कर्करोगावर आयुर्वेदीय उपचार आहे का?

स्वादुपिंडाच्या कर्करोगावर यशस्वी आयुर्वेदीय उपचार होणं शक्य आहे का?
मुळात कर्करोगाच्या गाठीला शस्त्र लावले तर तो अधिक उफाळून नाही का येणार? आणि जर त्यावर कोणताही ऍलोपऍथीचा उपचार केला नाही तर त्याचे उरलेले आयुष्य अधिक सुखाने जाते का? असा रुग्ण हळूहळू क्षीण होत जाणे अपेक्षित आहेच, पण त्याला जर इतर कोणताही त्रास होत नसेल तर आणि अशक्तपणा सहन करण्याची मानसिक तयारी असेल तर आहे ती स्थिती तरी टिकवता येते का?
रुग्णाचे वय ७३ वर्षे आहे आणि शस्त्रक्रिया करून काहीही उपयोग होणार नाही असे सांगितले आहे.
ऍलोपथीच्या उपचाराने शरीराचा भार वाहत मृत्यूची वाट बघण्यापलीकडे काहीही होत नाही. माझ्या म्हणण्याचा आधार- झाड वाढावे म्हणून ते छाटून टाकतात. जितके छाटावे तितके ते जास्त फोफावते. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. या बाबतीत संशोधन होते आहे का? झाले आहे का? कुणी अशा रुग्णावर उपचार केले आहेत का? कृपया जाणकारांनी प्रतिसाद द्यावा.
याबाबतीत (कर्करोगावरच्या आयुर्वेदीय उपचारपद्धतीबद्दल) योग्य आणि अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आत्यंतिक गरजेचे आहे.
शिवाय, भौतिक पातळीवर कर्करोगाचा सामना करतानाच तो मानसिक पातळीवर, पण गनिमी काव्यानेही करता येऊ शकत असला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे. याबाबतही जाणकारांनी विचार करणे गरजेचे आहे.
आपल्याच शरीराच्या बंडखोर झालेल्या पेशींना मानसिक पातळीवर रुग्णाने शरीरात सामावून घेऊन जास्त मानाने जगण्याची लालूच दाखवली तर ह्या रोगाचा सामना जास्त चांगल्या प्रकारे करता येईल. कदाचित माझे म्हणणे वेडेपणाचे वाटेल पण नुसती इच्छाशक्ती असे नाव न देता इतर औषधी उपचारांप्रमाणे याही उपचाराचे पूर्वनियोजन करता येऊ शकते का? विचारवंतांनी यावर अधिक विचार करावा.

Comments

सहानुभूती

संकटांमध्ये असे विचार येतात हे खरे आहे आणि भावना न दुखावता त्यांचा प्रतिवाद अवघड असतो.

स्वादुपिंडाच्या कर्करोगावर यशस्वी आयुर्वेदीय उपचार होणं शक्य आहे का?

आयुर्वेदात उल्लेखिलेल्या काही औषधांचा कर्करोगावर उपयोग होणे शक्य असले तरी त्या उपयोगाला आयुर्वेदिक म्हणणे योग्य होणार नाही. आयुर्वेदातील बहुतेक सर्वच औषधी द्रव्ये निव्वळ प्रयत्न-प्रमाद तत्त्वाने नोंदविलेली आहेत आणि त्या ट्रायल एररफ्री असल्याची नीटशी खात्रीही त्या लोकांनी बाळगलेली नाही. जी औषधे खरोखरीच प्रभावी असतात त्यांमागेही 'आयुर्वेद' अशी काही विचारसरणी नाही.

मुळात कर्करोगाच्या गाठीला शस्त्र लावले तर तो अधिक उफाळून नाही का येणार?

असे ठाम विधान शक्य नाही.

आणि जर त्यावर कोणताही ऍलोपऍथीचा उपचार केला नाही तर त्याचे उरलेले आयुष्य अधिक सुखाने जाते का?

ठाम विधान शक्य नाही.

असा रुग्ण हळूहळू क्षीण होत जाणे अपेक्षित आहेच, पण त्याला जर इतर कोणताही त्रास होत नसेल तर आणि अशक्तपणा सहन करण्याची मानसिक तयारी असेल तर आहे ती स्थिती तरी टिकवता येते का?

संदिग्ध प्रश्न. उत्तर: शक्य असावे.

ऍलोपथीच्या उपचाराने शरीराचा भार वाहत मृत्यूची वाट बघण्यापलीकडे काहीही होत नाही. माझ्या म्हणण्याचा आधार- झाड वाढावे म्हणून ते छाटून टाकतात. जितके छाटावे तितके ते जास्त फोफावते. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. या बाबतीत संशोधन होते आहे का? झाले आहे का? कुणी अशा रुग्णावर उपचार केले आहेत का? कृपया जाणकारांनी प्रतिसाद द्यावा.

असा काहीही अटळ नियम नाही.

शिवाय, भौतिक पातळीवर कर्करोगाचा सामना करतानाच तो मानसिक पातळीवर, पण गनिमी काव्यानेही करता येऊ शकत असला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे. याबाबतही जाणकारांनी विचार करणे गरजेचे आहे.

सत्याला सामोरे जाणे हे मूलभूत तत्त्वच चांगले आहे.

आपल्याच शरीराच्या बंडखोर झालेल्या पेशींना मानसिक पातळीवर रुग्णाने शरीरात सामावून घेऊन जास्त मानाने जगण्याची लालूच दाखवली तर ह्या रोगाचा सामना जास्त चांगल्या प्रकारे करता येईल. कदाचित माझे म्हणणे वेडेपणाचे वाटेल पण नुसती इच्छाशक्ती असे नाव न देता इतर औषधी उपचारांप्रमाणे याही उपचाराचे पूर्वनियोजन करता येऊ शकते का? विचारवंतांनी यावर अधिक विचार करावा.

होय, हे म्हणणे वेडेपणाचे वाटते. पेशींना मन नसते.

कर्क रोग

गेल्या ४/५ वर्षामधे माझे दोन निकटचे नातलग कर्करोगाला बळी पडले. या दोघांच्याही शेवटच्या कालावधीमधे त्यांच्यावर अनेक प्रकारचे उपचार करण्यात आले. आधुनिक औषधांपासून आयुर्वेदिक औषधांपर्यत सर्व औषध योजना झाल्या. काही प्रकारचे कर्क रोग सोडले (ब्रेस्ट, सर्व्हायकल आणि विशिष्ट प्रकारचा ल्युकेमिया) तर बाकीच्या कर्करोगांवर प्रभावी औषध योजना अजुन सापडलेली नाही हे कटू सत्य आहे. या आधुनिक औषध योजना फक्त आशा दाखवत राहतात असा माझा अनुभव.

कर्करोग झालेल्या रुग्णाला कोणतीही वेदना न होता त्याला नॉर्मल आयुष्य जगता ये ईल अशी औषध योजना केल्यास त्याचे जे काय उर्वरित आयुष्य असते ते तरी आरामदायी होईल असे बघावे असे मला वाटते.
आयुर्वेदातील कोणत्याही औषधयोजनेचा प्लॅसिबो परिणाम सोडला तर बाकी काही उपयोग होतो असे मला वाटत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत आहे| शंका

माझ्या एका जवळच्या नातेवाईकांना वयाच्या ७४व्या वर्षी फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यांची मुलगी स्वतः अमेरिकेत आँकॉलॉजिस्ट असल्याने तिने ऍलोपथीचे सर्व उपचार केले. किमो वगैरे उपचार केल्याने या गृहस्थांची प्रकृती ढासळली. रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आणि ते जे ६-८ महिने जगले त्यात त्यांना न्यूमोनिया वगैरे इतर रोगांनीही ग्रासले. अतिशय वेदना सहन केल्यावर त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबात या गोष्टीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यात काहींना असा प्रश्न पडला की 'या वयात त्यांना असल्या उपायांना तोंड द्यावे लागले नसते तर ते थोडे अधिक आणि कमी वेदनेत जगले असते का?' ज्यावेळी त्यांचे कॅन्सर निदान झाले त्यावेळेस ते आत्यंतिक वेदनेत नव्हते. किंबहुना, त्यांचा कॅन्सर आतमध्ये फोफावला असेल अशी पुसट शंकाही आली नव्हती. अशावेळी रुग्णाला खरेच इतर काही उपाय करून (आयुर्वेद, होमीओपॅथी वगैरे असे सांगण्याचा हेतू नाही) शांत मरण देता येणे अशक्य आहे का असा प्रश्न पडतो.

उपक्रमावर डॉक्टर आहेत त्यांनी कृपया शंकानिरसन करावे.

वरील प्रतिसादाबद्दल चू. भू. दे. घे. माझे वैद्यकीय ज्ञान यथातथा आहे.

शेवटचा दीस गोड व्हावा

कर्करोग झालेल्या रुग्णाला कोणतीही वेदना न होता त्याला नॉर्मल आयुष्य जगता ये ईल अशी औषध योजना केल्यास त्याचे जे काय उर्वरित आयुष्य असते ते तरी आरामदायी होईल असे बघावे असे मला

वाटते.
हेच म्हणतो. शेवटचा दीस गोड व्हावा.

आयुर्वेदातील कोणत्याही औषधयोजनेचा प्लॅसिबो परिणाम सोडला तर बाकी काही उपयोग होतो असे मला वाटत नाही.

पण होमीपदीत उपाय असू शकतो. काही जणांची हाडे (जिभेला असलेले, नसलेले हाड धरून) होमीपदीमुळे नीट जुळली असल्याचे कळते. त्यामुळे आता ही मंडळी आता खूपच सक्रिय झाली आहेत आणि नैराश्य जाऊन आत्मविश्वासाने बोलू लागली आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हाच तर कळीचा विषय

अशावेळी रुग्णाला खरेच इतर काही उपाय करून (आयुर्वेद, होमीओपॅथी वगैरे असे सांगण्याचा हेतू नाही) शांत मरण देता येणे अशक्य आहे का असा प्रश्न पडतो.

माझ्या वडिलांचा १९८९ साली कर्करोगाने यातनामय मृत्यु झाला तेव्हा मला ही हा प्रश्न पडला होता. डॉक्टरही या विषयावर बोलण्यास असहाय्य होते. दयामरण हा विषय अजुनही रेंगाळत पडला आहे.
प्रकाश घाटपांडे

दयामरण

दयामरण हा माझ्यामते उपाय नाही, पळवाट आहे. :-( बाकी सहमत.

दया मरण

ते कस आहे माहित आहे का? म्हणायचे आहे द्यामरण पण आपलं सहानुभुती जास्त होण्यासाठी दयामरण...

माफ करा

रुग्णाचे वय ७३ वर्षे आहे आणि शस्त्रक्रिया करून काहीही उपयोग होणार नाही असे सांगितले आहे.
वय आन आजार पाहता रुग्णाची जेवढी सेवा करता इन तेव्हढी सेवा करा.
प्रत्येकाला जगायची इच्छा शेवटच्या श्वासालोक राहती.
तशी आजारी मान्साला बी जगावं वाट्ट.
जीवलग मान्सासाठी लय करावं वाटतं.
पर उगा आपरेशनससाठी खर्च करु नका.
असा सल्ला दिल्याबद्दल बाबुरावला माफ करा.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :(

^ वर