उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
नविन संकेतस्थळाची गरज आहे का?
डार्क मॅटर
December 15, 2010 - 6:25 pm
उपक्रमावरच्या सध्या चालू असलेल्या काही चर्चा पाहून खालील विचार मनात डोकावले:
- उपक्रम हे माहितीप्रधान लेखांसाठी आहे, ललित साहित्याला इथे परवानगी नाही.
- माहितीप्रधान लेखन करणे हे जास्त कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. (सगळी माहिती गोळा करणे, संदर्भ देणे इ.इ)
- बर्याच सदस्यांना आंतरजालाचा वापर मुख्यत्वेकरुन करमणुकीसाठी करायचा असतो, त्यामूळे माहितीपूर्ण लेख लिहिण्याचा कंटाळा असतो
- ललित लेख लिहायची मुभा नाही, माहितीपूर्ण लेख लिहायचा कंटाळा ह्यामुळे 'चर्चा' हा लेखन विषय इथे सगळ्यात लोकप्रिय असावा का?
- सध्या ललित लेखन करण्यासाठी प्रगल्भ असे युजर फ्रेंडली संकेतस्थळ उपलब्ध नाही. तेव्हा उपक्रम व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन किंवा काही उपक्रमींनीच पुढाकार घेऊन नवे ललित साहित्य छापणारे असे परंतू प्रगल्भ आणि युजर फ्रेंडली असणारे असे स्थळ काढणे गरजेचे आहे का?
तुम्हाला काय वाटते?
दुवे:
Comments
ची हवे
जी ऐवजी ची हवे.
असे केल्याने माहितीपूर्ण लेख वाचणारे वाचकही कमी होतील असे वाटते का? नसल्यास का नाही?
उपक्रम व्यवस्थापन म्हणजे कोण? फक्त मालक? मालक, तांत्रिक सल्लागार वगैरे?
उत्तरे
धन्यवाद. मला बदलता येत नाही.
नाही. उलट काही तिखट चर्चांमुळे 'विवेकवादी हल्ला झाला' असे वाटून लिहायचे बंद केलेले पुन्हा लिहायला लागतील त्यामुळे वाचक वाढतीलच.
जे जे कोण उपक्रमाचे मॅनेजमेंट पाहतात ते. मालक संपादक तंत्रज्ञ इ.
शंका
.
असे वाटत नाही. ललित साहित्यातील अनेक कल्पना विवेकवादात बसत नाहीत.
उपक्रमाच्या मालकांना कधी उपक्रमावर पाहिले आहे का? ;-) की ते आणखी एक व्याप वाढवतील?
मालक
म्हणजे उपक्रम हे एक अनाथ पोर आहे की काय?;) ज्यांना दया येते त्यांच्या दयेवर वाढलेले ;)
तुम्ही सांगा
माझ्याकडे उत्तर असतं तर प्रश्नच उपस्थित झाला नसता. तुम्ही चर्चा टाकली, संस्थळ सुरु करण्याचा मानस आहे; काही रिक्वायरमेंट गॅदरिंग केले असेल ना तेव्हा उपक्रम हे एक अनाथ पोर आहे का हे तुम्हीच सांगा. :-)
बाकी, नव्या चर्चेला विषय चांगला आहे.
उपक्रम हे एक अनाथ पोर आहे का?
ह. घ्या.
नवीन?
नवीन कशाला? जुनी आहेतच की ढिगभर :)
तुम्हाला काय वाटते? तुम्हाला हवे आहे का?
जुनी
कामाचे एकही नाही. प्रगल्भ आणि यूजर फ्रेंडली हे माझे २ निकष आहेत. ते लागू होणारे एकही संकेतस्थळ नाही. तुम्हाला माहित असल्यास कळवावे.
हो.
निकष
तुम्ही तुमचे निकष ठरवा. कदाचित तुम्हाला हवे तसे संकेतस्थळ बनवता येईल. फक्त ते कसे हवे ते पहा. म्हणजे फुकट की पैसे टाकून की कसे...
आम्ही काही संकेतस्थळांचा जन्म जवळून पाहिला आहे. काही आली आणि गेली. काहींनी एखाद्या संकेतस्थळावरुन बाद केल्याने इर्षेने पैसे टाकून, माणसांसोबत गोडबोलून, मालक बनून संकेतस्थळ बनवून घेतले, त्याचा वापर/गैरवापर* केला आणि सुरु ठेवले. असा काहीसा इतिहास असल्याने नुसत्या लष्कराच्या भाकर्या भाजण्याचे उद्योग कोणी एका माणसाच्या इच्छेसाठी करेल असे वाटत नाही. एकतर स्वत्: कष्टकरुन बनवा अथवा आपल्या निकषांनुसार बनवुन घ्या. संकेतस्थळ बनवणे यात काही खास नाही. ते चांगल्या प्रकारे चालवणे आणि दर्जा टिकवणे आणि त्याचा गैरवापर होऊ न देणे या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. बाकी ॐकारने गमभन बनविल्यापासून मराठी संकेतस्थळ बनवणे फार अवघड राहिलेले नाही.
?
रेक्वायरमेंट नं ३- करमणुकीसाठी संकेतस्थळ आणि रेक्वायरमेंट नं ५- प्रगल्भ या दोन परस्पर विसंगत वाटत नाहीत का?
नितिन थत्ते
का बरं?
का बरं? प्रगल्भ करमणूक असे काही नसते का? करमणूकीसाठी गोलमाल३ टाईप सिनेमेच पाहिले पाहिजेत का? प्रगल्भ म्हणजे सिरीयस नव्हे.
उदाहरणे द्या
काही उदाहरणे द्या म्हणजे नेमके कसे संकेतस्थळ हवे ते कळेल.
सोयीसाठी गोलमाल३ प्रमाणे चित्रपटांची दिलीत तरी चालेल.
+१
पुढे जाऊन मी तर असे म्हणेन की डॉट मार्कर ने स्वतः पायंडा पाडुन द्यावा. आणि एक प्रगल्भ करमणुक् करणारा लेख् लिहावा. म्हणजे आमच्या सारख्या सामान्यजनांना त्यातुन बरंच् काही शिकता येईल् . उगाच 'प्रगल्भ् करा...','प्रगल्भ् करमणुक् करा' , अशी बोलबच्चन झाडुन काही प्रगल्भ करमणुक होत नसते :)
- हॉट पर्कर
अस्स
अस्स???
(मिशीला पीळ - जुना मराठी चित्रपट.) अरे तिथे कोणी अजुन आहे की नाही टाळ्या वाजवायला :)
:)
कोणी नसेल तर तुम्हीच वाजवा ... टाळ्या :)
- टारझन
आंतरजालीय "दिवाळी अंक"
मुक्त अभिव्यक्ती असलेली स्थळे सुद्धा हवीत. ती तर आहेतच.
"महाराष्ट्रातील समृद्ध परंपरेच्या छापील मासिकांत छापून येऊन लोक पैसे टाकून वाचतील त्या दर्जाचे" असे लेखन आंतरजालावर नियमित करण्याइतपत लेखक मराठी संकेतस्थळविश्वात आहेत काय? माझ्या मते नाही. इतका वेळ, इतकी हौस, इतकी प्रतिभा आणि इतके कौशल्य या सर्वांचा मिलाफ असलेले पुरेसे लेखक उपलब्ध नसावेत.
मग असे लेखन रोजच्या रतिबाने नव्हे तर अधूनमधून संकलित करावे, अशी महत्त्वाकांक्षा ठेवता येईल.
असे ललित साहित्य अधूनमधून संकलित करणारे संकेतस्थळ असू शकते. जरूर. हल्लीच्या संकेतस्थळांनी वाटल्यास असे करावे : त्यांच्या संपादकमंडळाच्या अनुसार दर्जेदार साहित्य असलेले "दिवाळी अंक" किंवा वसंत/शरद अंक प्रकाशित करावेत. "दर्जेदार काय" ते ठरवणारे संपादकमंडळ असणार. त्यामुळे मंडळाच्या अभिरुचीच्या मानाने संकलन होईल. हे तर आलेच.
- - -
"संपादनमंडळाने डोळसपणे निवड करावी" ही बाब ललित साहित्याला लागू आहे, तशी "उपक्रम" संकेतस्थळाच्या दिवाळी अंकातील साहित्यालाही लागू आहे.
निष्कर्ष
वरील चर्चा वाचून झाल्यावर एकच निष्कर्ष निघाला. नवीन संकेतस्थळाची गरज नाही.--वाचक्नवी
आभारि आहे
निष्कर्षाबद्दल आभारि आहे....
निदान चर्चेला लगाम तरि बसला.............
दर्जेदार संकेतस्थळाची गरज
वरली चर्चा आणि प्रतिसाद वाचून मौज वाटली. प्रगल्भ म्हणजे काय हे आम्हालाही माहित नाही पण दर्जेदार लेखन असणारी एक साइट हवी असे वाटते.
या साइटवर येणारे साहित्य शुद्धलिखित, कथा-काव्य, स्फुट, लेख, चर्चा असे हवे. आणखी प्रकारही यावेत पण लेखनावर अंकुश हवा. प्रतिसादांवरही अंकुश हवा.
आम्हाला विचाराल तर साइट एकदम उपक्रमासारखी हवी..दर्जेदार... पण त्यावर ललित साहित्य भरघोस हवे.
महामहाकठीण
या साइटवर येणारे साहित्य शुद्धलिखित, कथा-काव्य, स्फुट, लेख, चर्चा असे हवे. आणखी प्रकारही यावेत पण लेखनावर अंकुश हवा. प्रतिसादांवरही अंकुश हवा.
आम्हाला विचाराल तर साइट एकदम उपक्रमासारखी हवी..दर्जेदार... पण त्यावर ललित साहित्य भरघोस हवे.
एखादे संकेतस्थळ सुरू करणे सोपे आहे. पण ते चालू ठेवणे महाकठीण. त्यातही तुम्ही म्हणता तसे संकेतस्थळ, मंडई किंवा खरडवही न होऊ देता, गाजत-गजबजत ठेवणे महामहाकठीण. सहसा खूप दर्जेदार मजकूर खूप वेगाने पैदा करता येत नसतो. त्यामुळे आधी फोकस सपष्ट हवा. मात्र मराठीला अधिकाधिक दर्जेदार संकेतस्थळांची गरज आहे ह्याबद्दल दुमत नसावे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
संकेतस्थळाची गरज
हे तर खरेच आहे. यावर एक उपाय म्हणजे संकेतस्थळाचा एक मालक असण्यापेक्षा एका गटाने मालकी स्वीकारणे. (खूप लोक नकोत.)
हे तर उपक्रमावरही होतेच की परंतु ललित लेखनात कविता, पाककृती, कथा वगैरे अनेक साहित्यप्रकार आल्याने सदस्यही अधिक येतील आणि लेखनही जास्त येईल. दर्जेदार लेखन अभावाने येत असेल तर चर्चावगैरेंसारखे बॅक-अप प्लॅन्स ठेवता येतील. मी हल्लीच इतरत्र म्हटले होते की उपक्रमावर चर्चाविषयक धोरण थोडे शिथिल आहे, तसे काहीसे.
चांगले संकेतस्थळ सुरु करण्यासाठी मनुष्यबळ आणि योग्य धोरणे स्पष्ट हवीत असे वाटते. लेखकांना चांगले साहित्य देण्यास उद्युक्त करायला हवे. धोरणांत न बसणारे साहित्य संपादित करायला हवे. पण सर्वात आधी संकेतस्थळाचे प्रयोजन काय आहे ते स्पष्ट हवे. जसे, उपक्रमाचे प्रयोजन 'माहितीची देवाणघेवाण' हे आहे. पुस्तकविश्वचे 'पुस्तकांबद्दलची सर्वप्रकारे माहिती' असे आहे. नवे संकेतस्थळ काढायचेच असेल तर ते सोशल नेटवर्किंग साइट एवढ्याच धरतीचे नको असे वाटते. तशी अनेक संकेतस्थळे आज आहेत - मिपा, मी मराठी वगैरे.
धनंजय म्हणतात -
याच्याशी मी सहमत आहे.
हे मात्र मला कळले नाही. म्हणजे आधी इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य या संकेतस्थळावर संकलित करावे असे म्हणायचे आहे का?
--
असो. दिगम्भांनी एकदा विकीपीडियाच्या संदर्भात म्हटलेले एक वाक्य मला जसेच्या तसे आठवत नाही म्हणून ते थोडे वेगळ्या शब्दांत मांडते - "चार चांगली माणसे एका चांगल्या हेतूने एकत्र येतात तेव्हा त्यांच्या हातून चांगलेच काम घडते. एखादवेळेस काम जरी बिघडत असले तरी ते बिघडावे असा त्यांचा हेतू नसतो तेव्हा अधिक हातभाराने ते बिघडणारे काम सुधरवणे शक्य असते."
उपक्रमावर नियमित येणारे काही सदस्य असा उपक्रम का हाती घेऊ शकत नाहीत?
अधूनमधून म्हणजे जालीय दिवाळी अंक किंवा त्रैमासिक
अधूनमधून म्हणजे जालीय दिवाळी अंक (किंवा षण्मासिक किंवा त्रैमासिक) काढता येईल.
उपलब्ध चर्चा-संकेतस्थळाचाच एक विभाग असा संपादित असू शकतो. लेखन नवीनच. पण लेखन नेटके, संपादित, मुद्रितशोधित आणि सुबक मांडणीचे (टाइपसेटिंग-पेजसेटिंगचे) असल्याकारणाने लेखकांना तिथे लेख देण्यासाठी विशेष आत्मीयता वाटेल.
संपादन-मांडणीसाहाय्य हे कष्टाचे असल्याकारणाने व्हॉल्यूमवरती मर्यादा पडतात, प्रकाशनाचे रेशनिंग होते - गर्विष्ठपणामुळे नव्हे - हे लेखकवर्ग-वाचकवर्ग ओळखेल. कदाचित.
मात्र प्रकाशनासाठी निवडलेले साहित्य हे संपादकांच्या अभिरुचीवर अवलंबून असेल. कित्येक उत्कृष्ट कथा किंवा कविता संपादकांच्या अभिरुचीला मानवणार्या नसल्या, तर त्या प्रकाशित होणार नाही. यास गत्यंतर नाही. हा तोटा फायद्याच्या मानाने खूप कमी असल्याची काळजी संकेतस्थळ चालकांनी घेतली तर "यश" म्हणायला हरकत नाही.
तर मग...
ही ऐडिया चांगली असली तरी त्यातून सदस्य सहभाग कमी राहिल. लोकांना रोजच्या रोज गप्पा टप्पा करत प्रतिसाद/ चर्चा करू देणारे स्थळ अधिक आवडते असे निरीक्षण आहे.
हे आवडले पण हे करण्यास स्वयंसेवक (पक्षी:संपादक) हवेत. असे कोणी स्वतःहून पुढे येत असेल तर उत्तम. अन्यथा, असे लेख जमा करून त्यातले काही निवडून प्रकाशित करता येतील. प्रायोगिक तत्त्वावर उपक्रमाचाच असा विभाग सुरु करता येईल. (अर्थात, हे आपण कोण ठरवणार? उपक्रमपंतांनी लक्ष घातले तर उत्तम) फक्त उपक्रमाच्या रोजच्या लेखांत ही ललित लेखनाची सरमिसळ नको. दिवाळी अंकाप्रमाणे तेथे टिचकी मारून जाता यायला हवे.