पंतप्रधानपदासाठी विरोधीपक्षाचा उमेदवार

पंतप्रधानपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव बातम्यांत येऊ लागले आहे. मोदी यांनी एक कुशल, चांगला प्रशासक म्हणून नावलौकिक कमावला आहे. गुड गर्वनन्सबद्दल गुजरातचेच नाव घेतले जाते परंतु गुजरातमधील दंग्याचे भूत मोदींचा अजूनही पिच्छा पुरवते आहे. एकीकडे काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. २जी, कॉमनवेल्थ आणि कोलगेट इत्यादी भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि आरोप यांत काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली आहे पण याचबरोबर भाजपामधील अंतर्गत वाद समोर येत आहेत.

अडवाणींच्या ब्लॉगमधून भाजपामध्ये "ऑल इज नॉट वेल" नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या विषयी बातमी येथे आहे

http://www.ibtimes.co.in/articles/347410/20120531/lk-advani-pandoras-box...

I had said at the Core Group meeting that if people are today angry with the U.P.A. Government, they are also disappointed with us. The situation, I said, calls for introspection," Advani wrote on his blog.

He said that the mood in the party is not the same anymore and criticized a few recent party decisions.

मोदींचे नेतृत्व मान्य नसण्याचा एक संकेत नितीशकुमार यांनी येथे दिला असावा. http://khabar.ndtv.com/news/show/nitish-kumar-reacts-sharpely-on-narendr...

बिहार को लेकर गुजरात के मुख्यमंत्री नरेंद्र मोदी द्वारा दिए बयान से नाराज़ बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार ने पलटवार करते हुए मोदी को अपना घर संभालने की सलाह दी और कहा कि वह (मोदी) पहले अपना दामन देखें।

अश्या अनेक बातम्यांचा विचार केल्यावर पुढील प्रश्न पडतात.

  1. पंतप्रधानपदासाठी मोदींखेरीज भाजपाकडे दुसरा पर्याय आहे का?
  2. काँग्रेसला पर्याय देण्यात आणि प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे वठवण्यात भाजपा कितपत यशस्वी ठरला आहे?

काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय काँग्रेसला पर्याय

Comments

तिसरा मोर्चा

दुर्दैवाने लालकृष्ण आडवाणी ह्यांच्याशी सहमत व्हावे लागते आहे. भाजपाने प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका नीट पार पाडली नाही. म्हणूनच टिमाण्णाला फुटेज मिळाले. भाजपाकडे वाजपेयींसारखा ऍक्सेप्टेबल असा नेता/चेहरा/मुखवटा सध्या नाही.

आणि मोदी पंतप्रधानपदासाठी पुढे आले तर काँग्रेससाठी चांगलेच आहे. मतांचे ध्रुवीकरण होईल. बाकी गुड गर्वनन्सच्या बाबतीत गुजरातमध्ये बर्‍याच चांगल्या गोष्टी होत असतीलही पण एकंदर बटबटीत जाहिरातबाजीच जास्त होते आहे. फेसबुकावर ह्या अण्णासमर्थकांसोबत ह्या मोदीच्या पंख्यांनी फारच वात आणला आहे. असो. मोदींपेक्षा नीतिशकुमार ह्यांनी पंतप्रधानदासाठी आपली उमेदवारी जाहीर करायला हवी.

एकंदरच तिसरा मोर्चा सत्तेत येण्याची शक्यता वाढली आहे.

अवांतर:
पाणिनी कोण होता, काळा की गोरा ह्यावरून 79 पुस्तकांच्या महान लेखकांशी अतिशय ग्रेट असा वाद घालण्याऐवजी खबरदार ह्यांच्या धाग्यावर मोठमोठ्याने सात्विक संताप व्यक्त केलेला कधीही बरा नाही का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बहुमत शक्य नसावे

कुठल्याही पक्षाला (किंवा युतीला?) बहुमत मिळेल असे वाटत नाही. पुनश्च खिचडी खाणेच नशिबी असावे.

पंतप्रधानपदासाठी मोदींखेरीज भाजपाकडे दुसरा पर्याय आहे का?

नसावा. मोदी बरीच वर्षे ताटकळत आहेत.

काँग्रेसला पर्याय देण्यात आणि प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे वठवण्यात भाजपा कितपत यशस्वी ठरला आहे?

भाजपा खरेच काँग्रेसला पर्याय होता का?

अतिअवांतरः

पाणिनी कोण होता, काळा की गोरा ह्यावरून 79 पुस्तकांच्या महान लेखकांशी अतिशय ग्रेट असा वाद घालण्याऐवजी खबरदार ह्यांच्या धाग्यावर मोठमोठ्याने सात्विक संताप व्यक्त केलेला कधीही बरा नाही का?

याची काही गरज आहे का? भाव तेथे देव असे साधे समीकरण आहे. भाव नसेल तर देव स्वतःच्या पायाखालीही पाहत नसावा.

हेहेहे

नसावा. मोदी बरीच वर्षे ताटकळत आहेत.

अहो, 'माजी भावी' अशी एक कन्सेप्ट आहे.
अडवाणी नाही का ताटकळून ताटकळून 'भावी पंतप्रधान'पदावरून 'माजी भावी पंतप्रधान' होऊ घातलेत?
बरेच असतात असले माजी भावी राजकारणी. अगदी ग्रामसेवकापासून पंप्र पर्यंत. ताटकळू द्या नं त्यान्नाही..

उत्तरे

प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी येत्या लोकसभा निवडणूकीत भाजप स्वबळावर बहुमतात येण्याची शक्यता किती, हेदेखिल पहायला हवे. अशी शक्यता शून्याच्या जवळपास जात असेल तर, एकट्या भाजपपेक्षा NDA ची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल.

पंतप्रधानपदासाठी मोदींखेरीज भाजपाकडे दुसरा पर्याय आहे का?
शक्यता १ (भाजप स्वबळावर बहुमतात) - मोदींखेरीज दुसरा पर्याय सध्यातरी दिसत नाही.
शक्यता २ (भाजप स्वबळावर बहुमतात नाही मात्र NDA बहुमतात - नजिकचा दुसरा पर्याय म्हणजे श्री. नितिन गडकरी (भाजपमधील मवाळ त्यामुळे इतर घटक पक्षांना मान्य होऊ शकणारे आणि मोदींचा प्रखर विरोध नसलेले)

काँग्रेसला पर्याय देण्यात आणि प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे वठवण्यात भाजपा कितपत यशस्वी ठरला आहे?
फारसा नाही. काँग्रेसने स्वतःसाठी खड्डा तर खणून घेतलाच वर त्यात स्वतः पडलेलीही आहे. परंतु, तीवर माती लोटायला भाजपकडे बळ नाही!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बुडबुडा

आंतरजालावरचे लेखन म्हणजे जनमत असेल तर भाजप - मोदी पुढच्या लोकसभेत ५४३ पैकी ५४१ जागा जिंकतील असे वाटते.

अवांतर: आंतरराष्ट्रीय क्रेडिट एजन्सीजनी भारताचे क्रेडिट कमी केले आहे त्यासाठी आत्ताच्या सरकारबरोबरच २०१४ नंतरच्या चित्राचासुद्धा अभ्यास केला असावा.

नितिन थत्ते

एस ऍन्ड पी

एस ऍन्ड पी च्या बाबूमोशायने हा अहवाल दिला आहे ते नक्कीच मोटिवेटेड वाटतात हे कॉन्ग्रेसचे मत थोडे पटण्यासारखे आहे. जोयदीप मुखर्जी आघाडीच्या राजकारणातले नाइलाज आणि त्यातही ममताबाईंना कसे विसरले? मनमोहन आणि सोनिया ह्यांच्यातले भूमिकेचे विभाजन असल्यास आधीच्या यूपीए 1 मध्येही होतेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

निर्नायकी

सध्या भारतीय जनता निर्नायकी आहे आणि सर्वांना चमत्काराची अपेक्षा आहे. तो चमत्कार कदाचित राहुल बाबा करतील. मला त्यातल्या त्यात मोदीच बरे वाटतात. निदान इतर राज्यातले काही लोकं त्यांना ओळखतात. सध्या प्रत्येक बिगर काँग्रेस राज्याच्या सत्तेत असलेल्या प्रत्येक राज्य स्तरिय नेत्याला पंतप्रधान पदाची स्वप्ने पडतात. त्यात मनमोहन सिंगासारखा चांगला (?) माणून पंतप्रधान होऊ शकतो आणि त्यासाठी एक निर्णयक्षम नेता असावाच लागतो अशी सर्वसामान्यांचीच अपेक्षा नसल्याने कोणीपण यावे आणि पंतप्रधान बनुन जावे असा प्रकार आहे.
चर्चेचा विषय वेगळा हवा. तुम्हाला पंतप्रधान कोण होईल असे वाटते. चर्चा विषय वाचुन मला वाटले होते की फक्त पंतप्रधान विरोधी पक्षाचा आणि बाकी सर्व काही सत्ता पक्षाचे असे काही ठरले आहे कि काय?


किमान 15 टक्के मोदींना नक्की ओळखतात

निदान इतर राज्यातले काही लोकं त्यांना ओळखतात.
खरे आहे. पटले. इतर राज्यांतले किमान 15 टक्के लोक तरी मोदींना नक्की ओळखतात. पण ही मंडळी हमखास मोदींविरुद्ध मते टाकणारी आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:)

विरोध आणि पाठिंबा हे राजकारणात सोयीनुसार असते हे आपण सर्वजण जाणतोच. सध्या चर्चा करण्यासारखा एक नेता म्हणजे मोदी म्हणता येईल. मला तर देवेगौडा सारखे व्यक्तिमत्व पंतप्रधान झाल्यावरच कळले. भारतात कदाचित शीख अल्पसंख्य असल्याने त्यांच्या विरुद्धच्या दंगली लोकं विसरुन जातात अथवा मी शीख नाही ना मग मला काही फरक पडत नाही. त्यामुळे काँग्रेसचे फावते. ते तरी काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? मला स्वतःला मोदी आणि वाजपेयी यांच्यातले साम्य जाणवते ते म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता आणि इच्छा, त्याच सोबत अविवाहीत असल्याने पुढच्या पिढ्यांसाठी कमावायची इच्छा नसावी असा कयास. :)


निर्णायकी

सध्या भारतीय जनता निर्नायकी आहे आणि सर्वांना चमत्काराची अपेक्षा आहे.

सध्या भारतीय जनता निर्णायकी आहे आणि सर्वांना चमत्काराची अपेक्षा आहे. असं म्हणायचं होतं का? ;)

निर्नायकी

निर्नायकी - नायक नसलेली किंवा बोलाचाच नायक असलेली असे असावे. चू भू द्या घ्या.

बेशुद्धलेखन

(अशुद्ध म्हटलेले जास्त चांगले राहील, पण मी त्याला बेशुद्धलेखन म्हणतो.)
तर ते तसे करून मुद्दाम श्लेष काढून येथील जनता निर्नायकीत नसून, निर्णायकी भूमीकेत नेहेमीच होती अन राहील हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करीत होतो.

स्वगतः श्या! सर्दारजीचा जोक समजावून सांगणे म्हणजे...
निर्णायकः निर्णय देण्याच्या अधिकारात असलेली, the one that decides या अर्थाने.. चूभूद्याघ्या
..

प्रतिसाद

निर्णायकः निर्णय देण्याच्या अधिकारात असलेली, the one that decides या अर्थाने.. चूभूद्याघ्या

निर्णायक हा शब्द व्यक्ती इत्यादिपेक्षा परिस्थितीला उद्देशून वापरला जातो. सामान्यतः त्याचा अर्थ अटीतटीची / शेवटची / Deciding (अशी परिस्थिती) असा घेतात, असे पाहिले आहे. उदा. निर्णायक षटकांत केलेली फटकेबाजी...
निर्णायक = निर्णय घेणारा अशा अर्थाने हा शब्द वापरलेला पाहिला नाही.

सुषमा स्वराज

सुषमा स्वराज पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

अरे वा

दर महिन्याला* न्हाव्यांना मुंडणाचे काम आणि चणेवाल्यांना भरपूर ऑर्डर मिळणार तर.

*प्रत्येक वेळी वेगळ्या कारणासाठी.... एकदा पाकव्याप्त काश्मीर मधून पाकी बाहेर जात नाहीत म्हणून.....एकदा चीनचा निषेध म्हणून.... वगैरे

नितिन थत्ते

सोनियाचा आम आदमी

सोनियाचा आम आदमी तेवढेच करु शकतो. :) निदान न्हाव्याला धंदा तरी मिळेल. तसा राहूल पण कधी कधी दाढी करायला जाईल :)


चणेवाल्यांची भानगड

मुंडणाचे कळले पण ही चणेवाल्याची काय भानगड आहे?

उंच माझा झोका

दर महिन्याला* न्हाव्यांना मुंडणाचे काम आणि चणेवाल्यांना भरपूर ऑर्डर मिळणार तर.

आणि 'उंच माझा झोका' ह्या मालिकेत हेअरस्टाइलला साजेशी एखादी भूमिकाही देता येईल सुषमाताईंना.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर