आरुषी खून खटला आणि सीबीआय

गेली ४ वर्षे चाललेला आरुषी खून खटला किंवा नोयडा दुहेरी खून खटला वृत्तपत्रांचे पहिले पान अडवत असतो. या खटल्याविषयी सर्व उपक्रमींना माहिती असावी असे येथे गृहित धरले आहे.

हा गुन्हा नेमका कोणी केला त्याबद्दल साशंकता दिसते. त्यावर तहलका.कॉमचा एक जुना लेख येथे वाचा.

नुकत्याच घडलेल्या घडामोडीनुसार आरुषीच्या दंतवैद्य आईवडिलांवर खून, पुरावे नष्ट करणे वगैरे चार्जेस लावले आहेत. ही केस सध्या सीबीआयच्या ताब्यात असल्याने अनेक प्रश्न पडतात.

  • सीबीआयकडे खटला सुपूर्त होण्याची मागणी का केली जाते?
  • केस सीबीआयकडे सोपवण्याचे निकष कोणते? किंवा केस सीबीआयकडे कशी सुपूर्त होते? केवळ लोकाग्रहास्त्व होते का?
  • सीबीआयचे कार्यक्षेत्र काय आहे? त्यांच्या तपासणीनंतर विशेष सीबीआय कोर्टात केस दाखल होते का?
  • सीबीआय कोर्ट आणि इतर कोर्ट ह्यात काही फरक असतो काय?
  • सीबीआयवर कोणाचे नियंत्रण असते? जशी केस सीबीआयच्या हातात दिली जाते तशी काढली गेल्याची उदाहरणे मिळतात काय?
  • सीबीआयचा सक्सेस रेट किती आहे?

आमची भूमिका

Comments

उत्तरे

बर्‍याचशा प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील

पहिल्या आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहित असल्यास वाचायला उत्सूक आहे :)

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>तृयाच

चक्रावून टाकणारा खटला

हा खटला नि:संशय चक्रावून टाकणारा आहे आणि सोबत अतिशय खेदजनकही आहे. एकंदर खटल्याच्या निमित्ताने या कुटुंबावर उठलेली राळ (मग त्यात तथ्य असेल तरीही त्याची ज्याप्रकारे प्रसिद्धी केली गेली), हल्ला वगैरे निषेधार्ह होते.

असो. मलाही एक प्रश्न आहे.

सीबीआयच्या ताब्यात हा खटला येऊनही पुढे काही नवीन माहिती, क्लू किंवा छडा लागला असे दिसत नाही. पुन्हा आईवडिलांवरच टांगती तलवार (पार्डन द पन) आहे.

सीबीआयच्या तपासकार्यात खरेच का त्रुटी नाहीत?

अवांतरः भूमिका आवडली. चर्चेच्या शेवटी अशाच प्रकारे दुवा देत जावा म्हणजे लोकांना हेतू कळेल आणि कदाचित चर्चेत भाग घेण्याबद्दल विश्वासही वाटेल.

 
^ वर