इतिहास
काश्मीरबाबत एक शंका
माझा एक मित्र आहे. त्याला भारताचा काश्मीरवरचा हक्क मान्य नाही. त्याला देशद्रोही म्हणावे का?
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
मेजर्. जनरल ए. कनिंगहॅमचे पुस्तक
काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या 'भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र' या माझ्या लेखात भारतीय पुरातत्व विभागाचे १८८० मधले प्रमुख मेजर जनरल ए. कनिंगहॅम यांनी १८८०-८१ मध्ये केलेल्या आपल्या बिहार दौर्याच्या अहवालाचा संदर्भ दिला होता.
भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र
(Original Alms-Bowl of Buddha)
वर्ष कसे मोजायचे?
महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू आहे व ते 4,32,000 वर्षे चालेल, द्वापारयुग (8,64,000 वर्षे), त्रेतायुग (12,96,000 वर्षे) व सत्ययुग (17,28,000 वर्षे) होते. अशाप्रकारे या चार युगांचे एक महायुग (43,20,000 वर्षे) चालते.
इतिहासाचे संरक्षण
एक वाक्य नुकतेच वाचनात आले. - जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो.
दिवाळी अंक २०११: "कर्नल मॅकेंझीचा ऐतिहासिक खजिना"
धनंजय यांच्या विनंतीनुसार, कर्नल मॅकेंझीचा ऐतिहासिक खजिना या रोचना यांनी दिवाळी अंकात प्रकाशित केलेल्या लेखावरील चर्चा आणि प्रतिसाद यांच्यासाठी हा धागा वेगळा काढला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पुस्तक् 'गौतम बुध्द और उनका धम्म'
'गौतम बुध्द और उनका धम्म' डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी लिहीलेल पुस्तक या दिवाळीच्या सुट्यांमधे वाचनात आले. बबासाहेबांनी लिहीलेल्या अनेक अप्रतीम रचनांपैकी ही त्यांची शेवटची रचना होती.
बदलाचा इतिहास_धर्म
जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या लेखाच्या निमित्ताने विचारमंथन व्हावं अशी एक इच्छा आहे.इथे काही उदाहरणं मांडली आहेत आणि त्यावर अनेक वाचक आपली मतं मांडू शकतील.परस्परांमधल्या मतमतांतर प्रक्रियेला चालना मिळून विषयाचा आवाका नजरेसमोर येत रहावा असा एक उद्देश.
एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारावा हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात का येत असावा? त्यानंतर कृतीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष कृती कशी घडत असावी? त्यानंतरचे पडसाद काय स्वरूपाचे? हा या लेखाचा बीजविषय आहे.या संबंधातली केवळ उदाहरणं समोर ठेवणं हे या लेखाचं स्वरूप आहे.लेखावर वाचकतज्ज्ञांकडून उहापोह व्हावा ही सदिच्छा!
सुरवातीचं उदाहरण प्रत्यक्ष धर्मांतराचं नाही.कालानुक्रमानंही ते पहिलं नाही.जगण्याची पद्धत एवढाच शब्दश: आवाका या उदाहरणापुरता लक्षात घेऊया.
आपेगावच्या विठ्ठ्लपंत कुलकर्ण्यांना संसारात पडून मुरल्यानंतर, चार अपत्य झाल्यानंतर, गृहस्थधर्म सोडून संन्यस्तधर्म स्विकारावा असं का वाटलं असेल? एकाएकी, एका झटक्याच्या अंमलाखाली एखादी पुरूष व्यक्ती सर्वसंगपरित्याग करणं, तरुण वयात करणं हे त्या काळात कदाचित सहज असेल.मग काशीला जाणं.तिथे गेल्यावर विठ्ठलपंतांच्या गुरूंनी त्याना ’तू गृहस्थधर्म सोडणं ही चूक आहे.पुनश्च गृहस्थधर्म स्विकार!’ अशी आज्ञा करणं.ही आज्ञा शिरसावंद्य मानणं विठ्ठलपंतांना सोप्पं गेलं असेल? गुरूची आज्ञा तडकाफडकी शिरोधार्य मानण्याचा तो काळ.व्यक्तीच्या मनात आपल्या पुढच्या प्रवासांसंबंधात काही आलं नसेल? चलबिचल झाली नसेल? हे असं दोन टोकात गर्रकन् फिरणं या कृतीचा अर्थ एका व्यक्तीच्या अनुषंगातून कसा लावायचा? पुढे काय?
दिवाळी अंक २०११: "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई"
प्रियालींचा "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई" लेख आवडला. छायाचित्रे बघून ही चर्चा आठवली! किल्ला पर्यटनासाठी "डिवेल्हप" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले.