वर्ष कसे मोजायचे?

महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू आहे व ते 4,32,000 वर्षे चालेल, द्वापारयुग (8,64,000 वर्षे), त्रेतायुग (12,96,000 वर्षे) व सत्ययुग (17,28,000 वर्षे) होते. अशाप्रकारे या चार युगांचे एक महायुग (43,20,000 वर्षे) चालते.

आजपर्यंत 27 महायुगे झाली आहेत. सध्या 28 वे महायुग चालले आहे. या प्रमाणे 71 महायुगे म्हणजे (30,67,20,000 वर्ष) एका मनूचा कालावधी असतो. त्याला मन्वंतर म्हणतात.

आतापर्यंत स्वंयभू, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष ही सहा मन्वंतरे झाली आहेत. सध्या वैवस्वत मन्वंतर चालले आहे. यानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रूद्रसावर्णि, देवसावर्णि आणि इंद्रसावर्णि ही सात मन्वंतरे यायची आहेत. अशाप्रकारे ही 14 मन्वंतरे म्हणजे (4,29,40,80,000 वर्ष) म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस.

जगाची उत्पत्ती होऊन सध्या ब्रह्मदेवाची पन्नास वर्षे झाली आहेत. अशा रितीने ब्रह्मदेवाची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा सृष्टी नाशाप्रत होईल आणि हा एवढा कालावधी एका कल्पाचा असतो.

स्वर्गलोक, पुथ्वीलोक, पाताळलोकावर जो राज्य करतो तोच देव आहे, प्रथम तो ब्रम्हा, विष्णू, महेशची निर्मीती करुन प्रुथ्वीचा सर्व कारभार त्यांच्या स्वाधीन करतो.

आपल्या सुर्यमालेतील दुसरे ग्रह तसेच आपल्या मंदाकिनी आकाश गंगेतील इतरही माला आहेत अशा अगणित आकाश गंगाचा देवाला कारभार करावा लागतो म्हणून ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या नियोजनात देव (God) कधीही हस्तक्षेप करीत नाही.

आम्ही तुम्ही संत नामदेव, तुकाराम, राम, क्रुष्ण किंवा इतर ३३ कोटी 'देवाचा बाजार' काही लोकांनी पोटापाण्यासाठी भरवला आजही भरवत आहेत आपण त्यात सामील आहात काय?

कालगणना खुप महत्वाची आहे, महाभारत त्यामुळे झाले. आजही तो मुद्दा तसाच अर्धवट आहे कदाचित आपल्या सोबत चर्चा होऊन काही मार्ग निघेल असे वाटते. वर्ष कसे मोजायचे? हा प्रश्न आजही खुप मोठ्ठा आहे. यावर चर्चा व्हावी.

Comments

१ २ ३ ४ ....

प्रमोद

पुराणातली वांगी मोजायला एवढा वेळ आहे कुणाला?

युगे, महायुगे, मन्वंतरे आणि ब्रह्मा देवाची वर्षे सुरु होतात कुठे आणि कुठे संपतात हे मोजायला वेळ आहे कुणाला?
जिथे महाभारत झाले कि नाही, ते सत्य आहे कि केवळ महाकाव्य हेच अजून ठाम माहित नाही तिथे एवढा खटाटोप करण्याएवढा हा मोठ्ठा प्रश्न नाही.
जगात अजून असे बरेच उत्तम प्रश्न आहेत कि सोडवायला ते सोडवूया ना?

असे म्हणू नका

जगात अजून असे बरेच उत्तम प्रश्न आहेत कि सोडवायला ते सोडवूया ना?
असे म्हणू नका. पुराण, इतिहास, नोस्टाल्जिया यातून बाहेर पडा म्हणणे लोकांना मुळीच आवडत नाही. 'परंपरेच्या नाड्या घालूनच आधुनिकतेच्या सुरवारी चढवल्या पाहिजेत' हे (अर्थातच पु.लंचे!) वाक्य फार लोकप्रिय आहे. (अर्थात हीही पुराणातली वांगीच झाली म्हणा, पण फक्त वानगीदाखल!)
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

वेळ आहे कुणाला?

वेळ, दिवस, महीना, वर्ष, सवंत्सर, युग...वैगेरे क्से मोजयचे हाच तर चर्चा विषय आहे.

कोणते

कोणते ?

रोचक

युगांची आणि मन्वंतरांची माहिती रोचक वाटली.

कालगणना खुप महत्वाची आहे, महाभारत त्यामुळे झाले. आजही तो मुद्दा तसाच अर्धवट आहे कदाचित आपल्या सोबत चर्चा होऊन काही मार्ग निघेल असे वाटते. वर्ष कसे मोजायचे? हा प्रश्न आजही खुप मोठ्ठा आहे.

कालगणनेमुळे महाभारत झालं हे काही निटसं समजलं नाही, थोडं अजुन विस्तृतपणे सांगता येइल काय?

कालगणनेने महाभारत् झाले म्हणजे....

कालगणनेने महाभारत् झाले म्हणजे....
महाभारतात पांडव हरलेल्या प्रसिद्ध् द्युताची अट् आठवते? ती होती द्युतात जे हरतील् त्यांना बरा वर्षे वनवास् व् एक् वर्ष अज्ञातातवास्. आणि जर का ह्या अज्ञातवासात त्यांना ओळखले गेले, तर पुन्हा बारा वर्षे+१वर्षे असे चक्र सुरुच राहणार.
झाले क्जाय्, की बारा वर्षे पूर्ण झाली. अज्ञातवासा ते विराटनगरित राहू लागले. पाचही पांडावांनी आअपली नावे, वेशभूषा वगैरे बदलली.
विराट राजाच्या वेगवेगळ्या सेवक, सहकारी, मंत्री ह्या रूपात ते राहू लागले. वर्ष सरत आले. कौरवांना त् यांचा पत्त लागत् नव्हता.
अशातच् कौरवांनी मोहिम काढली विराट् राजाचे गोधन पळवायची. ते गायी घेउन, लुटून् पळून् गजाउ लागले. विराटाच्या सैन्याला त्यांनी भलतीकडेच् भलत्याच दिशेने गुंतवून् ठेवले होते, दुसर्‍या एका राजाच्या मदतीने. गुरे लुटली जाताना राजा फक्त् हताशपणे बघू शकत होता.
एवढ्यात उत्तर हा राजपुत्र आवेशात येउन् "मी बघातो एकटा त्या आख्ख्या कौरव सेनेला" असे बायकात बडबडला. व कुणीच सारथीही उपलब्ध नसल्याने बृहन्नडा(डान्स मास्टर,मुघलकालीन "खोजा" स्टाइअल्, नाच्या सारखं किंवा तृतीयपंथीसारखं) रुपात असलेल्या अर्जुनाने त्याचे सारथ्य करत रथ् थेट् कौरव सेनेसमोर् नेउन् ठेवला. अफाट् कौरव सेना व समोरचे कृप्-द्रोण- भीष्म-कर्ण्-दुर्योधन् इत्यादी महारथी पाहून तो गडबडला. हबकला. पळून् जाउ लागला. हे पहताच् अर्जुनाने सूत्रे हाती घेत त्या गाढवाला थांबवत थेट् एकट्याने लढाई सुरु केली.
एकत्या बृहन्नडेने कृप्-द्रोण- भीष्म-कर्ण्-दुर्योधन् ह्या सर्वांना त्याम्च्या सेनेसकट हरवले, परास्त केले. जीव वाचवत् ते पलत् सुटले. बृहन्नडा विजयी झाली पण्.............

पण पळून जाताना, धूम् ठोकताना एक् गोष्ट् शकुनीच्या लक्षात आली ती ही की ह्या सर्वांना पुरून् उरणारा एकमेव धनुर्धर ह्या धरतीवर अस्तित्वात आहे.....
अ र्जु न
म्हणजे? बृहन्नडा वेशातील् तो अर्जुनच होता की काय? ही तर इष्टापत्तीच ठरली म्हणत शकुनीला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. व अशाप्रकारे पांडव् ओळखले गेले. पण्............

एका कालगणनेनुसार विराट युद्ध सुरु झाले तेव्हाच मुळी १३ वर्षे उलटून् गेली होती. अज्ञातवासा आधीच् संपला होत. तर् दुसर्‍अय पद्धतीनुसार तेरा वर्षे संपण्यास् थोडासा का असेना पण् अवधी शिल्लक् होता. दोन्ही भारतीय् पंचांगेच असली तरी दोन्हीत असे चांद्र-सौर् वर्षाचे लफडे व मागे-पुढे असणे सुरूच् होते. शिवाय भर घालायला "तिथी क्षय्" वगैरे प्रत्येक पद्धतीत वेगवेगळा मानला जातो.

पांडव म्हटले "१३ वर्षे पूर्ण् झालित् . राज्य परत् द्या."
कौरव म्ह्टले "१३वर्षे झालेली नाहित, तुम्हाला ओळखले आहे. देत् नाही जा."

दोन्ही बाजू आपले म्हणणे सोडिनात. परिणामी संघर्ष अटळ् झाला. मूळ १३वर्षे ही अट घालताना, हा clause सांगताना, कालगनना कुठली गृहित धरण्यात आली आहे हे स्पष्ट् केले नव्हते.

म्हणून "कालगणनेमुळे महाभारत झालं " असे म्हटलेले असावे.

असो. मी काहीही प्रतिक्रिया लेखावर् देणार नव्हतो, इथे शंका दूर करता यावी म्हणून डोकावलो.

--मनोबा

अच्छा तर

अच्छा तर जे श्री कृष्णाला जमले नाही ते करायचे आहे तर, विद्वान गणितज्ञ उपक्रमी हे करु शकतिल ह्याबाबत फारसा संदेह नाही.

असो एवढी विस्तृत माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद !

धाग्याचा सदुपयोग केल्याबद्दल मनोबाचे आभार. :)
कालगणनेचा हा ट्विस्ट मला ठाऊक नव्हता !

लहानसा बारकावा

सौर वर्ष म्हणजे सूर्याचे बारा राशीमधून फिरून पुन्हा पहिल्या जागी येणे. याला सुमारे ३६५.२५ दिवस लागतात. हेच आपले इंग्रजी कॅलेंडरमधले वर्ष असते. या अवधीत पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते.
अमावास्येला चंद्र अदृष्य होतो, त्यानंतर तो कलेकलेने वाढत पौर्णिमेला पूर्ण गोलाकृती होतो आणि कलेकलेने लहान होत पुन्हा अमावस्या येते. हे चक्र साडे एकोणतीस दिवसांचे असते. भारतीय पंचांगामधला हा एक महिना असतो, तसेच इस्लामी कॅलेंडरमध्ये सुद्धा हाच महिना धरला जातो. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी याच क्रमाने पुन्हा एका रेषेत येण्यासाठी एवढा अवधी लागतो.
असे बारा महिने म्हणजे एक वर्ष असे हिजरी (इस्लामी) वर्ष असते, ते ३५४ दिवसांचे असते.
या दोन पध्दतींमधला ११ दिवसांचा फरक भरून काढण्याचे कार्य भारतीय पंचांगात दर तीन वर्षात एक अधिक मास धरून केले जाते. त्यामुळे आपली पध्दत सौर आणि चांद्र या दोहोंना धरून आहे.
महाभारतामधील चांद्र वर्ष पूर्णपणे चंद्रावर आधारलेले असेल तर १३ वर्षांमध्ये दोन पध्दतींमधील फरक १४३ दिवस इतका येईल. त्या काळात सुध्दा अधिक मास धरला जात असेल तर तो फरक जास्तीत जास्त ३० दिवसांइतका असेल. अर्जुनाने बृहन्नडा बनण्यापूर्वी आपले धनुष्य बाण शमीच्या झाडावर ठेवले होते आणि दसर्‍याच्या दिवशी ते हातात घेतले अशी दंतकथा आहे. युधिष्ठिराने द्यूत खेळण्याची घटना बहुधा दिवाळीत झाली असावी. असे असल्यास या दोन तिथींमधला फरक सुमारे २० दिवसांचा असतो.
उपक्रमावरील विद्वान यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

सार्थक केले

येथे येऊन डोकावण्याचे सार्थक केले.

विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास, शिक्षण

यांचा काडीचाही संबंध या पुराणातल्या वांग्याशी दिसत नाही. उपक्रम यावर काही नियंत्रण ठेवू शकते काय?

पुराणातली वांगीच आजची छान भाजी..

प्रथम सर्व सभासदांचे आभार, विशेष करुन मनोबांनी "कालगणनेमुळे महाभारत झालं" हे अगदी सोपे करुन सांगितले व आनंद घारे यांनी "सुर्य व चंद्राच्या उगवण्यावर मावळण्यावर वेगळ्या वेग्ळ्या कालगणना अस्तित्वात असल्याची कल्पना दिली" एक महत्वाचा मुद्दा आज जगात जेवढ्या घटना घडतात त्या सर्व महाभारतात घडल्या व शेवटी वरील प्रमाणे कालगणनेमुळे वाद निर्माण होऊन युद्ध् पेटले आणि सर्व जग त्यात ओढले जाऊन लोकसंख्या झपाट्याने कमी झाली. महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू झाले तेव्हा युधिष्ठीरने युगाब्ध नावाची कालगणना सुरु केली त्यात तेव्हा व आज जे डबल प्राब्लेम आहेत त्यावर उपाय आहेत. कोणाकडे युगाब्ध मधील महीने, वार व दिवस यावर काही माहीती असल्यास चर्चा सोपी होईल.

महायुग इ. थोडे स्पष्टीकरण

हा धागा सुरू करताना त्याच्या निर्मात्याच्या मनात हेतु काय होता हे स्पष्ट कळत नाही. ही सर्व 'पुराणातली वांगी' खरीच आहेत आणि त्यांच्या मागे काही शास्त्रीय विचार आहे आणि त्याची आपण चर्चा करावी असा हेतु आहे का 'हे आहे हे असे आहे, त्याच्या मागचा विचार काय होता' हे जाणून घेण्याचे कुतूहल असा हेतु आहे हे स्पष्ट नाही. <आम्ही तुम्ही संत नामदेव, तुकाराम, राम, क्रुष्ण किंवा इतर ३३ कोटी 'देवाचा बाजार' काही लोकांनी पोटापाण्यासाठी भरवला आजही भरवत आहेत आपण त्यात सामील आहात काय?> हा प्रश्न कोणाला कोणास केला आहे हे कळत नाही आणि धाग्यातील अन्य गोष्टींशी ह्या विधानाचे काय देणेघेणे आहे हेहि उमगत नाही. <आपल्या सुर्यमालेतील दुसरे ग्रह तसेच आपल्या मंदाकिनी आकाश गंगेतील इतरही माला आहेत अशा अगणित आकाश गंगाचा देवाला कारभार करावा लागतो म्हणून ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या नियोजनात देव (God) कधीही हस्तक्षेप करीत नाही.> हे विधान वाचकाने गंभीरपणे घेऊन आपल्या आयुष्यात त्याला योग्य स्थान द्यावे अशी अपेक्षा आहे काय हेहि स्पष्ट नाही. प्रास्ताविक करणार्‍या सदस्याने ह्याचा काही खुलासा केल्यास बरे होईल

युग, महायुग, मन्वन्तर, ब्रह्मदेवाचा एक दिवस, कल्प ह्या सगळया चढत्या भाजणीचा माझ्या समजुतीनुसार लागणारा अर्थ सांगतो.

महायुगाचा काळ म्हणजे ४३,२०,००० वर्षे ह्याला गणिती अर्थ आहे असे मला वाटते. भारतीय ज्योतिर्गणिताने एखाद्या दिवसाची ग्रहस्थिति आकडेमोडीने शोधण्यासाठी प्रथम त्या दिवसाचे अहर्गण काढत असत. अहर्गण म्हणजे पूर्वीचा कोठलातरी एक दिवस हा पहिला दिवस असे धरून त्या दिवसापासून इष्ट दिवसापर्यंत किती वर्षे, महिने आणि दिवस लोटले हे काढायचे. प्रत्येक ग्रहाची (त्यात सूर्य आणि चंद्रहि आले) आकाशातील रोजची चाल सूक्ष्म निरीक्षणामधून माहीत झालेली होतीच. (हे ज्ञान भारतीयांना बॅबिलोनकडून मिळाले असे काहीजण म्हणतात तर टॉलेमींच्या अलेक्झान्ड्रियामधील वेधशाळेमध्ये ३०० वर्षे निरीक्षणे गोळा करून हे हिशोब केले गेले आणि ते जगभर पसरले असे काहीजण म्हणतात.) ग्रहाच्या दैनंदिन चालीचा उपयोग करून गुणाकाराने त्या ग्रहाने पहिल्या दिवसापासून इष्ट दिवसापर्यंत आकाशात किती अंश चाल केली हे काढायचे. त्यातून ३६० अंशांचे जितके पूर्ण भाग बाहेर निघतील तेवढे काढले म्हणजे उरलेली बाकी ही त्या ग्रहाची इष्ट दिवसाची आकाशातील स्थिति. हा पहिला दिवस म्हणजे महायुगाचा प्रारम्भदिवस. (ही आकडेमोड मास/तिथींच्या क्षयवृद्धींमुळे ह्यापेक्षा बरीच गुंतागुंतीचे आहे पण त्यात येथे शिरत नाही. ह्या पहिल्या दिवशी सर्व ग्रह एकाच स्थानी होते हेहि गृहीत म्हणून मानले आहे. गुणक पुरेसा मोठा असला तर ह्या गृहीतामुळे निर्माण होणारी चूक हे दुर्लक्षिण्याइतपत क्षुल्लक असणार.)

आता चंद्रसूर्यांची रोजची चाल डोळयाला भासण्याइतकी मोठी असते पण अन्य ग्रहांचे तसे नाही. उदा. शनीची रोजची चाल ० अंश ०२ मि ००.०५ से इतकी, तर राहूची (-)० अंश ०३ मि १०.७७ से इतकी सूक्ष्म आहे.ह्या आकडेमोडीतील अपूर्णांक टाळण्यासाठी गुणक जितका मोठा तितका सोयीस्कर म्हणून ४३,२०,००० वर्षे हा आकडा ठरविला असला पाहिजे. १२०००*३६०= ४३२०००० ह्याचा त्यामध्ये काही प्रभाव असू शकेल कारण १२ आणि ३६० हे दोन्ही आकडे ज्योति:शास्त्रानुसार ओळखीचे आणि महत्त्वाचे आहेत.

ह्या गणितातून बाहेर पडले म्हणजे बाकीचा सगळा पुराण लिहिणार्‍या मंडळींचा कल्पनेचा खेळ आहे असे वाटते. प्राचीन भारतीयांच्या दोन सवयी येथे लक्षात घ्याव्या लागतील. पहिली म्हणजे प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ति करणे आणि दुसरी म्हणजे कोष्टके तयार करणे. ४३,२०,००० हा आकडा पुरेसा मोठा वाटला नाही म्हणून त्याच्यावर मन्वन्तर, ब्रह्मदेवाचा एक दिवस, कल्प ही उतरंड रचली आणि एक गुंतागुंतीचे कोष्टक निर्माण केले. भोळया श्रद्धाळूंना आपल्या कच्छपी लावण्याचा हा मार्ग असावा असे म्हणता येईल. (ह्या अतिशयोक्तीचे दुसरे उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील युद्धात किती सैन्य होते ह्याचा हिशोब. कौरवांकडे ११ आणि पांडवांकडे ७ अक्षौहिणी सैन्य होते असे महाभारत सांगते. एक अक्षौहिणी म्हणजे २१,८७० रथ, २१,८७० हत्ती, ६५,६१० घोडदळ आणि १,०९,३५० पायदळ. ह्यातील २१,८७० चा पाढा लक्षात घेतला म्हणजे कोष्टक निर्माण करण्याची पद्धति कळते. ह्यानुसार भारतीय युद्धात ३.९३.६६० रथ, तेव्हढेच हत्ती, ११,८०,९८० घोडदळ आणि १९,६८,३०० पायदळ इतक्यांनी भाग घेतला. एव्हढया हत्तीघोडयांना चारा आणि इतक्या सैन्याला धान्य किती लागेल, एव्हढी प्रचंड संख्या अल्पकाळात युद्धस्थानी दूरवरच्या कानाकोपर्‍यातून गोळा करण्यासाठी किती वर्षे लागतील ह्या आणि अशा असंख्य तपशीलांचा विचार न करता कल्पनेच्या वारूवर आरूढ होऊन निर्माण केल्यासारखी ही संख्या दिसते.)

असे जरी असले तरी भारतीय कालगणनेचे हे कोष्टक आपण पूर्णपणे विसरून जावे हेहि मी म्हणणार नाही. अतिशयोक्त आणि काल्पनिक असले तरी ते - आणि तशाच अन्य कित्येक गोष्टी - आपल्या सांस्कृतिक जाणिवेचा भाग झालेल्या आहेत म्हणुन त्यांवर विश्वास आणि श्रद्धा ठेवली नाही तरी त्यांची जाणीव मेंदूच्या कोठल्यातरी कोपर्‍यात ठेवणे अवश्य आहे. हे कोष्टकाचे अस्तित्व आपल्याला रोजच्या भाषेत भेटत असते. 'नव्या मनूतिल नव्या दमाचा शूरशिपाई आहे' ह्या केशवसुतांच्या ओळीमधे, 'नाटयमन्वन्तर' ह्या संस्थेच्या नावामध्ये, 'युगायुगाची गोष्ट सांगते तुझी नि माझी प्रीती' ह्या गीतामध्ये, 'सङ्घः शक्ति: कलौ युगे' अशा वचनांमध्ये, 'टिळकयुग संपले आणि गांधीयुग सुरू झाले' अशा विधानांमध्ये हे कोष्टक आपल्याला भेटत राहणार त्यामुळे general knowledge च्या पातळीवर त्याची माहिती असायला हवी.

(अवांतर - ज्योतिर्गणितविषयक चर्चेतून असे आठवले की १९व्या शतकातील प्रसिद्ध ज्योतिर्गणिती बापूदेव शास्त्री ह्यांचे एक चित्र मला जालावर सापडले होते ते मी घेऊन ठेवले होते. त्यांचे दुसरे कोठे चित्र आहे की नाही ते मला माहीत नाही पण माझ्याजवळचे चित्र सर्वांच्या माहितीसाठी येथे जोडत आहे.)

बनारस कॉलेजमध्ये बापूदेव शास्त्री - १८७०
बनारस कॉलेजमध्ये बापूदेव शास्त्री - १८७०

इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइ

+१

आशयाशी बराचसा सहमत.
भाविकपणाने नाही पण आपल्याकडील् मान्यता, लोककथा, समाजमानस काय् आहेत ते जाणण्यासाठी म्हणून नक्कीच महाभारत-रामायण् ह्यांची माहिती असलेली चांगली. ग्रामीण् भागात किम्वा अर्धशिक्षित बहगात आजाही वेद-पुराणे ह्यांचे दाखले बोलण्यात कुठेही दिसत नाहित, सतत रामकथेचे किंवा महाभारताचेच उल्लेख दिसतात. इथल्या जनतेची मानसिकता काहिशी त्याच धाटणीची बनली आहे असे वाटते.

अक्षौहणीच्या हिशेबाबाबत व अतिशयोक्तीबद्दल तर प्रच्ंड सहमत. मुळात कुरु-पांचालांचे किंवा कौरव-पांडवांचे युद्ध झाले, ते म्हणजे हस्तिनापूर्-पांचाल्(आजचा कुरुक्षेत्राच्या पश्चिमेकडचा पंजाब) काशी, मथुरा ही नुसती शहरे नाही, तर राज्ये होती! त्यांना आज नगर राज्ये किंवा city states म्हणता येइल.(ग्रीकांची अथेन्स, मॅसिडोनिया,स्पार्टा वगैरे होती तशीच्, आज ही सगळी ग्रीस मधील् साधी शहरे आहेत.) अक्षौहिणीचा हिशेब् केल्यावर् येणारा नुसत्या सैन्याचा आकडा तेव्हाच्या आख्ख्या दक्षिण आशियाच्या एकूण लोकसंख्येहून्(सैनिक + नागरिक धरून) मोठा वाटतो.

@घारे काका:-
मूळ वाद समजून घ्यायला प्रतिसाद उपयुक्त ठरला. ह्यावरून् आठवले, रमजान हा मुस्लिमांचा महिना दर वर्षी आपल्या ग्रेगरियन क्यालेंडारनुसार पंधरावीस् दिवस् अलीकडे येतो. म्हणजे यंदा जर तो ऑगष्ट् मध्ये आला असेल तर पाचेक वर्षांनी जूनमध्ये येइल. अजून् पाच सात वर्षांनी एप्रिलच्या शेवटी वगैरे. एकदम लिंक लागली.

@अदिती:- हे अंश आपण् कसे मोजतो? पृथ्वीवरून् त्या ग्रहाचे जे अंश जाणवतात तेच् मोजतो ना? की absolute अंतर् व absolute अंश मोजायची एखादी पद्धती आहे?

--मनोबा

हस्तिनापूर्-पांचाल्(आजचा कुरुक्षेत्राच्या पश्चिमेकडचा पंजाब)?

- हस्तिनापूर्-पांचाल्(आजचा कुरुक्षेत्राच्या पश्चिमेकडचा पंजाब)-
????
चूकभूल द्यावी घ्यावी, पण आंतरजालावरची माहिती असे दर्शवते की हस्तिनापूर आणि पांचाल (आजचे रोहिलाखंड) हे भाग उत्तर प्रदेशात येतात, कुरूक्षेत्राच्या पश्चिमेकडच्या पंजाबात नव्हेत.

आणि कौरव पांडवांचे युद्ध जिथे झाले ते कुरूक्षेत्र हरयाणामध्ये आहे. जिथे कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, जिथे भीष्मांचे पतन झाले, कर्ण का टीला, जिथे दुर्योधन मारला गेला इत्यादी स्थाने कुरूक्षेत्र जिल्ह्यात एकमेकांपासून काही किलोमीटर अंतरावर आहेत. ह्या कुरूक्षेत्र जिल्ह्यात सर्वत्र सुपीक शेतजमीन पसरलेली आहे (अपवाद - कर्ण का टिला), तसेच ठिकठिकाणी विशाल सरोवरेही आहेत.

जर खरोखर महाभारतीय युद्ध झाले असेल, तर ते निश्चितपणे मोठ्या सैन्यसंख्येने लढले गेले असावे, म्हणूनच वर सांगितलेली ठिकाणे एकमेकांपासून इतकी दूर असावी असे अनुमान काढता येते. कारण मोठ्या प्रमाणवर माणसे मारली गेल्यामुळे आणि युद्धभूमीवर रक्तमांसाच्या चिखलाचे पाट वाहिल्यामुळे युद्धभूमीची जागा बदलावी लागत असल्याचे ओझरते उल्लेख महाभारतात येतात. त्यामुळे हे युद्ध मोठ्या सैन्यसंख्येनिशी लढले गेले असावे, असे मानण्यास जागा आहे, मात्र सैन्यसंख्या किती होती, हे मात्र निश्चित सांगता येणार नाही.

पृथ्वीवर मोजतात तसेच.

हे अंश आपण् कसे मोजतो? पृथ्वीवरून् त्या ग्रहाचे जे अंश जाणवतात तेच् मोजतो ना? की absolute अंतर् व absolute अंश मोजायची एखादी पद्धती आहे?

निरिक्षकाला केंद्रस्थानी मानून आकाशातले अंश, इत्यादी मोजण्याची, सांगण्याची साधारण पध्दत आहे. आपल्याला दिसणारं क्षितीज ३६० आहे असं मानून एक अंशाची व्याख्या केली.
(अंश) = ६० कोनीय मिनीटे आणि १ कोनीय मिनीट = ६० कोनीय सेकंद अशी विभागणी केली गेली.

आपला हात पूर्ण लांब करून अंगठा आणि करंगळी लांबवली तर दोन टोकांमधे जेवढं कोनीय अंतर असतं ते साधारणतः २० एवढं असतं. मुंबई*तून ध्रुवतारा शोधताना याचा उपयोग व्हायचा. मुंबईचे अक्षांश १८ त्यामुळे आकाशात ध्रुवतारा क्षितीजापासून १८ एवढा वर दिसतो. हात लांबवून क्षितीजापासून एक वीत अंतर मोजून आपण शोधलेला तारा ध्रुवताराच आहे ना याची खात्री करता येईल.
तसंच एका बोटाची रुंदी म्हणजे साधारण १. अंदाजपंचे आकाशातली कोनीय अंतरं सांगताना याचा फार उपयोग होतो.

*साधारण १८-२२ अक्षांशावरून कुठूनही होईल.

माहितीत किंचित भर

मन, श्री. घारे आणि श्री. कोल्हटकर यांच्या प्रतिसादांमुळे धागा उघडण्याचे सार्थक झाले.

थोडी माहितीमधे भरः

शनीची रोजची चाल ० अंश ०२ मि ००.०५ से इतकी, तर राहूची (-)० अंश ०३ मि १०.७७ से इतकी सूक्ष्म आहे.

तुलना करण्यासाठी: आकाशात दिसणारा सूर्याचा आणि पौर्णिमेच्या चंद्राचा व्यास सुमारे अर्धा अंश एवढा आहे. ०२ मि ००.०५ से म्हणजे साधारणतः सूर्य किंवा चंद्राच्या व्यासाच्या एक तिसांश एवढी लांबी. किंवा (साधारण) एका महिन्यात शनी "एक सूर्य" एवढे अंतर आकाशात चाललेला दिसेल.
या मिनीट आणि सेकंदांमुळे कालमापनातल्या मिनीट आणि सेकंदांशी गडबड होऊ नये म्हणून त्यांना कोनीय मिनीटे आणि कोनीय सेकंद असे म्हटले जाते.

"आकाशगंगा" हा शब्द असाच एकत्र लिहील्यास आपल्याच दीर्घिकेचा विषय सुरू आहे हे कळण्यास वेळ कमी लागेल. मंदाकिनी हे नावही आपल्या दीर्घिकेला, आकाशगंगेला दिलेले आहे. अशा साधारण १०११ दीर्घिका विश्वात आहेत असे मानले जाते.

सुंदर

"मन, श्री. घारे आणि श्री. कोल्हटकर यांच्या प्रतिसादांमुळे धागा उघडण्याचे सार्थक झाले."

~ सहमत.

प्रतिसाद

कधी कधी काहि धागे प्रतिसादांनीच खुलतात हेच खरे.
मस्त प्रतिसाद आहेत. विषेशतः मन, घारे आणि कोल्हटकरांचे!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असेच म्हणते

कधी कधी काहि धागे प्रतिसादांनीच खुलतात हेच खरे.
मस्त प्रतिसाद आहेत. विषेशतः मन, घारे आणि कोल्हटकरांचे!

असेच म्हणते. अशा धाग्यांवरही उत्तम प्रतिसाद देऊन धाग्याचे सार्थक करणारे उपक्रमी आहेत हे उत्तम.

महाभारत हे प्रत्यक्षात काही टोळ्यांतील चकमकी यापेक्षा मोठे नसून कालांतराने अनेक टोळ्यांनी (क्लॅन) आपले महत्त्व वाढवण्यासाठी आपल्या टोळ्याही या युद्धात सामील होत्या असे भासवण्याचा प्रयत्न केल्याने महाभारत फुगत गेले असा प्रवाद येथेच वाचला होता.

शीर्षक

'वर्ष कसे मोजायचे?' असे शीर्षक आणि लेखात त्याबद्दल काहीच माहिती नाही हे पाहिले आणि मला ठाऊक असलेल्या तीन पध्दतींबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटले.
त्याचे 'सार्थक' झालेले पाहून बरे वाटले. धन्यवाद.

तीन पध्दती.

@ आनंद घारे, तुमच्या तीन पध्दती म्हणजे चंद्र, सुर्य, प्रुथ्वी याच आहेत का काही वेगळे तुम्हाला ठाऊक आहे?

स्पेलिंग

पृथ्वी असं लिहीण्यासाठी pRu असं स्पेलिंग करावं.

वर्ष कसे मोजायचे?

नवीन दिवस, नवीन महीना, नवीन वर्ष सुरु होताना आकाशात, प्रुथ्वीवर, मानवात, प्राण्यात एकंदर पुर्ण निसर्गात सध्या डोळ्यानी दिसून येईल असे बद्ल व्हायला हवेत. उदा. १) नवीन दिवस=चंद्राचे आकाशातील स्थान, २) नवीन महीना=सुर्याचे आकाशातील स्थान, ३) नवीन वर्ष=प्रुथ्वीमध्ये होणारा बदल.

तसा प्रयत्न कलीयुगाच्या सुरुवातीला ५११३ वर्षापुर्वी युधिष्ठीरने युगाब्ध नावाची कालगणना सुरु करुन केला होता. त्यानंतर कोणीतरी एखादा प्रेषित येतो त्याचा जन्म, त्याने दाखवलेला चमत्कार, त्याचा राज्याभिषेक, त्याचा म्रुत्यू ....त्याचे इतर काही बाही.... यावर आजच्या सर्व कालगणना आधारलेल्या आहेत तेही फक्त कलीयुगाच्या ५११३ वर्षापर्यंत आजून खुप दिवस बाकी आहेत.

आज एकही कालगणना चंद्र, सुर्य, प्रुथ्वी या तिन्हीचा मेळ बसविणारी नाही. आपण सर्व जण किती मुर्खासारखे वेडे आहोत हे सर्वाना कळलेच असेल. वेळीच यावर विचार करुन काही पावले उचलली पाहीजेत तरच आपण वाचू नाहीतर परत एकदा महाभारता सारखा वाद निर्माण होऊन कलीयुग संपण्या अगोदर प्रुथ्वीवरील सर्व नष्ठ् होऊन मुळ बीज पण राहणार नाही.

माझ्या माहीती प्रमाणे प्रथम दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्माने जगताची रचना केली तेव्हापासून आजपर्यंत १, ९७, २९, ४९, १०८ एवढी वर्ष झाली आहेत.

बरं बरं

माझ्या माहीती प्रमाणे प्रथम दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्माने जगताची रचना केली तेव्हापासून आजपर्यंत १, ९७, २९, ४९, १०८ एवढी वर्ष झाली आहेत.

माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या साधारण ११,००,००,००,००० वर्षांपूर्वी विश्व जन्माला "आलं".

कुठला सूर्योदय?

माझ्या माहीती प्रमाणे प्रथम दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्माने जगताची रचना केली तेव्हापासून आजपर्यंत १, ९७, २९, ४९, १०८ एवढी वर्ष झाली आहेत.
चोवीस तासामधील प्रत्येक सेकंदाला पृथ्वीवर कुठे ना कुठे सूर्य उगवत असतो आणि कुठेतरी तो मावळत असतो. यातला कुठला सूर्योदय त्या ब्रह्म्याने प्रमाण धरला होता?
आणि पृथ्वीवरच का? इतर ग्रहांवर सुद्धा त्यांच्या स्वत:भोवती फिरण्याच्या वेगानुसार सूर्याचे उगवणे व मावळणे चाललेले असते.
ब्रह्म्याने जगताची निर्मिती केली म्हणजे कशाची निर्मिती कशापासून केली? त्यात सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचा समावेश होता का?
त्यावेळी तो ब्रह्मा कुठे बसला (किंवा उभा) होता? ती जागा जगाच्या बाहेर होती का? आता तो कुठे आहे?
आपल्या विधानांवर विचार केल्यास असे असंख्य प्रश्न अनुत्तरित राहतील.
त्यामुळे पुराणातल्या असल्या तथाकथित गप्पांना 'माहिती' म्हणता येत नाही.

माहिती...

स्वर्गलोक, पुथ्वीलोक, पाताळलोकावर जो राज्य करतो तोच देव आहे, प्रथम तो ब्रम्हा, विष्णू, महेशची निर्मीती करुन प्रुथ्वीचा सर्व कारभार त्यांच्या स्वाधीन करतो. यात निर्मीती=स्वर्ग=ब्रम्हा, पालन=पुथ्वी=विष्णू, नाश=पाताळ=महेश. ही झाली देवाची मुले त्यांचे कार्य, जागा(लोकेशन), नाव या क्रमाणे.

विश्व निर्मिती ही खुप अगोदर झाली त्यात सूर्य, चंद्र व पृथ्वी पण आलेच.

चोवीस तासामधील प्रत्येक सेकंदाला पृथ्वीवर कुठे ना कुठे सूर्य उगवत असतो आणि कुठेतरी तो मावळत असतो. यातला जो पहीला सजीव ज्या ठिकाणी निर्माण केला तो सूर्योदय त्या ब्रह्म्याने प्रमाण धरला होता.

इतर ग्रहाचा या तिन्ही देवताचा काहीही संबंध नाही. निर्मितीच्या वेळी ब्रह्मा त्याच्या जागेवर अर्थात वर सांगितल्याप्रमाणे स्वर्गात होता व आताही तेथेच आहे.

खरेतर ही विधाने सर्व प्रश्न मिटवण्यासाठी आहेत. त्यामुळे पुराणातल्या असल्या तथाकथित गप्पांना 'माहिती' म्हणता येत नाही तर आपल्या इतिहासाचा अमुल्य ठेवा म्हणावा लागेल.

स्पष्ट करा

हा त्रिलोकी राज्य करणारा देव नेमका कुठे राहतो? तो कसा आहे? तो आहे हे कशावरून? स्वर्ग आणि पाताळ नेमके कुठे आहेत? तो ब्रह्मा-विष्णू-महेशाकडे कारभार स्वाधीन करतो म्हणजे त्याने एकदाच तो कारभार स्वाधीन केला की सतत करत असतो? त्याने ब्रह्मा-विष्णू-महेशाची निर्मिती कशापासून केली? हे तिघे सजीव आहेत का? असतील तर त्यांनाच पहिले सजीव म्हणता येईल का? त्या तिघांतील पहिला सजीव नेमका कोण? त्यांना नेमके कोणत्या ठिकाणी देवाने निर्माण केले?

___________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

हम्म

१. अजातवाद
२. युगपात सृष्टी
३. क्रमसृष्टी

वैदिक साहित्यात अशा तीन पद्धतीने (उतरत्या भाजणीने) विश्वोत्पत्तीचा खुलासा आलेला आहे असे वाचनात आले होते त्याची आठवण झाली.

(क्रमसृष्टीबद्दल कोम्बडी आधी की अण्डे आधी या धाटणीचे प्रश्न पडतात. त्यान्चे तर्कसन्गत उत्तर देणे अशक्य आहे हे प्रश्नातच दडलेले असते. युगपात सृष्टी आणि अजातवादाच्या दृष्टीने असले प्रश्नच निरर्थक ठरतात.)

कोणाचा ब्रह्म्या?

नेमका कोणाचा ब्रह्म्या? माया लोकांच्या कोणा ब्रह्म्याने पृथ्वीचा शेवट २३ डिसेंबर २०१२ हा जगाचा शेवट असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी सुमारे १ वर्ष शिल्लक राहिल्याने कलियुग वगैरे एका वर्षात संपण्याची शक्यताही दिसते.

अरे नवीन देवा..

यांना आवरा... एक तर "इतिहासाचा अमूल्य ठेवा" ते असा कसाही उधळत आहेत.. वरून नवीन शोध आणि नवीन गोंधळ यांची निर्मिती पण..

ते वर्षे आणि युगे बाजूला ठेवू जरा..

आजपर्यंत जे 'देव' (ब्रम्हा विष्णू महेश) म्हणून ऐकून होतो त्यांच्यावरती यांनी आता अजून एक देव आणून बसवला आहे.. आणि ही त्यांची मुले.. म्हणजे त्या नात्याने मोझेस, येशू, पैगंबर आता त्रिदेवांचे भाऊ म्हणायला हवेत...(की चुलत भाऊ ? तुम्हीच सांगा.. म्हणजे तिथे आणखी असायचे..) मग आता मोठ्ठेच confusion की हो..!! आता या नव्या भावंडाची पण देवळे बांधायची का ? मग ती हिंदू पद्धतीने की त्यांच्या त्यांच्या नावाने तयार झालेल्या धर्मानुसार ? बरे हे सगळे स्वर्गात तर मग त्यांचे वडील (की माता?) ही नवी देवता ती कुठे? मग तिचे नाव काय.. आमचे सगळे लोक मुलांची पूजा करतात तर मग त्यांच्या वडिलांची भक्ती कोण करते की कोणीच करीत नाही.. (ते जास्त powerfull असणार ना !).. बरेय मग देवपद हे अनुवांशिक आहे काय ? म्हणजे बघा ही नवीन देवता, त्यांचा मुलगा शिव, मग त्यांचा मुलगा गणेश.. हे सगळे देव की आणि कोण ? मग शिव 'महादेव' कसा ? ... वगैरे वगैरे वगैरे

यांना सविनय विनंती.. इथे तरी यांना "आवरा..."

ता. क. : बाकी प्रतिसादात मात्र झ्याक माहिती मिळाली.. सभ्यपणे २७ माहितीपूर्ण प्रतिसाद..!! उपक्रमींचा मी फ्यान आहे ते काय उगीच... :)

एकदम बरोबर

<आज एकही कालगणना चंद्र, सुर्य, प्रुथ्वी या तिन्हीचा मेळ बसविणारी नाही. आपण सर्व जण किती मुर्खासारखे वेडे आहोत हे सर्वाना कळलेच असेल. वेळीच यावर विचार करुन काही पावले उचलली पाहीजेत तरच आपण वाचू नाहीतर परत एकदा महाभारता सारखा वाद निर्माण होऊन कलीयुग संपण्या अगोदर प्रुथ्वीवरील सर्व नष्ठ् होऊन मुळ बीज पण राहणार नाही.>

समतानंद, तुमचं बोलणं एकदम दुरुस्त आहे आणि आपण अगदी मूर्खासारखे वेडे आहोत. लवकरच काहीतरी पावलं उचलायला हवीत नाहीतर सगळी पृथ्वीवरील सृष्टीच नष्ट होणार असं मलाहि जाणवतय्.

प्रॉब्लेम असा आहे की चंद्र, सूर्य आणि पृथ्वी ह्यांचा मेळ बसवणारी कालगणना करून देण्यासाठी काही करावं म्हटलं तर हेच तिघं साले मधे टांग अडवतायत. आता पहा ना, चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ, पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ आणि तिचाच स्वतःभोवती फिरण्याचा काळ ह्यांच्यामध्ये काहीच सुसूत्रता नाही. त्यांना काही शिस्त लावून कोठल्यातरी सोप्या प्रमाणात आणता आलं - म्हणजे उदा. पृथ्वीनं स्वतःभोवती तीस गिरक्या घेतल्या की चंद्राची पृथ्वीभोवती एक्झॅक्ट एक गिरकी झाली, पृथ्वीनं स्वतःभोवती तीनशेसाठ गिरक्या घेतल्या की तिची सूर्याभोवती एक्झॅक्ट एक गिरकी झाली असं सोपं गणित असतं तर चांगली सोपी कालगणनाहि करता आली असती. त्यातच मधे तो कोण उपटसुंभ कोपर्निकस निघाला. तो म्हणतो की पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरत नाही तर लंबवर्तुळात फिरते. आता ह्याला काय करावं?

माझी एक सूचना आहे. आपण सगळे ह्या कामाला लागू या. तुमच्यापासूनच सुरुवात करू. तुम्ही ह्या चंद्र, पृथ्वी वगैरे नाठाळांना शिस्तीत आणा. त्यांना सांगा की ही बेशिस्त बास् झाली. शिस्त कशी हवी ते वर लिहिलंच आहे. ते एकदा काम तुम्ही फत्ते केलं की तुम्हाला हवी तशी एकदम सोप्पी कालगणना तैय्यार करणं आपल्याकडं लागलं.

मग काय, करताय् सुरुवात? समर्थांनी सांगूनच ठेवलय् 'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे' आणि 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे'.

चंद्र, सूर्य आणि पृथ्वी ह्यांचा मेळ बसवणारी कालगणना...

चंद्र, सूर्य आणि पृथ्वी ह्यांचा मेळ बसवणारी कालगणना तुमची साथ असेल तर माझी तयारी आहे. पण त्याआधी युगाब्ध कालगणनेत वर्ष, महीना, दिवस यांची रचना कशी आहे? कोणाला काही माहीती असेल तर ती शेअर करावी.

माझे मत

माझ्या समजानुसार वर्शाची कालगणना १२ महिन्यांची, महिन्याचे दिवस ३१-३०-२९/२८ अशी जशी चालू आहे तशीच असू द्यावी. फक्त आठवड्याची सुट्टी हि अमवास्या, अश्टमी, पोर्णिमा, अश्टमी या चंद्राच्या फिरण्यानुसार दिली गेली पाहिजे. सद्या सप्ताहाची सुट्टी हि ख्रिस्ती धर्मातील भावना ज्या काळात् आकारात आल्या होत्या त्या काळातील ग्रहतार्‍यांच्या समजानुसार बेतलेल्या आहेत तेवढे बदलले जायला हवे.

पोर्णीमा, अमावास्या ह्या दिवशी चंद्राचा मानवी मनावर जो परिणाम होतो तो आठवड्यची सुट्टी दिल्याने नागरीकांना घरात बसून आराम करून तो परीणाम कमी करता येऊ शकेल, जेणेकरून सामाजिक स्वास्थ सुधरले जावू शकेल.

आपल्या कडील माहिती इतरांना कशी द्यायची? वाचकांकडून माहिती कशी मिळवायची? ह्या बाबतीत चे आडाखे साफ चूकल्यामुळे चर्चेचा प्रस्ताव व्यवस्थित मांडता आलेला नाही.

चर्चेचा प्रस्ताव..

नवीन कालगणनेत आठवड्याची सुट्टी हि अमवास्या, अश्टमी, पोर्णिमा, अश्टमी या चंद्राच्या फिरण्यानुसार दिली गेली पाहिजे. पोर्णीमा, अमावास्या ह्या दिवशी चंद्राचा मानवी मनावर जो परिणाम होतो तो आठवड्यची सुट्टी दिल्याने नागरीकांना घरात बसून आराम करून तो परीणाम कमी करता येऊ शकेल, जेणेकरून सामाजिक स्वास्थ सुधरले जावू शकेल. रावले साहेब तुमची सुचना मान्य झाली आहे. मला कालगणना व देव या दोन विषयावर चर्चा हवी होती, तुम्ही हाच प्रस्ताव कसा मांडला असता? इतरांना प्रतिसाद देणेही बाकी आहे. वेळेअभावी प्रतिसाद उशिरा मिळत आहे, समजून घ्यावे.

प्रस्तावाची चर्चा...

समतादर्शन,

तुम्ही येथे एखादी व्यक्ती म्हणू लिहीत आहात कि कोण्या एका संघटनेचे प्रतिनिधी म्हणून लिहीत आहात? तुमच्या वरील प्रतिसादातील हे वाक्य -'तुमची सुचना मान्य झाली आहे.' त्यातील वेगळी वाक्यरचना तुम्ही कोणासाठी तरी काम करता व त्यांना तुम्ही मी येथे मांडलेले मत कळवले व ते त्यांनी मान्य केले, असेच नेमके झाले आहे कां?

मला कालगणना व देव या दोन विषयावर चर्चा हवी होती'
असे तुम्ही म्हणता, पण तुम्हाला चर्चा हवी आहे कि माहिती हवी आहे? कारण वरील एका प्रतिसादात तुम्ही म्हणताहात - 'महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू झाले तेव्हा युधिष्ठीरने युगाब्ध नावाची कालगणना सुरु केली त्यात तेव्हा व आज जे डबल प्राब्लेम आहेत त्यावर उपाय आहेत. कोणाकडे युगाब्ध मधील महीने, वार व दिवस यावर काही माहीती असल्यास चर्चा सोपी होईल.'
तुम्हाला नेमके काय हवे आहे? ह्यातील धुसरता आधी स्पश्ट व्हायला हवी.
आपल्याला नेमके काय हवे आहे हे स्पश्ट झाले कि मग आपण लेख लिहू शकतो, प्रस्ताव ठेवू शकतो.

'माहिती हवी आहे' व 'अमुक एक कालगणना आज अस्तित्वात यायला हवी' हे दोन वेगवेगळे विशय आहेत. माहिती हवी असेल तर ती थेट मागायला हवी, इतर कोणताही फाफट पसारा न लिहीता.

'अमुक एक कालगणना आज अस्तित्वात यायला हवी.' असे जर सांगणे असेल तर त्यातून तुम्हाला स्वत: जवळची माहिती अनेक लेखांमधून हळू-हळू वाचकांपुढे सादर करायला हवी. तसे केल्यानंतर वाचक देखिल त्या कल्पनेत 'व्यवहारात आणण्याजोगे घटक' आहेत कां ते समजून घेऊ शकतील.

तुम्ही हाच प्रस्ताव कसा मांडला असता?

हा थेट विचारलेला प्रश्न तुम्हीच वर व्यक्त केलेल्या चर्चेच्या हेतू विपरीत असून
जर.... 'प्रतिसादाला प्रतिसाद' म्हणून विचारलेला असेल,
तर....
- अशा तोंडाला-तोंड देणार्‍या प्रश्नाकडे दुर्लक्श करणे क्रमप्राप्त ठरते. मी तुमची थट्टा केलेली नव्हती. पहिल्या वेळी चर्चा प्रस्ताव/ लेख लिहीला कि असे होतेच. ते नैसर्गिक आहे. माझे देखील सुरवातीला असेच झाले होते.

जर...प्रश्न गंभीरपणे विचारला गेला असेल,

तर....

- प्रत्येक व्यक्तीची मानसिकता वेगवेगळी असते. कधी-कधी परिस्थिती भिन्न-भिन्न असते. त्या-त्या परिस्थितीत त्या-त्या मानसिकतेने लेख लिहीले जातात, चर्चा प्रस्ताव ठेवले जातात. माहिती मिळवणे वा देणे त्या त्या मानसिकतेने घडत असते, त्या त्या परीस्थितीनुसार घडत असते. जे मला योग्य आहे ते तुम्हाला योग्य असेलच असे नाही. तसेच जे मी तुम्हाला सांगेन ते तुम्हाला पटेलच असेही नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचे थेट उत्तर देता येत नाही.

==================
मान उचलूनी द्यावे
मान वाकवूनी घ्यावे

उपक्रमावर

इतका करमणूकप्रधान प्रकार इथे कधी घडून गेला असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.

कालगणनेबद्दलचे सेन्सिबल प्रतिसाद वगळता या श्री. समतादर्शन यांना संकेतस्थळांच्या 'मॅनर्स् अन एटिकेट्स्'नसलेल्या ठिकाणी भेटण्याची जाम इच्छा होते आहे. एकतर करमणूक केल्याबद्दल धन्यवाद देण्याची इच्छा आहे, अन् तितकीच ... जाऊद्या. आणिक काय करायची इच्छा आहे ते टंकणे 'मॅनर्स् अन एटिकेट्स्' मध्ये बसत नाही.

मा. समतादर्शन् यांच्याइतके विनोदी व्यक्तिमत्व कधी सुशिक्षित होऊन, कॉम्प्यूटरचा वापर करणे शिकून, तेही मराठी, वरून उपक्रमासारख्या ठिकाणी असल्या चर्चांचा 'पो' टाकू शकेल, अन त्यावर येथील दिग्गज उत्तरे देतील असे स्वप्नातही वाटले नव्हते, इतकेच म्हणू इच्छीतो... (तो दुर्योधन जास्त दानी असला एक विनोदी धागाही अत्ताच वाचला. तेव्हापासून माझी आजपासूनची पुढची वंशावळ लिहायला घेतली आहे..;))

("तसल्या" ठिकाणी भेटीच्या प्रतिक्षेत कालगणना करणारा) आडकित्ता.

खुप मोठ्ठी चर्चा आहे...

सर्व सभासदाचे आभार.. कालगणना ही खुप मोठ्ठी चर्चा आहे... वेळेआभावी मी तुर्त जास्त चर्चा करु शकत नाही, एवढेच सांगता येईल की, मी 'समता गणपती सेवाभावी संस्था' साठी काम करत आहे व जगातल्या सर्व कालगणना चुकीच्या आहेत. वेळ मिळाला की सर्वांच्या सर्व प्रश्नांची ऊत्तरे देईल.

कालगणना

नवीन कालगणना तयार झाली आहे..

बरं मग?

कधी वापरायला घ्यायची म्हणता? आमचे कम्प्युटर पण जरा सेट करून द्या या कालगणनेशी. म्हणजे सर्व कसं सुरळीत होईल.

 
^ वर