस आपण नक्की कशाची तोडफोड करीत आहोत, त्याचे महत्त्व काय इत्यादीची अजिबातच कल्पना नसावी. कारण, १८५७ च्या उठावात हिंदूपेक्षाही मुस्लिमांचा सहभाग अधिक होता - संख्येने आणि आक्रमकतेतदेखिल!
हिंदूंसाठी तो जरी एक उठाव असला (बंडापासून स्वातंत्र्ययुद्धापर्यंत काहीही) तरी मुस्लिमांसाठी तो एक जिहाद होता - दिल्लीत मुघल सम्राटाची सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी.
सहमत आहे
स्मारकचिन्हाची तोडफोड हा गुन्हा असेल आणि स्मारकचिन्हच का, कोणत्याही ऐतिहासिक ठेव्याची तोडफोड करणे हा गुन्हा असेल तर संसदेचे आणि राजमुद्रेचे विडंबन करणे हा काहीजणांच्या मते (सौम्य) गुन्हा असू शकतो. निषेधार्ह कृती असू शकते.
पटले नाही.
स्मारकचिन्हाची तोडफोड हा गुन्हा असेल आणि स्मारकचिन्हच का, कोणत्याही ऐतिहासिक ठेव्याची तोडफोड करणे हा गुन्हा असेल तर संसदेचे आणि राजमुद्रेचे विडंबन करणे हा काहीजणांच्या मते (सौम्य) गुन्हा असू शकतो. निषेधार्ह कृती असू शकते.
"राजमुद्रेचे विडंबन करा" असा मी संदेश देत असेल तर तो गुन्हा होइल ना.
राजमुद्रेचा तुम्ही बट्ट्याब्बोळ करुन ठेवलाय. तुम्ही संसदेचे शौचक्लूप करुन ठेवलेत असे बोंबलून सांगायचे असेल माझ्या चित्रातून तर तो गुन्हा कसा काय?
कारण ह्या कसोटीवर पाहिले तर ९९% व्यंगचित्रे बाद ठरतील कि हो. attempt of murder हा भादवि/IPC नुसार गुन्हा आहे.
पण जर मी पंतप्रधान्/अर्थमंत्री "कॉमन मॅन"चा गळा आवळताहेत महागाई नामक दोरखंडाने असे दाखवले, तर काय गुन्हा दाखल करणार का?
किंवा एखाद्या घोटाळ्यावर टिप्पणी करताना सत्ताधारी हे व्हेम्पायर कि ड्रॅक्युलाप्रमाणे जनसामान्यांचे रक्त पिताहेत असे दाख्कवले तर असे दाखवणे हा ही गुन्हाच का?
(ह्या चित्रांचा दर्जा, मार्मिकता वगैरे सोडा, पण असे दाखवणे बेकायदेशीर आहे काय ते बोला.)
की मला नीटसा मुद्दाच समजलेला नाही?
"व्यंग" टाळून "व्यंगचित्र" कसे होणार?
उदाहरणे चुकत आहेत असे वाटते
मी आधी म्हटल्याप्रमाणे "भावना दुखावणे" हा आपल्या देशात गुन्हा मानला जातो त्यामुळे वरील कृती गुन्हा ठरू शकते. (यात मी कोणाची बाजू वगैरे घेत नाही. जे आहे ते सांगते आहे.) आपल्याकडे फालतू कुठल्याशा चित्रपटांत कमी कपडे घालून प्रदर्शन केले म्हणून गुन्हे दाखल केले जातात.
जर हा गुन्हा आहे असे वाटले तर संबंधितांकडून गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे वाटते. तरीही कॉमन मॅन हे एक प्रतीक आहे. ती विशिष्ट व्यक्ती नाही. त्यामुळे ते चित्र आक्षेपार्ह मानले जात नाही. परंतु इथे गांधीजी किंवा तत्सम मोठा नेता बायकांच्या गराड्यात बसलेला, दारु पिताना वगैरे दाखवले तर त्यांच्या अनुयायांच्या भावना दुखावणे शक्य आहे. हुसैनने काढलेली चित्रे, आंतर्वस्त्रांवरील, चपलांवरील देवदेवतांची चित्रे वगैरे उदाहरणे येथे येतात. येथे संसदभवनाची वगैरे चित्रे वापरून हेच केले आहे.
शेवटी राजकारण
असिम त्रिवेदीच्या बाबतीत जे काही झाले ते सर्व बाजूंनी केवळ राजकारण आहे. किंबहुना महारष्ट्र सरकारनेच त्या विषयाला जास्त हवा देऊन प्रसिद्दी दिली. यामगे दिग्विजय सारख्यांचे डोके असण्याचीच शक्यता जास्त. तसे तर मग आर एस एस ला संडास म्हणण्या बद्दल त्याच्यावर पण काही ना काही कारवाई व्हायला हवी नाही का? :) पण त्याला सर्वांनी अनुल्लेखाने मारले.
असिम त्रिवेदी प्रकरणात अशोक स्तंभावर काँग्रेस नेत्यांचे चेहरे लावलेली चित्रे सुद्धा फिरत होती. पण त्यावर असे काही झालेले दिसले नाही. ते म्हणजे केवळ फ्लेक्सचा अतिरेक या प्रकारात मोडले गेले असते. असो. कदाहित असिम त्रिवेदी प्रकरण सुरु असताना पाठीमागे एखादे भ्रष्टाचाराचे प्रकरण दडपणे असे उद्योग सुद्धा सुरु असतील. म्हणजे हे बोंब मारणारे लोक आपल्याच कार्यकर्त्याच्या सुटकेसाठी भांडत राहतील आणि आपले मुख्य कार्य बाजूला ठेवतील. एकूण हेतु साध्य झाला.
चर्चेचा मुद्दा हा आहे की एवढा जुना कायदा आपण जसाच्या तसा वापरतो आहे?
इंडिया अगेन्स्ट करप्शन
>>एकंदरीतच इंडीया अगेन्स्ट करप्शन ह्या लोकांनी आणलेला वात पहाता
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या डिसें २०११ मधील वांद्रे येथील आंदोलनात असली पोस्टर्स/व्यंगचित्रे जाहीरपणे लावलेली पाहिली होती.
त्यामानाने असीम त्रिवेदींची कार्टून फारच सोबर वाटली.
पोस्टर
तुम्ही दिलेले चित्रही त्रिवेदीचेच आहे. त्याची स्वाक्षरी कोपर्यात अस्पष्ट दिसते आहे.
खरेच की काय
मग सगळा खुलासा होत आहे.
संसद आणि लोकशाही हे तर त्यांचे खास द्वेषाचेच विषय.
नक्की त्याचेच!
गुगल शोध घेतल्यावर इथे सापडले
माझे मत
असीम त्रिवेदीची चित्रे दुर्लक्ष करण्यायोग्य आहेत असे माझे मत आहे. मला त्या चित्रांचा दर्जा, शैली, भडकपणा वगैरे आवडले नाही.
मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतच आहोत तर, इतर काहींचे मत माझ्या विपरीत असेल, काहिंना ती चित्रे मार्मिक, काहिंना आवडत असतील हे लक्षात घेऊन मी त्या त्या व्यक्तीच्या आवडीचा मान ठेऊन त्याच्या आवडीला 'सुमार' म्हणून हिणवणार नाही हे ही तितकेच खरे.
बाकी, काही चित्रे, चित्रपट वगैरेंमुळे होणार्या हिंसाचाराचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. अश्या घटनांमध्ये सामिल असणार्यांना त्या त्या देशातील कायद्यानुसार योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.
देशद्रोहाच्या कायद्या बद्दल बोलायचे झाले तर हा कायदा केवळ ब्रिटिशकालीन आहे म्हणून तो लगेच काढून टाकावा असे मी म्हणणार नाही. त्यात कालसुसंगत असे बदल सुचवले जावेत असे मात्र वाटते.
जाता जाता: केवळ मिडीया अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने ओरड करते आहे म्हणून पोलिस/सरकारने त्यांना योग्य वाटते ते कलम लावायचे (अगदी देशद्रोहाचे सुद्धा) रहित करू नये असेही वाटते. लावलेले कलम योग्य आहे की नाही ते ठरवायला न्यायालये आहेतच!
असीम
असीम त्रिवेदीची चित्रे प्रथम पाहता कि़ळसवाणी असली तरी त्याच्या बाजुला मत जाण्यास आपली खासदार म॑डळीच जबाबदार आहे. या लोकानी असे कर्तुत्व गाजवलेले आहे की असीम ची चित्रे चुकीची असली तरी दोष देता येत नाही.
शेवटी काय ? सर्व काही सापेक्षच असते.
कर्तृत्व
>>या लोकानी असे कर्तुत्व गाजवलेले आहे की असीम ची चित्रे चुकीची असली तरी दोष देता येत नाही.
या लोकांनी 'असे' कर्तृत्व गाजवले आहे ही स्वयंस्पष्ट किंवा "सिद्ध झालेली वस्तुस्थिती" नाही*. ते केवळ विविध माध्यमांतून होत असलेले आरोप/कुजबूज आहे. त्यामुळे असीम त्रिवेदी सत्यकथनच करत आहे असे म्हणण्याला पुरेसा आधार नाही.
*वर्षानुवर्षे तसे ऐकले गेल्याने ती वस्तुस्थिती आहे असे बर्याच लोकांना वाटत आहे. गोबेल्स झिंदावाद.
काही काळापूर्वी एका ठिकाणी नर्मदाविषयक आंदोलनाच्या माहितीपत्रकात काश्मीरचा भाग भारतात न दाखवणारा नकाशा वापरला म्हणून तो देशद्रोह झाल्याचे मत व्यक्त झाल्याचे आठवते.
+१
इनोसंट अंटिल प्रुवन गिल्टी. हा लोकशाहीचा फार जुना मूलमंत्र आहे.
उपक्रमाने प्रतिसादांना लाइक करण्याची सुविधा दिली तर +१ चे कष्ट वाचतील. ;-)
-१
या लोकांनी 'असे' कर्तृत्व गाजवले आहे ही स्वयंस्पष्ट किंवा "सिद्ध झालेली वस्तुस्थिती" नाही*. ते केवळ विविध माध्यमांतून होत असलेले आरोप/कुजबूज आहे. त्यामुळे असीम त्रिवेदी सत्यकथनच करत आहे असे म्हणण्याला पुरेसा आधार नाही.
टेक्निकली विधान अत्य्म्त योग्य आहे.
.
*वर्षानुवर्षे तसे ऐकले गेल्याने ती वस्तुस्थिती आहे असे बर्याच लोकांना वाटत आहे. गोबेल्स झिंदावाद.
म्हणजे?
सद्य व्यवस्थेतून इतरांचे शोषण करीत मजा मारणार्या वर्गातीलही काही जण स्वतःचे असेच समर्थन करतात.
सध्याची न्यायव्यवस्था कार्यक्षमतेच्या दृष्टीने काय आहे हे सगळ्यांनाच ठाउक आहे. कायदा सुव्यवस्था, विशेषतः एखाद्या शक्तीशाली व्यक्तीविरुद्ध एकेकट्यास काही करावयाचे असल्यास काय आहे; हे ही चांगलेच ठाउक आहे.(सत्येंद्र दुबे हे गाजलेले नाव; अशी प्रकाशात न येणारी अजून शेकडो नावे असतील. अनेकानेक "अपघात" प्रामाणिक लोकांचे होत असतील "ट्रक" च्या धडकेने.)
इतकी भयंकर गैरव्यवस्था असताना "आमच्यावर गुन्हा शाबित झालेला नाही. आम्ही धुतल्या तांदळाचे आहोत" असे म्हणत खदाखदा हसणारी नीच मंडळी प्रामाणिक पण निर्बल,असहाय अशा लोकांची भयंकर थट्टा करीत आहेत.
गुन्हेगार तेच, तपासही तेच करणार, योग्य त्या गोष्टी पुरावे म्ह्णून सादर करणार नि योग्य तो निकाल न्याय म्हणून मिरवणार असे होत आहे.
आनंद आहे.
ज्यांना शिक्षा व्हायला हवी ते सत्ता गाजवतात.(सत्ताधारी, विरोधक, नोकरशहा असे वर्गीकरण नाही; ज्याची हाती थोडीबहुतही सत्ता आहे(सत्ता पदाशिवायही असू शकते) असा कुठलाही भारतीय अचाट भ्रष्ट असतो. )
ज्यांचे सांत्वन व्हावे अशांना आणि ज्यांचा गौरव व्हावा अशांनाही क्रूर अशा शिक्षा दिल्या जातात.
बाकीचे थोडेफार काही बरे काम करु इच्छिणारे भीतीने गळाठून मान वळवतात नि पुन्हा रोजच्या रहाटगाड्दग्यात जुंपतात्.तोच रहाटगाडगा, जो खदाखदा हसणार्यांच्या ताब्यत आहे नि त्यांना बलिष्ठ करीत आहे.
अवांतर
त्या एन डी तिवारींचे काय झाले? त्यांचे कार्य हे फारच बोलके आहे. आता तो त्यांचा खाजगी मुद्दा मानायचा कि सामाजिक? जर देशातले मंत्रिगण अथवा मुख्यमंत्री असे आदर्श ठेवत असतील तर काहींनी अशा राजकारण्यांबद्दल हिन दर्जाची चित्रे काढल्यास जास्त चुकले कोणाचे? चित्र सुमार कि त्यांचे उद्योग सुमार?
इनोसंट अंटिल प्रुवन गिल्टी
अगदी के.के. मेनन पासुन ते डॉ. मनमोहन सि॑ग पर्यत आपण जे काही पाहतो आहोत ते जर का गोबेल्स असेल तर मग काय बोलावे?