हातच्या काकणाला आरसा कशाला?

पुढील लेखन 'ई-सकाळ'मध्ये आत्ताच वाचले आणि अंगावर काटा उभा राहिला.

"महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या विलासरावांचे गावागावातील कार्यकर्ते त्यांची परंपरा पुढे नेण्यासाठी आता खपू लागले आहेत.कुटुंबियांनी परवानगी दिल्यास विलासरावांच्या अस्थी जिल्हयाजिल्हयात नेण्याचा विचार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या अगोदरच जाहीर केला आहे. सर्वप्रथम कोल्हापूर कॉंग्रेस कमिटीने अमित यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा ठराव केला. आता त्यांच्या पाठोपाठ ही मागणी करणाऱ्या कॉंग्रेस कमिटयांची संख्या वाढली आहे.विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांना नुकतेच विधानपरिषदेत दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.मुलगा आणि बंधू या दोघांनाही विलासरावांनी सातत्याने आग्रहपूर्वक प्रतिनिधित्व मिळवून दिले.साखर कारखाना तसेच अन्य संस्थांवर मात्र अमित यांचा पगडा आहे.विलासरावांचा वारसा चालवण्यासाठी या पैकी कुणाला मंत्रिमंडळात संधी दिली जाईल या बाबत सध्या उत्सुकता आहे.राज्यसभेवरील रिक्‍त जागेसाठी वैशालीताई देशमुख यांना विनंती करावी असाही काही कार्यकर्त्याचा आग्रह आहे तर उल्हासदादा पवार यांना संधी दयावी असा काहीजणांचा प्रयत्न आहे."

मुलगा आणि बंधु ह्यांना'आग्रहपूर्वक' प्रतिनिधित्व मिळवून देण्यापलीकडे कै. विलासरावांचा कोणता वारसा आहे, जो चालवायची आवश्यकता आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

दुर्दैव आपलं

हे असं सगळं काँग्रेसमध्ये चालू आहे, आणि तो पक्ष सत्तेवर आहे. विरोधी पक्ष जवळजवळ नसल्यासारखाच आहे. काय बोलणार? दुर्दैव आपलं.
अवांतरः जेव्हा विलासराव गंभीर आजारी होते, तेव्हा लोकसत्ताच्या बातमीखाली अनेक 'प्रतिक्रीया' वाचल्या होत्या. प्रतिक्रीया कसल्या? निव्वळ शिव्याशापच होते. लोकांची खरी भावना काय आहे, ते वाचून मुळीच मुळीच आश्चर्य वाटले नव्हते.
-स्वधर्म

व्यवसाय

राजकारण हा व्यवसाय असल्याने त्यात इतर परंपरागत व्यवसायाप्रमाणे गोष्टी आल्याच.

व्यवसाय

राजकारण व्यवसाय असेल तर त्यात व्यावसायिक सचोटी असलेले किती जण आहेत?

नवी सामंतशाही

कुटुंबियांनी परवानगी दिल्यास विलासरावांच्या अस्थी जिल्हयाजिल्हयात नेण्याचा विचार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या अगोदरच जाहीर केला आहे.

वाव्वाव्वा. पुरोगामी महाराष्ट्रासाठी एक अत्यंत आनंददायक अशी घडामोड. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींचे कलश भारतभर फिरवले होते. आता हे भाग्य आमच्या विलासरावांना मिळणार असे दिसते आहे. अमित देशमुख उद्या मंत्री बनतीलही. नेत्याच्या निधनानंतर त्यांच्या मुलामुलींना त्यांची गादी द्यायलाच हवी. ते तर त्यांचे कर्तृत्व आहे.

दुर्दैव

मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये पण विलासराव देशमुख मेल्यानंतर मेडियाने तो ‘सोहळा’ ज्या रीतीने कव्हर केला ते पाहून आदर्श घोटाळ्यातले हेच का ते !!!!! असा प्रश्न पडला. मेलेली म्हैस चार शेर अधिक दूध देते (अगदी हेच शब्द नसतील पण असेच काही) असे साक्षात पु. ल. म्हणून गेले आहेत त्याचे पुन:प्रत्यंतर.

आपलेच लोक शहाणे नसावेत हे दुर्दैव, दुसरे काय.............

वाईट बोलू नये

मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये

मीडियाबद्दलही वाईट बोलू नये. अहो काही लाख लोकांचा तो शोकाकुल समुदाय बघितला नाहीत काय तुम्ही? राजबिंडा, राजा माणूस विलासराव देशमुख. आता भ्रष्टाचार कोण करत नाही. आपला माणूस जेव्हा आपल्यांसाठी भ्रष्टाचार करतो तेव्हा तो भ्रष्टाचार ठरत नाही. लाखांचा पोशिंदा होता तो.

नक्की

अवांतर प्रतिसदः-
नक्की किती काळपर्यंत वाईट बोलू नये हा एक मला प्रश्नच आहे. मुंबैला सिव्हिलिअन्सवर एकाएकी गोळ्या झाडत सुटलेल्या, बॉम्ब वगैरे घेउन आलेल्या आणि मग मारल्या गेलेल्या/मेलेल्या प्राण्यांविषयीही "मृताबद्दल वाईट बोलू नये" हा संकेत लागू होतो का?
.
तैमुरल्म्ग ह्याने इराण-पर्शिया मध्ये हत्यांकांडाचे विक्रम रचले, हिटलरने साठेक लाख(नक्की आकडा ठाउक नाही) ज्यूंची हत्या केली. आता सांगा ही माणसेदेखील मेली आहेत, मग ज्यूंनी हिटलरबद्दल किंवा इराण्यांनी तैमुर्-चंगीझ ह्यांच्याबद्दल बोंब मारु नये का?
म्हणजे नक्की किती काळ बोंब मारु नये तेही सांगा.
शिवाय सगळे मेल्यावरतीच बोंब मारताहेत कारण ही व्यवस्था इत्की भयंकर आहे की त्यात असल्या लोकांना जिवंतपणी स्वतःची खरी ओळख दाखवत वाईट वाईट बोलूच शकत नाही. हतबल, दुरबल नि स्वतः बरीचशी भ्रष्ट असलेली ही माणसे मग करणार तरी काय? शोषकाच्या प्रताभोवती आनंदसोहळा. अजून काय.

हे अनपेक्षित होतं?

सर्वप्रथम कोल्हापूर कॉंग्रेस कमिटीने अमित यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा ठराव केला. आता त्यांच्या पाठोपाठ ही मागणी करणाऱ्या कॉंग्रेस कमिटयांची संख्या वाढली आहे.विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांना नुकतेच विधानपरिषदेत दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.मुलगा आणि बंधू या दोघांनाही विलासरावांनी सातत्याने आग्रहपूर्वक प्रतिनिधित्व मिळवून दिले.साखर कारखाना तसेच अन्य संस्थांवर मात्र अमित यांचा पगडा आहे.विलासरावांचा वारसा चालवण्यासाठी या पैकी कुणाला मंत्रिमंडळात संधी दिली जाईल या बाबत सध्या उत्सुकता आहे.राज्यसभेवरील रिक्‍त जागेसाठी वैशालीताई देशमुख यांना विनंती करावी असाही काही कार्यकर्त्याचा आग्रह आहे तर उल्हासदादा पवार यांना संधी दयावी असा काहीजणांचा प्रयत्न आहे

हे घडलं नसतं तर काहीतरी अघटित, अनपेक्षित घडलं असं म्हणता आलं असतं.

दिडशे वर्षांची परंपरा

एकंदर भारतात व्यक्तीपूजेचे स्तोम फारच असल्याने आणि गेल्या काही वर्षांत त्याचा अतिरेक झाल्याने याविषयी फारसे आश्चर्य वाटले नाही. (एकंदरीतच कश्या कश्याविषयी वाइट वाटावे यासंबधी असणारी संवेदनशीलता बोथट होत चालली आहे हे दुसरे कारण.)

तरीही विलासराव देशमुख ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या दिडशे वर्षांहून अधिक असलेल्या परंपरेत व्यक्तीपूजा आणि वंशपरंपरागत पद/अधिकार हे सर्वात महत्त्वाचे कलम आहे. गांधी-नेहरू घराण्याची पाचवी पिढी पहिल्या दोन-तीन पिढ्यांच्या कारकीर्दीच्या जोरावर टिकून आहे. राहूल गांधी हे खरेतर एका स्वतंत्र चर्चेचा विषय आहेत, पण त्याविषयी पुन्हा कधी तरी :)

प्रसारमाध्यमांविषयी प्रसाद यांनी व्यक्त केलेल्या उद्वेगाशी सहमत आहे.

निष्ठा

आपण ज्याला व्यक्तीपूजा म्हणता त्याला ते निष्ठा असं म्हणतात. तुमची पक्षावरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी जे कराव लागत त्याला काही लोक ( विशेषतः मिडिया वाले) डिवचण्यासाठी लांगूलचालन असही म्हणतात. पक्षश्रेष्ठी हे पक्ष या संकल्पनेचे वाहक असल्याने ते पूजनीय, वंदनीय, आदरणीय आहेत. परमेश्वराप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी साधक भक्ती करतो. त्याला तुम्ही लांगूलचालन नाही म्हणत. परमेश्वरही प्रसन्न अथवा खूष झाल्यावर भक्ताला 'वरदान' देतो. पक्षश्रेष्ठी देखील खूष झाल्यावर राजकीय पद देतात. लोकसेवेची मोठी संधीच देतात म्हणा ना!

विलासराव, काँग्रेस आणि इतर

नवल नाही वाटले पण राजकारणात काय पातळीला काय चालते हे कळले. वर लिहिल्या प्रमाणे एक व्यक्ति वारल्याचे वाईट वाटते. पण माझ्या लक्षात राहिलेले विलासराव म्हणजे कसाबच्या हल्ल्या नंतर राम गोपाल वर्माला घेऊन फिरणारे. हा वाईट एका गोष्टीचे वाटले की शरद पवारांचा एक तुल्यबळ विरोधक गेला. बाकी काँग्रेस मध्ये राजकारण कसे चालते हे काही आपल्याला नवे नाही. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दिग्विजय खानविलकर गेले परवाच. तसे बरेच तरुण म्हणायला हवेत. पण धडाडीचा माणूस होता असे म्हणतात. याच सोबत कोल्हापूरचे खासदार सदाशिव मंडलिक जे एके काळी शरद पवारांचे शिष्य होते त्यांनी आता शड्डू ठोकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कोणतीही गोष्ट दाबणे आणि काँग्रेसची इमेज वर आ़णणे याचा हा एक भाग असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. पश्चिम महाराष्ट्र नेहमी या दोन पक्षांमध्येच वाटलेला असतो आणि हे दोन पक्ष सत्तेत एकत्र असतात. प्रत्येक घटनेचा राजकिय फायदा नाही घेतला तर ते आपले राजकारणी कसे म्हणवणार?

 
^ वर