विमानतळावरील सुरक्षा कक्षा

आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सूची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत. त्या पदावर जर कोणी असेल तर त्या इसमाला सुट.

शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा नामक ईसमाचे आहे. आता हा रॉबर्ट वाडरा कोण. त्याने असे काय केले की त्याला सुट आहे. भारतात जर अजुन कोणी त्याच नावाची असतील त्या सगळ्यांना सुट आहे का.

अजुन कोण कोण पात्र होतील त्या सुचीत नाव सापडण्या योग्य.

सचिन तेंडुलकर, रतन टाटा इत्त्यादीं चे नाव येऊ शकते का.

Comments

शंका

कुण्या काँग्रेसद्वेष्ट्या बाबूने मुद्दाम ही ओळ त्या सरकारी आदेशात घातलेली असू शकते.

नियम

मुख्य गांधी घराण्यातील माणसाशी कोणचेही नाते जोडलेल्या माणसाला हि सूट म्हणजे खूपच कमी आहे असे वाटते. त्याला स्फोटके न्यायला परवानगी नाही हे काय कमी आहे?

अशी यादीच असू नये असे मला वाटते. सर्वाना हा नियम सारखाच लागू असावा. लागू केला नाही तर त्याचा अर्थ नियम जाचक किवा अपमानास्पद आहे असा अर्थ निर्माण होतो.

अवांतर - "सिक्युरीटी तून" ..."सिक्युरीटी चेक मधून" असे असावे.

धन्यवाद

चुक दाखवल्या बद्दल.
लोभ असावा

पद का व्यक्ति?

साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत. त्या पदावर जर कोणी असेल तर त्या इसमाला सुट.

शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा नामक ईसमाचे आहे. आता हा रॉबर्ट वाडरा कोण.

पहिल्यांदा आपण पदाविषयी लिहिता. (याचा अर्थ पंतप्रधान, सेनाप्रमुख इत्यादी) ही २१ आहेत असेही लिहिता. शेवटी फक्त एक नाव लिहिता. यात गोंधळ आहे.

यावर संदर्भ द्याल का? म्हणजे ही सूची कुठल्याविमानतळावर कुठल्या द्वारावर पाहिली वगैरे.

प्रमोद

संदर्भ

त्यांनी लिहिलंय, तसंच आहे यादीत. बाकीची सगळी पदे, आणि एकच नाव.
नितिन थत्ते फोटो देतीलच.

म्हणजे?

नितिन थत्ते फोटो देतीलच.

म्हणजे काय? थत्ते हे चितळेंचे अधिकृत फोटोग्राफर आहेत की काय? कि चितळे जिथे जातील तिथले फोटो थत्ते काढतात? काही समजले नाही बुवा!!






फोटो

ज्ञानेश... यांच्या विश्वासास सार्थ करण्यासाठी फोटो देणार होतो. पण तो फार मोठा आहे आणि आकार लहान करता येईना म्हणून तो येथे पहावा.

सदर यादीत रॉबर्ट वधेरा एस्पीजी प्रोटेक्टीज बरोबर प्रवास करताना सूट असं स्पष्ट लिहिलं आहे.
एस् पी जी प्रोटेक्टीज् म्हणजे ज्यांना एस् पी जी सुरक्षा दिली जाते अशा व्यक्तींबरोबर (बहुधा गांधी कुटुंबीय) जात असताना सुरक्षा चाचणीतून सूट आहे. रॉबर्ट वधेरा एकटे जात असताना सूट नाही.

नितिन थत्ते

पूर्वप्रकाशित

पूर्वप्रकाशित लेखन उपक्रमावर प्रसिद्ध केले जात नाही असे समजते. सदर धागा अन्यत्र प्रकाशित झालेला आहे. असे चालते का?

जिथे हा धागा याअगोदर प्रकाशित झाला, तिथे या रॉबर्ट वधेरा नामक इसमाला मिळत असलेल्या सवलतीविषयी श्री थत्ते यांनी व्यवस्थित प्रतिसाद दिलेला होता. तोच पुन्हा इथेही दिलेला आहे. सचिन तेंडुलकर इ. विषयीही हेच. उत्तर मिळालेले आहे. मग कशासाठी हा प्रस्ताव आहे? कसली चर्चा नेमकी अपेक्षित आहे? चर्चेचे मुद्दे प्रस्तावकांनी स्पष्ट करावेत.

तसे नाही

पूर्वप्रकाशित लेखन उपक्रमावर प्रसिद्ध केले जात नाही असे समजते.

हे मलाही सुमारे तीन-चार वर्षांनी प्रमोद सहस्रबुद्ध्यांच्या लेखात आज समजले पण उपक्रमावर तसा काही नियम नाही.

हम्म!

यशवंत कुलकर्णी यांच्या लेखांनंतर हे कलम आलेले आहे की कसे ते माहित नाही कारण असे पूर्वी पाहिल्याचे आठवत नाही. उपक्रमाच्या जन्मापासून काही प्रभृती आपले लेख इथे आणि तिथे टाकत असत. पैकी काही जणांना कृपया असे करू नका अशी विनंती करावी लागली होती.

सहमत

मी सुद्धा असे लेख इथे आणि तिथे टाकले आहेत. उदा "इंजिनिअरिंग व्यवसायाची स्थिती".

मला वाटते स्वतःचे लेख दोन्हीकडे टाकण्यास काही हरकत नसावी.
दोन संकेतस्थळांवरील सदस्यांची प्रकृती भिन्न असल्याने वेगळी मतांतरे जाणण्यासाठी दोन्ही ठिकाणी लेख टाकणे योग्य वाटते.

नितिन थत्ते

'जसेच्या तसे नाही' ही पळवाट चितळे यांनी वापरली आहे काय

आपली प्रतिक्रीय पटली. आता पासुन दुस-या संकेतस्थळावर माझेच साहित्य प्रकाशित करायला, मी किमान सहा महीने तरी मी थांबेन .

उपाय

मूळ लेखनातील एखादा शब्द जरी बदलला तरी ते नवे लिखाण म्हणून सहा महिने वाट न बघता प्रसिद्ध करता येऊ शकेल ;)
सहा महिन्यांनंतर 'जसेच्या तसे' प्रसिद्ध करण्याची मुभा मनोगत या संस्थळावर आहे, येथे असल्यास मला माहिती नाही.

आपली प्रतिक्रीय पटली.

आपली प्रतिक्रीय पटली. आता पासुन दुस-या संकेतस्थळावर माझेच साहित्य प्रकाशित करायला, मी किमान सहा महीने तरी मी थांबेन .

नको

थांबण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही.

प्रत्येक संकेतस्थळाची प्रकृती वेगळी असते. त्यानुसार प्रतिसाद वेगवेगळे येतात.

याच धाग्याचे पाहिले तर तिकडे आलेले "हे अमके तमके हरामखोर....... आपल्यावर राज्य करतात...... देशाचे दुर्दैव" टाइप प्रतिसाद येथे येणार नाहीत.

आपल्याच राष्ट्रव्रत मालिकेवरचे प्रतिसाद देखील वेगवेगळे असल्याचे पाहिलेच असेल.

नितिन थत्ते

हे नवीन

हा नियम नवीन आहे. याची गरज का पडली याबद्दल उत्सुकता आहे. कारण एकच लेख, एकाच वेळी (उपक्रमासह) तीन-चार ठिकाणी प्रकाशित झालेला बरेचदा पाहिला आहे.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

नवीन

Jul 04, 2007
Aug 20, 2007
Mar 03, 2008
या नंतर कधीतरी नियम आलेला आहे परंतु तो नवीन नसावा, यशवंत कुलकर्णी यांच्या लेखांविरुद्ध तक्रार करताना तो मी वापरला होता.

वा!

कुठली तरी सिद्धी असल्यासारखे आहे. (रणजित चितळे-ज्ञानेश-नितिन)

यातली गंमत म्हणजे सर्व एस पी जी प्रोटेक्टीजना सूट आहे. (हे ३०व्यात स्पष्ट लिहिले आहे.)
मग रॉबर्ट वधेरा यांचे नाव का आले? (त्यांना सुरक्षा असेल तर ते भाग ३० प्रमाणे सूट मिळतेच आहे.) (कॅच २२ ची आठवण)

यामागे बरीच कागदे लढवली गेली असणार असे वाटते. (म्हणजे रॉबर्ट प्रियांका एस पी जी प्रोटेक्टी बरोबर गेला तर सूट. एकटा गेला तर सूट नाही असे काहीसे.)
पण असा कायदा करायला लावणार्‍या माणसाचे कौतुक केले पाहिजे. (त्याने तपासले असणार. तपासायचे नाही तर कायदा दाखवा असे म्ह्टले असेल.)

यावर माहितीच्या अधिकाराने प्रगती केली तर काही पुढील छडा लागू शकेल. हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.

प्रमोद

नाव का आले?

मग रॉबर्ट वधेरा यांचे नाव का आले? (त्यांना सुरक्षा असेल तर ते भाग ३० प्रमाणे सूट मिळतेच आहे.)

रॉबर्ट वधेरा एस पी जी प्रोटेक्टी नाहीत. त्यांच्या पत्नी आहेत. अर्थात तरीही त्यांचे नाव यादीत का यावे हे कळले नाही.

अरेरावी

रॉबर्ट वधेरा एस पी जी प्रोटेक्टी नाहीत. त्यांच्या पत्नी आहेत. अर्थात तरीही त्यांचे नाव यादीत का यावे हे कळले नाही.

रॉब (नाव छान आहे) आपल्या पत्निसमवेत विमानातून गेले असताना, पत्निला जाऊ दिले. त्यांची तपासणी कुणा सुरक्षारक्षकाने योग्य रित्या केली. अशी तपासणी ही भारतात अपमान मानली जाते. हा अपमान पत्नीसमोर झाल्याने अधिक विशेष. (इतर सर्वांचा अपमान करण्याचा सरकारचा हक्कच आहे.) याविरुर्द्ध नियम तीस धरून तक्रार केली गेली. सुरक्षारक्षकाने नियमाकडे बोट दाखवून आपले मत मांडले असणार. म्हणून शेवटी रॉब यांच्या साठी कलम ३१ आले असणार.

ही माझी कल्पना आहे. पण असा नियम करायला भाग पाडणार्‍या सुरक्षा रक्षकाचे कौतुक करायला हवे असे मला वाटते. एरवी नियम नसताना सूट मिळणे आपल्याकडे नवीन नाही.

प्रमोद

 
^ वर