जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

चित्रपट एक पाहाणे

प्रस्तुत प्रस्ताव लिहिण्याचे कारण वैयक्तिक दृष्टीने अतिशय तात्कालिक आहे. ते लिहिण्यामागे कसलाच अभ्यास किंवा नीट विचार केलेला नाही. परंतु वैयक्तिक पातळीवरच्या शंकाना इथे स्थान आहे असे धरतो.

कोडे: घड्याळे आणि इमारत

समजा आपल्याकडे एकाच प्रकारची अनेक घड्याळे आहेत. एका १०० मजली इमारतीच्या विशिष्ट क्ष व्या मजल्यावरून खाली पडले तर कोणतेही घड्याळ फुटेल, क्ष पेक्षा वरच्या कोणत्याही मजल्यावरून खाली पडले तरी कोणतेही घड्याळ फुटेल. क्ष पेक्षा खालच्या कोणत्याही मजल्यावरून खाली पडले तर मात्र कोणतेही घड्याळ फुटणार नाही. क्ष हा मजला कोणता ते शोधावयाचे आहे.

शासनव्यवस्थेचे संगणकीकरण

एक काळ असा होता की या देशातील लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना अर्थकारणातील ‘ओ’ की ‘ठो’ कळत नसे. तरीसुद्धा हे प्रतिनिधी लोकहितार्थ निर्णय घेत होते. त्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देत होते.

‘मराठी मंडळी’वर लेखन करण्यासाठी निमंत्रण

» सुचना: ही जाहिरातबाजी नाही तर एक निमंत्रण-पत्रिका आहे, लोकांना माहिती व्हावी यासाठी हा खटाटोप.


mm_logo.png
केवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले 'मराठी मंडळी' हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून लेखकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले [चर्चासत्र], चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे 'मराठी मंडळी' ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला.

प्रतिकर्षित करणारे गुरुत्व नसते काय?

गुरुत्वाकर्षण बल हे आकर्षणात्मक असते.

उदाहरणार्थ: विद्युत बलाशी गुरुत्वाकर्षण बलाची तुलना केली तर असे आढळते की विद्युत बल हे आकर्षित तसेच प्रतिकर्षितही करते. दोन विरुद्ध प्रभारांमध्ये आकर्षण तर दोन सारख्या प्रभारांमध्ये प्रतिकर्षण असते. यावरून हे स्पष्ट आहे की विद्युत प्रभार एकमेकांचा प्रभाव रद्द किंवा नष्ट शकतात. विद्युत बलाच्या ह्या परस्परविरोधी गुणधर्मांचा वापर करून विद्युत बलरहित क्षेत्राची निर्मिती करणे शक्य असते. विद्युत बलापासून स्वतःचा बचाव करणे त्यामुळे शक्य होते. अशाच प्रकारे चुंबकीय बलाशीदेखील गुरुत्वाकर्षणाची तुलना केली असता—चुंबकांचे विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे असतील तर त्यांच्यात आकर्षण उद्‍भवते पण सारखे ध्रुव एकमेकांकडे असल्यास प्रतिकर्षण उद्‍भवते.

गुरुत्वाकर्षणाचं मात्र असं नाही. हे बल वरील उदाहरणांतील बलांपेक्षा वेगळे आहे. गुरुत्वाचा प्रभाव सर्वत्र असतो, अन् तो सारखाच असतो. त्यापासून बचाव करणं अशक्य वाटते. यावरून, प्रतिकर्षित करणारे गुरुत्वीय बलच अस्तित्वात नसते काय? त्याचे कारण काय, जर असे नसेल तर असे प्रतिकर्षण गुरुत्वीय बल लावणे शक्य होईल का?

संपादकांवर अंकुश कुणाचा?

मराठी संकेतस्थळांबाबत उत्तरोत्तर प्रगल्भ होत जाणार्‍या 'रोचक' चर्चा वाचून बरेच दिवस मनात वळवळत असलेला हा विषय प्रकाशात आणावासा वाटला.

नविन संकेतस्थळाची गरज आहे का?

उपक्रमावरच्या सध्या चालू असलेल्या काही चर्चा पाहून खालील विचार मनात डोकावले:

  1. उपक्रम हे माहितीप्रधान लेखांसाठी आहे, ललित साहित्याला इथे परवानगी नाही.

विमानतळावरील सुरक्षा कक्षा

आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सूची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत.

उपक्रम

इतर संकेत स्थळांसंबंधी चर्चा चालू असताना. 'उपक्रम' या संस्थळाबाबत चर्चा साहजिक ठरते.

मराठी संकेतस्थळे प्रगल्भ कशी होतील?

नुकत्याच काही संकेतस्थळांवरील काही लेख व काही चर्चा वाचल्या. (आमचे काही मित्र तिथे सहभागी होतात आणि तिथे त्यांना भावुक, हळव्या, उसासेबहाद्दर मॉबला* सामोरे जावे लागते तेव्हा मजा येते.

 
^ वर