चिल्लर पार्टी
पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या काल न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.
फेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.
मला पडलेले काही प्रश्न –
१. बहुतांश मुले ९ वी ते १२ वी ची आहे, त्यामुळे मराठीच असावीत असे वाटते, म्हणून परप्रांतीयांनी काही केले असे म्हणता येणार नाही, पार्टीचे आयोजक ही २१ वर्षे व आतले आहेत, एक सोडता बाकीचे तिघे मराठी आहेत. मराठी संस्कृतीचे माहेरघर समजण्यात येणाऱ्या पुण्यात अशी घटना अतर्क्य वाटते. ही पहिलीच पार्टी नसल्याचे कळते. नववी दहावी च्या मुलांना अश्या पार्टीला पालकांनी सोडलेच कसे? ही पहिलीच पार्टी नसल्याने मुलांच्या तोंडाला या आधी कधी दारूचा वास वगैरे पालकांना येत नसेल का? मुलांना व्यसनाधीन करण्याचे जाणीवपूर्ण प्रयत्न काही समाजघटक करत आहेत का?
२. शाळेतल्या मुलांना मोबाईल लागतोच कशाला? आपण शाळेत होतो तेंव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हता, म्हणून आपल्याला काही त्रास झाला का? सुरक्षिततेचे कारण पटत नाही.
३. रिसोर्ट व्यवस्थापकाने पार्टीला वेगळाच रंग येतो आहे हे पाहून पार्टी वेळेतच का थांबवली नाही? रिसोर्टचा परवाना अजून रद्द कसा झाला नाही?
४. पार्टीत सहभागी एकाचीही शारीरिक तपासणी झाली नाही (त्यांनी ड्रग्ज वगैरे घेतले होते या दृष्टीने), असे का?
५. अशा पार्टीत जाणे हे सध्या शाळकरी मुलांसाठी प्रेस्टीज सिम्बॉल वगैरे बनले आहे की पिअर प्रेशर आहे की अशा पार्टीत आपण गेलो नाही तर इतर मुले कमी समजतील असे काही?
६. काही पालकांनी केलेल्या तक्रारीमुळेच पोलिसांनी धाड घातली असे कळते, पालकांना कळून त्यांनी आपल्या पाल्याला न दटावता पोलिसांना सांगावे हे जरा चमत्कारिक वाटते. योग्य वेळी स्वतःच मुलांना का समज देता येऊ नये?
७. पालकांच्या अतिलाडामुळे आणि कुठेही गप्पा बसा असे न सांगण्याच्या वृत्तीमुळे मुले अशी झाली आहेत का?
८. रु १२०० आणि रु. ७०० च्या जामिनावर या मुलांना सोडल्याचे कळते. परदेशात समाजसेवा वगैरे शिक्षा अशा मुलांसाठी असतात असे ऐकले आहे अशाच शिक्षा या मुलांना द्याव्यात का?
उपक्रमींना या बाबतीत काय वाटते?
Comments
ही बातमी
यावर कालपासुन टिवीवर चालुच आहे. आजची पेपरातली एक बातमी बघा
त्या बातमीची लिन्क कशी द्यायची? मी लिन्क द्यायला गेलो की प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. असा एरर योतोय
लिंक्स देणे
लिंक देण्यासाठी वर एडिटर बारमध्ये "इन्सर्ट/ एडिट लिन्क" बटण आहे त्याचा वापर करा. उदा. एक किंवा अधिक शब्द जसा "ही लिंक बघा" सिलेक्ट करा आणि नंतर ते बटन दाबून त्यात अॅड्रेस भरा.
किंवा सरळ लिंक पेस्ट करा आणि दहा टक्क्यांचा नियम भरण्यासाठी काहीतरी मराठी लिहून ठेवा. उदा.
जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी.
वरच्या शब्दांना पुसट रंग देऊन ती महत्त्वाची नाहीत हेही सांगू शकता. :-)
आभार हि लिन्क
आभार. हि लिन्कः
http://www.dnaindia.com/pune/report_kp-chillar-party-clueless-cops-duck-...
जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी. जागा भरायला मराठी
बरेसचे उत्तर
माझ्या क्र. ३ च्या प्रश्नाचे बरेसचे उत्तर मला या बातमीतून मिळाले.
बरोबर!
ते रिसॉर्ट कोणाचं होतं आणि सोबतचे लागेबांधे बाहेर येऊ लागले आहेत आता. :-)
जुनेरकर, जमलं की लिन्क देणं. आता एडिटरचा वापर (पृथ्वी आणि साखळी बटण) करून गरज पडल्यावर लिन्कही देऊन बघा.
गंभीर प्रश्न आहे
सज्ञान नसणार्या मुलांकडून असे बेजबाबदार कृत्य घडणे एकवेळ शक्य आहे परंतु येथे सर्वस्वी चूक पालकांची आहे असे म्हणावे लागेल. यातील काही प्रश्नांची उत्तरे आणि अंदाज असे -
आपण शाळेत जात होतो तेव्हा अनेक आया (आईचे अनेकवचन) घरात असत किंवा कमी तासांची नोकरी करत किंवा घरात आजी-आजोबा असत. अगदीच तसे नसेल तर शेजारची काकू वगैरे लक्ष देणार्या असत. दिवसेंदिवस "न्यूक्लिअर" कुटुंबांची संख्या वाढते आहे, फ्लॅट संस्कृती पूर्वीही होती पण तरीही शेजार्यांशी संबंध असत ते आता तुटत चालले आहेत. अशावेळी सुरक्षेच्या कारणांसाठी मुलांकडे मोबाईल/ सेलफोन्स दिले जातात. हल्लीच्या दिवसांत हे अगदीच चुकीचे म्हणता येणार नाही.
परंतु मुलांना त्यातील कोणत्या मॉडेलची किंवा फीचर्सची गरज आहे/ नाही यावर आपण आळा घालू शकतो. त्यांचे एसएमएस, इमेल्स अध्येमध्ये तपासावे. येथे अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरेच्या नावाने कोणी बोंब ठोकत असेल तर दुर्लक्ष करावे. ;-) ज्या वयाची मुले सज्ञान नाहीत आणि पूर्णतः पालकांवर अवलंबून आहेत तेव्हा त्यांच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी पालकांची असते.
अंदाज असा की त्यांनी स्वतःच्या पाल्याला दटावून तेथून बाहेर काढले असेल पण हल्ली इतरांच्या पोरांना काही बोलण्याचे दिवस राहिलेले नाहीत तेव्हा पोलिसांना सांगिअले असेल.
दोष सर्वस्वी पालकांचा. अगदी, त्यांनी चिडून ओरडून, धपाटे देऊन समजावले असेल आणि पोरांनी मानले नसेल तरीही दुर्दैवाने याचा दोष पालकांनाच जातो. रात्री बेरात्री १३-१८ वयोगटातील मुले न सांगता घरातून गायब राहत असतील तर काय बोला!
कम्युनिटी सर्विस वगैरे करवून घ्यावी ठीक पण समाजाप्रती आपण काही देणे लागतो ही भावना त्यांच्यात रुजायला हवी आणि पालकांना दंड लावायला हवा.
काळ
पोरांना उभे करुन पालकांना करायला लावा. मग दोघांना पण जर लाज वाटेल. काळ बदलला आहे. सोशल स्टेटस नावा खाली पालक मुलांसमोर व्यसने करत असतील तर मुलांना त्यात काही अयोग्य वाटत नाही. मग तुम्ही का करता याला समाधानकारक उत्तर आहे का?
सरळ ज्यांना आपल्या पाल्याचे वागणे खटकले त्यांनी स्वत: शिक्षा करावी. ज्यांना जे केले ते योग्य वाटते त्या पालकांना काय करणार? असे कितीसे पालक हल्ली सापडतात जे मुलांची बाजू घेत नाहीत? अनेक पालकांना पोरांनी त्यांचे सोशल स्टेटस बिघडवल्याचा राग असेल. थोडक्यात करायचेच होते तर जरा जपून करायचे अशी बाजू घेणारे असतीलच.
या वयातल्या मुलांना पालकांनी समजून घेणे आणि शक्य तेवढे मैत्रीचे नाते ठेवून त्यांना जाणीव देणे कि आमचे लक्ष आहे आणि जे करशील त्यात तुझा तोटा आहे हे समज देणे गरजेचे आहे.
बाकी काळ बदलतो आहे. समाज बदलतो आहे. पण याच सोबत दुसरा मुद्दा आहे की समाजातल्या कोणत्या वर्गातले असे प्रसंग बातमी बनतात हा आहे. मग चिल्लर पार्टी असो, व्यसने असो अथवा विवाह बाह्य संबंध... मला वाटतं की आपण ज्याला समाज म्हणून चर्चा करतो तो पुर्ण समाजाचा एक वर्ग आहे जो प्रतिष्ठेला जीवापाड जपायचा प्रयत्न करतो. बाकी चिल्लर पार्ट्या होणार.
जाता जाता. थोडे विषयांतर. नोकर्या करणार्या पालकांचे दोन गट जाणवतात. एक जे आपल्या मुलांना पहिल्यापासून जबाबदार बनवायचा प्रयत्न करतात आणि दुसरा जे पाल्यांना वेङ देता येत नाही या सबबी खाली हवे ते लाड पुरवून स्वतःला जबाबदारीतुन मुक्त करतात.
अपराधीपणाची भावना
आणि अशी अपराधीपणाची भावना बाळगणारे, आमच्या दुर्लक्षामुळे मुलं असं वागली म्हणून दंड भरून त्यांना गुमान सोडवून आणतात. :-) हे एक दुष्टचक्र वाटतं.
समाज
या सगळ्या सोबतच सर्वसाधारण समाज कशाला मान्यता देतो आणि कशाला नाही यावर सुद्धा बरेच काही आहे. अनेकदा बंडखोरीच्या भावनेतून व्यसनाचे वेड लागणारे आहेत. अथवा का नाही करायचे? आम्ही करणारच. असो. असे प्रकार आपण संकेतस्थळावर सुद्धा पाहिले आहेत. खास करुन मराठी संकेतस्थळावर दोस्ती करायची, मग कट्टे जमवायचे, दारू ढोसायची, पैसे घ्यायचे आणि बरेच काही... असो.
जनरेशन ग्याप ?
शाळेत असतांना सुटी असली की आईवडीलांना पत्ता लागू न देता मित्रांसोबत दूर रानात भटकायला जायचो. कधी कधी शाळा चुकवूनही हे उद्योग केल्याचे आठवते. यात एक धाडस वाटायचे. (पण तेव्हा आईवडीलांच्या धाकापूढे ह्या धाडसाची लगेच वाफ व्हाययी.) या भटकण्यात जिज्ञासा शमवणा-य़ा नको त्या (?) उद्योगांपासून उधाणणा-या ओढ्यात पोहायचा प्रयत्न करणे, आंब्याच्या झाडावर जीवघेण्या उंचीपर्यंत जाऊन आंब्याचा उरलासुरला पाड शोधणे... क्वचित बिड्या फुंकणे असले उद्योग करायचो...( या पैकी काही उद्योगांमधली थोडीशी ही चुक आम्हा भावंडांची संख्या एक ने कमी करायला पूरेशी होती... पण तेव्हा ते कुठे कळत होते.) आज त्याचे स्वतःलाच कौतुक वाटते. पण यापोटी पाठ शेकायची वेळ येईपर्यंत मारही खाल्लेला आहे.. तेव्हा फार पाचव्या सहाव्या वर्गात असेन....... आज काळाच्या संदर्भात तेव्हा ते तितकेच गंभीर असावे आणि आजचे तितकेच क्षुल्लक असे वाटते.... बाकी तावातावाने पोराबाळांच्या काळजीतून लिहीणे हा जनरेशन ग्याप म्हणावा का... (तरीही आज तालुक्याच्या गावी असला प्रकार निदान शाळेतल्या मुलांच्या बाबतीत तरी होत नाही हे ही नमुद करायला हवे...)