उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
चला डोके लावूया...
डार्क मॅटर
December 23, 2010 - 9:42 pm
९०च्या दशकात अमेरिकेत हा प्रयोग करण्यात आला होता.
आज रस्त्यावर दिसणार्या गाड्या पाहिल्या तर अर्थातच हा प्रयोग असफल झाल्याचे दिसून येईल.
हा प्रयोग असफल होण्यामागे काय कारणे असतील? चित्रफितीतील संकल्पना व्यवहार्य करण्यासाठी काय करता येइल?
दुवे:
Comments
गमतीदार
गमतीदार कल्पना आहे.
काही "मिनिव्हॅन" प्रकारच्या गाड्यांची मागची दारे रुळांवर (बहुधा) मागे सरतात. या मर्यादित उदाहरणात नेहमीच्या बिजागरीपेक्षा वेगळे तत्त्व वापरलेले दार यशस्वी झाले आहे. (ही दारे वेगळ्या प्रकारच्या बिजागिरीनेच उघड झाप करत असतील तर माहीत नाही.)
मिनिव्हॅनमध्ये पुढचे दार मात्र नेहमीसारख्या बिजागिरीचे असते.
गंमतीदार
माझ्याही मनात अगदी धनंजयसारखेच विचार आले. माझ्या मिनीव्हॅनचे मागचे दार रुळावरून मागे सरकते. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. या सरकण्याच्या प्रकारात काळजी घेतली नाही तर गाडीच्या इतर अंगाला इजा पोहोचण्याचा धोका असतो. अर्थातच, हा धोका आता टाळण्यात आला आहे. रुळावरून मागे सरकताना जर काही अडथळा असेल (उदा. गॅसटँकचे झाकण उघडे आहे) तर दरवाजा सरकायचा थांबतो आणि बीप येतो.
याचप्रकारे वरील डिझाईनमध्ये असे दिसले की गाडीचा दरवाजा गाडीच्या तळात सामावला जाताना आधी काच खाली जाते नंतर दरवाजा खाली जातो. असे होताना -
१. काच खाली जाऊन दरवाजा उघडेपर्यंत अधिक वेळ लागणे.
२. तळाशी काही कचरा वगैरे अडकला तर दरवाज्यावर चरे येण्याचा संभव आहे.
३. सर्वात महत्त्वाचे असे की गरज नसताना मागचा आणि पुढचा असे दोन्ही दरवाजे खाली सरकतात. पावसात, स्नोमध्ये अशा गाड्या बाहेरच काढायला नकोत.बिजागिरीचे दरवाजे पावसात वगैरे आपण जपून उघडतो. हळूच आपले अंग बाहेर काढतो आणि दरवाजा बंद करतो. या सर्व प्रकारात गाडीच्या काचा नेहमी चढवलेल्याच असतात. :-)
बाकी, लॅम्बोर्गिनी (असाच उच्चार का?) दरवाजे मला फार आवडतात.
चाणक्य आहेत का? त्यांच्या आवडीचा विषय दिसतो.
चांगले मुद्दे
चित्रफितीत काही सेकंदात काच खाली जाऊन दरवाअज उघडतो. वरील चित्रातील लॅम्बोर्गीनीचे दरवाजे उघडायला तितकाच वेळ घेत असतील.
दार सामावुन घ्यायला एक कप्पा केला असावा. ज्यात दार सुरक्षित राहू शकते.
चांगला मुद्दा. स्नो मधे एकवेळ ठीक आहे, पण पावसाळ्यात नक्कीच अडचणीचे आहे.
बिजागिरीच्या दरवाजांच्या त्रास अनेकदा होतो (उदा. पार्किंग मधे दोन गाड्या जवळ असताना) तो टळला तर पावसाचा इनकन्विनियन्स चालून जाईल का?
काच खाली करणे
यांत्रिकीने काच खाली करायला काही सेकंदांचा वेळ नक्कीच लागत असेल किंबहुना तो किती सेकंदाचा असतो हे कोणत्याही लोडेड कारची परीक्षा घेऊन पाहता येईल. शक्य झाल्यास उद्या कळवते. लॅम्बोर्गीनीला बाजूला ठेवू, ती कार मी फक्त स्वप्नात पाहू शकते. :-( परंतु सुमारे इतकाच वेळ कारमध्ये चावी घालून लॉक करताना लागतो पण लोक रिमोट* पसंत करतात. :-) कारमधून बाहेर पडताना वगैरे काही सेकंदांचा वेळही महत्त्वाचा वाटू शकणे शक्य आहे. (उदा. एखादी नकोशी व्यक्ती मागे लागली आहे आणि आपण जीव घेऊन त्या कारमध्ये बसण्याच्या प्रयत्नांत आहोत आणि दरवाजे उघडताना आधी काच खाली येते, दरवाजा कप्प्यात जातो, आपण आत बसतो, दरवाजा वर येतो, नंतर काच वर येते - हा कालावधी मोठा वाटतो.)
पावसाळ्यात कधीकधी रस्त्यावर पाणी साचलेले असते, ते या कप्प्यात शिरले वगैरे तर कारला किंवा या सुविधेला काही धोका पोहोचू शकेल का?
पार्किंग लॉटमध्ये दरवाजे उघडणे हा मोठा गंभीर ते विनोदी प्रकार होऊ शकतो हे मान्य आहेच. (मुन्नाभाईची आठवण झाली.) परंतु वरचे डिझाईन फीजीबल वाटले नाही. :-(
* रिमोट वापरण्याची इतर कारणेही आहेत. जसे, चावीच्या भोकावर बर्फ साठलेला असणे वगैरे.
कारणे-अडचणी
दोन्ही दारे गाडीच्याखालील् बॉक्स मध्ये मावण्याकरता दोन्ही दारांची रुंदी कमी हवी (म्हणजे काचेची उंची जास्त् हवी) पण् काच् संपुर्णपणे दरवाज्यात् जाण्याकरता दरवाजाची उंची किमान् उंचीची हवीच्. ह्यामुळे दारे डिसाईन् करताना एक् अधिक रीस्ट्रीक्शन आले.
दोन्ही दरवाजे खाली जातात् म्हणजे फ्लोअरची उंची सामान्य कारच्या फ्लोअरपेक्षा जास्त् असावी लागेल्. व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे,डोअर् ड्राइव्हिंग् मेकॅनिजम् हे तळात असावे असे दिसते. एकुणच फ्लोअरची उंची वाढली म्हणजे कारची उंची वाढली. ठराविक् प्रकारच्या गाड्या, ह्या कमी उंचीच्या असतात्, त्याला ठराविक् वर्गात् मागणी असते तेथे गाड्या विकणे शक्य नाही.
मेकॅनिझम फेल्युअरवेळी मॅन्युअली दरवाजाची उघडझाप करता येणे जमेल का अशी शंका वाटते.(एकवेळ् दरवाजा तश्या प्रकारे ढकलता येईलही, पण् ऑटोमॅटीक दरवाजांमध्ये काच खाली करता येण्यासाठी मॅन्युअल काही सोय् नसते, त्याने नेहमीच्या मॉडेलमध्ये काही बिघडत नाही, पण् इथे काच उघडल्याशिवाय् दरवाजा उघडत नसल्याने-किंवा उघडणे प्रॅक्टीकल नसल्याने- मोठी अडचण आहे.
गाडीत चढताना आणि उतरताना दरवाजाचे सहाय्य घेता येते ती सोय् येथे नाही. हलता दरवाजा असल्याने सामान्य गाडीतील दरवाजावर् असणारे सर्व कंट्रोल्स ह्या प्रकारात डॅशबोर्डावर् हालवावे लागतील. दरवाजात सहसा पाण्याची बाटली वगैरे ठेवण्याची सोय् असते ती उरणार् नाही. सहसा गाडीतुन् एखाद्याला उतरायचे असेल्यास आख्ख्या गाडीचे दर्शन जगाला होणे अनेकांना आवडेल् असे वाटत् नाही. एकच सलग काच असल्याने पुढील् किंवा मागील् प्रवाशास् काच उघडी-बंद असण्याचे परस्पर विरोधी स्वातंत्र्य नाही, वगैरे किरकोळ कारणेही आली.
नक्की कुठल्या कारणाने असफल झाले सांगणे कठीण् आहे, पन् बहुदा कुठले तरी सेफ्टी रेग्युलेशन पास झाले नसावे असा अंदाज् वाटतो.
-Nile
अडचणी
प्रोटोटाइपमधे त्यावर मात केलेली दिसते.
काच फोडून बाहेर पडायचा पर्याय देता येईल. (ग्लवबॉक्स खाली आपतकालीन छोटीशी हतोडी वगैरे)
कूप प्रकारच्या गाड्यांना दोनच दरवाजे असतात. तिथे पुढील आणि मागिल प्रवाशांसाठी एकच खिडकी असते.
कूप
चित्रफितीत दाखवलेल्या काही गाड्या कूप नाहीत. त्यांना चार सीट्स आणि मागे ट्रंक आहे, यावरून त्या फुलसाईज गाड्या वाटतात. अशा गाड्यांत मागील प्रवाशांना वेगळी काच हवी असेल असेच वाटते. एकंदरीत काचेचे डिजाईन पटले नाही.
बाकी किरकोळ गोष्टी जसे कपहोल्डर वगैरे त्या आजही स्लाईडिंग डोर्सना नसतात. त्याऐवजी सीटला कपहोल्डर दिलेला असतो.
फुलसाईज गाड्या
होंडा अकोर्ड कूप सारखी गाडी ह्याच प्रकारात मोडते. त्यामधे चार सीट्स् ट्रंक आणि फुलसाईझ लांबी/रुंदी असते.
तुलना कोणाबरोबर करावी?
सदर प्रोटोटाईपमध्ये यशस्वी रित्या जमेल आहे. पण् हे डिसाईन् कंस्ट्रेंट आहे म्हणजे प्रत्येक गाडी बनवताना ही दारे लावायची म्हणजे गाडीच्या एअरोडायनॅमिक् डीसाईनमध्ये हा एक् कंस्ट्रेंट येणार्.
कूप् दोन जणांसाठीच् बनवलेली गाडी असते. (नावाला मागे दोन सिटं असली तरी, तरीही खाली न करता येणारी काच मागच्या दोन् सिटांना असते. समोरची मोठी काच फक्त पुढच्या सिटांसाठी असते.)
-Nile
अडचणी
असा मेकॅनिझम प्रचंड खर्चिक होईल. (बिजागरीच्या साध्या दरवाजाच्या मानाने). शिवाय तो बराच कॉम्प्लेक्स होईल. दरवाजा बंद झाल्यावर कारच्या प्रोफाईलला जुळण्यासाठी कारच्या ऍसेंब्लीच्यावेळी बरेच मॅन्युअल काम लागेल. त्यामुळेही खर्च वाढेल.
रिलाएबिलिटीचा मुद्दा वर आलाच आहे.
दरवाजा बर्यापैकी जड असतो. त्याला उचलायला लागणारी ऊर्जा शेवटी पेट्रोलमधूनच येणार आहे.
एकूण काहीतरी फॅन्सी करण्याच्या हौसेपेक्षा जास्त काही साध्य होणार नाही.
(बहुधा ग्राहकालाही नवलाई ओसरल्यावर वरच्या प्रतिसादकांनी सांगितलेल्या अडचणी जाणवतील).
नितिन थत्ते (माजी प्रॉडक्ट डिझाइन इंजिनिअर)
सहमत
>>(बहुधा ग्राहकालाही नवलाई ओसरल्यावर वरच्या प्रतिसादकांनी सांगितलेल्या अडचणी जाणवतील)
सहमत. तसेच गाडीच्या काचा कळ दाबून वर खाली करणे हि सुविधा देखील ह्याचप्रकारे आकर्षक वाटते, पण एका पाहीव किश्श्यामध्ये ही कळ बिघडली व काचा खाली होत्या व दुरुस्त होईपर्यंत चांगला २ दिवसाचा काळ गेला कारण गाडी गावी होती व दुरुस्ती तंत्रज्ञ उपलब्ध नव्हता, हे असे फार घडत नसावे पण मुद्दा असा कि जास्त तांत्रिक सोय असली कि जास्त गैरसोय होण्याची शक्यता अधिक असते.
असहमत.
हा मुद्दा इथे अवांतर आहे,पण् हे सेल्फ काँट्रॅडिक्शन आहे. तुम्ही सिद्ध करु शकलात् तर् वाचायला आवडेल्.
हाताने हँडल् फिरवुन् खालीवर् करायची काच असेल्, तर् हँडल् तुटल्यावर् काय् कराल्? थोडक्यात फेल सेफ नसल्यावर असे होणारच्, अधिक तांत्रिक म्हणजे अधिक् गैरसोय असे सरळसोट रिलेशन नाही.
-Nile
आता?
>>पण् हे सेल्फ काँट्रॅडिक्शन आहे. तुम्ही सिद्ध करु शकलात् तर् वाचायला आवडेल्
असे प्रकार जास्त घडत नसावेत पण असा प्रकार घडल्यास जास्त गैरसोय होऊ शकते हि शक्यता आहे.
>>हाताने हँडल् फिरवुन् खालीवर् करायची काच असेल्, तर् हँडल् तुटल्यावर् काय् कराल्?
हि एक यांत्रिक सुविधा आहे व मी वर म्हणल्याप्रमाणे गैरसोय होणारच, पण ऑटोमॅटीक(जास्त तांत्रिक) सुविधांचा जास्त त्रास होउ शकतो हा मुद्दा आहे.
सहमत
हँडल तुटण्यापेक्षा पाणी जमून, बॅटरी संपून इ. कारणांनी स्वयंचालित काचा, दरवाजे अडकण्याची शक्यता अधिक आहे. गाडीला लागलेल्या आगीत, किंवा २६ जुलैच्या पावसात, विद्युतजोडण्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे, दार/काच न उघडता न आल्याने, लोक गुदमरलेले आहेत.
यांत्रिक सोयीपेक्षा स्वयंचालित सोयीत अधिक दुवे आहेत त्यामुळे ते बिघडण्याची शक्यता सैद्धांतिक पातळीवरही अधिकच असावी.
असहमत
वरील् प्रकारचे दरवाजे मॅन्युअली उघडता येतातच. :-)
(इथे तुम्हाला उलटे म्हणायचे आहे असे गृहीत धरुन)
यांतिक पद्धतींची तितक्या प्रकारे चाचणी केल्याशिवाय् पद्धतीला मान्यता मिळत् नाही. तुमच्या वरील् न्यायाने विमानात् कारपेक्षा कित्येक अधिक दुवे आहेत्, पण् विमानाचे अपघात् कीती होतात्? तांत्रिक सुधारणा करताना ती मॅन्युअल पेक्षा चांगली नसेल तर तिला मान्यता देणारे खुळेच म्हणावे लागतील.
यांत्रिक पद्धतीने दार उघडले नाही असे मानले तरी मॅन्युअली दार उघडुन लोक् बाहेर् का पडले नाहीत्? लोक गुदमरण्याचे कारण् वेगळे आहे असे वाटते.
-Nile
त्रासही जास्त "होऊ" शकतो
जास्त यांत्रिक सुविधांचा फायदा आहे हे मान्यच आहे (गृहीत आहे) पण त्यांचा त्रासही जास्त "होऊ" शकतो हे देखील मान्यच आहे. ग्रील दरवाजा असलेले उद्वाहक ऑटोमॅटीक दरवाजे असलेल्या उद्वाहाकापेक्षा अधिक सोयीचे होऊ शकते म्हणून ऑटोमॅटीक दरवाजे असलेले उद्वाहक बनवणारे खुळे असा त्याचा अर्थ नाही.
चांगली चर्चा
दोन दारांमधील कॉलम का बाद केला असावा?
तळात जाण्यापेक्षा दार छपरावर गेलेले अधिक चांगले, नाही का?
डिसाईन
छपराचा आकार एअरोडायनॅमिक राहणार नाही.
-Nile
छप्पर
छपराचे क्षेत्रफळ चारही दारांना सामावून घेण्याइतके नाही.
सहमत
छपराच्या अडचणीशी सहमत.
तळाकडेही दोन्ही दारे एकदम उघडण्याची सोय आहे का हे चित्रफीत पाहून कळले नाही.
हे घ्या
आमच्या लाडक्या विकीवरून साभार.
पण बहुतेक डिजाइन्स फ्लॉप दिसतात.
अपघात
समजा अपघात होउन दाराचा शेप बिघडला तर दार उघडणार नाही ना?
पण म्हणुन कदाचित दुसर्या बाजूला नेहमीचे दार (बिजागरी) असेल काय? का दोन्ही बाजुला तशीच उघडणारी दारे?
हे कसं आहे?
उत्क्रांतीवादानुसार 'सक्सेसफुल' दरवाजा..