विज्ञान
आंतरिक शक्तीचा शोध-१
७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला.
"स्वप्रयत्नांनी घडलेला प्राणी : माणूस" - लेखक रावसाहेब कसबे
सध्या उपरोल्लेखित शीर्षकाचा एक निबंध वाचत होतो. जवळजवळ शंभर पानांचा आहे. उपक्रमींना याबद्दल थोडे सांगावे आणि मुख्य म्हणजे मनात आलेले प्रश्न मांडावेत असा हेतू आहे.
चला डोके लावूया...
९०च्या दशकात अमेरिकेत हा प्रयोग करण्यात आला होता.
सापेक्षतावाद
सापेक्षिकतावाद (theory of relativity) हा सिद्धांत बर्याचदा समजल्यासारखा वाटतो पण कुणी त्यावर एखादा प्रश्न विचारला की "जैसे थे" ची स्थिती निर्माण होते आणि मग जाळ्यावर उत्तराची शोधाशोध सुरु होते आणि सोप्या शब्दात कळेल असे उत्तर कोठेच मिळत न
प्रतिकर्षित करणारे गुरुत्व नसते काय?
गुरुत्वाकर्षण बल हे आकर्षणात्मक असते.
उदाहरणार्थ: विद्युत बलाशी गुरुत्वाकर्षण बलाची तुलना केली तर असे आढळते की विद्युत बल हे आकर्षित तसेच प्रतिकर्षितही करते. दोन विरुद्ध प्रभारांमध्ये आकर्षण तर दोन सारख्या प्रभारांमध्ये प्रतिकर्षण असते. यावरून हे स्पष्ट आहे की विद्युत प्रभार एकमेकांचा प्रभाव रद्द किंवा नष्ट शकतात. विद्युत बलाच्या ह्या परस्परविरोधी गुणधर्मांचा वापर करून विद्युत बलरहित क्षेत्राची निर्मिती करणे शक्य असते. विद्युत बलापासून स्वतःचा बचाव करणे त्यामुळे शक्य होते. अशाच प्रकारे चुंबकीय बलाशीदेखील गुरुत्वाकर्षणाची तुलना केली असता—चुंबकांचे विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे असतील तर त्यांच्यात आकर्षण उद्भवते पण सारखे ध्रुव एकमेकांकडे असल्यास प्रतिकर्षण उद्भवते.
गुरुत्वाकर्षणाचं मात्र असं नाही. हे बल वरील उदाहरणांतील बलांपेक्षा वेगळे आहे. गुरुत्वाचा प्रभाव सर्वत्र असतो, अन् तो सारखाच असतो. त्यापासून बचाव करणं अशक्य वाटते. यावरून, प्रतिकर्षित करणारे गुरुत्वीय बलच अस्तित्वात नसते काय? त्याचे कारण काय, जर असे नसेल तर असे प्रतिकर्षण गुरुत्वीय बल लावणे शक्य होईल का?
कर्करोगावर आयुर्वेदीय उपचार आहे का?
स्वादुपिंडाच्या कर्करोगावर यशस्वी आयुर्वेदीय उपचार होणं शक्य आहे का?
भारतीय एकस्व कायद्याची ओळख: भाग १
सध्या आपल्या आसपास एकस्व (पेटंट) ह्या विषयाबाबत अनेक चुकीच्या समजुती प्रचलित झाल्याचे दिसते.
धर्म की विज्ञान: या द्वंद्वयुद्धाचा बळी (उत्तरार्ध)
पास्कलची प्रतिभा केवळ गणितातील नव्या नव्या सिद्धांतापुरतीच मर्यादित नव्हती.
धर्म की विज्ञान:या द्वंद्वयुद्धाचा बळी (पूर्वार्ध)
रॉजर बेकन (1220-1292), कोपर्निकस (1473 - 1543), गॅलिलियो (1564-1642), केप्लर (1571-1630) इत्यादी वैज्ञानिकांनी व त
रंग - आणखी शिल्लकची माहिती!
माझ्या [आकाश निळे का दिसते?] या प्रश्नाच्या उत्तराची समीक्षा करत असताना काही उपक्रमींना मुळात [रंग म्हणजे काय?] असा अतिशय अवघड प्रश्न पडला. या दोन्हींवर चर्चा चालू असताना मी दोन्ही लेखांशी सांधर्म्य असलेल्या या लेखाचे या दोन्ही चर्चांमध्ये विषयांतर होणार नाही, आणि यावरील होणारी चर्चादेखील या चर्चांच्या समांतर राहील या शुद्ध हेतूने प्रकाशन करीत आहे.
» उपग्रहांद्वारे मिळणारी छायाचित्रे एवढी निराळी का दिसतात?
आपण डोळ्यांद्वारे बघू शकतो त्यापेक्षा वेगळ्याच रंगांची वा रंगछटा असलेली उपग्रहांद्वारे आणि इतर दुर्बिणींद्वारे मिळणारी बरीच चित्रे आपण बघतो. प्रश्न असा आहे, उपग्रहांद्वारे मिळणारी छायाचित्रे एवढी निराळी का दिसतात?
खालील दोन्ही चित्रे अगदी एकाच ठिकाणची आहेत. चित्रांमध्ये अटलांटिक महासागराला खेटून असलेला चेसऽपीक उपसागर आणि बॉल्टिमोर शहर दिसत आहे. डावीकडील "ट्रु (खरे) कलर" चित्र आहे तर उजवीकडील "फॉल्स (भ्रामक) कलर" चित्र आहे; अशा भ्रामक रंग असलेल्या चित्रांचा खरा रंग असलेल्या चित्रांपेक्षा किती महत्वपूर्ण उपयोग होतो, आणि हे रंग लाल, निळा, पांढरा आणि काही ठिकाणी काळा, असे का नेमलेले आहेत?