काश्मीरबाबत एक शंका

माझा एक मित्र आहे. त्याला भारताचा काश्मीरवरचा हक्क मान्य नाही. त्याला देशद्रोही म्हणावे का?

लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.
लिखाणात कमीतकमी 25 शब्द हवेत.

लेखनविषय: दुवे:

Comments

इतरत्र

या संदर्भात एक चांगली चर्चा इथे सुरू आहे. उपक्रमींना आधीही 'ऐसीअक्षरे'वर आग्रहाचं निमंत्रण दिलेलं होतंच; पुन्हा एकदा देते. या २५ शब्दांपेक्षाही लहान जीव असणार्‍या चर्चेच्या तुलनेत अतिशय विस्तृत चर्चा आणि मत-मतांतरं तिथे आहेत.

सहमत आहे

अदितीशी सहमत आहे. ऐसीवर चर्चा सुरू आहे त्यात सदस्य यांना भाग घेता येईल किंवा समांतर चर्चा उपक्रमावर सुरू करायची असल्यास विषय व्यवस्थित मांडून ती करता येईल.

आणखी

उपक्रमावर सुरू करायची असल्यास विषय व्यवस्थित मांडून ती करता येईल.

सहमत. देशद्रोहाची व्याख्या काय, कायदेशीर व्याख्या कितपत मानायला हवी, एखाद्या भूभागाला ताकदीच्या बळावर जखडून ठेवणे कितपत योग्य आहे वगैरे मुद्दे असायला हवे होते असे वाटले. ह्या मुद्द्यांवरही इथे/आता चर्चा झाल्यास उत्तमच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

Patriotism is the last refuge of a scoundrel.


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

काश्मिर

Correction
पोलिटिक्स हा मुळ वाक्यातला शब्द बदलला आहे.
बहुधा हे वाक्य जी के चेस्टरटन या ब्रिटिश लेखाचे आहे.

जॉन्सनबाबांचे वाक्य आहे

पेट्रियटिज़्‌म इज़ द लास्ट रेफ्यूज ऑफ द स्काउंड्रल हे जॉन्सनबाबांचे वाक्य आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असहमत

पो * टाकुनच चर्चा सुरु केली पाहिजे असे काही नाही. तुम्हाला ही चर्चा निरर्थक वाटत असल्यास भाग न घेण्याचे किंवा इतर जाहिराती लावण्याचे स्वातंत्र्य आहेच की.

*आरा ह्यांच्यासाठी : जाड जुड प्रतिसाद अथवा प्रस्ताव ह्याला जालिय लिंगोमधे पो म्हणतात. सहसा असे लेखन आतुन् पोकळ असते.

निदान बेसिक माहिती

शीटांच्या टिचभर तुकड्याएवढी चर्चा टाकताना मित्र भारतीय आहे का अभारतीय याचा उल्लेख चर्चेला पो बनवणार नाही, नाही का?

(बाकी विश्वात बहुतेकशा गोष्टींच्या दुय्यम पातळीवरच्या बिल्डींग ब्लॉक, अणूंमधेच, एवढी पोकळी आहे की इतर गोष्टी पोकळ असल्याबद्दल फार आश्चर्य वाटू नये.)

असो. सदर महत्त्वपूर्ण चर्चेला मी निरर्थक म्हटलेलं नाही; तुमची मतं असतील तर माझी हरकत नाही, पण माझ्यावर ती लादू नयेत किंवा माझ्या तोंडी ती घालू नयेत.

देशद्रोही म्हणू नये

माझा एक मित्र आहे. त्याला भारताचा काश्मीरवरचा हक्क मान्य नाही. त्याला देशद्रोही म्हणावे का?

माझ्यामते देशद्रोही म्हणू नये. अरुंधती रॉय ही देशद्रोही नाही. देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या निरागसांकडे दुर्लक्ष करावे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

माझ्यामते देशद्रोही म्हणू नये. अरुंधती रॉय ही देशद्रोही नाही. देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या निरागसांकडे दुर्लक्ष करावे.

धन्यवाद.

देशद्रोह आणि निरागसता

देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या निरागसांकडे दुर्लक्ष करावे.

एक गंभीर चर्चा पटलावर घेणार्‍या, आणि देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित करणार्‍या श्री सदस्य यांना निरागस म्हणणे अनुचित वाटते.

गोंधळ नको

गोंधळ नको.

श्री. सदस्य यांच्याविषयी ही चर्चा नसून काश्मीरबाबत सरकारी धोरणापेक्षा वेगळे मत व्यक्त केल्यास त्यास सहेतुक देशद्रोही म्हणणाऱ्यांबाबत आहे. श्री. धम्मकलाडू यांनी अशा संधीसाधू देशभक्तांना निरागस म्हटले आहे हे कोणालाही सहज समजते.

बरर

माझा एक मित्र आहे. त्याला भारताचा काश्मीरवरचा हक्क मान्य नाही. त्याला देशद्रोही म्हणावे का?

बरर नाही म्हणणार देशद्रोही त्याला.

अवांतर.

संपादनाचा निषेध पण संपादित??? :) :)

@संपादन मंडळाला विनंती - २ प्रतिसाद उडविण्याचे कृपया कारण सांगावे.

--कारण द्या की राव! बर खरडवहित द्या..निदान व्यनिने द्या.

निषेध अवांतर वाटत असेल तर लेखाला प्रतिसाद दिला आहे.

केवळ शेलक्या विशेषणांच्या देवाणघेवाणीसाठी किंवा वैयक्तिक टिप्पणीसाठी व्य. नि. किंवा खरडवही ह्या सुविधांचा वापर करावा. --संपादक मंडळ

सहमत आणि धन्यवाद

>>केवळ शेलक्या विशेषणांच्या देवाणघेवाणीसाठी किंवा वैयक्तिक टिप्पणीसाठी व्य. नि. किंवा खरडवही ह्या सुविधांचा वापर करावा. --संपादक मंडळ

सहमत आणि धन्यवाद, निदान काय म्हणायचे होते हे तरी पोचले. पुढच्या वेळेस ऑस्कर वाइल्डची वगैरे मदत घ्यावी लागेल.

देशद्रोही का अज्ञानी

आपला मित्र देशद्रोही नसून अज्ञानी आहे एवढेच मी म्हणेन. माझा कोणीही मित्र इतका अज्ञानी नाही याचा मला सार्थ आनंद आहे.
चन्द्रशेखर

नेमके विधान

"अल्ला आहे" हे विधान सत्य मानणारे सरकार "अल्ला नाही" या विधानाला दंडार्ह मानते. तद्वतच, "काश्मीर भारताचा भाग आहे" हे विधान सरकारला सत्य वाटते. देशद्रोहाशी संबध असो वा नसो, असत्य विधानार्थी विधान दंडार्ह व्हावे.
उलट, "काश्मीर भारताचा भाग आहे परंतु तो अन्याय आहे, काश्मीर भारताचा भाग राहू नये" असे विध्यर्थी विधान करण्याची मोकळीक मिळावी असे मला वाटते.
ज्याप्रमाणे खोट्या जाहिराती करणे दंडार्ह असते त्याचप्रमाणे 'खोटे' नकाशे छापणे हाही गुन्हाच ठरावा. भारत सरकार 'मानते' की काश्मीर भारताचा भाग आहे, त्यामुळे, भारतात सध्यातरी तेच 'सत्य' म्हणावे लागेल. त्याला देशद्रोह म्हणता येईल असे मला वाटते.

पटण्याजोगे

भारतीय दंडविधान किंवा सरकार जे खरे मानते त्या विरुद्ध बोलणे किंवा प्रचार करणे कायद्याने गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा विरोधी विधाने करताना शक्य तेवढी काळजी घ्यावी.

पण मग,

"अल्ला आहे" हे विधान सत्य मानणारे सरकार "अल्ला नाही" या विधानाला दंडार्ह मानते

सरकार देवही मानते असे वाटते. "देव नाही" असे विधान सरकारविरोधी तर नव्हे. ;-)

दंडार्ह

सरकार देवही मानते असे वाटते. "देव नाही" असे विधान सरकारविरोधी तर नव्हे.

देव म्हणजेच अल्ला. त्यामुळे अल्ला आहे हे विधान सत्य मानणारे सरकार देव नाही हे विधान दंडार्ह मानणार.

यूएस सारख्या देशांच्या घटनेत देवाचा उल्लेख नाही त्यामुळे 'देव नाही' हे विधान दंडार्ह मानत नसावेत. अनेक अमेरिकन नागरीक (तेव्हाचे आणि आजचे) देवभोळे असले तरी घटनेने देव/धर्म ह्यापासुन सरकारला दूर ठेवले आहे. सध्याचे अध्यक्ष ओबामा ह्यांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या भाषणात सर्व निरीश्वरवाद्यांनाही शुभेच्छा दिल्याचे स्मरते.

इन गॉड वी ट्र्स्ट

हा अमेरिकेचा मोटो नव्हे का? मग ते देव नाही हे विधान दंडार्ह नाही पण आक्षेपार्ह मानणार नाही हे कशावरून?

मोटो

हा मोटो विवादास्पद आहे. सरकार ज्या घटनेनुसार चालते त्या घटनेशी तो सुसंगत नाही. सुप्रिम कोर्टात त्याविरुद्ध केसही झाली होती. सुप्रिम कोर्टाने हरकत नाकारली असली तरी घोषवाक्ये आणि घटना ह्यांचा काहीही संबंध नाही हे कारण देतच.

ज्या देशात सरकार अल्ला मानते त्या देशांचा हे निव्वळ घोषवाक्य नसून त्यांच्या घटनेत तशी तरतुद असली पाहिजे असा माझा समज आहे. अन्यथा सरकार अल्ला मानते ह्याला फारसा अर्थ नाही.

देशद्रोह की राजद्रोह?

कुठल्याही व्यवस्थेत दंडार्ह् असलेले विधान "राजद्रोह" नक्कीच ठरते. आजचा "राजद्रोह" आजचे सरकार "देशद्रोह्" ठरवते व पुढील काळात तोच "राजद्रोह" किंवा "असंतोसहचे जनन" हे "देशप्रेम" ठरते.
आज चेचेन्या वेगळा मागणारी मंडळी रशियन् व्यवस्थेत "द्रोही/विद्रोही/राजद्रोही " आहेत. रशियन सरकार त्यांना "देशद्रोही" म्हणते. पण न जाणो इंदोनेशियामधून ईस्ट तिमोर नावाचा प्रांत "नवीन देश" म्हणून काढला तसेच चेचेन्याचे झाले तर आजचे "राजद्रोही " उद्याही "राजद्रोही"च राहतील्, पण् "देशद्रोही" नाही.

शिवबा नावाच्या भोसल्यांच्या चिरंजीवाने अल्पवयातच आदिलशाहाची सत्ता झुगारली, नाकरली, तो तेव्हा आदिलशाही सत्तेसाठी "राजद्रोह" टह्रलाही असेल पण् आज काही तो "देशद्रोह" मानला जात नाही.

अजून एक् उदाहरण म्हणजे दुसर्‍या महायुद्धात प्रत्यक्ष जपानी सत्ताप्रमुख जनरल टोजो ह्याने एका लष्करी अधिकार्‍यास अमेरिकेच्या "पर्ल हार्बर"वर हल्ले चढवण्याची आज्ञा देताच तो उद्रगरला "we'll surely win this battle but lose the war with America" . घटना खरेच घ्डली असे मानले तर त्या लश्करी अधिकार्‍याने पर्ल हार्बरवर हल्ला करून राज्ञिष्ठा सिद्ध केली पण देशद्रोह केला.(देशास् निश्चित् हानीकारक ठरणारे कृत्य्)

illegal असेल ते immoral असेलच असे नाही. राजद्रोह असेल् तो देशद्रोह असेलच असे नाही. किंवा ह्याच्या उलट.

प्रस्थापित सत्ता देशद्रोही असेल तर राजद्रोह हेच देशप्रेम ठरते, दंडार्ह असले तरी. ती स्वातंत्र्याची किंमत असते.freedom is not free

सांगायचा मुद्दा इतकाच की दंडार्ह् विधान "राज्द्रोह" असते. देशद्रोह आहे की नाही हे काळच ठरवेल किंवा ज्याची त्याची आतली प्रामाणिक साद ठरवेल.
उपक्रमावर नवीनच असताना रोमन अंकांऐवजी(1,2,3...) मराठी आकडे(१,२,३...) वापरा असे फक्त म्हटल्यामुळे एका सदस्येने थेट मला "देशद्रोही " म्हटले होते,व 1,2,3 ह्या अकड्याचे समर्थन केले होते, त्याची आठवण झाली.

--मनोबा

 
^ वर